फिटनेस सोपी गोष्ट आहे
फिटनेस ५० आणि फिटनेस १००
कुटुंबासोबत व जवळच्यांसोबत फिटनेसचा आनंद घेण्याचा उपक्रम
फिटनेस ५० आणि फिटनेस १००
कुटुंबासोबत व जवळच्यांसोबत फिटनेसचा आनंद घेण्याचा उपक्रम
काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी.
भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी
मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव
ता सार्यांना चकवशील तर मिळेल तुजला धाव
चतुर आणखी सावध जो जो तोच इथे रंगला
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला.
समुद्रमंथन - पाश्चिमात्य व्हर्जन
प्रिय पाकिस्तानी क्रिकेट संघ,
First things first. प्रिय म्हणालो म्हणून हुरळून जाऊ नका. जोपर्यंत सीमेपलिकडून एक गोळी काय - एक दगडही माझ्या देशाकडे येत असेल, तुम्ही खतपाणी घालत असलेला दहशतवाद एकाही भारतीयाला झळ पोहोचवत असेल, जोपर्यंत माझ्या देशाबद्दल विखारी, अमंगळ विचार करणारा एकही नेता तुमच्या देशात जिवंत असेल तोपर्यंत तुम्ही माझे शत्रूच राहणार आहात. अर्थात तुमच्या हुकूमतीच्या कट - कारस्थानांना टाचेखाली चिरडायला आमच्या intelligence agencies आणि आमची सेना समर्थ असल्याने सामान्य नागरिक म्हणून तुमचा देश आमच्या खीजगणतीतही येत नाही. तेव्हा आपण फक्त क्रिकेटबद्दल बोलूया.
साल १९७५, भारताचा विश्वचषकाचा पहिला सामना. इंग्लंडनी ६० ओव्हर्समध्ये ३३५ धावांचं आव्हान ठेवलं तेव्हा न लढताच आपण शस्त्र टाकली. ना अनुभव, ना मानसिकता. तेव्हा एका विक्रमादित्यानं बॅटिंग केली तीच औपचारिकता पूर्ण करण्यासाठी. २०२ रन्सनी हारलो तरी निदान ६० ओव्हर टिकलो. किमान पूर्ण वस्त्रहरण नाही झालं. अगदीच अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली गेली नाहीत हेच काय ते समाधान.
ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेली टी-२० विश्वचषक स्पर्धा मध्यावर आलेली आहे.. या स्पर्धेत पहिल्या चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकत भारत ग्रुप २ मध्ये पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.. या लेखाच्या माध्यमातून आपण भारतीय संघाच्या एकंदर कामगिरी बद्दल बोलणार आहोत.
पहिल्या सामन्यात अटीतटीच्या लढतीत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आणि विश्वचषकाला धडाक्यात सुरूवात केली. या सामन्यानंतर भारतीय संघाची आणि धुवांधार अर्धशतक झळकावनाऱ्या विराटची खूप वाहवा झाली. विराट कोहलीने या सामन्यात ५३ चेंडूत ८२ धावा बनवल्या आणि सामनावीर होण्याचा मान पटकावला.
यंदाच्या क्रीडा हंगामाचा शेवट नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनं होणार आहे. कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून तो देश आपली प्रतिमा उंचावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. या वर्षी ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा, बीजिंग हिवाळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक, बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, महिला क्रिकेट विश्वचषक यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. मात्र चीनमध्ये अजूनही COVID-19 ची स्थिती गंभीर असल्यामुळं सप्टेंबर 2022 मध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा एक वर्ष पुढं ढकलण्यात आली आहे.