माहिती हवी आहे - पुण्यातील आयुर्वेदिक केंद्रे /निष्णात वैद्य

saishwari's picture
saishwari in काथ्याकूट
25 May 2013 - 1:17 pm
गाभा: 

नमस्कार
ही माझी मिपावर नवीन सुरुवात अहे. चू. भू. सांभाळून घ्यावी.
काही दिवसांपूर्वीचा "आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?" या विषयाचा धागा आणि प्रतिक्रिया पहिल्या. मिपावर या विषयाचे बरेच जाणकार आहेत हे पाहून आनंद झाला. म्हणूनच या ज्ञानाचा फायदा मला आणि सर्वाना व्हावा म्हणून हा काकू.
माझ्या घरी सर्वांना (मी,बहिण, भाऊ,आई ) संप्रेरक असंतुलनाचा (hormonal imbalance)त्रास आहे असे आढळून आले आहे. याची लक्षणे आम्हा भावंडांमध्ये खूपच समान आहेत जसे कि चेहऱ्यावर पुरळ येणे,केस गळणे,केस अकाली पांढरे होणे,जाडी वाढणे,वारंवार तोंड येणे, चिडचिड होणे, कोणत्याही कामात उत्साह नसणे. सर्वाना या सगळ्याचा कमी जास्त त्रास होतो.
विशेषतः बहिण (वय २६ ) आणि भाऊ (वय २८) यांच्या चेहर्य्वर वयात आल्यापासून आतापर्यंत पुरळ येतात तेही खूप जास्त प्रमाणात. यासाठी त्वचा तज्ञाचा सल्ला घेतला असता त्यांनी सांगितले कि हे संप्रेरक असंतुलन (hormonal imbalance ) मुळे होत आहे आणि यासाठी कोणतेही खास उपचार नाहीत. पुरळ सुकण्यासाठी मलम दिले होते. २-३ महिने नियमीत वापराने पुरळ गेले परंतू १) त्या मलमाचे दुष्परिणाम दिसून येऊ लागले जसे कि डोळ्यांची आग होणे २) हे मलम कायमस्वरूपी काम करणारे नाही जोपर्यंत वापरत आहात तोपर्यंत परिणाम,वापरणे बंद केले असता दुप्पट जोमाने पुरळाची उत्पत्ती सुरु.
दुष्परिणाम दिसू लागल्याने मलम वापरणे बंद केले आहे. आंतरजालावर उपाय शोधले असता पूरक आहार आणि घरगुती उपाय या बद्दल वाचायला मिळाले. त्यानुसार घरगुती उपचार सुरु आहेत जसे कि तेलकट, आंबट , उष्णता वाढवणारे पदार्थ आहारातून पूर्णपणे वर्ज्य केले आहेत, फळे, पाणी, हिरव्या पालेभाजा यांचा आहारात मुबलक वापर इ. परंतु म्हणावासा परिणाम दिसून आलेला नाही. (गेल्या ३ महिन्यापासून हे उपचार सुरु आहेत)
मातोश्रींना दम्यासारखा त्रास आहे. (हा त्रास संप्रेरक असंतुलनाशी निगडीत नाही. ) हवामानातील बदल अजिबात सोसत नाही. जेवणातही दही,ताक ,लिंबू, कैरी (आंबट पदार्थ ), फ्रीजमधील थंड पदार्थ, काकडी,मुळा (थंड पदार्थ), अति तेलकट (मसाल्याचे , तळलेले , काजू,बदाम, अक्रोड) असे पदार्थ एकदम वर्ज्य आहेत . गेली ४० पेक्षा जास्त वर्षांपासून ती यातील कोणत्याही पदार्थाचा यथोचित आस्वाद घेऊ शकली नाही. फक्त भात,भाकरी,वरण, रोजच्या भाज्या याव्यतिरिक्त कशाचाही आनंद घेऊ शकली नाही. ज्या ज्या वेळी वरील कोणताही पदार्थ (अगदी थोड्या प्रमाणात) आहारात आला असता ८-१० दिवसांच्या आजाराची निश्चिंती. उन्हाळ्यातही माठाचे एक ग्लास पाणी वा काकडीची एक फोड सुद्धा दगा देते.
"आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?" या दुव्यामध्ये नाडी परीक्षक वैद्यन्बद्दल वाचायला मिळाले.आयुर्वेदामध्ये प्रत्येक आजारावर उपचार आहेत आणि निरोगी जीवन जगण्यासाठी आयुर्वेदाचा खूप चांगला उपयोग होतो असे आंतरजालावर वाचण्यात आले. आमच्या नातेवाईकांपैकी एकजणाने कमरेच्या दुखण्यासाठी अशाच एका नाडी परीक्षक वैदयांकडून (मु. पो. हैद्राबाद) उपचार घेणे सुरु केले आहे. त्यांचा अनुभव खूप चांगला आहे. आम्हाला हैद्राबादला जाणे शक्य नाही. पुण्यात वा आसपास कोणी निष्णात वैद्य असल्यास पत्त्यासकट माहिती द्यावी. सोबत स्वताला आलेले अनुभव दिल्यास विशेष आभारी. पुण्यातील प्रसिध्द "बालाजी तांबे" यांचे उपचार कोणी घेतले असल्यास (त्यांचे उपचार कितपत परिणाम कारक आहेत याबद्दल) मार्गदर्शन करावे.
(काही चुकीचे लिहिले असल्यास दयाळू मिपाकर क्षमा करतील आणि पामराला समजून घेतील अशी आशा आहे . जाहीररीत्या लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे.)

प्रतिक्रिया

खेडूत's picture

25 May 2013 - 3:18 pm | खेडूत

मिपावर स्वागत.

जुन्या पिढीतले खडीवाले वैद्य तर माहीत असतील.
च्यानल वर चमकणारे वैद्य शक्यतो टाळावेत असे वाटते.
मिपावर पण काही वैद्य आहेत असे ऐकलेय.

>>> काही चुकीचे लिहिले असल्यास दयाळू मिपाकर क्षमा करतील...
...सगळे मिपाकर दयाळू नाहीत बरें !

बाकी व्य नि. केलाय.

नर्मदेतला गोटा's picture

25 May 2013 - 3:31 pm | नर्मदेतला गोटा

खेडूत यांनी पुणेकरांकडून जी अपेक्षा होती तेच वैद्य सुचवले आहेत पण पुढचा भाग सांगितलेला नाही. त्यांच्याकडून गुण आला नाही म्हणून वैतागून हे ख. वै. सोडून दुसरे चांगले वैद्य कोण असा धागा अनेक मिपाकरांना टाकावा लागतो.
एखाद्या व्यावसायिकाची जागा खूप मोठी आहे आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे म्हणून तो व्यावसायिक
चांगला असेलच असे नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

25 May 2013 - 3:40 pm | परिकथेतील राजकुमार

'नर्मदेतला गोटा' ह्यांचे 'बिटविन द लाईन्स' चे जे वाचन असतेना त्याचे मला कायमच कौतुक वाटत आले आहे. आज राहवले नाही, त्यामुळे त्यांचे जाहिर कौतुक करत आहे.

बाकी, saishwari ताई / माई / काकु इ. अहो, आंतरजालावर जे काय वाचायला मिळते ते सगळेच खरे मानून चालायचे नसते हो. चाळीस वर्ष तुम्ही विविध उपचार ट्राय करत असालच की. माझे ऐकाल तर दुसर्‍या त्वचारोग तज्ञाचा सल्ला (ते शेकंड ओपिनियन का काय ते) घ्या. जोडीला असले आयुर्वेद वैग्रे करायला, योगा करायला काय हरकत नाय.

असो... उम्मीद पे दुनिया कायम है.

आणि second opinion म्हणाल तर alopathy उपचारांमध्ये असंतुलन संतुलित करण्यासाठी कायमचा उपाय नाही कारण सगळ्या डॉ. नी हि औषधे नेहमीच घ्यायला सांगितली आहेत आणि औषधे पण हीच दिली आहेत कंपनी बदलून.

नर्मदेतला गोटा's picture

25 Jun 2013 - 10:36 am | नर्मदेतला गोटा

धन्यवाद !

विनायक प्रभू's picture

25 May 2013 - 3:32 pm | विनायक प्रभू

परा शी संपर्क साधा.

मैत्र's picture

25 May 2013 - 3:36 pm | मैत्र

वैयक्तिक चांगला वाईट काही अनुभव नाही.
पण सकाळतर्फे फुकट येणारी फॅमिली डॉ़क्टर नावाची रद्दी पाहून आणि गर्भ संस्कार नावाच्या एका लठ्ठ आकाराच्या पण उपयोगितेच्या दृष्टिने अतिशय फेकू अशा पुस्तकाला पैसे वाया घालवून झाल्यावर तांबे यांच्या कडुन एरंडेल सुद्धा घेऊ नये असं मत झालं आहे. (अर्थात "ओ सजना" ऐकायला ऐरंडेलाचेही पैसे वाया घालवायला नकोत -- इति सर्वश्री तांबे)

आणि तांबे यांचे कर्ते धर्ते कोण आहेत हे स्पष्ट असताना त्यात सत्या सत्यतेचा भाग किती हा वेगळाच मुद्दा आहे.
असेही वाचले आहे की हे स्वतः डॉ. लावतात ते आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून नव्हे. त्यांनी कुठेही वैद्यकीय पदवी घेतलेली नाही. आयुर्वेदाचा अभ्यास केला आहे.. त्यांची मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी आहे असे या दुव्यात म्हटले आहे.
http://www.lifepositive.com/body/ayurveda/tambe.asp
(पदवी / पदविका न घेता औषध देता येते का? आयुर्वेदिक असले तरी.. काही तर रजिस्ट्रेशन / सनद वगैरे असते असे ऐकले आहे)..

