सध्या गाजत असलेल्या 'मॅगी' प्रकरणामुळे आज नेस्ले ईडिया कंपनीच्या शेअरने जवळजवळ 10% ची गटांगळी खाल्ली. हे प्रकरण मिडियात आल्यापासुन म्हणजेच गेल्या पंधराएक् दिवसांत हा शेअर सधारण 1000 रुपयांनी (म्हणजे जवळजवळ 14% घसरला) आपण, एका सामान्य गुंतवणुकदाराने या बाबत काय करावयास हवे असे आपणास वाटते??..
कर्मधर्मसंयोगाने मी याच विषयावर् अर्थपुर्णच्या येत्या मासिकात एक लेख लिहिला आहे. जरुर वाचावा. आपल्या प्रतिक्रिया, सुचनांचे स्वागत आहे. - प्रसाद भागवत
प्रतिक्रिया
3 Jun 2015 - 2:32 pm | मृत्युन्जय
माझे मत आहे की विकत घ्यावा नेसले चा शेयर. नेसले म्हणजे फक्त मॅगी नूडल्स नाहित. त्याव्यतिरिक्ता खालील ब्रँड्स सुद्धा आहेतः
१. मॅगी सॉस
२. एवरीडे
३. मिल्कमेड
४. नेसले दही, दूध
५. नेसकॉफी
६. नेसटी
७. किटकॅट
८. मॅगी मसाले आणि इतर फूड प्रॉडक्ट्स
९. पॉलो
९. मिल्कीबार
१०. मंच
११. अल्पिनो, बारवन आणि इतर चॉकोलेट्स
यातला मॅगी नूडल्सचा हिस्सा किती आहे ते माहिती नाही पण बाकीचे ब्रँडसदेखील तगडे आहेत ज्याच्या विक्रीवर काही परिणाम होणार नाही (मॅगी ब्रँडेड प्रॉडक्ट्स वगळता). शिवाय एक दोन महिन्यात लोक सगळे विसरतील. मॅगी नूडल्स न्युट्रिशियस असल्याचे प्रमाणपत्र मिळेल. काही सिने तारका आणि क्रिकेटपटु येउन मॅगीतली पोषणमूल्ये समजावुन सांगतील, काही आया आपली पोरे कशी मॅगी नूडल्समुळे भाज्या खायला शिकली ते सांगतील. मॅगी हे आधुनिक संजीवनी असल्याचा आभास निर्माण केला जाइल. एक - २ महिन्यात लोक सगळे विसरतील. आणी मॅगी नूडल्सचा खप परत सुरु होइल. त्यामुळे आत्ता वाहत्या गंगेत हात धुवुन घ्या.
अर्थात भाव अजुन पडणार नाहित याची काही ग्यारंटी नाही.
अवांतरः खरेदी आपल्या जोखमीवर करावी माझ्या मतावर नाही.
3 Jun 2015 - 4:06 pm | प्रसाद१९७१
मॅगी कित्येक वर्ष खात आहे आणि ह्या प्रकरणामुळे खाणे अजिबात बंद करणार नाही. भारताबाहेर पण मॅगी मसाला भारतीयांमधे पॉप्युलर आहे. तिथे एक्स्पोर्ट होऊ शकले म्हणजे फार काही मोठी इश्यु नसणार.
रादर आजच पुढच्या ६ महीन्यांचा स्टॉक करुन ठेवणार आहे. आणि माझ्या सारखे लाखो आहेत.
4 Jun 2015 - 2:36 pm | ब़जरबट्टू
मॅगी भारतात कितीही पॉप्युलर असली, व आपली विसरायची सवय असली, तरी जिथे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, तिथे भारतीय आया ब-यापैकी जागरूक असतात... मागे जान्सन बेबी प्राडक्टच्या बाबतीत असाच किस्सा झाला होता, तेव्हा, मॅगी परत वर येणार हे नक्की, पण अब बुन्द से गयी है... :)
3 Jun 2015 - 4:10 pm | आदूबाळ
+१ सहमत आहे.
मुंबई हल्ल्याच्या वेळी इंडियन हॉटेल्सचा शेअरही असाच धडपडला होता. त्यावेळी तिथेच नोकरी करत असल्याने घेऊ शकलो नाही...
3 Jun 2015 - 5:18 pm | प्रसाद भागवत
मृत्युन्जय साहेब, माहितीबद्दल धन्यवाद.
3 Jun 2015 - 4:01 pm | आनंदराव
अगदी बरोबर
पण नेस्ले च्या दुध भुकटी मधे पण काहीतरी गड्बड सापडली आहे.
भाव ५५००/- पर्यंत खाली आल्यास ३ वर्षांसाठी घेण्यास उपयुक्त !
बाकि : आपआपली सदसदविवेकबुद्धी वापरावी. माझी नको.
3 Jun 2015 - 5:16 pm | प्रसाद भागवत
काय 5500??...आपल्या तोडांत मॅगी सॉस, एवरीडे,मिल्कमेड.नेसले दही, दूध, नेसकॉफी. नेसटी.किटकॅट.मॅगी मसाले आणि इतर फूड प्रॉडक्ट्स, पॉलो. मिल्कीबार, मंच, अल्पिनो, बारवन, आणि इतर चॉकोलेट्स पडो.
3 Jun 2015 - 6:56 pm | आनंदराव
नको नको
त्यापेक्षा मस्त बोकड कापु
मटान बिटान
8 Jun 2015 - 5:52 pm | कपिलमुनी
आहे
3 Jun 2015 - 4:23 pm | रामदास
ठरवून राडा घातल्यासारखे वाटते आहे. त्यामुळे पडत्या भावात खरेदी करणार आहे.
3 Jun 2015 - 4:46 pm | संदीप डांगे
सहमत.
मॅगीला काँपीटीशन वाढल्याने हे एक मार्केटींग ट्रीक असल्यासारखे वाटत आहे. सेलीब्रिटी ब्रँड अम्बेसेडर्सना गुंतवणे म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा इशू पोचवणे. नंतर काही वेळाने याच लोकांना वापरून, झालेल्या पब्लिसिटीचा फायदा घेऊन मॅगी किती उत्तम आहे याची जाहिरात करणे. सद्यस्थितीत मॅगीकडे वेगळेपणाचा कोणताच मुद्दा नसल्याने बॅड पब्लिसिटीचा घाट घातला आहे अशी शंका आहे. यातूनच कंपनीला दमदार अॅड कँपेन करण्याचे कारण मिळते. असे इशूनंतर झालेले कँपेन लक्ष वेधून घेऊन जनतेमधे चर्चा होण्यास भाग पाडते. साध्या कॅम्पेनने विक्रीत होणारी ५-८ टक्के वाढ अशा वादग्रस्त कॅम्पेनने ३५ टक्क्यांपर्यंत वाढते.
इतरही बाजू असू शकतात. पण लेड आणि एमएसजी उकरून काढलेला वरवरचा मुद्दा आहे. याने फक्त एकच प्रश्न शिल्लक राहतो तो म्हणजे ते आधीपासून त्यात होतं का किंवा पुढे नसेल हे कसे ओळखायचं?
3 Jun 2015 - 4:53 pm | काळा पहाड
मी आत्ताच थोडासा युनिटेक (३५% कोसळला) खरेदी करण्यासाठी ऑव्हर्नाईट ऑर्डर प्लेस केली आहे.
अदानी ८२% कोसळला आहे. त्याबद्दल आपलं काय मत आहे?
