Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शुचि on Tue, 01/22/2013 - 19:33
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
चौकशी
एक मुद्दा मांडायचा प्रयत्न करते - आम्हाला जेव्हा शाळेत लैंगिक शिक्षण मिळालं तेव्हा फक्त "मासिक धर्म" या विषयावर सांगीतले गेले. अजूनही भारतात तीच स्थिती आहे की आता गुप्तरोग/ एडस आदि रोगांची माहीतीदेखील सांगीतली जाते? कारण चित्रपट, कादंबर्‍या आदिंमधून सहजीवनाअची एक इमेज निर्माण केली जाते जी अतिशय रोझी असते, खरं तर वास्तवापासून दूर असते. सततच्या भूलभुलैय्याच्या भडीमारामुळे , हार्मोनल बदलांमुळेदेखील मुलामुलींचे मन भरकटू शकते. शाळा/ विद्यालयांमधून वास्तवाची जाण करुन देण्याचे किती प्रयत्न होतात? वास्तव म्हणजे 'सेफ सेक्स" काय, "लो रिस्क बिहेव्हिअर" कशाला म्हणतात. शारीरीक संपर्काशिवाय किंवा अगदी अचूक सांगायचे झाले तर "बॉडी फ्लुईड एक्स्चेंज" शिवाय आनंद कसा मिळवायचा आदिची माहीती देणे आदि "लैगिक शिक्षणांतर्गत" अंतर्भूत नाही काय? शिक्षक-पालक साधारण कधी ही माहीती देतात? आणि देत नसतील तर हे आवश्यक नाही का? "एकच सहचारी (पार्ट्नर)" हे एक मूल्य यापेक्षा व्यावहारीक स्तरावर किती महत्त्वाचे आहे याचा कशी उहापोह झालेला माझ्या माहीतीत नाही. नैतिक मूल्य-मूल्य म्हणून ती डोक्यावर घेतलेली गोष्ट आहे पण त्याच गोष्टीला जबरदस्त व्यावहारीक मूल्य आहेच हे कधी हायलाईट होत नाही ते. मुलांशी मनमोकळेपणाने बोलणे हे नैतिकतेइतकेच किंबहुना जास्त व्यावहारीक (प्रॅक्टिकल) पातळीवरुन व्हायला पाहीजे. असो. या विषयावर गंभीर आणि संयत प्रतिसादांची अपेक्षा मिपाकरांकडून ठेवली तर वावगे ठरेल का? आशा करते लेखामागची भूमिका जाणवून मग प्रतिसाद येतील. नुसता कळफलक बडवला असे होणार नाही. नाना स्तरांतून, नाना वयाच्या, प्रगल्भतेच्या, व्यवसायीक स्तरांमधून आलेल्या व्यक्ती मिपावर वावरतात तेव्हा ही अपेक्षा अवाजवी ठरु नये.
  • Log in or register to post comments
  • 52031 views

प्रतिक्रिया

Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on Wed, 01/23/2013 - 02:23

In reply to या फँटसीज (उघड) करावयास, by शुचि

Permalink

या फँटसीज (उघड) करावयास,

या फँटसीज (उघड) करावयास, बोलावयास जीवाभावाची/चा मित्र-मैत्रिण का शोधू नये?
:) लैंगिकता वाहवत न्हेते. आगित तुप ओतल्यावर तो विझत नाही तर भडकतो, त्यामुळे "जीवाभावाचं" शोधुन फँटसीज फक्त बोलल्या जात नाहीत तर पोसल्या जातात. केवळ बोलल्या जाणार्‍या फँटसीज लवकरच हुकमी "सिडक्शन" बनतात. म्हणुनच लैंगिक शिक्षणाचा हेतु व पध्दत ही फँटसीमधे इंटरफेअर करणार नसेल तरच ती प्रभावीपणे स्विकारली जाउ शकते. सिगारेटमुळे कँसर होतो हे शिकवुनही ती ओढली जातेच, लैगिक शिक्षणामुळेही फार महान गोष्टी घडत/टळत नसतात. कामप्रेरणा भल्या भल्यांना संपवते/बदलते. लैंगिकतेमुळे मनात अनावश्यक न्युनगंड, वर्तनात पराकोटीचा बदल वा शरीरात रोग तर पोसले जात नाही ना यापुरती जाणीव मुलांना करुन दिली तरी पुरे आहे. या विषयावर बरीच पुस्तके मराठीतही उपलब्ध आहेत जसे की "वयात येताना", "हस्त मैथुन शाप कि वरदान" वगैरे वगैरे वगैरे ही आपण होउन मुलांना वाचायला दिली त्यावरुन चर्चा केलित तरी चालण्यासारखं आहे असं वाटतं. अवांतर:- अमेरिकन पाय मधिल जिम'चा बाप एक सॉलिड कॅरॅक्टर आहे. अर्थात विनोद निर्मीतीला त्याच्या स्वभावाचा वापर करुन आचरट विनोद आहेत पण एकुणच व्यक्तिरेखा लैंगिकतेच्या बाबतित समजुतदार आहे. विषेशतः द्वितीय भाग. स्वजबाबदारीवर चित्रपट पहावा.
  • Log in or register to post comments

Submitted by योगप्रभू on Wed, 01/23/2013 - 01:23

Permalink

आधी स्वच्छता महत्त्वाची...

प्रत्येक व्यक्तीने आधी आपली शारीरिक व मानसिक स्वच्छता आणि आरोग्य जपले तरी चांगली सुरवात होऊ शकेल.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Wed, 01/23/2013 - 02:24

In reply to आधी स्वच्छता महत्त्वाची... by योगप्रभू

Permalink

मी तर म्हणेन - Each soul is

मी तर म्हणेन - Each soul is an eternal pilgrim. आणि मला कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसण्याचा अधिकार नाही एवढं जरी प्रत्येकाने लक्षात घेतलं तरी बरच मिळवलं.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Wed, 01/23/2013 - 11:54

In reply to मी तर म्हणेन - Each soul is by शुचि

Permalink

+१००

नीतिमत्तेच्या, समाज नियमनाच्या आपल्या संकल्पना दुसर्‍यावर लादणे थांबवा. जगा आणि जगू द्या लोकांना मुक्तपणे, कोणत्याही अपराधी भावनेशिवाय पाळू द्या शरीरधर्म. फेकून द्या आपला वृथा अहंकार, सोडून द्या हट्ट सगळे पर्फेक्ट असण्याचा आणि सोडून द्या आव समाजाचे इंजिनिअरिंग करण्याचा. जगातल्या कोणत्याही धर्मापेक्षा शरीरधर्म महत्त्वाचा आहे. पचनसंस्थेबद्दल शिकवल्याने माणसाची भूक भागत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवट on Wed, 01/23/2013 - 11:57

In reply to +१०० by नगरीनिरंजन

Permalink

आमेन..