बाकी व्य नि केला आहे..

नितिन थत्ते's picture

25 May 2013 - 8:06 pm | नितिन थत्ते

+१

सहमत आहे.

डॉ. कालाजी लोखंडे*.

*ते पण म्याक्यानिकल मी पण म्याक्यानिकल म्हणून मी पण डॉ. पदवी लावली आहे.

बॅटमॅन's picture

26 May 2013 - 12:06 am | बॅटमॅन

+१.

असेच म्हणतो. बाकी, मिपाकरांपैकी तांब्यांकडे गेलेल्या कुणाचा बरावाईट कसाही अनुभव आहे काय? असल्यास तेही वाचायला आवडेल.

पेरूगेट भावेस्कूलच्या समोर (राजाराम मंडळाकडे आणि विजय टॉकीजकडे जायच्या रस्त्यावर) वैद्य समीर जमदग्नी यांचं क्लिनिक आहे. माझा वैयक्तिक अनुभव चांगला आहे.

पण माणूस अतिशय स्पष्टवक्ता आणि रोखठोक आहे. थोडं काही बोललेलं मनाला लागत असेल किंवा अपमान झाल्यासारखं वाटत असेल तर कृपया त्यांच्याकडे जाऊ नये.

(या भागातले बहुतांश डॉक्टर असेच आहेत. पलिकडच्या बोळातले डॉ भट हे नेत्ररोगतज्ज्ञ पण त्यातलेच. गुण जबरदस्त पण आपली कातडी थोडी जाड हवी.)

सरांचा रिझल्ट्च्या बाबतीत प्रश्नच येत नाही,पण अधिक माहिती करता सांगतो आपल्या एका भुतपुर्व राष्ट्रपतींची देखिल उपचार सरांकडेच चालु होते आणी आहेत.

वैद्य स.प्र.सरदेशमुख..आयुर्वेदातले पहिले पी.एच.डी. वाघोली आयुर्वेद कॉलेजचे सर्वेसर्वा..पण वेळ घेउन जा,सर स्वतःअसतील तरच जा,नाहीतर सगळा सावळा गोंधळ आहे.

पत्ता आणि फोन नंबर ?

श्रीगुरुजी's picture

25 May 2013 - 9:43 pm | श्रीगुरुजी

आपल्यासाठी होमिओपॅथीचा देखील गुण येऊ शकेल असे वाटते. पुण्यात शनिपाराजवळ डॉ. उदय कुलकर्णी हे निष्णात होमिओपॅथी डॉक्टर आहेत. काही दिवस त्यांची ट्रीटमेंट घेऊन बघा.

चौकटराजा's picture

25 Jun 2013 - 10:53 am | चौकटराजा

पर्यायी वैद्यकशाखा म्हंणून आयुवेदा इतकी ( व इतकीच ) होमिओपाथी ही स्वीकारून पहा .चिंचवड येथे डो अशीक बोरा हे गेली ३० वर्षे होमिओपाथ म्हणून यशस्वी आहेत. कुरिअरनेही औषधे पाठवायची सोय आहे.

होमिओपथीसारखी "अ‍ॅट बेस्ट प्लासिबो आणि अ‍ॅट वर्स्ट क्वॅकरी" इतकेच म्हणता येणारी पथी लोकांनी आपल्या कोणत्याही विकारांसाठी (किमान शारिरीक विकारांसाठी) वापरु नये यासाठी विनंती करणं हे मला कधीकधी माझं कर्तव्य वाटतं. यावर अनेक आंतरजालीय वाद घालूनही पुन्हा एकदा न थकता म्हणू इच्छितो. होमिऑपथीवर विश्वास ठेवून अन्य पथी सोडण्यापूर्वी माहिती नीट मिळवा.

हां, जर अन्य पथीसोबत साईड बाय साईड होमिओपथी चालू करणार असाल तर खुशाल करा. चारपाच साखरेच्या गोळ्यांनी अपाय काही नाही. :)

हा धागा वाचा. मी आरोग्यतज्ञ मुळीच नाही, पण होमिओपथीची निरुपयुक्तता सिद्ध करायला आरोग्यतज्ञाइतक्या ज्ञानाची गरजही नाही असं स्पष्ट दिसतं. त्या लेव्हलच्या कितीतरी अलीकडच्या पातळीवरच ती फेल ठरते.

धाग्यात मांडलेल्या मुद्द्याची उत्तरं कोणत्याही होमिओपथी समर्थकाने दिली तर तिथेच त्यातली विसंगती आणि अतार्किक भाग लक्षात येतो.

श्रीगुरुजी's picture

2 Jul 2013 - 12:41 pm | श्रीगुरुजी

>>> मी आरोग्यतज्ञ मुळीच नाही, पण होमिओपथीची निरुपयुक्तता सिद्ध करायला आरोग्यतज्ञाइतक्या ज्ञानाची गरजही नाही असं स्पष्ट दिसतं.

मला स्वतःला व कुटुंबातील सर्वांना होमिओपॅथीचे खूपच चांगले अनुभव आले आहेत. कावीळ, साधा ताप, सर्दी, जुनाट खोकला, केसात झालेली चाई, पोटदुखी, कांजिण्या इ. अनेक विकार होमिओपॅथीने पूर्ण बरे झाले आहेत. हा काही निव्वळ प्लासिबो परीणाम नाही. औषधांमुळेच हे आजार बरे झाले आहेत.

३-४ वर्षांहून लहान असलेल्या बाळाला आपण जे घेतो ते औषध आहे हे कळत नसते. ते मूल होमिओपॅथीच्या गोळ्या खाऊ समजून खाते. त्यामुळे त्याच्यावर प्लासिबो परीणाम व्हायची काहीच शक्यता नाही. पण इतक्या लहान बाळांचेही अनेक आजार होमिओपॅथीच्या सहाय्याने बरे झाले आहेत.

होमिओपॅथीत आजार हळूहळू बरा होतो. त्यामुळे अत्यंत तीव्र स्वरूपाच्या आजारात होमिओपॅथी उपयोगाची नाही. अशा आजारात तातडीची शस्त्रक्रिया किंवा चटकन परीणाम करणारी वेदनाशमक औषधे किंवा स्टेरॉईड्स घ्यावी लागतात. पण आजाराच्या प्राथमिक स्वरूपात किंवा आजार तीव्र स्वरूपाचा नसेल, अनेक आजारांवर होमिओपॅथी नक्कीच गुणकारी आहे हा स्वानुभव आहे.

एखादी शाखा निव्वळ प्लासिबो परीणाम म्हणून नाकारण्यापेक्षा स्वतःच त्या शाखेचा थोडा अभ्यास करून किंवा स्वतः पुरेसा अनुभव घेऊन नंतरच मत बनवावे ही नम्र विनंती.

आजार अत्यंत तीव्र स्वरूपात असेल तर

गवि's picture

2 Jul 2013 - 2:35 pm | गवि

स्वतःचे अनुभव शेअर केल्याबद्दल तुमचे आभार.

एखादी शाखा निव्वळ प्लासिबो परीणाम म्हणून नाकारण्यापेक्षा स्वतःच त्या शाखेचा थोडा अभ्यास करून किंवा स्वतः पुरेसा अनुभव घेऊन नंतरच मत बनवावे ही नम्र विनंती.

दोन्ही गोष्टी केल्या आहेत. मी घेतलेला क्वांटिटीबद्दलचा आक्षेप घेण्याइतका अभ्यास केला आहे. क्वालिटी (समजा प्रत्यक्ष औषध पोटात गेलं तर) त्याचा गुण येऊ शकेल हे गृहीत धरुन उलट त्याबाबत शंकासुद्धा उपस्थित केलेली नाही.

बाकी जवळच्या नात्यात होमिओपथी डॉक्टर असल्याने होमिओपथी औषधोपचाराचा थेट व्यक्तिगत, फर्स्टहँड आणि इतरांच्या निरीक्षणाचा अनुभव अगदी लहानपणापासून घेतला आहे.

प्लासेबो हा एक भाग झाला. लहान मुलांबाबत किंवा अगदी मोठ्यांबद्दलही अनेक रोग प्लासेबो इफेक्टशिवायही आपापल्या ठराविक मुदतीनंतर आपोआप बरे होतात (सेल्फ लिमिटिंग). बहुतांश सामान्य व्हायरल इन्फेक्शन्स यात येतात. त्यावर मॉडर्न मेडिसिनमधले उपचारही केवळ सिम्प्टमॅटिकच असतात. उपचारांसहित सात दिवसात आणि उपचाराविना आठवड्यात बरे होणारे असे रोग होमिओपथीनेच नव्हे अगदी घड्याळाकडे एकटक पाहणे या पथीनेही बरे होतील.

