बोका-ए-आझमला भावपूर्ण श्रध्दांजली
बोका गेला. अरे ४२ हे काय जायचे वय होते का?त्याला झालेल्या आजाराविषयी ६-७ महिन्यांपासूनच कल्पना होती आणि त्यातून तो बरा होणे फारच कठिण आहे हे पण माहित होते. तरीही मानवी वेडं मन शेवटपर्यंत हार मानायला तयार होत नाही. अगदी कालपर्यंत वाटत होते की काहीतरी चमत्कार होईल आणि एक दिवस व्हॉट्सअॅप ग्रुपवर त्याचे मेसेज बघायला मिळतील. पण आज ती वाईट बातमी समजली आणि मन दु:खाने भरून आले.