रोमन कॅथलिक चर्चच्या मान्यतेनुसार सात पापांची गणना महत् पापे (Cardinal Sins) म्हणुन होते...आपल्या कडील षड्रिपुंसारखीच, मात्र गंमतीचा आणि वेगळा भाग हा, की बायबल काळापासुन चालत आलेली ही सात पापांच्या मुळ यादी तशी लवचिक स्वरुपाची आहे. पोप ग्रेगरी यांनी त्यात प्रथम बदल केला आणि नंतर ही त्यांत क्वचित,कालपरत्वे बदल होत असतो.'The Only Thing That Is Constant...Is Change' ही उक्ती मला मनापासुन पटते आणि म्हणुनच मनोजकुमारादी मान्यवरांची क्षमा मानुन लेखाचे शीर्षक थोडेसे बदलले आहे.
अब्राहम मास्लो या मानस शास्त्रज्ञाने प्रथमतः मानवी गरजांचे पृथक्करण केले. त्यात सर्वप्रथम अन्न वस्त्र निवारा ह्या मुलभुत 'गरजा' भागविल्यानंतर मनुष्य हा 'ईच्छापुर्ति'च्या दिशेने धावु लागतो असे त्यांचे सर्वसाधारण प्रतिपादन आहे. ह्या वेगवेगळ्या भौतिक, सामाजिक वा मानसिक सुखांची उतर्ंड सर करावयाच्या प्रयत्नांना वास्तवात आणण्यासाठी काय केले पाहिजे?? याचा मी स्वांतःसुखाय, स्वतःसाठी म्हणुन केलेल्या चिंतनाचा सारांश म्हणजे मुळ उक्तीत केलेला बदल आहे असे आपण म्हणु शकता.
माझा एक जवळचा मित्र श्री.श्रीकांतने बरेच दिवसांपासुन मारुतिची 'स्वीफ्ट' गाडी घ्यायचा घाट घातला होता. कर्ज काढणार नाही..ह्या सर्वपरिचित मध्यमवर्गीय बाणेदार खाक्याला अनुसरुन गाडीखरेदीसाठी आवश्यक असणारे पैसे तो निकराने जमवित होता.आता येत्या महिन्यांत गाडी बुक करणार एवढ्यात बादशहा अकबराच्या काळापासुन जगातील सर्वश्रेष्ठ म्हणुन गणल्या जाणारया पुरुषाचा,म्हणजेच त्याच्या एकुलत्या एक मेहुण्याचा त्याला फोन आला. साहेबांना म्हणे त्यांच्या एका महत्वाकांक्षी प्रोजेक्ट्करिता भांडवल म्हणुन तातडीने 5/6 लाख रुपयांची आवश्यकता होती. झाले,...’तोड दाबुन बुक्क्यांचा मार, सहनही होत नाही...’वगैरे स्थिती म्हणजे काय, याचे प्रत्यंतर माझ्या मित्राला आले. पण काय करणार??..शेवटी "आपण नाही मदत करायची तर कोणी?? आणि तो देणारच आहे नं एफ.डी एवढे व्याज..." मा.सुप्रीम कोर्टाच्या घरगुती पुर्णपीठाने दिलेल्या काहीशा अशा सुचनेवजा आदेशाने श्रीकांतरावांनी चेकवर मारुतिच्या डीलर ऐवजी आपल्या मेहुण्याचे नाव टाकले.
परमेश्वर कृपेने सर्वकाही व्यवस्थित पार पडेल आणि माझ्या मित्राला दिलेले मुद्दल अगदी व्याजासह (अर्थात एफ.डीच्या दराने) तीन वर्षांनी परत मिळेल असा मला विश्वास आहे. पण तरीही तेंव्हा, 03 वर्षांनी ही रक्कम श्रीकांतची पुर्वनियोजित 'स्वीफ्ट' घ्यायला पुरेशी ठरेल का?? तुम्हाला काय वाटते??