3 Jun 2015 - 5:11 pm | प्रसाद भागवत
पहाड साहेब, अदानीच्या भावातील फरक हा डीमर्जरमुळे भावांत झालेली 'ॲडजेस्ट्मेंन्ट' आहे. युनिटेकबद्दल माझा अभ्यास नाही.
3 Jun 2015 - 5:13 pm | मृत्युन्जय
अदनी डीमर्जर स्कीम मुळे पडला आहे. स्कीमबद्दल आधिक माहिती मिळाल्यानंतर त्यावर काही बोलणे योग्य होइल.
युनिटेक का पडला कुणास ठाउक. डेड इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्यायला हरकत नाही. पैसे वायाच जातील असे समजुन घ्यायचा
3 Jun 2015 - 6:54 pm | आनंदराव
़जया,
युनिटेक चे क्यु४ चे रिझल्ट्स लागले आहेत.
१९४ कोटी लोस आहे
म्हणुन पडला
मी तर इन्फ्रा स्टोक च्या विरुद्ध आहे.
घ्यायचाच असेल तर लार्सन बेस्ट !
3 Jun 2015 - 7:02 pm | सुबोध खरे
युनिटेक ३५ % पडला तरी त्याला सर्किट का लावले गेले नाही?
माहितगार लोक यावर भाष्य करतील तर बरे होईल.
बाकी ५४५ पर्यंत गेलेला समभाग आज त्याचा दीड टक्के किमतीवर (रुपये ८. ७०) का आहे याचा विचार केला तर यामध्ये पैसे गुंतवावे का याचे उत्तरही मिळेल. कंपनी गाळात आहे. बुडणे बाकी आहे.
3 Jun 2015 - 7:12 pm | श्रीगुरुजी
युनिटेकशी संबंधित असलेली युनिनॉर ही कंपनी २-जी स्पेक्ट्रमच्या घोटाळ्यात अडकलेली आहे. त्यामुळेच काही वर्षांपासून युनिटेकचा शेअर पडलेला आहे. या घोटाळ्याचा निकाल लागल्यानंतरच युनिटेक पूर्ण बुडेल का तरेल हे नक्की होईल.
4 Jun 2015 - 10:28 pm | श्रीगुरुजी
युनिटेकचे वार्षिक निकाल मागील शुक्रवारी २९ मे रोजी लागले. युनिटेकला १९४ कोटी रू.चा तोटा झालेला आहे. या तोट्याचा परीणाम मागील शुक्रवारी व नंतर लगेच सोमवारी दिसायला हवा होता. या दोन दिवशी काही प्रमाणात हा समभाग घसरला. परंतु काल, म्हणजे निकालानंतर बर्याच उशीरा, हा समभाग ३५% ने घसरला (एकवेळ तो जवळपास ५०% खाली आला होता, पण नंतर ६.७५ या भावानंतर थोडा वाढून ८.७० ला बंद झाला.) त्याचे वेगळेच कारण आहे. वृत्तपत्रातील बातम्यानुसार या कंपनीवर ६००० कोटी रू. अधिक कर्ज आहे व कंपनी कर्ज फेडण्यास असमर्थ ठरत आहे असे वृत्त पसरल्याने या समभागाने इतकी मोठी आपटी खाल्ली.
यापूर्वी सत्यमचा घोटाळा उघडकीस आल्यावर यापेक्षा मोठ्या फरकाने सत्यमचा सहभाग घसरला होता. ९/११ नंतर मॅस्टेकचा समभाग एका दिवसात ५६० वरून २६० वर आला होता, तर इन्फोसिसचा समभाग ९/११ नंतरच्या पहिल्या दिवशी ४००० वरून २४०० वर व दुसर्या दिवशी २००० वर जाऊन पोहोचला होता.
5 Jun 2015 - 1:03 am | मार्मिक गोडसे
वृत्तपत्रातील बातम्यानुसार या कंपनीवर ६००० कोटी रू. अधिक कर्ज आहे व कंपनी कर्ज फेडण्यास असमर्थ ठरत आहे असे वृत्त पसरल्याने या समभागाने इतकी मोठी आपटी खाल्ली.
कंपनी प्रमोटरनी ९० % शेअर प्लेज केले आहेत, ह्या शेअरचे सौदे वायदे बाजारात होत असल्यामुळे शेअरचा भाव अजून खाली येउन मार्जीन कॉल आल्यास आणी प्रमोटर तो भरण्यास असम्रर्थ ठरल्यास हा शेअर एका सत्रात कीतीही खाली येऊ शकतो. अशा शेअरपासून दूर राहीलेले बरे.
5 Jun 2015 - 2:31 pm | श्रीगुरुजी
सहमत.
परंतु या शेअरमध्ये मी अडकलो आहे. विकण्यासाठी योग्य भावाची वाट बघत आहे. एखाद्या मोठ्या कंपनीने ही कंपनी टेकओव्हर केल्यास भाव वाढू शकतो.
7 Jun 2015 - 10:55 am | hitesh
केले तर तीही कंपनी बुडेल.
शेअर रामाला अर्पण करा.
7 Jun 2015 - 3:43 pm | नगरीनिरंजन
याला लॉस ॲव्हर्जन बायस म्हणतात.
7 Jun 2015 - 4:07 pm | काळा पहाड
बहुधा तसं नसावं. गुरुजींनी तो शेअर ८०+ रुपयात जरी घेतला असेल तरी आता लॉस राईट ऑफ करायमध्ये काही फायदा नाही. शेअर या व्हॅल्यूपासून ९०% पडला आहे. आता रिस्क फार थोडी आहे आणि होल्ड केल्यास पोटेंशियल फायदा असू शकतो.
8 Jun 2015 - 11:40 am | श्रीगुरुजी
मी होल्ड करणार आहे. अजून काही काळ थांबायची माझी तयारी आहे. २-जी स्पेक्ट्रम प्रकरणाचा निकाल याच वर्षी लागणार आहे. त्या निकालावर युनिटेकचे भवितव्य ठरेल.
4 Jun 2015 - 9:44 am | प्रसाद भागवत
डॉ. साहेब, युनिटेकबद्दल मी मत व्यक्त करु शकणार नाही पण आपण सर्किट का लागले नाही असे विचारले आहे. तसे न लागण्याचे कारण म्हणजे 'ज्या शेअर्सचा वायदा बाजारात(futures) समावेश आहे, त्यांना सर्किट बेकर्सचा नियम लागु होत नाही' हे आहे. बाकी युनिटेकबद्दल मी मत व्यक्त करु शकणार नाही धन्यवाद.
5 Jun 2015 - 11:58 am | आदूबाळ
नवीन माहिती. धन्यवाद!
हा नियम/अपवाद लॉजिकल वाटतो आहे. पण फ्यूचरच्या स्प्रेडपेक्षा मोठी चढउतार झाली तरी सर्किट लागणार नाही का?
5 Jun 2015 - 12:10 pm | चिनार
प्रसाद साहेब ..फ्युचर्स आणि ओप्शंस वर एखादा माहितीपूर्ण लेख येऊ द्या
5 Jun 2015 - 2:43 pm | प्रसाद भागवत
सध्याच्या नियमांनुसार तरी नाही.
5 Jun 2015 - 3:04 pm | मार्मिक गोडसे
हा नियम/अपवाद लॉजिकल वाटतो आहे. पण फ्यूचरच्या स्प्रेडपेक्षा मोठी चढउतार झाली तरी सर्किट लागणार नाही का?