आमेन..
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Wed, 01/23/2013 - 17:24

In reply to +१०० by नगरीनिरंजन

Permalink

अगदी खरं आहे

जगा आणि जगू द्या लोकांना मुक्तपणे, कोणत्याही अपराधी भावनेशिवाय पाळू द्या शरीरधर्म.
कोणतेही प्रेमी युगल हे काही एक "कॅल्क्युलेटेड रिस्क" घेऊन, जवळ येत (येत असावे). त्यांच्या शारीरीक, मानसिक गरज, त्यांचे ऋणानुबंध असतील, स्पिरिच्युअल अ‍ॅस्पायरेशन्स ही असतील. यात समाजाला मधे पडण्याचा अधिकार नसावा. दूषीत नजरेने, पोट्दुखीने त्यांच्याकडे पहाणे हीच विकृती.
  • Log in or register to post comments

Submitted by योगप्रभू on गुरुवार, 01/24/2013 - 11:44

In reply to अगदी खरं आहे by शुचि

Permalink

हो बरोबर आहे, पण

बरोबर आहे, पण त्या युगुलांनीही आपली स्पिरिच्युअल अ‍ॅस्पायरेशन्स बंदिस्त साधनागृहात शेअर करावीत. आजकाल बरीच युगुले ही साधना सार्वजनिक ठिकाणी करतात. त्यामुळे लगेच चमत्कार घडू लागतात. उदाहरणार्थ - बागेत लहान मुले अशा साधनास्थळांकडे वेगाने आकर्षिली जातात. त्यांचे चेंडूही सतत तिकडे जाऊ लागतात. त्यामुळे युगुलांच्या साधनेत आणि मुलांच्या खेळण्यात व्यत्यय येतो. पुन्हा मुलांना या अध्यात्माच्या शंका पडतात त्यांचे निरसन आम्हा पालकांना सोप्या भाषेत करता येत नाही. त्यामुळे मला वाटते, की लैंगिक शिक्षणाचा सुबोध असा अभ्यासक्रम तयार व्हायला हवा. सोप्या आकृत्यांच्या किंवा चित्रमय पद्धतीने विषय सोपा करुन सांगायला हवा. एकदम फ्रॉइडियन थिअरी मुलांना झेपणार नाही, असे वाटते.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 01/24/2013 - 12:39

In reply to हो बरोबर आहे, पण by योगप्रभू

Permalink

स्कोप आहे

लैंगिक शिक्षणाचा सुबोध असा अभ्यासक्रम तयार व्हायला हवा. सोप्या आकृत्यांच्या किंवा चित्रमय पद्धतीने विषय सोपा करुन सांगायला हवा
किंवा अ‍ॅनिमेशन वापरून, त्यातल्या त्यात ३डी आणि व्हीएफऐक्स बेस्ट. वा वा. चला, आहे पुढे स्कोप आम्हाला. को की नै रे स्पावड्या? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Wed, 01/23/2013 - 01:25

Permalink

अजुनहि कुनाच्याच प्रतिसादात

अजुनहि कुनाच्याच प्रतिसादात नाविन्य नाहि . तेच तेच वाचल्यागत वाटतय .
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on Wed, 01/23/2013 - 12:28

In reply to अजुनहि कुनाच्याच प्रतिसादात by जेनी...

Permalink

आपल्याबद्दल आदर वाटू लागलेला

आपल्याबद्दल आदर वाटू लागलेला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Wed, 01/23/2013 - 21:29

In reply to आपल्याबद्दल आदर वाटू लागलेला by खटासि खट

Permalink

आपल्याला वाटलेला आदर हा नक्कि

आपल्याला वाटलेला आदर हा नक्कि आदरच आहे का , अशी शंका वाटु लागलेली आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on गुरुवार, 01/24/2013 - 08:59

In reply to आपल्याला वाटलेला आदर हा नक्कि by जेनी...

Permalink

गणिताचार्य रामाणुजन विलायतेत

गणिताचार्य रामाणुजन विलायतेत गेल्यावर तेथील शिक्षक म्हणाले तु काहुन लक्ष देत नाही ,त्यावर रामाणुजन म्हणाले हे तर मी पयलीतच शिकलो बुवा. तशीच गत तुमची झालेली दिसतेय पुजा बै
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on गुरुवार, 01/24/2013 - 20:09

In reply to गणिताचार्य रामाणुजन विलायतेत by श्री गावसेना प्रमुख

Permalink

ओ सेनाप्रमुख तुमी तुमच्या

ओ सेनाप्रमुख तुमी तुमच्या गावाच्या विकासाचं बघा .... उगा नको त्याच्या आयुष्यात नाक खुपसु नका ..... आयंदा याद रखना !
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Fri, 01/25/2013 - 09:01

In reply to ओ सेनाप्रमुख तुमी तुमच्या by जेनी...