आकडेवारी सांगते,गेल्या 05 वर्षांत की मारुति सुझुकी या कंपनीच्या विक्रीमध्ये प्रतिवर्षी (चक्रवाढ्दराने) अदमासे 16% आणि नफ्यांत 17.60% वाढ झाली आहे. सहाजिकच असा अंदाज बांधता येतो की कंपनीच्या उत्पादनांच्या किंमतीही एवढ्याच प्रमाणांत वाढत असणार. मग विचार करण्याची गोष्ट ही आहे की श्री.श्रीकांत काय किंवा आपण, आपल्या एफ.डीज (किंवा आपला मेव्हणा) आपल्याला कधी 16/18% व्याज देतात का?? उलट नफ्याच्या वर्षप्रतिवर्षीच्या अशा पौष्टीक खुराकाने या कपनीचा शेअ्ररच्या भावाने मात्र मारुतीरायांसारखेच उड्डाण केले आहे. सुरवातीस फक्त 125,होय फक्त सव्वाशे रुपयांत मिळालेला हा शेअर बरोब्बर दोन वर्षांपुर्वी (01ऑगस्ट 2013ला) 1350 रुपयांना मिळत होता,आज तो 4200 रुपयांना मिळतोय. सहाजिकच माझ्यासारख्याला त्याचे चारचाकीचे स्वप्न गंगाजळीच्या माध्यामातुन लवकर साकार करावयाचे असेल तर मी R.Ds, F.Ds च्या फंदात न पडता मारुती-सुझुकी (वा अशाच एखाद्या अन्य ब्लुय-चीप कंपनीचे) शेअर्स जमविण्यास सुरवात करणे,वा त्याही पेक्षा सोपे म्हणजे एखाद्या प्रथम दर्जाच्या ईक्विटी फंडांत SIP सुरु करणेच बरे नाही का??
SIP म्हणजे्च Systamatic Investment Planचा विषय निघालाच आहे, तो एका आघाडीच्या फंडाने केलेले एक उत्तम सादरीकरण मला आठवले.त्याचा गोषवारा सांगतो.
समजा तुम्ही नवीन घर विकत घेतले असुन त्यासाठी रु.20 लाखांचे गृहकर्ज 15 वर्षे मुदतीने घेण्याची आपली योजना आहे. आजच्या दराने आपणास या कर्जावर रु.21,676 एवढा मासिक हप्ता पडेल आणि 15 वर्षे मुदतीअखेर आपण मुळ कर्जाबरोबरच रु.19,01,682 एवढे व्याज अशी एकुण रु.39,01,682 ची परतफेड कराल.(http://www.sbi.co.in/portal/web/home/emi-calculator)
आता येथे मांडलेली कल्पना नक्कीच लक्षवेधी आहे, जरुर पहा. फंड सुचवितो की आपण आपली कर्जाची मुदत 15 ऐवजी 20 वर्षे करा. यामुळे आपला मासिक हप्ता रु.19,500 म्हणजे दरमहा साधारणतः रु.1200 ने कमी होईल आणि मुदतीअखेर आपण मुळ कर्जाबरोबरच रु. 26,80,000 एवढे व्याज अशी एकुण रु. 46,80,000 ची परतफेड कराल.
महत्वाची, खरी म्हणजे निर्णायक बाब म्हणजे, कर्जफेडीच्या सुरवातीबरोबरच आता आपण ह्या, बचत केलेल्या हप्त्याची, म्हणजेच रु.1200ची SIP सुरु करावयाची आहे. नुकताच 20 वर्षाचा कालावधी पुर्ण करणा-या ‘HDFC Equity Fund’ या योजनेचा संदर्भ घेतला (http://www.hdfcfund.com/CMT/Upload/Attachments/HDFC_Equity_Fund_Leaflet_...) तर प्रतिवर्षी 25% पेक्षा अधिक परतावा देणा-या या योजनेत एखाद्याने रु.1200ची SIP 20 वर्षे ईमाने ईतबारे भरल्यास शेवटी गुंतवणुकीचे मुल्य रु.60,50,000 म्हणजेच आपल्या अपेक्षित एकुण परतफेडीपेक्षा पेक्षा कितीतरी अधिक झाले आहे!!!