एखाद्या शेअरचे वायदे बाजारातील ओपन इंटरेस्ट मार्केट वाईड पोजिशनच्या ९५ % मर्यादेबाहेर गेल्यास संबंधीत शेअरचे सौदे थांबविले जातात पण ही सर्व माहीती बा़जार बंद झाल्यावर एकत्रीत केली जाते आणी सौदे दुसर्या दिवशी रोखले जातात. मार्केट वाईड पोजिशनची ६०% ची मर्यादा पार केल्यास संबंधीत एक्सचेंजकडून तसे संदेश येतात.
3 Jun 2015 - 4:56 pm | वेल्लाभट
विचार करणेस हरकत नाही....
3 Jun 2015 - 5:19 pm | आकाश कंदील
मला पूर्वी एक SMS आला होता "तुम्ही तुमच्या १० लाखाची गाडी रॉकेल वर चालवता का, जर नाही तर तुमच्या शरीरात अपायकारक गोष्टी का टाकता ?" आता कधीतरी ठीक आहे पण 'प्रसाद१९७१' म्हणतात तसे "आजच पुढच्या ६ महीन्यांचा स्टॉक करुन ठेवणार आहे. आणि माझ्या सारखे लाखो आहेत" यावर काय बोलावे समजत नाही. मग गुणवत्ता आश्वासन, गुणवत्ता नियंत्रण वैगेरे विभागाची ची गरजच काय. आपण आपल्या बद्दल जागरूक नसलो तर दुसरे आपली काळजी कशाला करतील.
बाकी मला माहित आहे माझा मुद्दा धाग्याच्या विषया पासून वेगळा आहे पण राहवले नाही म्हणून मत मांडले.
3 Jun 2015 - 5:30 pm | प्रसाद१९७१
१. एक तर गेली ३० वर्ष मॅगी खाऊन काही त्रास झाला नाही. झालाच तर तो मॅगी मुळे होईल असे वाटत नाही. कारण मॅगी खाल्ली तरी जास्तीत जास्त आठवड्यात एकवेळेला.
२. भारतीय सरकारच्या कुठल्याही विभागावर विश्वास नाही. उत्तर प्रदेशच्या तर नाहीच नाही. नेसले वर जास्त विश्वास आहे.
३. प्रचंड धुर असणार्या रस्त्यांवर दिवसाचा १ तास तरी जातोच, ( पूर्वी तर लेड पण असायचे ह्या धुरात ). कुठलीही टेस्ट पास होऊ शकणार नाही असे पाणी हे मायबाप सरकार देते. तेही वर्षभर पितच असतो.
ह्या सर्व प्रकारात मॅगी खाउन अजुन काही जास्तीचा अपाय होइल असे वाटत नाही.
3 Jun 2015 - 5:53 pm | प्रसाद भागवत
भारतीय सरकारच्या कुठल्याही विभागावर विश्वास नाही. उत्तर प्रदेशच्या तर नाहीच नाही. नेसले वर जास्त विश्वास आहे........दुर्दैवाने सहमत..
3 Jun 2015 - 5:50 pm | काळा पहाड
नेसले मागची कटकट संपलीयसं वाटत नाही. भाव उद्या सुद्धा खाली जावू शकतो. जोपर्यंत हा इश्श्यू हॉट आहे, तोपर्यंत कंपनीच्या स्टॉक वर नकारात्मक परिणाम होईलसं वाटतंय. उद्या वॉच ठेवून निर्णय घ्यावा म्हणतोय. भागवत साहेब, उद्या साठी काय प्रेडिक्शन आहे?
3 Jun 2015 - 6:03 pm | प्रसाद भागवत
अशा प्रकरणांतला क्लायमॅक्स कधी येइल याचा अंदाज बांधणे हे भुकंपाचा केंद्रबिंदु भुकंप होण्याआधीच सांगण्यासारखे आहे पहाड्साहेब. यावर उपाय म्हणुन खरेदी हप्त्याहप्त्याने करता येवु शकते.सर्वसामान्यतः, मला स्वतःला 5900 ही एक चांगली आधारपातळी वाटते आहे.
4 Jun 2015 - 9:59 pm | प्रसाद भागवत
नेस्लेसंदर्भात 'मला स्वतःला 5900 ही एक चांगली आधारपातळी वाटते आहे..' असे मी काल म्हटले होते, माझ्या या अनुमानावर विसंबुन आज साधारणतः मी 5855/60 दराने नेस्लेची खरेदी केली. येत्या 50 सत्रांत (sessions) मध्ये भावपातळी 6700+ व्हावी अशी माझी अटकळ आहे.
हा खुलासा करण्याचे कारण म्हणजे मी येथे करीत असलेल्या लिखाणातील विचार हे बहुतेकदा स्वतः अंमलात आणतो किंबहुना माझा चरितार्थ त्यावर गेली अनेक वर्षे अवलंबुन आहे, ही गोष्ट अधोरेखित करणे हा आहे.
अर्थातच अशा लेखनातुन (व अगदी याही प्रतिक्रियेतुन) मी कोणताही खरेदी विक्रीविषयक शिफारस करीत नाही वा कोणत्याही नफ्याची हमी देत नाही व याची नोंद सदस्यांनी घ्यावी.
3 Jun 2015 - 6:49 pm | सुबोध खरे
नेस्लेच्या समभागाला घेणारा दिवसाखेरीस कोणीही नव्हता. आताच आलेल्या बातमीनुसार माग्गीच्या नुडल्सच्या विक्रीवर दिल्लीत १५ दिवस बंदी घातली आहे. याचा अर्थच हा आहे कि उद्या तो अजून ५-१० % पडेल. आणी येत्या महिन्याभरात तो सहजरीत्या चढणार नाही. कारण कायद्याच्या कटकटीतून बाहेर पडण्यास त्यांना अजून थोडा वेळ लागेल. आज सहा हजार दोनशेच्या आसपास एक समभाग घेऊन तो जास्तीत जास्त किती चढेल तर सात हजार पर्यंत( गेल्या सहा महिन्यांची सरासरी) आजमितीस सर्वात जास्त ( लाइफ टाईम हाय) ७५०० होता. तेंव्हा मिळणारा परतावा हा १३% असेल यातून १.५ टक्के ब्रोकर चे कमिशन आणी नफ्या वर १५ % कमी वेळाचा भांडवली परतावा(SHORT TERM CAPITAL GAINS) म्हणजे २% असे ३. ५% कमी केलेत तर मिळणारा परतावा जास्तीतजास्त ९.५% असेल.
यात जर मॉन्सून कमी उतरला तर ग्रामीण भागातील त्यांची विक्री कमी राहील. अशा तर्हेच्या धोक्यांचा विचारही व्हावा
ब्लू चीप कंपनी असल्याने भांडवल बुडणार नाही हे नक्की.
परंतु त्याऐवजी त्याच श्रेणीतील टाटा स्टील घेतला तर ३१६ रुपयाचा समभाग ३५० रुपये नक्की होईल. म्हणजे वर दिल्याप्रमाणे सर्व खर्च वजा जाता १०% परतावा नक्की मिळेल. शिवाय एकदम एवढे पैसे एका समभागात गुंतवण्याऐवजी तुम्हाला पाहिजे तेवढे समभाग घेता येतील. किंवा आय सी आय सी आय बँक २९७ रुपयाला घेतल्यास तो नक्की तितकाच परतावा देऊ शकेल.
ज्यांना एकदम एवढे पैसे एका समभागात गुंतवायचे नाहीत त्यांनी अशा तीन चार कंपन्यांचे पाच पाच समभाग घेतले तर त्यातून मिळणारा नफा तेवढाच असेल पण पैसे जास्त खेळते राहू शकतील आणी धोका तितका कमी होईल.