Permalink

मी कुठे नाक खुपसल लागल ना

मी कुठे नाक खुपसल Image removed. लागल ना बोलन (इथे मध्ये खाजगी आयुष्य नका आणीत जाउ,सगळ कस निथळ हव)
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on Wed, 01/23/2013 - 11:59

Permalink

भारतातील दारिद्र्य रेषेखाली

भारतातील दारिद्र्य रेषेखाली जगणार्या लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे अशा हातावर पोट भरणार्या लोकांनी कधी शाळेचे तोंडही बघितलेले नाही त्यांच्या मुलांचीही तीच गत खेळण्याच्या - शिकण्याच्या वयात ही मुलेमुली रस्त्यावर / सिग्नलवर पेपर विकताना ,भीक मागताना किंवा एखाद्या कारखाण्यात बालकामगार म्हणुन काम करतात. "लैंगिक शिक्षण" ह्या विषयापासुन अशी मुले कोसो दुर आहेत . अशा मुलांचा शालेय शिक्षण हा विषयच बाद आहे ,अशा मुलांना पालकाकडुन काय माहीती मिळणार ? " ह्यांच आला दिवस कसातरी ढकलायचा ह्या तत्वावर जगणारी ही मुले अन हाता- तोंडाची कशी गाठ पडेल ? रोज ह्या विवंचनेत जगणारा पालक काय शिकवणार ? अन काय माहीती देणार ? त्यामुळे अपुर्या माहीतीअभावी हाच समुदाय एडस सारख्या भयंकर आजारांना बळी पड्तो
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on Wed, 01/23/2013 - 12:26

Permalink

लैंगिक शिक्षण सार्वत्रिक झालं

लैंगिक शिक्षण सार्वत्रिक झालं ? शाळेमधे लैंगिक शिक्षण दिल्याने निश्चित फायदा होईल पण लोकशाही व्यवस्थेत पालकांचं मत देखील विचारात घेतलं गेलं पाहीजे का ? विरोध असलाच तर त्यांचं म्हणणं ऐकून योग्य बाजूचा विचार व्हायला हवा. गैरसमज असल्यास दुर केले गेले पाहीजेत. लैंगिक शिक्षण देताना शास्त्रीय माहिती देणं इतकंच अभिप्रेत आहे कि नैतिक बाजूही शाळेत सांगितली गेली पाहीजे अशी अपेक्षा आहे ? एकतर नैतिकतेच्या कल्पना समाजागणिक बदलतात, त्यातून ज्या काही ऑल इंडियन नैतिकता संघाच्या कल्पना आहेत त्यांचं पाश्चात्यिकरण होत चाललंय. पाश्चात्यिकरण होणं हा शब्द योग्य /अयोग्य या संज्ञांशी जोडला जाऊ नये. लीव्ह इन रिलेशनशिपला मान्यता, समलैंगिक विवाहांना मान्यता या कल्पना हळूहळू आपल्याकडे मान्य होत आहेत. पण सर्वत्र मान्य असतील असं नाही. मुलांना या संबंधीचं शिक्षण योग्य वयात मिळणंहि आवश्यक आहे. स्त्री आणि पुरूष याशिवाय तिस-या लिंगाचे लोक यासंबंधीचं शिक्षण मिळाल्यास अशा लोकांबद्दल हेटाळणीचा / भीतीचा दृष्टीकोण जाऊन माणूस म्हणून समजावून घेण्याची वृत्ती विकसित होईल. सध्या हा विषय अधून मधून डोकं वर काढतोय याला कारण दिल्लीच्या घटनेचा जनमानसावर झालेला परिणाम. पण अशा घटनांची प्रतिक्रिया म्हणून असे कार्यक्रम राबवण्याला माझा सख्त विरोध आहे. भावनेवर नियंत्रण ठेवता येणं हा त्या शिक्षणाचा एक भाग असला पाहीजे. उद्देश क्लिअर असले म्हणजे झालं. त्यानंतर गुन्ह्यांत वाढ झाली किंवा अमूक एक ठिकाणची आकडेवारी काय सांगते याला फारसा अर्थ राहत नाही. आपलं काम आहे योग्य ते संस्कार देणं. जे आपल्या हातात आहे ते आपण करावं. गुन्हा करण्यापासून परावृत्त करण्यासाठी वारंवार संस्कार असावे लागतात. समाजत कुठली गोष्ट गुन्हा मानली जाते हे माहीत असूनही तसं करावंसं वाटणं याला इतर अनेक गोष्टी जबाबदार असतात म्हणून चोरी वाईट, परीक्षेत कॉपी करणं इ. इ. वाईट हे सांगणं आपण सोडून देत नाही. मुद्दा स्पष्ट झाला असावा असं मानतो. धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Wed, 01/23/2013 - 12:29

Permalink

अजूनही भारतात तीच स्थिती आहे

अजूनही भारतात तीच स्थिती आहे की आता गुप्तरोग/ एडस आदि रोगांची माहीतीदेखील सांगीतली जाते?
शाळेत किंवा मोठ्या लोकांना, दोन्ही केसेसमधे आता तरी सेक्स म्हणजे केवळ रोग, धोका, अनचाहा गर्भ इतकंच सांगितलं जातं. अर्थातच हे मुद्दे अत्यंत महत्वाचे आणि प्राथमिकतेने सांगण्याचे आहेतच, पण सेक्स या गोष्टीत काही आनंद असू शकतो हे कोणाला जाणवणारच नाही इतपत दहशत बसते आहेच. त्याउलट त्यातील आनंदाचा भाग सर्वांना आपोआप समजेलच असं गृहीत धरलं जातं. पण मनुष्य म्हणून जी समाजव्यवस्था आपण स्वीकारली आहे त्यात निसर्गतः तसं होतंच असं नाही. आणि आनंद या अँगलने पाह्णारा एकच सोर्स सर्व पौगंडावस्थेतल्यांना उपलब्ध आहे तो म्हणजे एकदम सविताभाभी किंवा चंद्रलोक टाईपचे दुसर्‍या टोकाचे लेखन. योग्य, वास्तव आणि सर्व बाजूंनी माहिती मिळणं कठीणच.
  • Log in or register to post comments

Submitted by बापू मामा on Wed, 01/23/2013 - 13:31

Permalink

काय गरज आहे ह्या लैंगिक

काय गरज आहे ह्या लैंगिक शिक्षणाच्या थेरांची. आज आमची पन्नाशीतली पिढी आहे. आम्हाला कोणी लैंगिक शिक्षण दिलं ? अरे, पाण्यात पडल्यावर पोहोता येतं, हेच ( आणी असेच) आम्ही शिकलो. ऊगीच ह्या विषयाचा बाऊ केला जातोय.
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on Wed, 01/23/2013 - 14:02