मला स्पष्ट केले पाहिजे की लेखांतेल कंपनी वा फंडांचे उल्लेख हे शिफारस म्हणुन केलेले नसुन केवळ प्रातिनिधिक व आकलन सुलभतेकरिता आहेत. ‘HDFC Equity Fund’ या योजनेच्यासारखाच उत्तम परतावा देणा-या किमान २/३ अन्य योजनाही मी सांगु शकेन. महत्वाचे हे आहे की 'उद्या हा आज किंवा कालसारखाच असेल' ह्या सर्वमान्य गृहितकावर विश्वास ठेवुन अशा पद्ध्तीने आपण बॅंकेला केलेल्या एकुण परतफेडीपेक्षा कितीतरी अधिक पैसे विनासायास मिळवणे अगदी शक्य आहे.!!!........एका अर्थाने 'हलवायाच्या घरावर तुळशीपत्र' ठेवुन मिळणारे असे बोनस आपण कितीवेळा मिळवतो??
परवाच वाचनात आले, स्व. राजेश खन्नांचा कार्टर रोडस्थित 'आशिर्वाद' बंगला तब्बल 85 कोटी रुपयांत विकला गेला. स्व.काकानी 1970मध्ये ही मिळकत 3.5 लाखांना विकत घेतली होती म्हणे, म्हणजेच गेल्या 45 वर्षांत ही गुंतवणुक 2428 पट झाली आणि टक्केवारीत बोलावयाचे तर हा दर चक्रवाढीने 19.38% पडला.
प्रसिद्ध गोदरेज समुहाचे व्यवस्थापकिय संचालक् श्री. आदि गोदरेज यांनी त्यांचे पहिले घर सन 1963 मध्ये दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध अशा ‘उषाकिरण’ या ईमारतीत एक लाख रुपयांत घेतले…. पुढे 2011मध्ये 2500 पट जास्त किंमतीला म्हणजेच रु. 25 कोटींना, त्यांनी ते विकले. नफ्याच हा दर 17.70% पडतो.
"आता ह्या लक्ष्मीपुत्रांच्या कथा आम्हाला कशाला ऐकवतोय हा माणुस??"… ही आपल्या मनांत आलेली स्वाभाविक प्रतिक्रिया असणार हे मी जाणतो. ह्या अशा प्रकारच्या मिळकती घेणे येड्या-गबाळ्याचे काम नव्हे, ही ही मला माहित आहे. पण असेच कल्पनातीत 'रिटर्न्स' देणा-या आणखी एका ईमारतीबद्दल मला आपणाला सांगावयाचे आहे. आणि हो, ती ही अशी, की जेथे आपण कोणीही मालकी मिळवु शकतो बरं का...1980 साली 100रु स्क्वे. फुटांनी उपलब्ध असलेल्या या जागेचा आजचा भाव आहे रु.27000 स्क्वे. फुट!!!. ही जागा म्हणजे (एव्हांना काही चाणाक्ष वाचकांनी ओळखले्ही असेल) आपले 'दलाल स्ट्रीट'!!!,मित्र हो, स्क्वे. फुट हे एक रुपक आहे एका युनिट्साठी. मला आपल्याला आवर्जुन सांगावयाचे आहे की आपल्या बाजारानेही गेले 34 वर्षे 20% हुन अधिक परतावा दिलेला आहे.सबब आपण भलेही नसु उद्योगपती, नसु सेलिब्रिटी,पण हा शेअर बाजार आपल्या हक्काचा आहे. आवश्यकता फक्त विचार बदलण्याची आहे.