ता क़:- मी एक सामान्य गुंतवणूकदार आहे आणि माझे पैसे मी समभागात गुगलवर बातम्या काढून वाचल्यानंतर कुठे गुंतवायचे ते ठरवतो. प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या बुद्धीनुसार गुंतवणूक कशी करावी हे ठरवावे
3 Jun 2015 - 8:07 pm | प्रसाद भागवत
डॉ. साहेब, (१) नेस्लेच्या समभागाला घेणारा दिवसाखेरीस कोणीही नव्हता.... ही माहिती कोठे उपलब्ध आहे ?? (२) दिल्लीत १५ दिवस बंदी घातली आहे. याचा अर्थच हा आहे कि उद्या तो अजून ५-१० % पडेल..... ह्या विधानांमुळे गोंधळ उडाला आहे. (३)एकीकडे नफ्याची टक्केवारी काढताना वर्षाचा कालावधी धरलेला दिसतो आणि त्याच वेळेस कमी वेळाचा भांडवली परतावा(SHORT TERM CAPITAL GAINS)ही... (४) येत्या महिन्याभरात तो सहजरीत्या चढणार नाही.... तो जास्तीत जास्त किती चढेल तर सात हजार पर्यंत... त्याच श्रेणीतील टाटा स्टील घेतला तर ३१६ रुपयाचा समभाग ३५० रुपये नक्की होईल...शक्य आहे पण शेवटी हे अंदाजच आहेत. काळच याची उत्तरे देइल.(५) शिवाय एकदम एवढे पैसे एका समभागात गुंतवण्याऐवजी तुम्हाला पाहिजे तेवढे समभाग घेता येतील...या वर एक (वादग्रस्त) विधान उध्रूत करतो.. 'Diversification is protection against ignorance......
3 Jun 2015 - 8:24 pm | सुबोध खरे
MONEYCONTROL च्या वेबसाईट वर हा समभाग टिचकी मारल्यास BID आणी OFFER PRICE आणी QUANTITY आपल्याला दिसू शकतात. याच ठिकाणी समभाग आयुष्याभरात सर्वोच्च स्थानावर किति आणी कधी पोहोचला हे येते आणी बाकी सर्व त्या कंपनीची कुंडलीहि दिसू शकते.
साहेब कोणताही समभाग घ्या एक तर एका वर्षाच्या आत आपण विकलात तर STCG आपल्याला भरायला लागेल मग तो टाटा स्टील असो कि नेसले वा आय सी आय सी आय बँक असो त्यामुळे तुलनात्मक रित्या काहीच फरक पडत नाही. राहिली गोष्ट टक्केवारी काढताना एक वर्षाच्या आतील कालावधी धरला आहे. जो माणूस लांब पल्ल्यासाठी( एक वर्ष आणी अधिक) गुंतवणूक करणार आहे त्यासाठी तर टाटा स्टील किंवा आय सी आय सी आय बँक या नक्कीच नेसले पेक्षा चांगल्या कंपन्या( परताव्याच्या दृष्टीने) आहेत. कारण नेसले कंपनी अधिक चांगलीअसली तरी त्याचा समभाग फार महाग आणी फार उच्चीवर आहे.
http://www.theguardian.com/world/2015/jun/03/india-withdraws-maggi-noodl... गुगलून पहा.
राहिली गोष्ट 'Diversification is protection against ignorance.या बाबत आपले मत बहुसंख्य जनता आणी विशेषज्ञ यांच्या विरोधात आहे त्याबद्दल मी मत देणे टाळतो.
3 Jun 2015 - 8:49 pm | प्रसाद भागवत
(१)दिवसाअखेरीस सर्वच BID आणी OFFER PRICE आणी QUANTITY ह्या शुन्य दिसत असाव्यात, मात्र ह्यावर विसंबुन आपण करता तसे विधान करणे चुकीचे आहे. आपण सुचविलेल्या ह्याच पानावर दोनच सेमी वर आज झालेला व्हॉल्युम पहा. तेथे पाहता येते की गेले ३० दिवसाच्या व्हॉल्युमच्या १०पट शेअर्सचा आज व्यवहार झाला. म्हणजेच आज दिवसाअखेरीस या शेअरला कोणी खरेदीदार नव्हते हे कसे काय ??
(२) सर्वस्वी आपल्या अंदाजांवर आधारित असा आपण सुचविलेला पर्याय( म्हणजे टाटा स्टील) आणि नेस्ले यांच्या संभाव्य नफ्यात आपल्याच आकडेवारीप्रमाणे फरक आहे तो उणापुरा अर्धा टक्का. त्यात उजवे डावे कसले??. घाईघाईत आकडेवारीतली झालेली गफलत मी फक्त नजरेस आणुन दिली, ती आपण मान्य करुन आपली आकडेमोड सुधारावी म्हणुन एवढेच त्याने तर्कात फरक पडेल असे म्हणालो नाही.
(३)कोण महाग, कोण स्वस्त...हे काळच ठरवेल. बाजर इतक्या गणिती, साचेबद्ध पद्ध्तीने चालत नाही हे मी आपणास सांगावयस नकोच
(४) 'Diversification is protection against ignorance.या बाबत आपले मत.........क्षमस्व. मी हे 'उधृत' केलेले वाक्य आहे हे बहुधा घाईत आपल्या नजरेतुन सुटले असावे. साहेब, हे माझे नव्हे तर सर बफेट यांचे मत आहे.
3 Jun 2015 - 9:36 pm | सुबोध खरे
PREV. CLOSE
6803.25
OPEN PRICE
6500.00
BID PRICE (QTY.)
0.00 (0)
OFFER PRICE (QTY.)
6186.95 (138)
साहेब
NSE वर बिड कोणीच करत नव्हतं पण offer price आणि quantity पण दिसत आहे वर दिले आहे याचा अर्थ मी म्हणालो तसा आहे.
गेले ३० दिवसाच्या व्हॉल्युमच्या १०पट शेअर्सचा आज व्यवहार झाला. म्हणजेच आज दिवसाअखेरीस या शेअरला कोणी खरेदीदार नव्हते हे कसे काय ??तुमच्या माझ्या सारखे लोक थांबले आहेत समभाग अजून पडण्याची वाट पाहत म्हणूनच तर दिवसाखेरीस कोणी विकत घेणारा नाही. दहा पट व्यवहार झाला कारण लोकानी आपले समभाग घाईने विक्रीस काढले आणि तोटा कमी केला. अठरा मेला ७३२७ ला असलेला समभाग आज ५९८० पर्यंत घसरला याचे कारण काय ? लोक गेले पंधरा दिवस हे समभाग विकत आहेत. आणि याची सुरुवात १९ मी च्या बातमीने झाली आहे. तेंव्हा या समभागाने ताल गाठला आहे असे म्हणवत नाही. http://www.moneycontrol.com/news/cnbctv18-comments/gujaratmaharashtra-fd...
राहिली गोष्ट बाजार इतक्या गणिती, साचेबद्ध पद्ध्तीने चालत नाही म्हणून तर एकाच टोपलीत आपली अंडी ठेवू नका हि म्हण प्रसिद्ध आहे यासाठीच मी म्हणालो कि एक महाग समभाग घेण्यापेक्षा त्याच किमतीत चार उत्तम कंपन्यांचे पण तुलनेत स्वस्त समभाग घ्या.