In reply to काय गरज आहे ह्या लैंगिक by बापू मामा

Permalink

आजपर्यंत काय काय चुकीचं केलम

आजपर्यंत काय काय चुकीचं केलम हे तरी समजेल कि..
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 01/23/2013 - 14:06

In reply to काय गरज आहे ह्या लैंगिक by बापू मामा

Permalink

तसं तर अनेक गोष्टींबद्दल

तसं तर अनेक गोष्टींबद्दल म्हणता येईल की मग. काय गरज आहे गाड्या बनवायची, आम्ही चालत जायचो. काय गरज आहे कॅल्क्युलेटरची, आम्ही पाढे पाठ करायचो. काय गरज आहे औषध घ्यायची, आम्ही जडीबुटी खाऊन स्वस्थ रहायचो. काय गरज आहे कारखाने काढायची, वल्कले नेसून स्वस्थ राहायचो, वगैरे वगैरे पैकीच हे वरचे वाक्य आहे. आणि लैंगिक शिक्षणाला थेर म्हणणे यावरूनच विचारपद्धती कळते.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Wed, 01/23/2013 - 14:10

In reply to तसं तर अनेक गोष्टींबद्दल by बॅटमॅन

Permalink

शब्दरचनेशी नाही, पण मताशी

शब्दरचनेशी नाही, पण मताशी सहमत. पूर्वीच्या काळी एड्स विषाणू अस्तित्वात असला तरी अक्राळविक्राळ स्वरुपात पसरलेला नव्हता. त्यामुळे अवेअरनेस आता जास्त आवश्यक झाला आहे. पूर्वी होणारे एड्सखेरीजचे गुप्तरोग बहुतांश पेनिसिलिन अथवा अन्य इंजेक्शनांनी बरे होऊ शकत असतील आणि थेट जिवावर उठत नसतील अशी शक्यताही नाकारता येत नाही. सर्वायकल कॅन्सरला जन्म देऊ शकणारा Human papillomavirus कदाचित पूर्वी कर्करोगाचं कारण म्हणून तितका ज्ञात नसेल. त्यामुळे सर्वायकल कॅन्सर झालेल्या स्त्रियांना नुसतंच दुर्दैवी ठरवण्यात येत असेल. त्याचा लैंगिक आयुष्याशी संबंध असू शकतो हेही माहीत नसेल.. ही फक्त उदाहरणं.. तस्मात शिक्षणाची आवश्यकता आहेच. फक्त सर्व बाजू शिकवण्यात याव्यात. आणि "शिक्षण" पेक्षाही अवेअरनेस (जाणीव!?) असं त्याचं स्वरुप असावं. अवांतरः "पूर्वीच्या (आमच्या) काळी" आणि "हल्ली" अशी तुलना करताना निर्माण होणार्‍या गडबडींमागची कारणं पाहणारी प्रातिनिधिक उदाहरणं जुन्या पिढीतल्याच एका प्रख्यात आय सर्जनने दिली होती: १. पूर्वीच्या काळी बायकांचे डोळे ठणठणीत असायचे. नजर अगदी तांदळातला खडा काढण्याइतकी किंवा सुईत दोरा ओवण्याइतकी तीक्ष्ण. हल्ली बघावं तर सर्वांना चष्मे.. आरोग्य बिघडलंय खरं. - वास्तविक पूर्वीच्या काळी बायका जास्तीतजास्त वेळ घरात असायच्या. एका मर्यादेपलीकडे दूरचं पहायची वेळ / आव्हान आयुष्यात फारच कमी. त्यामुळे घरातल्या घरात काम होऊन जायचं. दूरचं नीट दिसत नाही याची खरोखर जाणीव नव्हती. निकटचं खराब दिसण्याचा दोष (चाळिशीत) आला की मगच तो जास्त जाणवायचा आणि चष्मा आणला जायचा. २. तेच "हल्ली" लहानपणी चष्मा लागण्याविषयी. पूर्वी मुलांना दृष्टिदोष होतेच. चष्मा लागणे हा विशिष्ट दोष डोळ्याच्या रचनेमुळे होतो, त्यात पूर्वी किंवा आता फरक नाही. (पोषण / खाणेपिणे यामुळे रातांधळेपणा आदि होऊ शकतात, दूरदृष्टिता / निकटदृष्टिता नव्हे.) पूर्वी पोरांचे डोळे तपासलेच जायचे नाहीत आणि ते सतत डोळे ताणून / फाडफाडून अ‍ॅडजेस्ट करुन पाहण्याची सवय लावून घ्यायचे. आणि चष्म्याची गरज वय होईपर्यंत (स्नायू थकून अ‍ॅडजेस्ट होणं बंद होईपर्यंत) जाणवायची नाही. .... पूर्वी वाटीवाटी तूप पिऊनही तब्ब्येती ठणठणीत असायच्या आणि हल्ली कोलेस्टेरॉल वगैरे भानगडी आल्यात असंही म्हटलं जातं. पण अनेकदा तूप पिणारे आणि शंभर जिलब्या उठवणारे ठणठणीत काका "गेले" कसे याचा शोध घेतला तर "पंगतीतच अचानक मान टाकली आणि डोळे फिरवले" असंही दिसतं.. :)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 01/23/2013 - 14:19

In reply to शब्दरचनेशी नाही, पण मताशी by गवि

Permalink

पूर्वी होणारे गुप्तरोग हे

पूर्वी होणारे गुप्तरोग हे पूर्वीच्या वैद्यकशास्त्राप्रमाणे पाहिले तर असाध्य नव्हतेच असेही नाही. पानिपतच्या युद्धाचे मुख्य कारण असलेला रोहिला सरदार नजीबखान लढाईनंतर किती आजारी होता त्याचे वर्णन अस्सल पत्रात दिलेले शेजवलकरांच्या पानिपत १७६१ या पुस्तकात लढाईनंतर किंवा उपसंहार या प्रकरणात आहे- "नजीब अजारी बहुत. छ २२ तारखेस रात्री हातपाये आपटीत होता. सर्वांग सुजले आहे. इंद्रियाचे वाटे रक्त व पू वाहतो, लोकांचा मुजरा पडल्यापडल्या छावणीतच होतो." त्यातच त्याचा अंत झाला, त्यामुळे गुप्तरोग घातक असू शकतो हे नक्की. पण प्रसाराबद्दल सहमत आहे. दळणवळण फार जलद झाल्याने हा विषाणू इतका फैलावलाय की ज्याचे नाव ते. सर्वांगीण अवेअरनेस इज ए मस्ट.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Wed, 01/23/2013 - 19:33

In reply to पूर्वी होणारे गुप्तरोग हे by बॅटमॅन

Permalink

गुप्तरोग घातक असू शकतो हे

गुप्तरोग घातक असू शकतो हे नक्की.
नक्कीच. एकदा गूगलवर इमेजेस शोधून पहा. चूकलेल्या लैंगिकतेचे विदारक रुप दिसेल.
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Wed, 01/23/2013 - 14:31

In reply to काय गरज आहे ह्या लैंगिक by बापू मामा

Permalink

गरज नक्कीच आहे..