लो. टिळक एकदा त्यांच्या सहका-यांबरोबर काही महत्वाचा विचार-विनिमय करीत बसले असतानाच दोन होतकरु (आमच्या गावी येणारे किर्तनकार बुवा या वर्गातील लोकांची 'होईल तितकेच करु' अशी व्याख्या करायचे) तरुण तेथे आले आणि त्यांनी थेट लोकमान्यांना "सांगा, देशासाठी काय करु शकतो आम्ही??" असा प्रश्न केला. लोकमान्यांनी "बाळांनो, प्रपंच नीट करा, संसार सांभाळा" असा 'जनरल' सल्ला देवुन त्यांची बोळ्वण केली. तेंव्हा टिळकांबरोबर बरोबर असलेले सहकारी त्यांना म्हणाले "अहो, का नाराज केलेत तुम्ही त्यांना?? किती उत्साहाने आले होते ते तुमच्याकडे...." लोकमान्य उत्तरले "हे पहा, ज्याला काही खरेच करावयाचे असते, तो विचारायला येत नाही, मी देशासाठी काय करु म्हणुन..तो करुन दाखवतो. मी केले हे योग्यच केले असे माझे मत आहे." अशी कथा मी कोठेतरी वाचली होती. मला काय म्हणावयाचे आहे हे एव्हाना स्पष्ट झाले असावे. आता 'माझ्या उद्दीष्ट्पुर्तीसाठी मी काय करावसाय हवे??'..हा प्रश्न मला तुम्ही बहुधा विचारणार नाही.
लक्षांत घेण्याची गोष्ट ही आहे की आपल्याला काही एखादा मोठ डोंगर एका दिवसांत उलथुन टाकावयाचा नाही. महानदीचा उगमही एक क्षींण प्रवाहच असतो आणि मोहिम कितीही महान असो, सुरवातीचे पाउल हे नेहमीप्रमाणेच फुट दीड्फुट अंतराचेच असते. स्मरणात असलेला आणखी एक किस्सा सांगतो, 'टुर दी फ्रान्स' (Tour de France) ही युरोपांतील एक अतिशय प्रतिष्ठेची सायकल शर्यत आहे. 21 दिवस चालणारी आणि जवळजवळ 3500कि,मी अंतराची ही स्पर्धा जिंकावी यासाठी अनेक संघ अहममिकेने प्रयत्न करतात. प्रसिद्ध सायकलिंग कोच डेव्ह ब्रेल्स्फोर्ड यांच्यावर एकदा ब्रिटीश संघाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपविण्यांत आली. या,इतक्या उच्च पातळीवर दैनंदिन सराव, व्यायाम, शारिरिक तंदुरुस्ती या गोष्टी तर आधीपासुन होत्याच, पण ब्रेल्स्फोर्ड सरांचे वेगळेपण हे, की त्यांनी दैनंदिन बाबींत किरकोळ दिसणारे, अगदी साधे सोपे बदल केले उदा. झोप चांगली लागावी यासाठी आरामदायी उशा वापरणे, पोट बिघडु नये यासाठी सॅनिटायझर शिवाय हात न धुणे....अशा बाबींना त्यांनी त्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमांत प्राधान्य दिले. त्यांच्या म्हणण्यानुसार अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळेच त्यांच्या संघाचे 05 वर्षांत 'टुर दी फ्रान्स' जिंकण्याचे स्वप्न साकार होणार होते. अर्थात पुढे त्यांचा अंदाज चुकला.....त्यांच्या संघाने 05व्या नव्हे तर 03-याच वर्षी ही स्पर्धा जिंकली.!!! अतिशय माहितीपुर्ण व रंजक असा हा किस्सा तपशीलांत वाचावयाचा असल्यास http://jamesclear.com/marginal-gains या दुव्यावर जावुन वाचावा.