बाकी आपण सर्व "बफेट" नाही म्हणूनच "diversification" आवश्यक आहे.
3 Jun 2015 - 10:27 pm | प्रसाद भागवत
असहमत. आता या मुद्द्यावर आपल्या पोस्ट्स् दुराग्रहाकडे झुकताहेत असे खेदाने म्हणावे लागते. offer price आणि quantity ह्या सेकंदागणिक बदलतात. आपण पहात असलेला सोदा दिवसाचा शेवटचा सौदा आहे. त्यामुळे आपण म्हणता अशी स्थिती दिसते आहे. शेवटी खरेदीदार नव्हते या म्हणण्याला अर्थ नाही. अशी स्थिती जवळपास प्रत्येक समभागाबद्दल आणि दररोज दिसेल.तेंव्हा दिवसातला शेवटच्या सौद्यावरुन काहितरी निष्कर्ष काढ्ण्यात काय अर्थ आहे?? असे शेवटचे सौदे अनेकदा चुकीची माहिती प्रसुत करतात म्ह्णुनच दिवसाचा बंद निर्देशांक शेवट्च्या काही सोद्यांची सरासरी काढुन ठरवला जातो हे आपणास विदित असेलच.
"diversification" आवश्यक आहे किंवा नाही हे एकाच पॅथीच्या डॉक्टरच्या सल्ल्याने चालावे की ... याच चालीवरचा वैचारिक मुद्दा आहे.
एक महाग समभाग घेण्यापेक्षा त्याच किमतीत चार उत्तम कंपन्यांचे पण तुलनेत स्वस्त समभाग घ्या...पुन्हा एकदा महाग स्वस्त हे ठरविणार कोण?? एक्दाच१० ग्रॅम सोने घ्यावे की ०२/०२ ग्रॅम चांदी, काही तांबे,पितळ व अन्य धातु... हे सागंता येणे कठीण.
बाकी आधी "diversification" बाबतचे मत बहुसंख्य 'जनता आणी विशेषज्ञ' यांच्या विरोधात आहे असे लिहुन नंतर ... आपण सर्व "बफेट" नाही असे म्हणुन बफेट सरांचा सन्मान करण्याची आपली हातोटी आवडली.
4 Jun 2015 - 1:53 pm | प्रसाद१९७१
डॉक्टर साहेब, काल नेस्लेचे ७३०००+ शेयर्स विकले/घेतले गेले. हा सरासरी व्हॉल्युमच्या १०-१५ पट आहे. ह्याचाच अर्थ विकणारे होते तसेच ते घेणारे पण होते. तुम्ही दिवस संपल्यानंतर चे आकडे बघितल्या मुळे तुम्हाला कोणी खरेदीदार नाही असे वाटले.
सध्या टाटा स्टील च्या वाट्याला जावु नका ( जर आतली काही खबर नसली तर ). त्यांची कोरस स्टील प्रचंड नुकसान करते आहे. चीन ची मागणी कमी झाली तर फारच कठीण परीस्थिती येइल
3 Jun 2015 - 6:55 pm | प्रचेतस
आईसीआईसीआई ब्याङ्क एकदम सुरक्षित.
3 Jun 2015 - 7:00 pm | आनंदराव
एस बी आय
आय टी सी
सध्या च्गा भाव खरेदी करयला उत्तम
बाकी नेहमीचे डिस्केमर - स्वताची सद सद विवेकबुद्धी वापरावी.
3 Jun 2015 - 7:32 pm | काळा पहाड
१. चीन मध्ये मंदी सुरू झालेली आहे. त्याचा फटका कदाचित खनिजे आणि धातूंना बसू शकतो कारण भारत हे निर्यात करतो. http://www.cbc.ca/news/business/china-s-central-bank-cuts-interest-rates...
२. भारतात हे वर्ष दुष्काळाचं आहे. ऑटो उद्योगाला मोठा फटका बसू शकतो. रियल इस्टेट मध्ये मंदी आहेच. मोठ्ठी इन्व्हेन्टरी पडून आहे आणि आता दुष्काळात लोक गुंतवणूक करतील अशी शक्यता कमी आहे. बिल्डर्स आता काम अर्धवट सोडून पळून जाण्याची शक्यता जास्त आहे. नवीन प्रोजेक्ट मध्ये गुंतवणूक करताना विचार करून करा.
३. बँकांचे एन.पी.ए. सध्या उंच जागी आहेत. विशेष करून युनायटेड बँकेचे एनपीए पहा. एस बी आय सुद्धा एन.पी.ए. च्या बाबतीत धोक्याच्या जागी उभी आहे.
http://www.blog.sanasecurities.com/non-performing-asset-npa-in-public-se...
3 Jun 2015 - 11:17 pm | मी-सौरभ
या सेक्टर बद्दल काय मत आहे?
4 Jun 2015 - 2:04 am | सखारामगटणे
http://www.nestle.com/aboutus/ask-nestle/answers/maggi-noodles-india
एक शंका आहे त्यांनी असे म्हटले आहे की उत्तर प्रदेश मध्ये maggi packets मध्ये जास्त लीड सापडले ते lot नोव्हेंबर २०१४ expiry असलेले होते.. पण ह्याचा अर्थ असा आहे का की Maggi expire झाली की त्यातले लीड कंटेट वाढते?
एकूणच बर्याचादा maggi हानिकारक अशी डिबेट होत असते..कोणी तज्ञ ह्या बाबत अधिक माहिती देऊ शकेल काय?
4 Jun 2015 - 1:40 pm | काळा पहाड
असं होवू शकत नाही. लीड हा धातू आहे. एस्क्पायर झाल्यावर दुसर्या कंटेंट चा शिसे नावाचा धातू बनू शकत नाही*
* याला एक अपवाद आहे. युरेनियम-२३८ चं शिसे-२०६ मध्ये रेडिओअॅक्टीव्हिटी मुळे रुपांतर होतं. पण त्याला ४.४६ बिलियन वर्षं (४४६००००००० वर्षं) लागतात. एक्स्पायर होणारी मॅगी जर तेवढी अगोदर बनवली असेल आणि त्यात जर युरेनियम-२३८ असेल तर तयारही होईल त्यात शिसं.
4 Jun 2015 - 9:38 am | सुबोध खरे
नेस्ले ५८००
4 Jun 2015 - 2:31 pm | ब़जरबट्टू
मला तरी नेस्ले ५००० नक्की जाणार असे वाटते... :)
4 Jun 2015 - 12:34 pm | पथिक
सुवेन लाईफ सायंसेज घ्यावा काय?
5 Jun 2015 - 10:03 am | प्रसाद भागवत
एकेकाळी प्रत्येक थिएटरमध्ये प्रत्येक शो आधी हळद आणि चंदनाच्या गुणांनी युक्त अशा क्रीमची जोरात जाहिरात होत असे. एकवेळ पोलिसांची एंट्री न होता सिनेमा संपेल पण ह्या 'हल्दी/चंदन के गुणवाल्या' क्रीमची जाहिरात लागल्याशिवाय सिनेमा सुरु होणे अशक्य अशी स्थिती होती. पुढे काही काळाने ,.......WSO क्रीम बनले. 'WSO' हे 'Without Sandal Oil' या ' सत्याचे' लघुरुप आहे हे कितीजणांना माहित आहे ??... हे आठवायचे कारण म्हणजे अर्थातच मॅगीपुराण.
गेला बाजार काय होईल ?? Maggi(WML)....with Led & monosodium असा नावांत बदल होईल.दुसरे काय??