गरज नक्कीच आहे.. काही उच्चशिक्षित लोकंदेखिल जेव्हा हेटाळणीच्या सुरात "षंढ", "वंध्यामैथुन" असे शब्दप्रयोग वापरतात तेव्हा खरच या शिक्षणाची किती गरज आहे हे जाणवतं... मनुष्याच्या कर्तृत्वाचा आणि त्याच्या शरिराच्या प्रजोत्पादक संस्थेच्या कार्याचा संबंध नाही .. मैथुनाचा प्रजोत्पादनाशिवाय किंबहुना त्याहुन अधिक संबंध आनंद मिळवण्याशी आहे.. एवढी मूलभूत माहिती सर्वांना असावी असे वाटते..
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on गुरुवार, 01/24/2013 - 00:47

In reply to काय गरज आहे ह्या लैंगिक by बापू मामा

Permalink

काय गरज आहे ह्या लैंगिक

काय गरज आहे ह्या लैंगिक शिक्षणाच्या थेरांची. आज आमची पन्नाशीतली पिढी आहे. आम्हाला कोणी लैंगिक शिक्षण दिलं ? अरे, पाण्यात पडल्यावर पोहोता येतं, हेच ( आणी असेच) आम्ही शिकलो. ऊगीच ह्या विषयाचा बाऊ केला जातोय.
ओ गवि, मला ट्रोलनाथ म्हणाला होतात ना. बघा, याला म्हणतात ट्रोलींग.. पडलात ना बळी. ए धत्तड तत्तड, धत्तड तत्तड !!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 01/24/2013 - 10:37

In reply to काय गरज आहे ह्या लैंगिक by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

हॅ हॅ.. तो शब्द तुमच्याच एका

हॅ हॅ.. तो शब्द तुमच्याच एका प्रतिसादातून उचललेला होता, तो प्रतिसाद आवडला होता म्हणून.. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on गुरुवार, 01/24/2013 - 01:08

In reply to काय गरज आहे ह्या लैंगिक by बापू मामा

Permalink

आम्हाला कोणी लैंगिक शिक्षण

आम्हाला कोणी लैंगिक शिक्षण दिलं ?
ह्म्म्म्म... म्हणजे तुम्हाला "ते" सगळं सगळं नीट माहित आहे तर.. नक्की का ??? की तुम्हाला माहित आहे तेच "सगळं" आहे असे तुम्हाला वाटते ???
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 01/23/2013 - 14:20

Permalink

लैंगिकतेबद्दल शाळेत शिकवलम

लैंगिकतेबद्दल शाळेत शिकवलम जावं हे पटलं - पटतं.. मात्र विद्यार्थांना हे पालकांनी समजावल्यास अधिक उत्तम नाही का? पालक स्वतःच्या पाल्याला जर इतक्या खुलेपणाने सांगु शकत नसतील तर शिक्षकांना हे विद्यार्थ्यांपुढे सांगणे किती अवघड जात असेल याचि कल्पना येऊ शकते. यापेक्षा शासनाने काहि शास्त्रशुद्ध विडियो बनवावेत आणि ते शाळां-शाळांमधून दाखवावेत, ज्यामुळे कोणला 'सांगायची' गरज रहाणार नाही मात्र टार्गेट ऑडियन्सला सगळं काही समजेल. बाकी, सेक्स ही पुनरुत्पादन करण्यासाठी आणि स्त्रियांवर हक्का गाजवण्यासाठी करण्याची क्रिया आहे असे गैरसमज असणार्‍या समाजात योग्य माहिती पाल्यांपर्यंत झिरपायला वेळ हा लागणारच
  • Log in or register to post comments

Submitted by सांजसंध्या on गुरुवार, 01/24/2013 - 13:45

In reply to लैंगिकतेबद्दल शाळेत शिकवलम by ऋषिकेश

Permalink

पालकांनी शिकवणं सर्वात उत्तम.

पालकांनी शिकवणं सर्वात उत्तम. काही पालक करतातही. पण आपला समाज कसा आहे याची कल्पना आपल्याला आहेच कि. मुलांशी खुलेपणाने बोलणं भल्याभल्यांना शक्य होत नाही. म्हणून तर शाळेच्या माध्यमातून हा विषय शिकवला जावा ही कल्पना पुढे आली. शिक्षकांना पालकांइतकं जड जाईल असं वाटत नाही. आपल्याकडे मुलांचं पालकांशी असलेलं नातं हेच खुलेपणाच्या आड येतं. मात्र मुलं-मुली यांना एकत्र हे शिक्षण देताना अनेक अडचणी येतात. लैंगिक शिक्षणात फक्त स्वतःची ओळख होणारे बदल आणि त्यांना सामोरं कसं जायचं तसंच विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल वाटणा-या आकर्षणाचं शात्रीय उत्तर इतकंच असेल अशी माझी कल्पना आहे. विकर सेक्सबद्दचा मानवतावादी दृष्टीकोण आणि सन्मानजनक व समतावादी वागणूक या गोष्टी संस्कारातून यायला हव्यात. ते शाळेत होत नसेल तर गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बापू मामा on Wed, 01/23/2013 - 14:22