प्लासेबो + सेल्फ लिमिटिंग अशा रोगांचे कॉम्बिनेशन होमिओपथी-यशस्वितेच्या कथांना हातभार लावते. मुळात त्यात औषधच अस्तित्वात नसते हा मुद्दा बिनतोड वाटतो.. त्यामुळे पुढे उपाय झाला असं म्हटलं तर मग मूळ द्रव्याचे "स्पिरिच्युअल / चुंबकीय / भारित करणारे" इ इ गुण पदार्थ नसतानाही पाण्याला भारुन राहतात वगैरे अशी थियरी मान्य करावी लागेल. सुपरनॅचरल एकदा का काहीतरी मानलं की तसं तर मग काय ताईत, खडे, नजर कवच हेही मानता येईल..

श्रीगुरुजी's picture

2 Jul 2013 - 10:37 pm | श्रीगुरुजी

>>> लहान मुलांबाबत किंवा अगदी मोठ्यांबद्दलही अनेक रोग प्लासेबो इफेक्टशिवायही आपापल्या ठराविक मुदतीनंतर आपोआप बरे होतात (सेल्फ लिमिटिंग). बहुतांश सामान्य व्हायरल इन्फेक्शन्स यात येतात. त्यावर मॉडर्न मेडिसिनमधले उपचारही केवळ सिम्प्टमॅटिकच असतात. उपचारांसहित सात दिवसात आणि उपचाराविना आठवड्यात बरे होणारे असे रोग होमिओपथीनेच नव्हे अगदी घड्याळाकडे एकटक पाहणे या पथीनेही बरे होतील.

कावीळ, पोटाचा जुनाट अल्सर, अनेक दिवसांपासून केसात असलेली चाई किंवा अ‍ॅन्टीबायोटिक्स घेऊनसुद्धा बरा न झालेला जुनाट खोकला हे निव्वळ प्लासिबो परीणामाने किंवा आपण औषध घेतले आहे या समजूतीने औषध न घेताच बरे होणारे आजार नव्हेत. हे ठराविक मुदतीनंतर आपोआप बरे होणार आजार सुद्धा नाहीत. तसे असते तर हे आजार कोणतेही औषध न घेता काही आठवड्यात पूर्ण बरे झाले असते. हे आजार म्हणजे सामान्य व्हायरल इन्फेक्शन नसते. हे बरेचसे गंभीर स्वरूपाचे आजार आहेत. कावीळीवर योग्य औषधयोजना न केल्यास मृत्यु ओढवू शकतो. अल्सरवर योग्य उपचार न घेतल्यास आतड्याची जखम वाढून शेवटी आतडे काढून टाकण्याची वेळ येऊ शकते.

हे व इतर काही आजार होमिओपॅथी औषधयोजेनेने बरे झाल्याचा माझ्या कुटुंबात अनुभव आलेला आहे. होमिओपॅथी म्हणजे निव्वळ साखरेच्या गोळ्या असतात हा गैरसमज आहे. त्या गोळ्यांवर औषधी अर्क शिंपडलेला असतो. होमिओपॅथी म्हणजे भोंदूगिरी आहे किंवा होमिओपॅथी हे पूर्ण थोतांड आहे हे मत पूर्ण अयोग्य आहे.

श्रीगुरुजी's picture

30 Oct 2013 - 12:26 pm | श्रीगुरुजी

एक अनुभव.

माझ्या भाच्याला (वय २१) शनिवार १९/१०/२०१३ या दिवशी संध्याकाळी ताप आला होता. रात्री झोपताना लिक्विड क्रोसिन दिल्यावर ताप थोडा कमी झाला, पण परत दुसर्‍या दिवशी ताप वाढला. त्याचे पाय सुद्धा खूप दुखायला लागले. चालताना त्रास व्हायला लागला. सोमवारी युरीनमधून रक्त जायला लागल्यावर संध्याकाळी लगेच एका नातेवाईक डॉक्टरांकडे नेलें. ते अत्यंत अनुभवी होमिओपॅथी डॉक्टर आहेत. तपासल्यावर त्यांनी डेंगूची शक्यता व्यक्त केली व लगेच दुसर्‍या दिवशी रक्त तपासायला सांगितले. डेंगू गृहीत धरून त्याच दिवशी संध्याकाळी औषध सुरू केले.

दुसर्‍या दिवशी मंगळवारी सकाळी रक्त तपासल्यावर डेंगूचे निदान नक्की झाले. रक्तात प्लेटलेट्सची संख्या ४६००० इतकी कमी होती (सर्वसामान्य व्यक्तीत ३,००,०० - ४,५०,०० प्लेटलेट्स असतात). मंगळवारी संध्याकाळपर्यंत त्याचा ताप उतरला व बुधवारपर्यंत पाय दुखणे थांबून युरीनमधील रक्त जाणे थांबले. आता तो पूर्वीच्याच उत्साहाने वावरत होता.

यावेळी अनेकांनी रूग्णालयात हलवून बाह्यरक्तातून प्लेटलेट्स भरायचा सल्ला दिला व अँटीबोयोटिक्समुळे डेंगू लवकर आटोक्यात येईल असे सांगितले. परंतु माझ्या औषधाने डेंगू बरा होईल असा डॉक्टरांचा विश्वास होता व वेळ पडल्यास मी रूग्णालयात नेण्यास सांगेन असे त्यांनी सांगितले.

बुधवारी परत रक्त तपासल्यावर प्लेटलेट्स ३३००० पर्यंत कमी आल्या होत्या. बुधवारी त्यांनी औषध बदलून दिले. गुरूवारी परत रक्त तपासल्यानंतर प्लेटलेट्स ३१००० पर्यंत कमी आल्या होत्या. त्याच दिवशी मध्यरात्री काही कारणाने घोळणा फुटुन त्याच्या नाकातून रक्त वाहू लागले व १ तासानंतर ते कसेबसे थांबले. कमी प्लेटलेट्समुळे रक्त गोठण्याच्या प्रकियेवर परीणाम झाला होता.

शुक्रवारी त्यांनी औषध बदलून दिले व लगेच शनिवारी रक्त तपासल्यावर प्लेटलेट्सची संख्या ८५००० वर जाऊन पोहोचली. त्यानंतर ३ दिवसांनी मंगळवार २९/१०/२०१३ ला रक्त तपासल्यावर प्लेटलेट्सची संख्या ३,२५,००० इतकी झाली (नॉर्मल संख्या).

ताप आल्यापासून पहिले २ दिवस औषध नव्हते. तिसर्‍या दिवशी होमिओपॅथी औषध सुरू झाल्यावर ४ थ्या दिवशी ताप उतरून पाय दुखणे थांबले व युरीनमधून रक्त जाणे बंद झाले व एकूण १० व्या दिवशी प्लेटलेट्सची संख्या ३१००० वरून ३२५००० वर गेली. बाह्य रक्तातून प्लेटलेट्स न देता, अँटीबायोटिक्स व सलाईन न देता उपचार लागू पडले.

'प्लासिबो' इफेक्ट इतका जबरदस्त काम करतो याची मला कल्पनाच नव्हती.

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

बाबा पाटील's picture

30 Oct 2013 - 12:43 pm | बाबा पाटील

डेंग्यु ऑटोइम्युन डिसिज आहे,बाकी माहिती सुबोधसरांकडुन मिळेल.

श्रीगुरुजी's picture

30 Oct 2013 - 1:11 pm | श्रीगुरुजी

खरं आहे. डेंग्यू झालेले रूग्ण उगाचच रूग्णालयात भरती होऊन अँटीबायोटिक्स घेऊन रक्तात बाहेरून प्लेटलेट्स भरत बसतात आणि डॉक्टर, औषधे व रूग्णालयावर पैसे उधळतात. वर्तनानपत्रे व वाहिन्या उगाचच 'इतक्या जणांना डेंग्यूची लागण झाली, त्यातले इतके जण दगावले' अशा सनसनाटी बातम्या देऊन विनाकारण घबराट निर्माण करतात. डेंग्यू झाल्यावर त्याकडे दुर्लक्ष करून काहीही उपचार न करता नेहमीचाच दिनक्रम सुरू ठेवावा. डेंग्यू आपोआप बरा होईलच.

डेंग्यु निश्चितच प्राणघातक आहे,पण त्यावर हुकमी प्रतिजैविके नाही आहेत.दुसर म्हण़जे साधारणतः सात दिवसानंतर शरिरात त्याचे व्याधीप्रतिकार क्षमत्व तयार होते व प्लेटलेट्स वाढण्यास सुरुवात होते. डेंग्यु झालेले सगळेच रुग्न दगावत नाहीत. त्याची सगळी पॅथोलॉजी मी नाही टायपु शकत तसेच सुबोधसर सिनियर असल्यामुळे ते माझ्या पेक्षा अधिक चांगल्यारितीने समाजाउन सांगु शकतील.हव तर त्यांना व्य नी करा..धन्यवाद.