गेला बाजार काय होईल ?? Maggi(WML)....with Led & monosodium असा नावांत बदल होईल.दुसरे काय?? - प्रसाद भागवत.
5 Jun 2015 - 11:29 am | तुषार काळभोर
विको: असं पण आहे का?!!
मॅगी: Maggi(WML)....with Led & monosodium असं होईल नाहीतर मॅगी चं स्पेलिंग किंचीत बदलून परत आहे तसं येईल. जॉन्सन & जॉन्सनच्या बेबी प्रॉडक्ट्सचं नाव आता नुसतं जॉन्सन्स आहे.
5 Jun 2015 - 3:30 pm | कहर
उगीच काहीही काय राव … vicco turmeric ayurvedic skin cream (ज्याची जाहिरात दाखवायचे ) आणि vicco turmeric WSO cream दोन्ही वेगळे product आहेत. आणि दोन्हीहि मार्केट मध्ये उपलब्ध आहेत.
5 Jun 2015 - 4:31 pm | प्रसाद भागवत
अरे बापरे, माझी तपशीलांत चुक झालेली दिसते. मी हा पोस्ट मागे घेतो. तशी विनंती मी संपादक मंडळास कळवितो. वस्तुस्थिती नजरेस आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.
5 Jun 2015 - 9:12 pm | सुबोध खरे
हा सगळा पैशाचा खेळ आहे. सुरुवातीला हे क्रीम विको टरमेरिक व्हेनिशिंग क्रीम म्हणून होते. व्हेनिशिंग क्रीम हे सौंदर्य प्रसाधन म्हणून त्यावर केंद्रीय अबकारी कर ७० टक्के लागतो. मग त्यांनी नाव बदलले आणी विको टरमेरिक आयुर्वेदिक क्रीम केले कारण आयुर्वेदिक नाव दिले कि ते "औषध" होते. आणी त्यावर अबकारी कर १५ टक्के लागतो. म्हणजे तब्बल ५५ % ची बचत. http://www.cosmeticsdesign-asia.com/Regulation-Safety/Indian-Supreme-Cou...
नंतर काय झाले कि विको टरमेरिक आयुर्वेदिक क्रीम चंदनाच्या तेला सकट ( ०.५ % चंदनाचे तेल) ७० ग्रामला किमत २००/- रुपये आहे. हि किंमत सर्व सामान्य निम्न आणि मध्य मध्यम वर्गाला परवडणारी नव्हती म्हणून त्यांनी त्यातील चंदनाचे तेल काढून टाकले आणि किंमत ६०/- रुपये केली म्हणून ते विको टरमेरिक आयुर्वेदिक क्रीम WSO म्हणून आले. यात १६ % हळद असते पण चंदनाचे तेल नाही. मूळ ब्रान्ड चा फायदा मिळवणे पण किमत कमी करणे हा हेतू होता. लोक कुठे WSO वाचतात.
आयुर्वेदिक आणी सौंदर्यप्रसाधने यांच्या कहाण्या सुरस आणी चमत्कारिक आहेत. त्याबद्दल परत केंव्हा तरी.
6 Jun 2015 - 11:07 am | तुषार काळभोर
पायजे!
पायजे!!
पायजे!!!
6 Jun 2015 - 1:05 pm | प्रसाद भागवत
उद्बोधक आणि मनोरंजक माहिती डॉ. साहेब, धन्यवाद. आणखी लिहा या विषयावर
10 Jun 2015 - 4:25 pm | कहर
ऐकायला नक्की आवडतील.
एका नामवंत टूथपेस्ट चा किस्सा वाचनात आला. वाढत्या स्पर्धेमुळे खप वाढत नव्हता. म्हणून चर्चा चालू असताना एका शिपायाने सल्ला दिला कि खप वाढवू शकत नसाल तर वापर वाढवा. त्यासाठी ट्यूब चे तोंड फक्त १ mm ने मोठे करा. एवढा छोटा फरक लोकांना समजणार नाही. वापर वाधेल. पेस्ट लवकर संपेल आणि खप आपोआप वाढेल.
कंपन्या अशा फसवत असतात ग्राहकांना
10 Jun 2015 - 10:47 pm | श्रीगुरुजी
ही खूप जुनी आणि प्रभावी युक्ती आहे. मी पूर्वी काही महिने डोळ्यात एक विशिष्ट ड्रॉप्स टाकत होतो. अडीच मिलीची ड्रॉप्सची बाटली सुरवातीला २४० रूपयांना व नंतर ३६० रूपयांना मिळायला लागली. सुरवातीचे काही महिने एक बाटली ४०+ दिवस पुरायची. काही महिन्यांनंतर तीच बाटली जेमतेम २३-२४ दिवस पुरायला लागली. डोळ्यात ड्रॉप टाकल्यावर पूर्वीच्या तुलनेत जास्त क्वांटिटी आहे हे स्पष्टपणे जाणवत होते. बाटलीचे भोक थोडे मोठे केल्यामुळे जास्त क्वांटीटी जाऊन बाटली लवकर संपायला लागली.
12 Jun 2015 - 10:38 am | सुबोध खरे
एके काळच्या रिचर्डसन हिंदुस्तानने( आता प्रोक्टर आणि गम्बल) व्हिक्स व्हेपोरब आणि इन्हेलर हि आयुर्वेदिक औषधे आहेत असे म्हणून त्यावर ५५ % अबकारी कर चुकवला होता. त्यावर त्यांना सर्व कर भरायला लावला होता. कारण जर आयुर्वेदिक औषध असेल तर त्यात वापरले जाणारे मेंथोल आणि थायमोल हे वनस्पतीजन्य असणे आवश्यक असते पण ते महाग आहे. म्हणून त्यांनी त्यात पेट्रोलियम पासून तयार केलेली वरील औषधे वापरली होती आणि कर चुकवला होता. असाच प्रकार आयोडेक्स(SKF स्मिथ क्लाईन आणी फ्रेंच) ने केला होता. त्यातील मिथाईल सालीसिलेट पेट्रोलियम जन्य होतेतरीही आयुर्वेदिक औषध म्हणून दावा करून कर चुकवला होता. एकदा न्यायालयाकडून डंका मिळाल्यावर त्यांनी आयुर्वेदिक( वनस्पतिजन्य) कच्चा माल वापरायला सुरुवात केली. (सुरस आणी चमत्कारिक कथा)
12 Jun 2015 - 11:08 am | प्रसाद भागवत
एकावे ते नवलच.
12 Jun 2015 - 12:48 pm | गवि
.इंटरेस्टिंग...इनोदेखील आयुर्वेदिक असं लेबल वापरते बहुधा.
5 Jun 2015 - 10:18 am | सुबोध खरे
भागवत साहेब
हा सगळा गदारोळ कुणी उठवला आहे हे सांगणे कठीण आहे. नेसले हि ब्लू चीप कंपनी आहे त्यामुळे ती उद्या वर येणार हे नक्की आणि शिवाय भांडवल बुडणार नाही हे नक्की. त्याचा समभाग घेणे कि न घेणे हा एकदम वेगळा विषय आहे.