...तेंव्हा, पुन्हा एकदा धृवपदाकडे येतो ते हे, की या इहलोकातील तुम्हा आम्हा पामरांना आपली लौकिकार्थातील इप्सिते साध्य करावयाची असतील तर 'इक्विटी' ला पर्याय नाही. 'इक्विटीय नमस्तस्मै एस.आय.पी. ब्रह्मा रुपिणे । आर्थिक क्लेष नाशाय, बाजारायः नमो नमः' हा आधुनिक जगातील मुलमंत्र हवा. अर्थात खरेदी वा विक्रीचा आंघळा साहसवाद केंव्हाही घातकच. गुंतवणुकदाराची भुमिका ऑलिम्पिक मधील नेमबाजासारखी, एकाग्र चित्ताने लक्षवेधाचा प्रयत्न करणारी असावी, हिंदी मारधाड चित्रपटांतील व्हिलनसारखी, अंधाधुंद गोळीबार करणारी नसावी, या माझ्या भुमिकेचा पुनरुच्चार करणे हे हे मी महत्वाचे समजतो.
शेवटी जाता जाता आणखी एक गमतीशीर सत्यघट्नेची माहिती देतो. आपल्या शेजारी राष्ट्राबरोबरील झालेल्या युद्धानंतर दोन्ही अनेक नागरिक आपापल्या मालमत्ता तेथेच टाकुन स्थलांतरीत झाले. भारतातील अनेकजणही शत्रुराष्ट्राचे नागरिक बनले. देश सोडुन गेलेल्या अशा नागरिकांच्या येथे राहिलेल्या मालमत्तांना शत्रु-मालमत्ता (Enemy Properties)असे संबोधले जाते व 'Enemy Property Act of 1968' या कायद्यान्वये गृहमंत्रालयातर्फे एक खास विभागामार्फत त्यांची देखरेख केली जाते. सांगावयाचे हे की सन 1965 व 71 च्या युद्धानंतर केलेल्या मोजणीनुसार भारत सरकारकडील शत्रु-मालमत्ता विभागाकडे अशा नागरिकांच्या नावावर असलेले 29 कोटी रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स होते. असे म्हणतात की यांत टाटा समुहांतील महत्वाच्या कंपन्या, युनिट ट्रस्ट, हिंदुस्थान लीव्हर, स्टेट बॅंक, अशिक ले-लॅंड, सिप्ला अशा एक सो एक ब्ल्यु चीप कंपन्यांचा समावेश आहे. सरकारी, अधिकृत माहितीनुसार आलिकडेच,2015 साली केलेल्या मुल्यमापनानंतर त्यां शेअर्सचे बाजारमुल्य रुपये 10,000 कोटी एवढे आहे. बघा 345 पट वाढ्ले 45 वर्षांत...आहात कुठे?? अधिक कुतुहल असेल तर हा घ्या आंतरजालावरील दुवा - http://www.business-standard.com/article/markets/enemy-shares-to-be-dema...
आता मला सांगा, आपला बाजार जर 'शत्रुची मालमत्ता अशी भरभक्कमपणे वाढवु शकतो, तर आपल्याला,या देशांच्या नागरिकांना हा फायदा का नाही मिळणार??
चीनी लोकांत एक म्हण आहे 'The best time to plant a tree was 20 years ago and The second best time is now.' शेअर्समध्ये करावयाच्या गुंतवणुकीबद्द्लही हेच तत्वज्ञान 100% लागु पडते. चला मग वाट कसली पहाताय ?? गुरु...हो जाओ शुरु!!!
प्रतिक्रिया
26 Sep 2015 - 8:50 pm | एस
वा! छान लेख!
शेअर बाजारातल्या गुंतवणुकीसंबंधी 'हाउ टू' प्रकारचे अगदीच अडाणी गुंतवणूकदाराला समजेल असेल स्टेप-बाय-स्टेप लेखन येणे गरजेचे आहे. उदा. शेअर म्हणजे काय, बाजारात शेअर कसे लॉन्च होतात, ते विकत घेण्यासाठी काय आवश्यक आहे, डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय फरक आहे, एकावेळी किमान किती मूल्याची गुंतवणूक करता येते, करप्रणाली कशी असते वगैरे वगैरे. बघा, मनावर घ्या.