सुबोध खरे's picture

30 Oct 2013 - 1:39 pm | सुबोध खरे

श्री गुरुजी , डेंग्यू हा एका विषाणूमुळे होणारा आजार आहे आणी त्यामुळे रुग्णाच्या प्लेटलेट कमी होतात आणी त्याला रक्त स्त्राव होतो. भारतात ९ ० % लोकांना डेंग्यू साठी उपचार मिळत नाहीत आणी तरीही ते सुधारतात. जे सुधारत नाहीत ते नशिबाला बोल लावतात. याचे कारण जसे नाकातून रक्तस्त्राव होतो तसा मेंदूची रक्तवाहिनी फुटली तर रुग्णाला लकवा होतो आणी तो आयुष्यासाठी अपंग होऊ शकतो किंवा रक्तस्त्राव जास्त झाला तर प्राणावर बेतते. हि शक्यता १ टक्का लोकांमध्ये असते.
प्लेटलेट चे आयुष्य ६ तास असते आणि कमी झालेल्या प्लेटलेट चोवीस तासात भरून निघतात. त्यामुळे आपला रोग आटोक्यात यायला लागला कि त्या आपोआप वाढतातच.
फक्त आपण त्या एक टक्क्यात आहोत कि नाहीत हे ज्याचे त्याने ठरवावे ( किंवा ज्योतिषाचा आधार घ्यावा कि आपल्याला मृत्यू योग आहे किंवा कसे). आपल्या भाच्याला कोणताही उपचार न देता तो बरा होण्याची शक्यता ९९ टक्के होतीच.
The characteristic symptoms of dengue are sudden-onset fever, headache (typically located behind the eyes), muscle and joint pains, and a rash. The alternative name for dengue, "breakbone fever", comes from the associated muscle and joint pains.[1][9] The course of infection is divided into three phases: febrile, critical, and recovery.[8]
The febrile phase involves high fever, potentially over 40 °C (104 °F), and is associated with generalized pain and a headache; this usually lasts two to seven days.[8][9] Nausea and vomiting may also occur.[7] A rash occurs in 50–80% of those with symptoms[9][10] in the first or second day of symptoms as flushed skin, or later in the course of illness (days 4–7), as a measles-like rash.[10][11] Some petechiae (small red spots that do not disappear when the skin is pressed, which are caused by broken capillaries) can appear at this point,[8] as may some mild bleeding from the mucous membranes of the mouth and nose.[5][9] The fever itself is classically biphasic in nature, breaking and then returning for one or two days, although there is wide variation in how often this pattern actually happens.[11][12]
In some people, the disease proceeds to a critical phase around the time fever resolves[7] and typically lasts one to two days. यानंतर तो रुग्ण स्वतःच्या प्रतीकारशक्तीने सुधारत जातो मग त्याला काही द्या किंवा देऊ नका. [8] During this phase there may be significant fluid accumulation in the chest and abdominal cavity due to increased capillary permeability and leakage. This leads to depletion of fluid from the circulation and decreased blood supply to vital organs.[8] During this phase, organ dysfunction and severe bleeding, typically from the gastrointestinal tract, may occur.[5][8] Shock (dengue shock syndrome) and hemorrhage (dengue hemorrhagic fever) occur in less than 5% of all cases of dengue,[5] however those who have previously been infected with other serotypes of dengue virus ("secondary infection") are at an increased risk. The recovery phase occurs next, with resorption of the leaked fluid into the bloodstream.[8] This usually lasts two to three days.[5] The improvement is often striking, and can be accompanied with severe itching and a slow heart rate.
संदर्भ विकिपीडिया
हा धोका आपण घेतलात ते स्वतःच्या जबाबदारी वर. कित्येक लोक विमा उतरवत नाहीत ते स्वतःच्या जबाबदारी वर आणि त्यांची मरण्याची शक्यता १ टक्क्यापेक्षा कमी असते. माझ्या दवाखान्याच्या समोर रेल्वे रूळ आहेत ते डोळे मिटून ओलांडल्यास मरण्याची शक्यता १ टक्का आहे ते सुरक्षित आहे किंवा नाही हे तुम्ही ठरवा असे मी माझ्या रुग्णांना सांगतो.

असो
आपल्याला होमियोपाथीचा उपयोग होत असेल तर किंवा आपला विश्वास असेल तर आपण त्याचा वापर जरूर करा. शेवटी कुणाच्याही कोंबड्याने का होईना उजाडल्याशी कारण. सर्दी खोकला एलर्जी सांधेदुखी इ साठी होमियोपथी घ्या किंवा घेऊ नका हे ज्याचे त्याने ठरवावे. पण जीवावर बेतणाऱ्या रोगासाठी यात कैन्सर, हृदय विकार मेनिन्जायटीस इ साठी धोका पत्करणे किती बरोबर आहे हे ज्याचे त्याने ठरवावे अधिक काय लिहू
पण ते एक आधुनिक शास्त्र आहे हा त्या डॉक्टरांचा दावा त्यांनी सिद्ध करून दाखवावा केवळ मी अमुक तमुक ला बरे केले सगळे तज्ञ किंवा सुपर स्पेशालीस्ट न जे जमले माही ते मी केले अशी दर्पोक्ती करू नये. झाडून सर्व होमियोपाथ असे किस्से सांगत असतात.
एक तरी आधुनिक वैद्यकाचा तज्ञ असे सांगताना आढळतो काय कि अमुक तमुक माणसाला होमियोपथी ने काही झाले नाही मी बरे केले. नाही. कारण ते गृहीतच असते.
अधिक काय लिहावे

श्रीगुरुजी's picture

30 Oct 2013 - 10:29 pm | श्रीगुरुजी

>>> याचे कारण जसे नाकातून रक्तस्त्राव होतो तसा मेंदूची रक्तवाहिनी फुटली तर रुग्णाला लकवा होतो आणी तो आयुष्यासाठी अपंग होऊ शकतो किंवा रक्तस्त्राव जास्त झाला तर प्राणावर बेतते. हि शक्यता १ टक्का लोकांमध्ये असते.

माहितीबद्दल धन्यवाद. डेंग्यू झाल्यावर अपंग होण्याची किंवा मरण्याची शक्यता १ टक्के असणे हे खूपच जास्त प्रमाण आहे. त्यामुळे डेंग्यू झाल्यावर तो आपोआप बरा होईल या आशेवर न राहता उपचार घेणे आवश्यक आहे. निव्वळ प्लासिबो इफेक्टमुळे डेंग्यू, खोकला, अल्सरच्या/कोलायटिसच्या जखमा, कावीळ इ. विकार बरे होणे हे अशक्य वाटते. होमिओपॅथी हे आधुनिक शास्त्र आहे का नाही हे इतरांना ठरवू द्यात. वरील विकार होऊन होमिओपॅथीमुळे बरे झालेले बरेच पेशंट माझ्या माहितीतले आहेत. आणि हा त्या डॉक्टरांचा दावा नसून त्या त्या पेशंटची ही माहिती आहे. हे सर्वच जण व त्यांचे गंभीर विकार निव्वळ 'प्लासिबो' इफेक्टमुळे बरे होतात हा दावा खूपच धाडसी वाटतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Oct 2013 - 1:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

बाकीच्या रोगांचं माहित नाही, पण कावीळ आपोआपच बरी होते. शरीरातल्या ज्या अवयवांच्या पेशी पटपट तयार होतात त्यात एक यकृत आहे. मेंदूच्या पेशी फारच कमी वेगाने/अजिबातच तयार होत नाहीत.

गंभीर विकार निव्वळ 'प्लासिबो' इफेक्टमुळे बरे होतात हा दावा खूपच धाडसी वाटतो.

होमेपदीच्या "औषधां"मधे पाणी आणि साखर वगळता अन्य काहीही नसतं. गविंनी या विषयावर अभ्यास करून चिक्कार लिहीलेलं आहे. ते जरूर वाचा.

गविंनी या विषयावर अभ्यास करून चिक्कार लिहीलेलं आहे. ते जरूर वाचा.

गवि होमिओपदीचे डॉक्टर आहेत का?

बॅटमॅन's picture

1 Nov 2013 - 5:32 pm | बॅटमॅन

+११११११११११.

हा मुद्दा महत्त्वाचा आहे.

डेंग्यू झाल्यावर तो आपोआप बरा होईल या आशेवर न राहता उपचार घेणे आवश्यक आहे. मान्य पण होमियोपथी मध्ये याच्यावर उपचार आहेत हे कुठे सिद्ध झाले आहे. जर असेल तर मला तसे संशोधन वाचायला आवडेल. मी अमुक तमुक इतके रोगी बरे केले असे वैयक्तिक दावे नव्हेत.शास्त्रीय संशोधन हवे. अन्यथा ९ ९ टक्क्यात तो आपोआप बरा होणार आहेच मग होमियोपथी वर तरी खर्च का करा.
आधुनिक विज्ञानात असे स्पष्ट पणे म्हटले आहे कि या रोगावर नक्की उपाय आजतरी नाही पण रुग्णाच्या प्लेटलेत कमी झाल्या आणि अंतर्गत रक्तस्त्राव झाला तर तात्पुरता उपाय म्हणून प्लेटलेट चे रोपण करून रुग्ण नैसर्गिकरित्या बरा होईपर्यंत तग धरून ठेवावा लागतो. हे म्हणजे खोल जखमेला टाके घालेपर्यंत आपण स्वच्छ कापडाने जखम दाबून धरतो तसेच आहे.
आधुनिक विज्ञान आपल्या मर्यादा ओळखून आहे आणि त्या मुक्तपणे स्वीकारण्यास हयगय करीत नाही. पण इतर लोक आमच्याकडे अमुक तमुक रोगाला औषध नाही असे कधीतरी सांगताना आढळतात काय? त्यांच्याकडे एड्स पासून कैन्सर पर्यंत सर्वांवर रामबाण उपाय असतोच. याला काय म्हणावे? दांभिकपणा?
असो. बिनतोड युक्तिवाद करून समोरच्याला आपण गप्प करू शकतो पण त्याचा दृष्टीकोन बदलत नाही. असे असल्यामुळे मी सर्वसाधारणपणे वादात पडत नाही. त्यामुळे अधिक काय लिहावे. आपला नातेवाईक सापाच्या शेपटीवर पाय पडूनही न चावता सुरक्षित बाहेर पडला याबद्दल परमेश्वराचे जितके आभार मानावे तितके थोडे.
श्रीगुरुजी, मी आपले उत्कृष्ट लिखाण आवर्जून वाचतो आणि त्याबद्दल मला अत्यंत आदर आहे. वरील वादाचा आणि त्याचा संबंध नाही.