मुळात नुडल साठी वापरलेल्या गव्हाच्या पिठातच किंवा त्यात वापरलेल्या तेलात शिसे ( लेड) नाही हे ठरवणे आवश्यक आहे. जिथे गहू पिकतो ती राज्ये उदा. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार येथे . वाहनाच्या बॅंटरीची( ज्यात शिसे वापरले जाते) विल्हेवाट कशी लावतात हि सुरस आणि चमत्कारिक संशोधनाची कथा आहे.तेंव्हा हे शिसे पाण्यात मिसळून गव्हात येत नाही हे म्हणणेच धारिष्ट्याचे ठरेल.गाझियाबाद, कानपूर इ ठिकाणी असणारे कारखाने आणि ते सोडत असलेले सांडपाणी बंद कोण आणि कसे करणार? पण कुठलीही ऑरगेनिक वस्तू म्हणजे स्व्च्छ आणि शुद्ध असते हे म्हणणाऱ्या लोकांना तुमचा गहू किवा तेलच शुद्ध नाही हे म्हणणे पचेल का? ( मग ते तेल अगदी घरगुती तेलघाणीत पिळून काढलेले असेल तरीही)
परंतु या प्रकरणातून वर उठायला नेसलेला बराच वेळ( सहा महिने तरी) लागेल असे वाटते.
तेंव्हा म्यागी खायचे कि नाही तसेच नेस्लेचा समभाग घ्यायचा कि नाही हे ज्याचे त्याने ठरवणे आवश्यक आहे पण या दोन्ही गोष्टीं मुळात वेगळ्या आहेत.
5 Jun 2015 - 10:20 am | प्रसाद भागवत
सहमत.हा आताचा पोस्ट सहज आठवले, संदर्भ जुळला म्हणुन लिहिला एवढेच
12 Jun 2015 - 9:37 am | प्रसाद भागवत
http://www.business-standard.com/article/opinion/t-thomas-maggi-imbrogli... आजच्या बिझनेस स्टॅंडर्ड मधे आलेला हा लेख नेस्लेमधील गुंतवणुकीसंदर्भांत उपयोगी आहे.शिवाय आज कळफलकावर बोटे फिरविण्यासाठी तयार रहा......... उच्च न्यायालयातील सुनावणीमुळे बाजारभावांत मोठी हालचाल संभवते .
6 Jun 2015 - 4:01 pm | नगरीनिरंजन
मी बर्याचदा पाहतो की या अशा लेखांमध्ये टेक्निकल ॲनालिसिसच केलेले असते; फंडामेंटल ॲनालिसिस औषधालाही सापडत नाही.
मॅगीवर बंदी आणली काही दिवस म्हणून नेसले कंपनी बंद पडणार नाही हे शेंबडं पोरही सांगेल पण मॅगी हा नेसलेचा जुना आणि प्रस्थापित ब्रँड आहे आणि कंपनीच्या शेअरच्या किंमतीत ब्रँडची किंमतही अंतर्भूत असते. इतक्या वर्षांच्या प्रस्थापित ब्रँडला धक्का बसणे याचा कंपनीच्या पुढील उत्पन्नावर परिणाम होतो आणि शेअरच्या किंमती कंपनीच्या भावी उत्पन्नावर आणि वाढीच्या दरावर अवलंबून असतात.
याठिकाणी रेझिस्टन्स लेव्हल आणि सपोर्ट लेव्हल हे शब्द नुसतेच अनाठायी नसून दिशाभूल करणारे आहेत. लेखकाने विश्लेषण करुन ब्रँडच्या डॅमेजचा अंतर्भाव करुन शेअरची नवी किंमत किती असायला हवी याचा अंदाज काढून मग सध्याच्या किंमतीवरुन शेअर अंडरव्हॅल्यूड आहे कीओव्हरव्हॅल्यूड आहे ते ठरवण्याचा प्रयत्न केला असता तर अधिक समर्पक झाले असते.
बाकी अचानक लोकांना आपले गहू-तांदूळही जास्त विषारी असतील याची अचानक खात्री पटायला लागणे व नेसलेचा पुळका येणे आश्चर्यकारक आहे. मॅगीची जागा दुसर्या नूडल्स भरुन काढतील; त्यासाठी आपल्या सगळ्याच अन्नपदार्थांना विषारी ठरवण्याची गरज नाही! :-)
उलट ही इतर लोकांना संधी आहे; उगाचच कोणत्याही क्षेत्रात ओलिगोपॉली असणे चुकीचेच आहे तसेही.
6 Jun 2015 - 8:43 pm | प्रसाद भागवत
फंडामेंटल वि. टेक्नीकल या विषयावर मी आधीच्या लेखात भाष्य केलेच आहे.पण मुख्य मुद्दा शेअर अंडरव्हॅल्यूड आहे की ओव्हरव्हॅल्यूड आहे ते ठरवण्याचा आहे. त्यासाठी कोणती पद्धत वापरावी हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मतलब आम खाने से है.... बाकीचे आपण म्हणता त्याप्रमाणे अनाठायी व दिशाभूल करणारे टेक्नीकल विष्लेषण करतात,..,, आपण जमल्यास फंडामेंटन्ल विष्लेषण करा आम्ही आनंदाने वाचु.
6 Jun 2015 - 9:04 pm | नगरीनिरंजन
सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न असेल तर पब्लिक फोरमवर चर्चा करण्याचे प्रयोजन काय?
7 Jun 2015 - 6:34 pm | प्रसाद भागवत
'जाहिर सहभागांतुन चर्चा' याचा अर्थ प्रत्येकाने एखाद्या बाबीवर त्याचा वा त्याला पटणारा दृष्टिकोण मांडणे असाच आहे. अशा बाबीचे सर्व ज्ञात-अज्ञात पैलु जर एखाद्याला मांडता अले तर मग ती 'चर्चा' कसली ?? दुसर्याने काय मांडावे याचा शहाजोगपणाने सल्ला देण्याकरिताच 'पब्लिक फोरम' असतात हा गैरसमज आहे.
शिवाय फंडामेण्टल असो वा टेक्नीकल...,त्यांचे उपयोग वेगवेगळ्या परिस्थितीत अधिक परिणामकारक पद्ध्तीने करता येतात कारण दोघांच्याही काही मर्यादा आहेत.फंदामेंटल्स विषेश न बदलुनही भाव दिवसागणिक बदलतातच आणि या वस्तुस्थितीचा अनुकुल वापर करावयाचा असल्यास अपरिहार्यपणे टेक्नीकल्स पहावी लागतात. आणि त्या शास्त्रालाही भक्कम गणिती,सांख्यिकी आधार आहेत तेंव्हा त्याचा अभ्यास करुन काढलेले निष्कर्ष हे अगदीच केराच्या टोपलीत टाकण्याच्या योग्यतेचे नसतात असे मला वाटते.
6 Jun 2015 - 11:55 pm | काळा पहाड
बिंगो. मला वाटतं या चिखल उडवणुकीमुळे मॅगीचं नाव इतकं खराब झालं आहे की त्याच्यात आता सुधारणा होणं अवघड आहे. मॅगी हा नेस्लेचा कदाचित सर्वात जास्त खपणारा ब्रँड असावा. आणि त्याचा रेव्हेन्यू बंद होणं नेस्ले च्या शेअरसाठी धोक्याची घंटा असायला हवी.
7 Jun 2015 - 6:38 pm | प्रसाद भागवत
पहाड्साहेब, काश ऐसा होता........याच न्यायाने,सल्लुचे संजुबाबाचे पिक्चर्स पहायला कोणा जाणार नाही असे आपल्याला वाटते का?? सिगारेट्च्या पाकिटावरील '---मुळे कॅन्स्र होतो' हा विअधानिक ईशारा व्हाचुन किती जणांनी सिगारेट सोडली असेल ??