27 Sep 2015 - 1:14 am | उगा काहितरीच
अनुमोदन ! खरंच येऊद्या अशी मालीका/लेख .
26 Sep 2015 - 11:32 pm | दिवाकर कुलकर्णी
लेख नाक्कीच छानआहे,परंतु शेअर्स गुतवणूक नेहमीच फार छानआहे/असतेअसा सर्वसाधारण समज समाजात
आहे,तथापिे कालाच्या कसोटीवर ते ५० टक्केच (खरं तर त्याहून कमी) खरं सिध्द होऊ शकतं कारण हा झिरो
सम गेम आहे,दुसर्याच्या नुकसानीशिवाय पहिला नफा मिलवू शकत नाही,
आपण नेहमीच पहिले असू शकतो हे जरा कमी अधिक स्नप्नरंजन आहे
माझ्या पत्नीला २००९/१० साली टाटा स्टील मध्ये मी २ लाख रु घालायला लावले होते,त्या रतन टाटांच्या
ऐवजाची किमत आज ५ ०ह.इतकीच आहे ,५/६ वर्षानंतरहि.लोखंडाच्या फुंकणीन(सध्या फुकण्या असत नाहीत
त्यामुले)तिनंठोकून काढलं नाही एव्हडच नशीब.
असो तुमचा लेख अभ्यासपूरण व छान आहे
27 Sep 2015 - 8:46 am | बोका-ए-आझम
तुम्हाला दुर्दैवाने विपरीत अनुभव आला पण त्यामुळे शेअरमार्केट हा झीरो सम गेम आहे हे समजणं चुकीचं आहे. शेअरमार्केट म्हणजे जुगार नव्हे. तिथे एकाचा फायदा हा इतरांच्या नुकसानावर अवलंबून असतो आणि त्यामुळे तो झीरो सम गेम होतो. शेअरबाजारात दीर्घ कालावधीची, बहुआयामी (diversified)गुंतवणूक केली तर फायदा मिळतोच. प्रसिद्ध गुंतवणूकतज्ञ वाॅरन बफेट यांचं वाक्य आहे - My favorite holding time (शेअर्स खरेदी केल्यापासून ते विकेपर्यंतचा काळ) is forever. आणि ते खरं आहे.
27 Sep 2015 - 8:46 am | बोका-ए-आझम
तुम्हाला दुर्दैवाने विपरीत अनुभव आला पण त्यामुळे शेअरमार्केट हा झीरो सम गेम आहे हे समजणं चुकीचं आहे. शेअरमार्केट म्हणजे जुगार नव्हे. तिथे एकाचा फायदा हा इतरांच्या नुकसानावर अवलंबून असतो आणि त्यामुळे तो झीरो सम गेम होतो. शेअरबाजारात दीर्घ कालावधीची, बहुआयामी (diversified)गुंतवणूक केली तर फायदा मिळतोच. प्रसिद्ध गुंतवणूकतज्ञ वाॅरन बफेट यांचं वाक्य आहे - My favorite holding time (शेअर्स खरेदी केल्यापासून ते विकेपर्यंतचा काळ) is forever. आणि ते खरं आहे.
28 Sep 2015 - 10:06 am | प्रसाद भागवत
लेखाबद्दलची आपल्या सकारात्मक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, मात्र बाजाराबद्द्दल्ची आपली प्रतिक्रिया सकारात्मक असती तर अधिक आवडले असते.
बाजारांतील नियमित गुंतवणुक हेही येथील यशस्वितेकरिता अत्यत आवश्यक असे गृहितक आहे. केवळ एखाद्या वाईट वा असमाधानकारक अनुभवाने आपण आपले कायमस्वरुपी मत बनवु नये एवढेच आपणास मी सुचवेन.