श्रीगुरुजी's picture

31 Oct 2013 - 2:24 pm | श्रीगुरुजी

होमिओपॅथीमध्ये काही ठराविक रोगांवर उपचार आहेत का नाहीत हे सिद्ध करणे हे त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे काम आहे. होमिओपॅथीमुळे अनेक जुनाट व गंभीर रोग बरे झाल्याचा मला व माझ्या परिचयातील अनेकांना व्यक्तिगत अनुभव आहे. असे उपचार म्हणजे 'कावळा फांदीवर बसायला व फांदी तुटायला एकच गाठ पडली' अशा तर्‍हेचे योगायोग आहेत असे मी मानत नाही. कोणतेही औषध नसलेल्या निव्वळ साबुदाण्याच्या गोळ्या घेऊन प्लासिबो इफेक्टमुळे रूग्ण बरे होतात असे मी तरी समजत नाही. कावीळ, डेंग्यू, एक्झिमासारखे त्वचारोग, चाई, अल्सरेटिव्ह कोलायटीस, दीर्घकालीन खोकला इ. विकार प्लासिबो इफेक्टमुळे बरे होणे अशक्य आहे.

असो. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.

प्रभाकर पेठकर's picture

31 Oct 2013 - 2:47 pm | प्रभाकर पेठकर

अ‍ॅलोपॅथीवाले बहुतेक जणं होमिओपॅथीला 'प्लासिबो इफेक्ट'च्या नांवाने दूषणे देत असतात. पण, 'प्लासिबो इफेक्टने माझे ६० टक्के पेशंट बरे होतात' असा दावा कधीच कुठला अ‍ॅलोपॅथीचा डॉक्टर करीत नाही. प्लॅसिबो इफेक्ट हा सर्वच पॅथींमध्ये महत्त्वाचे काम करीत असतो. पण होमिओपॅथीला १००% प्लासिबो इफेक्टचे लेबल लाऊन अ‍ॅलोपॅथीवाले नाकारत आले आहेत. ३-४ वर्षांपूर्वी मी स्वतः माझ्या फ्रोझन शोल्डर आणि टेनिस एल्बोने हैराण होतो. अ‍ॅलोपॅथीच्या तज्ञांकडून (एम डी) उपचार आणि भरपूर खर्च करूनही कणभर फरक पडला नाही. हे सर्व डॉक्टर मला माझ्या व्याधीतून मला बरे करतील असा मला १००% विश्वास होता. पण प्लासिबो इफेक्ट कांही झाला नाही. नंतर एका मित्राच्या सांगण्यावरून एका वैदूला भेटायला गेलो (होमिओपॅथी डॉक्टर नाही. ) माझा त्या वर शून्य विश्वास होता पण पिडीत होतो. काहीही उपचार करून घ्यायला तयार होतो. आणि चमत्कार व्हावा तसा माझा वर्षभराचा त्रास १० दिवसांत पूर्ण नाहीसा झाला.
आता पुन्ह होमिऑपॅथीकडे वळूया. नुसत्या प्लॅसिबो इफेक्ट्वर एखादी पॅथी इतकी शतकं कार्यरत राहील? मला शंका आहे.

बाबा पाटील's picture

31 Oct 2013 - 7:15 pm | बाबा पाटील

पॅथी कुठलीच पुर्णतः बरोबर नसते आणी चुकही नसते.स्किन मध्ये खरच होमिओपॅथीचे रिझ्लट्स खुप चांगले आहेत.जुनाट आजारांवर आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही आणी अ‍ॅक्युट कंडीशन मध्ये अ‍ॅलोपॅथी हवी,निर्णय स्वातंत्र शेवट त्या रुग्नाचेच असते.कारण कुठलाही डॉक्टर कितीही दुसर्‍याच्या पॅथीविषयी बोंबलला तरी पेशंट त्याला हवे तेच करतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Nov 2013 - 3:42 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

'प्लासिबो इफेक्टने माझे ६० टक्के पेशंट बरे होतात' असा दावा कधीच कुठला अ‍ॅलोपॅथीचा डॉक्टर करीत नाही.

संख्याशास्त्र अशा प्रकारे काम करत नाही. वैद्यक तर नाहीच नाही. औषध घेणे आणि बरे होणे या दोन गोष्टींमधे कार्यकारणभाव आहे म्हणून शुद्ध, १००% प्लासिबो नाकारता येतो. होमेपदी आणि तत्सम "उपचारां"मधे असा कार्यकारणभावच नाही म्हणून तो शुद्ध, १००% प्लासिबो समजला जातो.

... माझा वर्षभराचा त्रास १० दिवसांत पूर्ण नाहीसा झाला.

हे वर्णन वाचून, मॉडर्न मेडिसीनचा परिणाम किंचित उशीराने (delay) दिसायला लागला असेल आणि वैदूने त्याचं क्रेडीट लाटलं याची फार शक्यता वाटते आहे.

अनुप यांच्या प्रतिसादाबद्दल

गवि होमिओपदीचे डॉक्टर आहेत का?

I hope not! :)
बारावीपर्यंतचं रसायनशास्त्र शिकलं आणि होमेपदीची "औषधं" कशी बनवतात हे माहित असलं तरीही होमेपदीची औषधं पाणी आणि साखर वगळता काहीही नसतात हे समजेल. Avogadro number बद्दल विकीवाचनातूनही उलगडा होऊ शकेल. गविंनी होमेपदीच्या याच बोगसपणाबद्दल बरंच लिहीलेलं आहे.

आनंदी गोपाळ यांनीही मागे कुठेतरी होमेपदीला वैद्यक पायाच नाही, किंवा आहे तो कचकड्याचा आहे याबद्दल लिहीलेलं आहे. (वेळ होईल तेव्हा लिंका शोधून देते.) ते स्वतः सर्जन, वैद्यकीय व्यावसायिक आहेत.

प्रभाकर पेठकर's picture

30 Oct 2013 - 2:06 pm | प्रभाकर पेठकर

(सर्वसामान्य व्यक्तीत ३,००,०० - ४,५०,०० प्लेटलेट्स असतात).

३०००० (तीस हजार) ते ४५००० (पंचेचाळीस हजार) की ३००००० (तीन लाख) ते ४५०००० (साडेचार लाख)?

श्रीगुरुजी's picture

30 Oct 2013 - 10:30 pm | श्रीगुरुजी

तीन लाख ते साडेचार लाख

… ठाण्यामध्ये आयुर्वेदिक वैद्य कोणी आहेत का? त्वचा, केस, आणि इतर रोगावरचे जालीम उपाय सांगू शकतील… विशेषत: मधुमेहसाठी…माझा आयुर्वेदावर गाढ विश्वास आहे… पण रामबाण उपाय लागू झाला पहिजे…. सुज्ञांनी तज्ञांची माहिती नमुद करावी…

अन्नाचे पाचन झाल्यावर उरलेले अपच्य पूर्णपणे शरीराबाहेर न टाकले गेल्यासही बऱ्याच व्याधि होतात .पुनर्नवादि अथवा मंजिष्टादि काढा डोळे मिटून (म्हणजे जास्ती चिकित्सा न करता) एक आठवडा घेऊन पाहा .

सखी's picture

26 May 2013 - 1:37 pm | सखी

डॉ. दिवेकरांचा मला स्वतःला आणि माझ्या कुटुंबियातील अनेक जणांना चांगला अनुभव आला. प्रत्येकाची समस्या निराळी होती, त्यामुळे तुम्ही विचारलेल्या त्रासाचा अनुभव नाही पण इतकेच सांगते की मी हामेरीकेतल्या स्पेशालिस्ट पूढे मी हात टेकले होते ३-३.५ ट्रिटमेंट घेऊन पण समस्या बिकट होत गेली, त्रासही वाढत गेला. त्यांच्याकडे गेलात तर वेळ जास्त काढुन जा, प्रत्येक पेशंटला ते भरपूर वेळ देतात, ते बोलतात, पेशंटचेही सगळे ऐकतात :)
दिवेकरांच्या पत्नीसुद्दा आयुर्वेदिक वैद्य आहेत. दिपबंगल्याजवळ आहे त्यांचा दवाखाना (020) 25671391.

त्रिवेणी's picture

26 May 2013 - 1:45 pm | त्रिवेणी

ताबे कडून एकदा शतावरी क्ल्प घेतले होते तर त्यात बारीक किडे सारखे काहीतरी होते. तेव्हा पासुन नाही घेत काही त्याच्याकडून.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 May 2013 - 1:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

वैद्य धोपेश्वरकर चिंचवड.

पथ्य कडक पणे पाळावी लागतात.