6 Jun 2015 - 4:05 pm | नगरीनिरंजन
हेच जर युरोपातल्या गोर्या मर्कटांनी भारतीय कंपनीच्या उत्पादनावर वा भारतीय आंबे किंवा द्राक्षादिंवर बंदी आणली असती तर लोकांनी हूं का चूं नसतं केलं. कसला हा न्यूनगंड?
6 Jun 2015 - 11:44 pm | सुधीर
फंडामेंटल्स रिपोर्ट्स ब-याच वेळा फुकट उपलब्ध नसतात. त्यात वेळ द्यावा लागतो. ॲप्रोक्स रेव्हून्यू इंपॅक्टचे भाकीत करणे नक्कीच सोपे नाही. मार्केट शेअर मध्ये काय बदल होतील? कुठल्या प्रतिस्पर्धी कंपनीला फायदा होईल? याचा अंदाज घेणे कठीण आहे (अनुभवी माणसाचे काम आहे. ब्रिटानियाचा स्टॉक मिन टाईम वाढला). तसाही नेस्ले मला खूपच महाग वाटतो अजूनही. ईटी इंटेलिजन्स वगळता मी फॉलो करत असलेल्या कुठल्याच ब्रोकरची रेटींग नव्हती. (ब्रोकरच्या रिपोर्ट्स वर किती विश्वास ठेवायचा हाही प्रश्न आहेच) इटी इंटिलिजन्सचं सब्स्क्रिब्शन नसल्याने नेमकं ॲनालिसिस अजूनही मिळालं नाही वाचायला. सीकींग अल्फा नावाचं संकेतस्थळ आहे पण त्यात खास करून अमेरीकेतल्या स्टॉक्स वरचे रिपोर्ट्स हरहुन्नरी, नवशिखे देत असतात. आपल्याकडे असं कुठलं संकेतस्थळ आहे का याची कल्पना नाही.
8 Jun 2015 - 2:10 am | hitesh
म्हणुन नेस्लेला उडवले असेल का ?
8 Jun 2015 - 3:40 am | संदीप डांगे
तुमच्याकडे आला असेल ना गुप्त अहवाल...?
रामदेवबाबाकडे असंख्य प्रॉडक्ट्स आहेत. तेवढं निवडून मॅगीला धोपटण्यासारखं काय होतं?
8 Jun 2015 - 10:16 am | चिनार
नेस्ले शेयरविषयी तज्ञ चर्चा करत आहेतच ..
पण एक अवांतर माहिती शेयर करतोय .माझी या आधीची कंपनी नेस्लेला गेल्या ३० वर्षांपासून बॉयलर पुरवठा करते. नेस्लेच्या भारतातील सगळ्याच प्लांट मध्ये त्या कंपनीचा बॉयलर आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. माझ्या एका वरीष्ठांनी सांगीतल्याप्रमाणे देशभरात रोज २५० टन मॅगीचे उत्पादन होते. मॅगी जर तीन-चार महिने बाजारात आली नाही तर नेस्लेचे किती नुकसान होईल याचा जाणकारांनी अंदाज लावावा.
8 Jun 2015 - 1:12 pm | काळा पहाड
मी जे वाचलं त्यावरून नेस्लेचा ३०% रेव्हेन्यू मॅगी कडून येतो. साधारण पणे २२०० कोटी रुपये.
8 Jun 2015 - 10:20 am | सुबोध खरे
नेस्ले ५६६१
8 Jun 2015 - 12:05 pm | प्रसाद भागवत
माझी थोडी घाई झाली असे मान्य केलेच पाहिजे.
8 Jun 2015 - 11:41 am | श्रीगुरुजी
मी आज नेस्ले ५६७० रूपयांना घेतला. बघू अजून किती खाली जातोय ते.
8 Jun 2015 - 1:37 pm | काळा पहाड
http://www.moneycontrol.com/news/buzzing-stocks/will-nestle-lead-againma...
Goldman Sachs recommends selling it with a target of Rs 4664 per share.
Barclays: The brokerage has a target price of Rs 5194 per share.
8 Jun 2015 - 1:43 pm | गवि
४६६४ टारगेट ? सेल ? कसे?
8 Jun 2015 - 3:46 pm | अन्या दातार
शॉर्ट सेल - मंदीत संधी
8 Jun 2015 - 1:41 pm | गवि
अरे लोकांनो.. घेऊ की नको..? ५६०० ला पोचतंय आता.
की थोडेथोडे दर आठवड्याला घेऊ?
-(उडी टाकण्यासाठी नाक मुठीत धरुन विहिरीच्या काठावर पुढेमागे डोकावत उभा) गवि
8 Jun 2015 - 1:56 pm | काळा पहाड
हे एक उत्तर आहे: http://economictimes.indiatimes.com/markets/stocks/recos/not-a-good-time...
पण खरं सांगायचं तर कुणालाही माहीत नाही. हे मॅगी-युद्ध कदाचित किचकट, लांबलचक आणि दमवणारं ठरणार आहे.
8 Jun 2015 - 2:20 pm | आनंदराव
गवि साहेब, दुसर्याच्या सल्ल्याने शेअर घेतला किंवा विकलात तर नुकसान होण्याचे चान्सेस खूप जास्त असतत.
तर, स्वत; अभ्यास करा आणि निर्णय घ्या
प्रेमाचा सल्ला !
(अशा प्रकारात हात पोळलेला) आनंद
10 Jun 2015 - 1:07 pm | असंका
+१
8 Jun 2015 - 5:34 pm | सुधीर
मोतिलाल ओस्वालचा रिसर्च रिपोर्ट इथे पहाता येईल.
त्यांच्या मतानुसार नेस्टलेच्या संपूर्ण रेव्हिन्यूपैकी २०% हिस्सा आणि नेट प्रॉफिटचा २५% हिस्सा हा न्यूडल्स मधून येतो. (१/४ हा मोठा आकडा आहे). आणि २०१४ मध्ये याच कॅटेगरीचा सेल्स ग्रोथ सर्वात जास्त होता. मॅगी लहान मुलं खात असल्याने ब्रॅंड इक्विटी वर मोठा फरक पडणार आहे. कारण परत विश्वासार्हता परत मिळवण्यास वेळ जाईल.
आणि सर्वांना ज्यात जास्त उत्सुकता आहे त्या प्रश्नाचं उत्तर देताना ("स्टॉक खरेदी करण्याच्या पातळीवर पोहोचला का?" ) रिपोर्ट म्हणतो. अजून त्या पातळीवर आलेला नाही. २०१५ आणि २०१६ च्या एक्सपेक्टेड अर्निंग नुसार स्टॉक (फॉर्वर्ड) पीई रेशो ३७ आणि ३२ आहे. (37x CY15E and 32x CY16E EPS) भविष्यकाळात नेस्टलेच्या डॅमेज कंट्रोल अॅक्टिव्हीटीनुसार त्यांचे अंदाज बदलू शकतात. २०१६ चा एक्स्पेक्टेड ईपीएस (रु. १९०, त्यांच्या रिसर्च नुसार) च्या साधारण ३३ पट त्यांनी टार्गेट किंमत (रु. ६३००) ठरवली आहे आणि स्टोक्स अजून करेक्ट होईल असे त्यांना वाटते.
रिपोर्टच्या डिस्क्लोजर मध्ये "अॅनालिस्ट कडे स्टॉक्स नाहीत आणि अॅनालिस्ट नेस्टलेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरवर, वा नेस्टलेचा एम्प्लॉई नाही" असे नमुद केले आहे.
ओस्वालखेरीज दुसर्या कुणाचा रिपोर्ट मिपाकरांना माहीत असेल तर जरूर शेअर करा.