Permalink

अवेअरनेस कोणत्या बाबतीत

अवेअरनेस कोणत्या बाबतीत द्यावा यालाही काही मर्यादा आहेत. अरे, भुकेलेलं लेकरु आई कडून अगदी जन्मताक्षणीच गरज भागवितं. त्याला पोट कसं भरायचं हे कोणी शिकवितं ? तसेच या विषयाचे आहे. ऊलट या विषयावर (एडस, कंडोम ) इतके साहित्य रस्तो रस्ती ,अगदी बस च्या पार्श्वभागीही उपलब्ध आहे, कि वेगळे शिकवायची काय गरज आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 01/23/2013 - 14:36

In reply to अवेअरनेस कोणत्या बाबतीत by बापू मामा

Permalink

अवेअरनेस कोणत्या बाबतीत

अवेअरनेस कोणत्या बाबतीत द्यावा यालाही काही मर्यादा आहेत.
या मर्यादा कोण ठरवतं आणि कशाच्या आधारावर? लैंगिक शिक्षण म्हणजे पोर्नोग्राफी बघण्याचा राजमार्ग नव्हे.
ऊलट या विषयावर (एडस, कंडोम ) इतके साहित्य रस्तो रस्ती ,अगदी बस च्या पार्श्वभागीही उपलब्ध आहे, कि वेगळे शिकवायची काय गरज आहे?
रादर म्हणूनच वेगळे सांगायची गरज आहे. नुसत्या कंडोमच्या काहिराती पाहून किंवा मुतार्‍यांतून मर्दाना ताकत, हवा भरून साईज ठीक करणे, वगैरे जाहिराती असतात त्या पाहून जर शिक्षण होईल असे वाटत असेल तर तुमची कीव करावी तितकी थोडीच आहे. शिवाय, मुळात इतके सगळे उपलब्ध असले तरी सेक्स इज टॅबू हे लहानपणापासून शिकवले जाते त्याची काय वाट? पन्नाशीच्या पिढीच्या बालपणात, लैंगिकतेसंबंधी साधी शंका विचारली तरी कसा मार मिळायचा ते डोळेआड केलेत वाटतं. लैंगिकतेची ओळख पिवळ्या पुस्तकांतूनच व्हावी आणि लग्न होईपर्यंत त्या रोगट फँटसीज हाच एकमेव आधार असावा ह्यालाच तुम्ही जर ठीक आहे असे म्हणत असाल तर मग अरसिकेषु कवित्व कशाला करू?
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 01/23/2013 - 14:39

In reply to अवेअरनेस कोणत्या बाबतीत by बापू मामा

Permalink

ऊलट या विषयावर (एडस, कंडोम

ऊलट या विषयावर (एडस, कंडोम )इतके साहित्य रस्तो रस्ती ,अगदी बस च्या पार्श्वभागीही उपलब्ध आहे, कि वेगळे शिकवायची काय गरज आहे?
अगदी म्हणूनच या विषयावर 'आधिकारीक' पातळीवर शिकवायची गरज आहे. हल्लीच्या पिढीकडे भरपूर माहिती आहे, त्यांना ती तुम्ही लिहिली आहे तशा अनेक मार्गांनी ती मिळत असते. त्यातील योग्य कोणती, अयोग्य कोणती, उपयुक्त कोणती आणि अपायकारक कोणती, आयोग्यपूर्ण कोणती हे सांगायला त्या क्षेत्रातील अधिकारी माणसाने माहिती देणे अधिकच गरजेचे झाले आहे
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवट on Wed, 01/23/2013 - 14:52

In reply to अवेअरनेस कोणत्या बाबतीत by बापू मामा

Permalink

मामा, मी काय म्हणतो,

मामा, मी काय म्हणतो, अवेअरनेस कोणत्या बाबतीत द्यावा अथवा देऊ नये याची लिस्टच का देत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by बापू मामा on Wed, 01/23/2013 - 15:14

Permalink

आपली माघार !

आपली माघार ! आजकाल भाच्चे कंपनीच इतकी बुद्धिमान झाली की ती मामाचा "मामा" करतील. लैंगिक शिक्षण म्हणजे पोर्नोग्राफी बघण्याचा राजमार्ग नव्हे. सहमत. अगदी म्हणूनच या विषयावर 'आधिकारीक' पातळीवर शिकवायची गरज आहे. म्हणजे अधिकारी व्यक्ति कोण? व तिने एक्झॅक्ट काय करावे?
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 01/23/2013 - 16:26

In reply to आपली माघार ! by बापू मामा

Permalink

अधिकारी म्हणजे

शाळेतील प्रशिक्षित शिक्षक, डॉक्टर्स, मानसोपचारतज्ज्ञाकडून समुपदेशन घेऊन योग्य शब्दात पाल्याला माहिती देऊ शकणारे पालक (किंवा या विषयाचे शिक्षण देणारे अधिकृत शासकीय कार्यक्रम, हे अजून सुरू व्हायचेत म्हणतात)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Wed, 01/23/2013 - 17:13

In reply to अधिकारी म्हणजे by ऋषिकेश

Permalink

+१

पालकच हे काम उत्तम रीतीने पार पाडू शकतील.
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्न्या on Wed, 01/23/2013 - 17:11

Permalink

आताच्या नवीन अभ्यासक्रमात....

(नववी पासून) काही प्रमाणात याबद्द्ल माहिती देण्यात आली आहे, मी अजून ते पुस्तक पाहिले नाही. त्याबद्दल फक्त ऐकले आहे. एक मात्र नक्की, पूर्वीपेक्षा आज सर्व माहिती सहज उपलब्ध असल्याने मुलांपर्यंत पोहोचणारी माहिती योग्य दिशेने आहे की नाही हे पाहणे, सजगतेने लक्ष ठेवणे आणि गरज पडेल तेव्हा योग्य दिशा दाखवणे हे महत्त्वाचे आहे. लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीतून याबाबत पालकांसाठी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Wed, 01/23/2013 - 17:28