अप्पा जोगळेकर's picture

26 May 2013 - 2:31 pm | अप्पा जोगळेकर

दररोज ४-५ किमी धावलात तर सगळेच आजार सूंबाल्या करतील.
बाकी आमचा एक दोस्त जो आयुर्वेदिक डॉक्टर आहे तो नर्तक्गिरी चौक,पुणे येथे प्रॅक्टिस करतो.
अधिक माहिती हवी असेल तर खरड करावी.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 May 2013 - 8:26 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

उगाच अँजेलिना ताईंनी डबल मॅस्टेक्टमी केली. रोज चार-पाच किमी धावली असती ... तिची अडचण वेगळीच असणार. अमेरिकेत अंतरं मैल, यार्ड, फुटात मोजतात. ४-५ किमी कधी झाले तिला समजलं नसेल. (अवांतरः अशाच प्रकारचा विनोद आचार्य अत्र्यांनी 'साष्टांग नमस्कार' या नाटकात केला आहे.)

विनोदाचा भाग वगळता मूळ धाग्याबद्दल, वाचन आणि स्वानुभवातून काही मतप्रदर्शन. मी वैद्यकीय डॉक्टर नाही.

५-१०% स्त्रियांना पॉलिसिस्टीक ओव्हरीजची काही-ना-काही लक्षणं दिसतात असं डॉक्टर आणि आंजाकडून समजलं आहे. याची लक्षणं वेगवेगळी असतात, विकीपीडीयाच्या या लिंकेवर बरीच माहिती आहे. या लक्षणांपैकी एक चेहेर्‍यावर पुरळ, पिंपल्स, एक्ने येणं असंही एक लक्षण आहे. त्यामुळे या प्रकाराबद्दल अजिबात डिप्रेस होऊ नका, तुमच्यासारखे बरेच लोक त्रस्त आहेत.

शरीरातलं हॉर्मोन्सचं प्रमाण मोजण्याचं तंत्रज्ञान २०व्या शतकात रोझालिन यालो आणि सोल बर्सन यांनी शोधलं. (यालो यांना मिळालेलं १९७७ सालचं, जन्माने अमेरिकन स्त्रीला मिळालेलं पहिलं नोबेल.) तोपर्यंत सर्व प्रकारचे डॉक्टर्स या क्षेत्रात चाचपडतच होते. त्यानुसार, या संशोधनानंतर आयुर्वेदात काही बदल झाले आहेत का याचा एकदा विचार करा ही विनंती.

(माझा आयुर्वेदिक डॉक्टरांबद्दल असणारा अनुभव, विशेषतः हॉर्मोन्स संदर्भातला, अतिशय निराशाजनक आहे. एक तरूण आणि एक अनुभवी वैद्य जोडप्याने शब्दशः हजारो रुपये खर्चायला लावून एकही लक्षण बरं केलं नाहीच. स्वस्त 'अ‍ॅलोपॅथिक' औषधं मात्र मस्त निघाली; दुसर्‍या बाबतीत असे प्राथमिक निष्कर्ष आहेत. हॉर्मोन्ससंदर्भातली औषधं वर्षानुवर्ष घ्यावी लागू शकतात, त्याची तयारी ठेवा.)

तुम्हां सर्वांना ही लक्षणं दूर होण्यासाठी शुभेच्छा. हॉर्मोन्सचं प्रमाण व्यवस्थित झाले तर उत्तमच.

टवाळ कार्टा's picture

26 May 2013 - 6:15 pm | टवाळ कार्टा

पुण्यातले सगळेच वैद्य निष्णात असतात ;)

:) पुण्यातले सगळेच निष्णात असतात, मग वैद्य नसतील तरच नवल.

अविनाशकुलकर्णी's picture

27 May 2013 - 9:36 am | अविनाशकुलकर्णी

रुपाली होतेल च्या बोळात भोळे वैद्यांचा दवाखाना आहे..माझा अनुभव चांगला आहे..ट्राय मारा..

अर्धवटराव's picture

27 May 2013 - 10:22 am | अर्धवटराव

केळकर संग्रहालयाजवळ, पुणे.

अर्धवटराव

अव्यक्त's picture

27 May 2013 - 8:33 pm | अव्यक्त

… ठाण्यामध्ये आयुर्वेदिक वैद्य कोणी आहेत का? त्वचा, केस, आणि इतर रोगावरचे जालीम उपाय सांगू शकतील… विशेषत: मधुमेहसाठी…माझा आयुर्वेदावर गाढ विश्वास आहे… पण रामबाण उपाय लागू झाला पहिजे…. सुज्ञांनी तज्ञांची माहिती नमुद करावी…

चैदजा's picture

29 May 2013 - 7:33 pm | चैदजा

डॉ. थत्ते, कॅसल मिल जवळ.

मराठी_माणूस's picture

28 May 2013 - 9:19 pm | मराठी_माणूस

माझा एलोपथिक (एक नव्हे , अनेक डॉ. )चा अनुभव अतिशय निराशजनक आहे. आयुर्वेदीक चा अनुभव आतापर्यंत मात्र खुप चांगला आला आहे पण ते वैद्य नाशीक मधील आहेत

शिल्पा ब's picture

29 May 2013 - 5:41 am | शिल्पा ब

पुण्यातलं माहीती नाही पण नाशकात योगविद्या धाम नावाची संस्था आहे. मला तिथे पाठ अन कंबरदुखी वर चांगला गुण आला. ते १० दिवसांच शिबीर असतं. त्यात योग, आयुर्वेदिक उपचार - एक डॉक्टर आहे इ. चा समावेश होतो. काय खावं हे सुद्धा सांगतात अन १० दिवस योग्य तेच जेवण असतं.

रेवती's picture

29 May 2013 - 8:08 am | रेवती

कळवते व्य.नि. मधून.

वैद्य उदय सुतार.

ह्या माणसावर खरेतर एक धागा काढता येण्यासारखा आहे. रोज न चुकता कितीही उशीर झाला तरी पुण्यातलं दवाखान्याचं काम उरकलं की दुचाकीवरून आळंदी गाठायची. देवळात पटकन दर्शन घ्यायचं आणि तिथे डॉक्टरांची वाट पहात असलेल्या सर्व रुग्णांची मोफत तपासणी करायची. मग अकरा वाजोत की बारा. कित्येकदा देवळाची दारे बंद झालेली असतात. मग बाहेरच पायरीवर बसायचं. पेशंट तपासायचे. पण कुणालाही विन्मुख पाठवायचं नाही.

असोत. पहा वाटल्यास जाऊन. भ्रमणध्वनी क्रमांक व्यनितून कळवेन. आंतरजालावर देत नाही, कारण ते आलेल्या सर्व कॉलना उत्तर देतात. नाही जमलं फोन उचलायला तर स्वतःहून कॉल करतील. कुठल्या पेशंटचा इमर्जन्सी फोन असेल तर, यासाठी.

पिलीयन रायडर's picture

9 Jul 2013 - 12:55 pm | पिलीयन रायडर

किडनी स्टोन साठी कुणी चांगला वैद्य सुचवु शकेल काय?
नगर ला जाताना स्माईल स्टोन जवळ कुणी एक शेतकरी आहे म्हणे जो मुळव्याध आणि मुतखडा ह्यावर औषध देतो. जे बरेच उपयोगी आहे असे ऐकले आहे. कुणी घेतले आहे का ते?

सुबोध खरे's picture

11 Jul 2013 - 9:52 am | सुबोध खरे

पि रा ताई,
एक वैयक्तिक अनुभव म्हणून लिहित आहे. मी गेल्या २२ वर्षाच्या वैद्यकीय व्यवसायात एकही रुग्णाचा मुतखडा आयुर्वेदिक व होमियोपाथीच्या औषधाने गेलेला पहिला नाही.( मुतखडा ६ ते ७ मिमी किंवा लहान असेल तर बर्याच वेळा स्वतःहून लघवि वाटे पडून जातो मग तुम्ही कोणतेही औषध घ्या व घेऊ नका) कारण मी एक क्ष किरण तज्ञ असल्याने खडे सर्व प्रथम माझ्या शाखेच्या तज्ञानाच दिसतात( एक्स रे किंवा सोनोग्राफीमध्ये). आणि असे मी हजारानी रुग्ण पाहिले आहेत. यापैकी एकही रुग्णाचा खद गेलेला मी पाहिलेला नाही. शिवाय साधारण साठ रुग्णांना मी वरील ( आयुर्वेदिक किंवा होमियोपाथीच्या) चिकित्सा योजनेनंतर तीन वर्षेपर्यंत तपासले आहे( कमांड रुग्णालय पुणे). या साठ रुग्णांच्या पैकी एकाचाही एकही खडा गेलेला नव्हता. या चिकित्सा पुण्यातील नामांकित वैद्य (प य खडीवाले, वेणी माधव शास्त्री जोशी, चंद्रशेखर/ अजित जोशी) आणि होमेओपथिचे डॉक्टर हबू यांच्या उपचारानंतर होत्या. त्यामुळे वैयक्तिक रित्या या उपचाराचा काही गुण येतो असे मला वाटत नाही.
आपण काय उपचार करावे हा सर्वस्वी आपला वैयक्तिक प्रश्न आहे.
परंतु मला आपल्याला एक सल्ला द्यावासा वाटतो कि मुतखडा हा तुमची लघवी संतृप्त( concentrated) झाल्याने होतो त्यामुळे आपण आपले मुत्र जितके पातळ ठेवाल तितकी आपली खडा होण्याची शक्यता कमी होते.तेंव्हा रोज आपण कमीत कमी ३.५ ते ४ लिटर पाणी प्यायले पाहिजे जेणे करून आपली लघवी अतिशय विरळ(dilute) राहील आणि खडा हळूहळू ( १ ते २ वर्षांनी)
विरघळून जाईल. बाकी इतर उपचार आपणास योग्य वाटतील तसे करावेत.
असेही आपण रोज ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे कारण जर आपल्याला एक खडा झाला असेल तर खडा होणे हि आपली प्रवृत्ती आहे आणि परत मुतखडा होऊ नये यासाठी आपण आयुष्यभर औषध घेऊ शकत नाही तेंव्हा जीवन पद्धती बदलणे हे श्रेयस्कर आहे असे मला वाटते.
हा सल्ला आगाऊ पणाचा( uncalled) आहे हे मला मान्य आहे पण तरीही राहवत नाही म्हणून दिला आहे. जर आपणास गैर वाटले तर क्षमा असावी आणि सोडून द्यावे

तुम्ही उत्तर अन्य कोणालातरी दिलं असलं तरी माझं मत लिहीतो:

एका तज्ञ डॉक्टरने स्वतःहून सल्ला देणं, आणि तोही कोणताही व्यावसायिक फायदा नसताना, हा एक लाभ आहे. त्याबद्दल उलट सर्वांनी तुमचे आभारच मानले पाहिजेत तेव्हा क्षमा वगैरेचा विचारही मनात आणू नये अशी व्यक्तिगत विनंती.