29 Sep 2015 - 12:28 pm | सुबोध खरे
@ दिवाकर कुलकर्णी
शेअर बाजार हा झिरो संम गेम नाही. ढोबळ मानाने मी क्ष कंपनीचा समभाग विकला म्हणजे कुणीतरी खरेदी केला म्हणजे तो बुडाला आणि मी नफा केला असे दिसते. परंतु त्या क्ष कंपनीने २० टक्के नफा कमावला हा तुम्हाला लाभांश( डिव्हिडंड) या स्वरुपात दिला जातो. यामुळे त्या समभागाची किंमत वाढते. शिवाय हा लाभांश आणि समभाग (एक वर्षानंतर) विकल्यावर येणारा नफा हा पूर्णपणे करमुक्त असतो. मी स्वतः साधारण १२ % परतावा मिळेल या गृहितकावर चालतो पण हा बारा टक्के म्हणजे मुदतठेवीचा १७ % व्याजाच्या बरोबर आहे( १७ टक्क्यावर ३० % म्हणजे ५.१ टक्का हा कर जाऊन मला ११.९ टक्के परतावा मिळेल. गेल्या २० वर्षात १७ टक्के परतावा देणारी मुदत ठेव (कदाचित जगभरात) कुठेही उपलब्ध नाही.
आपण वीस टक्के दर साल चक्रवाढ दराने मिळतील हि आशा धरू नये असे माझे मत आहे. ते तसे मिळाले तर सोन्याहून पिवळे. हा परतावा जेंव्हा शेअर बाजार चढ्या क्षेत्रात असतो तेंव्हा भरपूर दिसतो आणि तोच परतावा बाजार पडलेला असेल तेंव्हा अगदी कमी दिसतो.
सर्व म्युच्युअल फंडांची कामगिरी त्यांच्या जाहिरातीत अशीच चढ्या बाजाराची दाखविलेली असते त्यामुळे माणसे त्याला भुलतात. हे म्हणजे फेयर आणि लव्हली लावून हबशिणीला अप्सरा बनवण्याचे स्वप्न दाखवणारी जाहिरातकलेचा नमुना आहे. त्याला न भूलता चांगला फंड किंवा स्वतः चांगल्या कंपनीच्या समभागात शिस्तीने पैसे गुंतवले तर महागाई च्या दरापेक्षा आपण जास्त पैसे मिळवू शकाल.
27 Sep 2015 - 8:36 am | बोका-ए-आझम
प्रचंड सहमत. मी तर कुटुंबातल्या दोघांना लग्नावर अनाठायी खर्च करण्याऐवजी तेवढेच पैसे म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवा असा सल्ला दिला होता. त्यांनी तो सुदैवाने ऐकला आणि अजूनही ते त्याबद्दल धन्यवाद देतात.
27 Sep 2015 - 9:04 am | अनुप ढेरे
छान लेख!
27 Sep 2015 - 10:09 am | बहुगुणी
वरचा एच डी एफ सी दुवा चालत नाही, /CMT/ पासून पुढे लॉगिन लागत असावं, मला वाटतं हा दुवा अभिप्रेत होता का? (या कॅल्क्युलेटर वर बर्याच आधिक रक्कमेचा [७९ लाख] परतावा मिळेल असं दिसतं.) मुख्य शंका म्हणजे इतक्या दीर्घ मुदतीपर्यंत या योजना इतक्याच उच्च दराने व्याज देत टिकतात का?
27 Sep 2015 - 11:29 am | खेडूत
लेख नेहमीप्रमाणेच आवडला.
गेल्या तीन वर्षात उत्तम परतावा मिळत आहे. त्यापूर्वी होम लोन सम्पवणे हाच ध्यास घेतला होता, तो बरोबर नव्हता. हे कर्ज सम्पल्यावर समजले!