Permalink

खरतर इथले प्रतिसाद वाचुन काही

खरतर इथले प्रतिसाद वाचुन काही समजेल अशी आशा होती. पण आता मीच बोलते. या बद्दलच शिक्षण आवश्यक का? एक अनुभव. कॉलेजात मैत्रीणीच्या भावाच लगन झाल. त्यावेळच्या अन आताच्याही मत प्रवाहापणे "इतक्यात नको" असा सगळ्यांचा भर होता. मग नविन लग्नाच्या दोघांनाही घरच्या "फॅमिली डॉकटर" कडे पाठवण्यात आले. डॉकटर काकांनी मुलाला लहानाच मोठ होताना पाहिलेले. मग त्याम्नी कंडोम घेउन ते कसे वापरायचे ते हाताच्या अंगठ्याचा वापर करुन सागितले.इकडे महिन्याभरात उलट्या सुरु. नवरा तावला, बायको त्याच्यावर गरम. मग हे कस झाल हे पहायला डॉक्टरकाकांकडे. डॉक्टरांनी जेंव्हा खर कारण ऐकल तेंव्हा त्यांनी डोक्यावर हात मारुन घेतला. मैत्रीणीच्या भावाने डॉक्टरांच्या सांगण्याबरहुकुम कंडोम अंगठ्यावर चढवलेलं. मैत्रीण सांगत होती,"माझी वहिनी इतकी चिडली होती सांगु. काहीही माहिती नाही अन लग्न करतात म्हणाले भावाला." आता हे ऐकताना मग नक्की कस वापरायच कंडोम अन कंडोम म्हणजे काय हे प्रश्न आम्हालाही पडले होते. अन आज माझी १४ वर्षे कन्या शाळेत टिचरला आम्ही प्रोटेक्शनवरुन चिडवल म्हणुन सांगत येते. कंडोम क्लास मध्ये आणुन दाखवले गेले. माझ एकच तत्व आहे, ऐकताना चेहर्‍यावर कोणतेही भाव आणायचे नाहीत. तिला कस सांगायच हे ज्ञान मला नाही. नवरा तर सपशेल पळ काढतो. मग तिला जी सर्वंकश माहिती शाळेत मिलतेय त्याला निदान काहीतरी हॉरीबल असल्यासारखे रिअ‍ॅक्ट न करणे एव्हढा शहाणपणा मला कळतो. बाकि कधी तिनेहोउन काही विचारल तर मी जमेल तेव्हढ शांतपणे उत्तर देते. तरी माझी मुलगी १४ वर्षाची आहे. इथे ६ वी पासुनच हा विषय तज्ञ बोलावुन शिकवला जातो. मी प्रायमरी शाळेत व्हॉलेंटीअर करते.एकदा स्टाफरुम मध्ये ६वीची क्लास टिचर आली अन साम्गु लागली. माझ्या वर्गातली मुल जमिनीवर पडुन गडाबडा लोळत होती, अन त्यांच्या डोळ्यातुन पाणी गळत होत. व्हाय शुड वी मास्टरबेट हा प्रश्न विचारला त्यांनी त्या त्ज्ञाला अन तो सांगतो दॅट इज यॉर नीड. म्हणजे जेम्व्हा मुलांना अजुन या भावनेची ओळखसुद्धा नाही तेंव्हाच या गोष्टी सांगुन, जेंव्हा त्यांना याची गरज भासेल तेंव्हा आपण असे का वागतोय या गोष्टीचा ताण नाहीसा होत असावा. आता याचा परिपाक म्हणजे माझ्या मैत्रीणीच्या सहावीच्या पोरीने त्याच दिवशी कारमध्ये शिरल्या शिरल्या तिच्या एक वर्ष मोठ्या भावाला आईवडिलांसमक्ष विचारल्"डु यु मास्टरबेट" अन बिचार पोरग आई बाप सारे लालेलाल झाले. पण एकुण मला वाटत ते हे की त्यामागचा स्ट्रेस नाहीसा झालाय, जो आमच्याबाबतीत होता.
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Wed, 01/23/2013 - 18:00

In reply to खरतर इथले प्रतिसाद वाचुन काही by स्पंदना

Permalink

हम्म..

मैत्रीणीच्या भावाने डॉक्टरांच्या सांगण्याबरहुकुम कंडोम अंगठ्यावर चढवलेलं.
हा विनोद म्हणून एका डॉक्टर मित्राने सांगितला होता. हा किस्सा ऐकीव असावा असं वाटतं कारण खरं असं घडेल असं वाटत नाही. पण तुम्हाला खात्री असेल तर मला त्या भावाचं आश्चर्यच वाटेल. बाकी सध्याचं वातावरण बघता 'बलात्कार किंवा एड्स काय आहे?' हा प्रश्न यायच्या आधी 'सेक्स' काय आहे' ते मुलांना सांगायला हवं. आमच्या काळात याच्या शिकवणीची सुरवात 'घाणेरड्या जोक्स'नी व्हायची. अनेक वेळा हे जोक्स अनैतिकतेच्या सीमा ओलांडत. आठवी-नववी पर्यंत साधारण सगळं बिट्स अँड पिसेस मध्ये कळलेलं असायचं. वर्गात सो कॉल्ड सज्जन मुलं यापासून दूर असायची. त्यांना असले जोक सांगितलेले आवडत नसायचं. पुढे बाहेरच्या राज्यातल्या मुलांमुळे आपणही किती 'सज्जन' आहोत हे कळलं. :)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 01/23/2013 - 18:09

In reply to हम्म.. by दादा कोंडके

Permalink

बाकी सध्याचं वातावरण बघता

बाकी सध्याचं वातावरण बघता 'बलात्कार किंवा एड्स काय आहे?' हा प्रश्न यायच्या आधी 'सेक्स' काय आहे' ते मुलांना सांगायला हवं. आमच्या काळात याच्या शिकवणीची सुरवात 'घाणेरड्या जोक्स'नी व्हायची. अनेक वेळा हे जोक्स अनैतिकतेच्या सीमा ओलांडत. आठवी-नववी पर्यंत साधारण सगळं बिट्स अँड पिसेस मध्ये कळलेलं असायचं. वर्गात सो कॉल्ड सज्जन मुलं यापासून दूर असायची. त्यांना असले जोक सांगितलेले आवडत नसायचं. पुढे बाहेरच्या राज्यातल्या मुलांमुळे आपणही किती 'सज्जन' आहोत हे कळलं.
वाक्यावाक्याशी सहमत!!
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on गुरुवार, 01/24/2013 - 02:27