याउपर शक्य असेल तर होमिओपथीसारख्या नॉन्-मेडिकल किंवा नॉन-एक्झिस्टंट उपचारपद्धतीविषयी लोकांना फॅक्ट्स काय आहेत ते सांगणं हे एक मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर म्हणून सर्वच डॉक्टर्सनी चालू ठेवलं पाहिजे.

त्याचा उपयोग झाल्याच्या अनेक कहाण्या असल्या तरी त्यामागे मूलभूत चुकीची गृहीतकं आहेत आणि औषध अस्तित्वातच नसतं या गोष्टींमुळे होमिओपथीसारख्या पद्धतीतल्या घोडत्रुटी एखाद्या अपायकारक अंधश्रद्धेप्रमाणे लोकांच्या नजरेला आणून देणं हे एकप्रकारे वैद्यकीय शास्त्राच्या कर्तव्याला पूरकच आहे.

त्याचप्रमाणे चुंबकचिकित्सा, बाराक्षार, पुष्पौषधी, जलचिकित्सा, संगीतोपचार, इलेक्ट्रोपथी किंवा तत्सम पथींचा उपयोग नेमका किती आणि कुठपर्यंत मर्यादित आहे हेही कोणा एका मध्यवर्ती ऑथॉरिटीने ठरवून त्यातले जे काही फ्रॉड आहे ते बंद केलं पाहिजेच.

पिलीयन रायडर's picture

11 Jul 2013 - 12:35 pm | पिलीयन रायडर

एक तर तुम्ही क्षमा मागायचा प्रश्नच नाहीये.. मी आधी तुमचे आभार मानते!
तुमचा अनुभव दांडगा आहे ह्यात वाद नाही आणि तुमचे निरीक्षण ही मला पटले आहे. माझ्या मते शरीर स्वतःहुन तो खडा बाहेर टाकायला मदत करेल जर मी पाण्याचे प्रमाण वाढवले. त्या साठी मला औषधाची गरज नाही.
पण जी प्रव्रुत्ती तयार झाली आहे शरीरामध्ये, ती आयुर्वेदाने जाऊ शकेल असे मला वाटत होते. आणि तुम्ही वर नावे लिहीलेल्यां पैकीच कुणाकडे तरी जाण्याचा माझा विचार होता.
एकंदरीत मी सुद्धा कोणतेही औषध न घेतल्याने माझे स्वतः विषयी एक निरिक्षण आहे.. मी काहीही खाल्ले (जे मला खायचेच नाही म्हणुन सांगितले आहे, उदा कोबी, पालक इ.) तरी मला त्रास असा होत नाही. पण माझे पाणी पिण्याचे प्रमाण कमी झाले की मात्र मला ताबडतोब त्रास होतो. मला बर्‍याच लोकांनी असेही ऐकवले आहे की खडा कुठेतरी जाऊन अडकला तर तो त्रास देतो. एरवी नाही. त्यामुळे असे वाटले जरी की आप्ल्याला काही त्रास नाहीये तरी खडा हा आत मध्ये मोठा होत असतो. माझ्या मते हे सगळ्यात जास्त पाण्याच्या प्रमाणावर अवलंबुन आहे. थोडा फार टोमॅटो, पालक खाल्ला तरी ठिक..
होमीओपॅथी चा मला काडीचाही फायदा झालेला नाही (मी १ वर्ष भर एका वेगळ्या त्रासा साठी उपचार घेतले) पण त्यासाठी आयुर्वेदाचा मात्र फायदा झाला (अर्थात त्या काळात माझ्या आयुष्यात इतर ही अनेक गोष्टी बदलल्या, जसे की जेवण,रुटिन, लग्न झाले, मुल झाले..) ह्या सगळयाचा ही नक्कीच प्रभाव पडला असणार.. त्यामुळे आयुर्वेद प्रव्रुत्ती नष्ट करायला मदत करेल असे मला पुर्वानुभवा वरुन वाटत होते.. पण आता विचार करावा लागेल !

तुमच्या सल्ल्या साठी धन्यवाद..!!

अंदाजे ३०० ते ४०० रुग्नांचा तरी आयुर्वेदि़क औषधांनी मुतखडे पडल्याचा डाटा माझ्या फाइल्स मध्ये आहे सगळ्यात मोठा १२.५ मिमी चा आहे जो एका निष्णात आर्थोपेडीक सर्जनचा आहे.माझ्या माहितीतले जवळपास ८० टक्के अ‍ॅलोपॅथी डॉक्टर मुतखड्याकरिता आयुर्वेदीक औषधे लिहितात. १२-१३ मिमी च्या पुढे जर खडा असेल तर आम्हीच सांगतो बाबा रे लिथोटॉप्सी करुन घे मग नंतर माझ्याकडे जे काही शिल्लक असेल ते मी बाहेर काढतो.कारण प्रत्येक शास्त्राची एक मर्यादा असते,ती ओळखुन डोळे उघडे ठेउन काम केले,की काम चांगले होते.
खोटे वाटेल पण सुरुवातीच्या प्रॅक्टीस मध्ये,असाच एक १७ वर्षाच्या मुलाला घेउन त्याचे वडील आले होते, मुत्राश्मरीच्या तिव्र वेदना,रुग्न अक्षरशः गडबडा लोळत होता,वडिलांच्या हातात सकाळीच केलेला सोनोग्राफीचा रिपोर्ट होता. उजव्या किडनीच्या लोअर पोल मध्ये ७.५ मिमीचा खडा होता. त्याच्या वडिलांची या अगोदर स्वतःची दोन वेळा पुन्यातील नामांकित रुग्नालयात या गोष्टीसाठीच ऑपरेश्नस झाली होती,त्यामुले वेदना काय असतात हे त्या बापाला चांगलेच माहिती होते,ते म्हणाले डॉक्टर तुम्हाला जे करता येईल ते करा,गरज लागली तर मी त्याला इमर्जन्सी हॉस्पिटलला न्यायला तयार आहे.
यावर त्याम्चे संमती पत्र घेउन काही नाही,माझ्या शास्त्रानुसार फक्त १०० मिली चा एक नारायण तेलाचा बस्ती(एनिमा)त्यानंतर पुर्ण एक लिटर चा मुत्रल द्रव्यांचा निरुह(काढ्याचा एनिमा)बस्ती दिला दुसर्‍या बस्ती नंतर पोरग अक्षरश: हसत बाहेर आले होते, वेदनेला पुर्णतः उपशय्,आणी संध्याकाळच्या ओपीडीला पोराचा बाप लघवी वाटे पडलेला तो खडा घेउन आला होता.शास्र्तात जे वाचल त्याची ती परिपुर्ण अनुभुती होती.
मी म्हणत नाही की प्रत्येक वेळेला हेच शक्य होइल ,प्रत्येक रुग्न वेगळा अनुभव देतो,जिथे आयुर्वेदाला मर्यादा आहेत्,तिथे निष्णात डॉक्टरांची मदत घेण्यात मला कधीच कमीपणा वाटत नाही, इतकेच नाही माझ्या शेजारी असणारे चेस्ट फिजिशियन त्यांच्या कॉक्सच्या पेशंट साठी,लिव्हरसाठी सपोर्टीव्ह ट्रीटमेंटं म्हणुन माझ्याकडे पाठवतात्,कारण अ‍ॅन्टी ट्युबरकिलन ड्र्ग्ज लिव्हर डॅमेज करतात तिथे आयुर्वेद चांगल काम करत.त्यामुळे या दोन्ही शास्त्रांचा एकत्रीत उपयोग केला तर तो रुग्नांसाठी खुपच फायदेशिर ठरते.

प्रभाकर पेठकर's picture

21 Aug 2013 - 12:49 am | प्रभाकर पेठकर

3 mmच्या खड्यासाठी मला तर होमिओपॅथीच्या औषधाचाही फायदा झाला आहे.

