तेल,साखर, मीठ प्रमाणा बाहेर प्राशन करणं म्हणजे मधुमेहाला आ मं त्र ण करणं.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
1 May 2024 - 10:01 pm

तेल,साखर, मीठ प्रमाणा बाहेर प्राशन करणं
म्हणजे मधुमेहाला आ मं त्र ण करणं.

काल मी आणि श्री समर्थ असे दोघेच तळ्यावर फेऱ्या घालत होतो.बोलता बोलता मधुमेह ह्या
व्याधीचा विषय निघाला.
“अलीकडे आपल्याकडे ह्या व्याधींचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे “
असं मी समर्थांना म्हणालो.
“जशी देशाची श्रीमंती वाढत चालली आहे तशी
अनेक जणांची खाण्याची सवय वृद्धींगत होत
चालली आहे असं मला वाटतं. आणि हळूहळू
एव्हडं जेवण घरी तयार करून ठेवण्यापेक्षा
बाहेर उक्तं मिळत असेल तर बाहेर पैसे खर्च
केल्यास घरी कष्ट कमी होतात.आणि बाहेर जेवण्याच्या सवयी वाढत असल्याने त्याची
पुर्तता करण्यासाठी खाण्याच्या सोई वाढत आहेत. आणि सोई वाढत असल्याने जास्त
रुचकर पदार्थ बनविण्यासाठी स्पर्धा वाढत
आहेत. आणि रूचकर जेवण बनवण्याच्या
स्पर्धेत तेल,साखर आणि मीठ या वस्तू सहजतेने
वापरल्या जात असल्याने,अशा रुचकर पदार्थांच्या सेवनाने,चरबी आणि वजन वाढत
चाललेलं आहे.त्यमुळे हृदय दाब वाढत चालला आहे.”
मला मधेच थांबवत श्री समर्थ म्हणाले,
“ सामंत, तुम्ही हे सर्व सांगत असताना मला
एक लक्षात आलं आहे की,
”वाढत चाललं आहे “ हे तुम्ही इतके वेळां वापरत आहात की,
“कमी होत चाललं आहे “
हा वाकप्रचार तुम्ही जवळ जवळ विसरलेले
दिसता आहात”
असं म्हणून समर्थ मिस्किल होऊन
माझ्याकडे पाहत होते.
आवंढा गिळून मी म्हणालो,
“असा कसा मी तो वाकप्रचार विसरेन?
अहो समर्थजी,
“कमी होत चालला आहे”
तो व्यायाम. आणि तेच कारण मधुमेह व्याधी
वाढवण्यात हातभार लावतोय.
“हिरव्या” वयात काही खाल्लं, कितीही खाल्लं
तरी चालतं पण “पिवळ्या आणि लाल” वयात
शरिर साथ देत नाही ना!
कुरकुरीत भजी,पाववडा,चपचपीत तूप घातलेला
सांजा,बटाट्याची तेलात तळसलेली भाजी with
पुऱ्या, हे असलं खाणं शरिराला झेपत नाही ना!
अहो समर्थजी,एकेका नेत्यांची राजकारण करत
असताना चालताना पूढे आलेली पोटं बघा, अतिशयोक्ती नाही करत,साडी नेसून हे चालत
असते तर दहा महिन्याची (नऊ महिन्यांचा वर)
गरोदर बाई, delivery ला चालली आहे असं
वाटेल.मी हे सर्व तुम्हाला सांगून मला Energy
येई तो पर्यंत जरा गोड खातो.”
असं म्हणून समर्थजीनी साखरे बद्दल काही तरी
सांगावं असं गृहीत धरे पर्यंत तेच म्हणाले,

“मला असं वाटतं की,आपण कदाचित जास्त साखर खातो. आणि मला खरोखर वाटतं की
आपण परिष्कृत साखर (refined sugar) आणि त्या साखरेचे सर्व पदार्थ आणि साखरेला पर्याय म्हणून गोड करण्यासाठी वापरून बनवलेले पदार्थ खाणं का सोडलं पाहिजे हे ऐकण्यात तुम्हाला रस असेल.

तुम्हाला वाटेल साखर सोडणं आणि साखरेचा पर्याय सोडणं कठीण आहे.पण हे काही आठवडे कठीण वाटेल पण नंतर तुमच्या जिभेवर गोड पणा भासवणारी जागा कमी कमी गोड चव
दाखवत जाईल.
जिभेवर गोडपणा वेगळ्या पातळीवर काम करील.आंबा,सफरचंद आणि संत्री यांसारख्या फळांची चव खूपच गोड वाटेल.
तुम्हाला लक्षात येईल की तुमचे वजन टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला पुन्हा कधीही नियमातला आहार (diet) घ्यावा लागणार नाही.”

