धटिंगण रॉ आणी वॉशिंग्टन पोस्ट ची कावकाव
लोकसत्ता मध्ये आज एक मस्त बातमी वाचली (ती कॉपी पेस्ट करत नाही , नाहीतर काही सन्माननीय सदस्य... )
वॉशिंग्टन पोस्ट मधल्या बातमीचा गोषवारा असा होता की...
भारताची ‘रॉ’ गुप्तहेर संघटना मोसाद, सीआयए, केजीबीसारखीच धोकादायक आहे.
गेल्या दोन अडीच वर्षात साधारण १०/११ जणांची पाकिस्तानात हत्या झालीये.
त्या सगळ्या हत्यांमध्ये एक सूत्र सामान आहे , हे सगळे कार्यकर्ते भारतविरोधी प्रचारामध्ये किंवा प्रत्यक्ष वा अ-प्रत्यक्ष कारवायांमध्ये गुंतलेले होते
ईस मे रा की साजिश है (रॉ नाही बरका) पाकिस्तानी चॅनेल्स कंठशोष करून सांगतायेत...