१०८ वेळेस बेल
खरं तर आज शाळेला सुट्टी होती , तरीही गुंड्याला भल्या पहाटे उठवले होते. सुट्टीचा दिवस असूनही त्याने अजिबात कुरबुर केली नाही , उलट आज स्वारीचा उत्साह दांडगा होता. कारण आज महाशिवरात्री होती. शंभू महादेव त्याचं आवडतं दैवत आणि उपवासाचा छान छान फराळ खायला मिळणार म्हणून अजून जास्त खुश. गुंडया जसा आंघोळ करुन तयार झाला तसं आईनं हातात बेलान भरलेली पिशवी दिली आणि सांगितलं - "हे बघ गुंड्या ह्यात एकशे आठ बेलाची पानं आहेत. मंदिरात जाऊन महादेवाला वाहून ये. पण तिथं जाऊन बद्द करून पिशवी पिंडीवर उलटी करून रिकामा होऊ नको.