कॅप्टन कूल - महेंद्रसिंह धोनी
आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला शेवटच्या ओव्हर मध्ये १२ धावांची गरज आहे....प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार ३० पेक्षा अधिक धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे..अश्या वेळेस विश्वातला कोणताही कर्णधार शेवटची ओव्हर संघातील सर्वात अनुभवी गोलंदाजाला देणे पसंत करेल.....पण ३ यष्टयांच्या मागे उभ्या असलेल्या कर्णधाराच्या मनात वेगळाच प्लॅन होता. त्याने शेवटची ओवर फक्त ३ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या जोगिंदर शर्माला दिली आणि इथेच भारतीय क्रिकेट मधल्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. तो सामना होता पहिल्यावहिल्या T-२० विश्वचषकाचा अंतिम सामना.