In reply to हम्म.. by दादा कोंडके

Permalink

कदाचित त्या जोकचा मुळ हिरो

कदाचित त्या जोकचा मुळ हिरो हेच साहेब असावेत. कारण भावाच ल्ग्न झाल होत हे खर अन ती याबरोबरच बाकिचे किस्सेही सांगायची.कधी वहिनीच्या भाज्या, आईचा बदललेला नूर, अन मेन म्हनजे वहिनी हिच्या पिढीची आसल्याने त्या दोघीतला संवाद. शरीराला स्वतःच्या गरजेची जाणिव होती, पण डॉक्टरनी सांगीतलय म्हणजे असाव काहीतरी हा विचारही असु शकतो. अगदी प्रोफेशनल कोर्सेस होइपर्यंत कंडोम म्हणजे काय हे प्रत्यक्ष न बघितलेली मुल अजुनही असतात. अन आपल्याला साधा, सरळ मुलगा अथवा मुलगी हवी असते. मग ते साधे सरळ व्यक्तीमत्व, सार्‍याच बाबतीत साधे सरळ सज्जन असणार नाहीत का?
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Wed, 01/23/2013 - 18:21

In reply to खरतर इथले प्रतिसाद वाचुन काही by स्पंदना

Permalink

मला एकच प्रश्न पडलाय..

मला एकच प्रश्न पडलाय.. जर बायकोला प्रेग्नंट कसं करायच एवढं समजलं, तर कंडोम वापरायच कसं हे नाही समजलं? म्हण्जे हे काही रॉकेट सायन्स नाही.. कॉमन सेन्स आहे.. अवांतरः- माझी आजी आपण जर नवीन लग्न झालेल्या मुलीला "अजुन लहान आहे ती.. समजत नाही.." ह्या टाईप च काही बोललो तर म्हाणायची की "गरोदर व्हायच कळलं ना.. मग कशी ती लहान?"
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Wed, 01/23/2013 - 19:31

In reply to मला एकच प्रश्न पडलाय.. by पिलीयन रायडर

Permalink

+१

जर बायकोला प्रेग्नंट कसं करायच एवढं समजलं, तर कंडोम वापरायच कसं हे नाही समजलं? म्हण्जे हे काही रॉकेट सायन्स नाही.. कॉमन सेन्स आहे..
सहमत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Fri, 01/25/2013 - 01:42

In reply to +१ by शुचि

Permalink

त्या मुलीच्याही (त्याच्या

त्या मुलीच्याही (त्याच्या बायकोच्या) ते लक्षात आले नव्हते हे तुमच्या लक्षात आले नाही वाटते:-)
  • Log in or register to post comments

Submitted by तर्री on Wed, 01/23/2013 - 18:09

Permalink

पण एकुण मला वाटत ते हे की

पण एकुण मला वाटत ते हे की त्यामागचा स्ट्रेस नाहीसा झालाय, जो आमच्याबाबतीत होता. ह्या एका वाक्याने लैंगिक शिक्षणाचा उद्देश सफल झाला म्हणायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Wed, 01/23/2013 - 18:59

Permalink

शिक्षण तर हवंच कारण आता

शिक्षण तर हवंच कारण आता माहिती मिळवण्याचे मार्ग (तेही जास्त करुन चुकीचेच...) आहेत.. त्यामुळे काहीतरी येड्पटासारखे समज असतात लोकांचे.. माझी आई मुलांच्या शाळेत शिकवायची तेव्हा नातु असलेल्या शिक्षिकांना ८-१० तली मुलं गलिच्छ पत्र लिहायची.. एकदा तर एका नवीन तरुण बाईंना असं पत्र आलं.. रडली बिचारी खुप.. तिला त्या मुलां समोर जाउन शिकवाव वाटेना. मी पण एकदा गेले होते आईच्या शाळेत त्या मुलांचा नाच बसवायला, तर ते अशा पद्धतिनी जवळ गोळा व्हायचे की मला मी कधी इथुन पळुन जाते असं व्हायचं. ६-७ तल्या मुलांच्या नजरा हपापलेल्या असु शकतात.. ५वी तला मुलगा बस मध्ये तुम्हाला नको तिथे हात लावायचा प्रय्त्न करु शकतो.. आता आई कन्या शाळेत आहे.. आणि तिथेही अचाट प्रकार घडत असतात.. मुळात हे मुला-मुलिंची वेगळी शाळा हाच मोठा मुर्खपणा आहे.. मुलं काहीतरी पाहतात्..तेच खरं समजुन बसतात.. आणि हाच मुलगा पुरुष बनुन बायको कडुन तशाच अपेक्षा ठेवतो.. आता आम्च्यावेळी हे नव्हतं म्हणुन आताही नको म्हणणं म्हणजे वेडेपणा आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Wed, 01/23/2013 - 19:31

In reply to शिक्षण तर हवंच कारण आता by पिलीयन रायडर

Permalink

बाप रे

शिक्षकांना असे अनुभव येत असतील असे वाटले नव्हते :( मुलामुलींच्या वेगळ्या शाळा नकोत. सहमत आहे.
मुलं काहीतरी पाहतात्..तेच खरं समजुन बसतात.. आणि हाच मुलगा पुरुष बनुन बायको कडुन तशाच अपेक्षा ठेवतो..
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Wed, 01/23/2013 - 20:39

In reply to बाप रे by शुचि

Permalink

हम्म खरंय पण...

तसे परफेक्ट शरीर आपल्या जोडीदाराकडून अपेक्षितात यावर तो लेख होता. हास्यास्पद आहे पण खरच तशी परिस्थिती आहे.
त्याही आधी स्वतःला न्युनगंड येतो त्याच काय? :)
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Wed, 01/23/2013 - 21:33

In reply to हम्म खरंय पण... by दादा कोंडके

Permalink

अरेरे !

अरेरे !
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Wed, 01/23/2013 - 22:06

In reply to अरेरे ! by जेनी...

Permalink

हा हा...

२X, ३X ठिक आहे. पण 'बिझार' विडिओ बघितले नाहीत काय? :) याच्यावर मात्रा म्हणजे 'बिहाइंड सिन्स' वाले विडिओ बघणे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com