सुबोध खरे's picture

21 Aug 2013 - 9:20 am | सुबोध खरे

मुतखडा ६ ते ७ मिमी किंवा लहान असेल तर बर्याच वेळा स्वतःहून लघवि वाटे पडून जातो मग तुम्ही कोणतेही औषध घ्या व घेऊ नका)अशा परिस्थितीत आपण शंख किंवा बिब्ब्याचे चूर्ण घेतले तरी खडा पडेलच. मग तो औषधाने पडला असे कसे म्हणता येईल?

प्रभाकर पेठकर's picture

21 Aug 2013 - 10:21 am | प्रभाकर पेठकर

होय. वर आपल्या प्रतिसादात लिहीलेले वाचूनच, माझ्या प्रतिसादात, खड्याचा आकार मी मुद्दाम उद्घृत केला होता.
जवळ जवळ आठवडाभर मला त्रास झाला आणि औषध घेतल्याच्या दुसर्‍याच दिवशी खडा पडून गेला. साहजिकच हा औषधाचाच पारिणाम असावा असं माझं मत बनलं आहे.
तुमच्या ज्ञानाला आणि अनुभवांना मी आव्हान देत नसून माझा अनुभव मांडला आहे.
गैरसमज नसावा.

सुबोध खरे's picture

21 Aug 2013 - 9:34 am | सुबोध खरे

डॉक्टर बाबा साहेब,
आमच्या बालरोग तज्ञाला मूत खडा झाला होता मी त्याला गमतीने म्हटले कि माझा एक रुग्ण सांगत होता कि भेंडीची भाजी खा मूत खडा पडून जातो आणि काय आश्चर्य दुसर्या दिवशी तो माझ्याकडे आला आणि मला पडलेला खडा दाखवून म्हणाला कि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी भेंडीची भाजी खाल्ली आणि हा खडा पडला.
पण दुर्दैवाने त्याच बालरोग तज्ञाला पुढच्या वेळेला खडा खाली उतरत असताना भेंडीची भाजी खाउन काहीही उपयोग झाला नाही. त्याने भेंडी कच्ची आणि परतून पण खाऊन पाहिली पण काहीही उपयोग झाला नाही.असेच इतर रुग्णाच्या बाबतीत झाले.
मला एवढेच म्हणायचे आहे कि जोवर एखादे औषध ( कोणत्याही पाथीचे) जोवर हजारो रुग्णावर DOUBLE BLIND RANDOMISED CONTROLLED TRIALS (http://en.wikipedia.org/wiki/Randomized_controlled_trial) करून सिद्ध होत नाही तोवर त्याचा नक्की फायदा होतो हे सांगता येणार नाही. (या चाचण्या संख्याशास्त्राच्या कसोट्या असून त्या आधुनिक वैद्यकाची बटिक असल्याचा आव मात्र इतर पथी चे लोक करताना आढळतात.)
प्रत्येक डॉक्टर कडे असे चमत्काराचे स्वानुभव असतात पण हे पुढच्या रुग्णावर उपयुक्त ठरतात असे नाही. दुर्दैवाने आयुर्वेदीक किंवा होमियोपथिक कौन्सिल मधील दुद्धाचार्य यातले काहीही न करता स्वार्थासाठी त्या पदांचा वापर करताना दिसतात त्यामुळे या प्राचीन/नवीन उपचारपद्धतीचा भविष्यकाळ फारसा आशादायक दिसत नाही.

मी कधीच ५ मिमी च्या खालच्या रुग्नांना औषधे देतच नाही,कारण साधा उसाचा रस ३-४ ग्लास पिला की पुढच्या काही तासात तो खडा मुत्रोत्सर्जन वाढुन पडतो,त्याला कशाचीच गरज नसते,दुसर भेंडीच्या भाजीने खड्याचा त्रास वाढतो,कमी होत नाही,तिसरी गोष्ट माझ्या ओपिडीत कंपल्सरी औष्धे देण्यापुर्वी आनी त्यानंतर एक महिन्याने औषध बंद करण्यासाठी सोनोग्राफी केली जाते,आयुर्वेद फक्त उपचार पद्धती नाहीये ती जिवनपद्धती आहे,यात आहार विहार्,आजार होन्याची कारणे या सगळ्याच गोष्टींचा विचार केला जातो,कारण एकदा खडे तयार झाले की बर्‍याच रुग्नांच्या किडनी मध्ये ते परत परत तयार होण्याची प्रवृती वाढीस लागते, यातुन काही वर्षांनी तिचे कार्य बिघडते,हे घडु न देन्यासाठी आयुर्वेद काम निच्छित करतो.कारन मी माझ्या आईलाच मागची १२ वर्ष फक्त आयुर्वेदीक औषधांवर जगवतोय्,कारण माझ्या जन्मापुवीच ३२ वर्षापुर्वी तिची एक किडनी एका ऑपरेशन मध्ये काढली गेली होती, त्यानंतर एक दोन वेळा तिचे क्रिएटीन वाढले होते,पण एकही अ‍ॅलोपॅथी ड्रग न वापरता ती ठणठणीत बरी आहे,त्यात कधीच मॉर्डन मेडीसिन वापरली गेली नाहीत्.
एक गोष्ट मान्य आहे की मायक्रो लेव्हल किंवा सेल लेव्हलला जाउन आयुर्वेदात संशोधन झाले नाही,पण आयुर्वेदाचा ढाचाच वेगळा आहे,हजारो वर्ष ही उपचार पद्धती चालु आहे,म्हणून ती टाकाउ आहे का ? बर्‍याच आजारांसाठी अ‍ॅलोपॅथी अलर्जीच नाव देते,प्रत्यक्षात ते आयुर्वेदात सहज साध्य आहेत,सोरियासिसचा कसलाही रुग्न माझ्याकडे पाठवा,जिथे माझ्या शेजारचा ससुन(बी.जे.मेडीकलचा)चा स्किनचा स्पेश्यालिस्ट दम टाकतो. मी त्याला बरा करुन दाखवतो.नाही जमले तर गावाकडे जाउन नांगर पकडतो.तेच शितपित्त मध्ये काही केसेस मध्ये नाही रिझ्लट मिळत.
मी प्रथम पासुन एकच गोष्ट मांडतो आहे,पॅथी कुठलीच चांगली किंवा टाकावु नसते,फक्त तिच्या मर्यादा पाळुन काम करा,डॉक्टरचा खिसा भरण्यासाठी नाही पण रुग्नाच्या आयुष्यासाठी ते हितकर ठरेल.

अनुप ढेरे's picture

22 Aug 2013 - 4:31 pm | अनुप ढेरे

मी प्रथम पासुन एकच गोष्ट मांडतो आहे,पॅथी कुठलीच चांगली किंवा टाकावु नसते,फक्त तिच्या मर्यादा पाळुन काम करा,डॉक्टरचा खिसा भरण्यासाठी नाही पण रुग्नाच्या आयुष्यासाठी ते हितकर ठरेल.

छान प्रतिसाद...

दादा कोंडके's picture

22 Aug 2013 - 5:00 pm | दादा कोंडके

पॅथी कुठलीच चांगली किंवा टाकावु नसते,फक्त तिच्या मर्यादा पाळुन काम करा,

सहमत. फक्त काहिंची मर्यादा सुरू होण्याआधिच संपते. ;)

शैलेशसहस्त्रबुद्धे's picture

4 Jul 2019 - 9:46 am | शैलेशसहस्त्रबुद्धे

तुमचा पत्ता मिळेल का?

म्हैस's picture

20 Aug 2013 - 2:30 pm | म्हैस

खडीवाले वैद्य आणि ते बालाजी तांबे तर अजिबात नको. खडीवाले आधी चांगले होते पण आता त्यांची मुले तो व्यवसाय सांभाळतात. त्यांना आयुर्वेदातला काही कलता कि नाही कोण जाने. आणि हा पिचू फेम म्हातारा तर एका बाजूला १००% नफा कमावतो आणि दुसरीकडे गीता निरुपण सांगतो. ताम्बेंची सगळीच पुस्तके अर्थहिन आहेत.

दत्ता काळे's picture

21 Aug 2013 - 9:40 am | दत्ता काळे

२.५ mm च्या किडनी स्टोनवरील उपचारासाठी मला होमिओपॅथी उपचारांचा चांगलाच फायदा झाला.

गुरुचरण's picture

22 Aug 2013 - 4:10 pm | गुरुचरण

झेलम पाषाणकर, सदाशिव पेठ- सुजाता मस्तानी दुकान जवळ- अतिशय निष्णात वैद्य आहेत

वैद्य खासगीवाले, बाजीराव रोड,पुणे
खूण : बाजीराव रोडवर आठवले डेअरी आहे आणि त्याबाजूला आयुर्वेदिक औषधांचे दुकान आहे. ह्याच्या विरुद्ध बाजूला एक छोटासा बस स्टॉप आहे. त्याशेजारी एक जुनाट घर दिसते. तेच घर !
वैद्य बुधवारी आणि शनिवारी (दुपार ३ ते रात्री पर्यंत) प्रॅक्टिस करतात.
बोलण्यात अतिशय स्पष्टवक्ते. जास्त प्रश्न विचारलेले चालत नाहीत. कुरकुर न करता चार-पाच तास बसण्याची तयारी असेल तरच जावे.

जालिम लोशन's picture

4 Jul 2019 - 2:21 pm | जालिम लोशन

इतक्या ऊशिरा सांगुन ऊपयोग नाही.

लिहू देत. कोणालातरी उपयोग होईल.
लिहिल्याबद्दल धन्यवाद.