पिवळ्या, लाल” वयात गेलेलो आम्ही दोघेही
मधुमेह मुक्त असल्याचं कारण ह्या तळ्यावरच्या
फेऱ्या असाव्यात ह्या मुद्द्यावर सहमत नसणं
म्हणजे,तेल,साखर, मीठ खाऊन ही मधुमेह
होत नसतो असं म्हटल्यास सारखं होईल.

औषधोपचारसमीक्षा

प्रतिक्रिया

वाक्ये सरळ लिहिण्याऐवजी वाट्टेलतिथे तोडून लिहीली आहेत, म्हणून वाटले. हा काही नवीन साहित्यप्रकार आहे ? की AI / speech to Text ची करामत आहे ?

उग्रसेन's picture

2 May 2024 - 8:27 am | उग्रसेन

लिहिणा-या वाटेल तसं लिहु द्या.
चित्र-बीत्र त्यावर लेख लिहा.

उगा शानपट्टी कशाला म्हणतो मी

चित्रगुप्त सर तुमचं असं झालंय की राहुल गांधी जसा मोदी बद्दल काही ना काही तरी टीका करत असतो तसे झाले म्हणजे मी काय मला मोदी समजत नाही पण मला म्हणायचा अर्थ असा आहे की आता हे मी जे लिहिलंय ते तुम्हाला कुठच्याच गुगलवर मिळणार नाही आणि हे मी माझ्या भारतीय बांधवांसाठी लिहिलंय तर त्याच्यातही तुम्हाला आरटीबीटीजन दिसते मला म्हणायचंय यातही तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स दिसतं अहो साधारण 20 29 पासून हे जे आपल्यासारखे साहित्यिका आहेत ना त्यांची त्यांची जरुरीच भाषण नाही सुपर आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे मेंदू ज्यावेळी कार्यरत होतील त्यावेळी माणसाचे मेंदू मागे पडतील पु ल देशपांडे यांसारखे लेखक हजारोंनी तयार होतील मग तुमचं आमचं काय एनीवे आता जेवढं मला सुचलं तेवढं मी ह्याच आर्टिफिशियल व्हाईस इंटेलिजन्स मधून तुम्हाला टाईप करून कळवत आहे त्याच्यात काही चुकाही दिसतील पण त्याला नाही लाज आहे यू आर वेलकम थँक्स

कंजूस's picture

2 May 2024 - 5:40 am | कंजूस

बाकी हे समर्थ कोण?
तेल तूप साखर {अनावश्यक मात्रेत} खाण्याचा परिणाम म्हणजे मधुमेह ही व्याधी असा समज आहे. व्याधींचा परिणाम म्हणजे हे जिन्नस न पचणे.

श्रीकृष्ण सामंत's picture

2 May 2024 - 5:59 am | श्रीकृष्ण सामंत

हे समर्थ माझे मित्र आहेत ते पूर्वी प्रोफेसर होते सायन्स सब्जेक्ट वर आम्ही दोन-चार मित्रमंडळी म्हणजे प्रोफेसर देसाई प्रोफेसर 200 प्रोफेसर समर्थ आणि मी असे मित्रमंडळी संध्याकाळी भेटतो आमच्या जवळच्या तळ्यावर आणि तिकडे गप्पागोष्टी होतात कधी कधी आम्ही चौघेही नसतो तेव्हा जे कोण भेटलो त्यांच्याशी चालू घडामोडीवर किंवा नवीन विषयावर चर्चा होतात आणि ह्या चर्चा मी माझ्या ब्लॉगवर कृष्ण वॉच गुगल केल्यावर माझा ब्लॉग मिळेल कृष्ण वाच म्हणून त्याच्या त्याच्यावर हे लिहीत असतो

श्रीकृष्ण सामंत's picture

2 May 2024 - 6:09 am | श्रीकृष्ण सामंत

माझा ब्लॉग कृष्ण उवाच गुगलवर शोधता येईल.shrikrishnasamantwordpress.com आहे

अहिरावण's picture

2 May 2024 - 2:29 pm | अहिरावण

बरे होते काही काळ हे गप्प होते ते....

काही काही खरंच चांगले ब्लॉग असतात. पण होतं काय की सातत्याने ते लिहीत नाहीत आणि मागे पडतात.

चौथा कोनाडा's picture

2 May 2024 - 5:52 pm | चौथा कोनाडा

हे मिपाकडं कसे काय परतले असतील बुवा ?
ब्लॉगस्पॉट्वर मंदी आलीय ?