२० वर्षे शिस्तबद्ध गुन्तवणूक करणारा कोणी परिचित नाही, त्यामुळे असा परतावा भरवशाचा आहे का ही शंका होती.
अजून माहिती-विष्लेषणाच्या प्रतिक्षेत..
27 Sep 2015 - 4:15 pm | मार्मिक गोडसे
सहमत.
गेली ५-६ वर्षे वडिलांबरोबर शेअरबाजारातील व्यवहार करत आहे. नीट अभ्यास करुन गुंतवणूक केल्यास बँक एफडीपेक्षा नक्कीच जास्त परतावा मिळू शकतो. प्रत्येकाने अभ्यास करून शेअर बाजारात थोडीतरी गुंतवणूक केलीच पाहीजे. इंटरनेटव्यवहारामुळे शेअरबाजारात गुंतवणूक करणे व तिच्यावर लक्ष देणे सोपे झाले आहे.
27 Sep 2015 - 6:36 pm | मित्रहो
शेअर बाजारातली गुंतवणुक फायदेशीर असते हे खरे परंतु प्रत्येक गुंतवणुकीवर फायदा मिळेलच असे नाही. कितीही नाही म्हटले तरी इक्वीटी ही जास्त जोखमेची गुंतवणुक असते. साऱ्या कागदपत्रांवर हेच लिहीले असते. तेंव्हा फक्त शेअर बाजारात गुंतवणुक करुन उपयोग नाही. हल्ली एफ डीचे रेट बरेच उतरले तरीही ठरले तेवढे व्याज नक्की मिळते.
27 Sep 2015 - 7:07 pm | खेडूत
असहमत .
निवृत्तीनंतर कदाचित हा विचार ठीक असेल.
पण कमावत्या व्यक्तीने एफ डी मधे ८.५% ने काही लाख ठेवले - वर्षाखेरीस कांही हजार व्याज मिळाले आणि ३०% आयकर भरला तर पावणेसहा टक्के परतावा रहातो, जो चलनवाढीच्या दरापेक्षा कमी राहतो.
गुंतवणुकीच्या मूळ संकल्पनेत उद्दिष्ट ठरवूनच गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. त्यापूर्वी ती गुंतवणूक मोडून गरजेला पैसे काढणे अपेक्षित नाही. तशा कारणासाठी जास्तीची एफ डी / आर डी करणे ठीकच. साधारण भारतीय व्यक्ती मिळकतीच्या किमान तीस टक्के बचत करतोच. ती डोळसपणे गुंतवणे जमत नाही ही समस्या आहे. लवकर सुरुवात करून किमान वीस वर्षे गुंतवणूक करणे ही गुरुकिल्ली आहे असं गेल्या काही वर्षात वाचनातून मत बनलंय.
अर्थात मी स्वतः तसं करू शकलो नाही तरी पुढील पिढीला अर्थसाक्षर करत आहे!
27 Sep 2015 - 8:14 pm | मित्रहो
एफडी मधे टाका असे म्हणत नाही आहे. पण सारी रक्कम शेअर मधे गुंतवणे पण चुकीचे आहे. भारतामधे घर, जमीन, बाँड, म्युच्युअल फंड, शेअर, एफडी असे गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तेंव्हा प्रत्येकाने त्याच्या गरजेनुसार आणि त्याच्या जोखीम घ्यायच्या ताकतीनुसार बॅलन्स करीत गुतवणुक करावी. मार्केट चढो की उतरो सारा पैसा एकाच ठिकाणी गुतवणे चुकीचे आहे.
27 Sep 2015 - 9:36 pm | आनंदी गोपाळ
कोणत्याही धंद्यात फुलटाईम डोकं घातलं तरच फायदा होतो.
शेयर्समधून पैसे कमावलेही आहेत, व गमावलेही आहेत. कधीकाळी माझ्या मूळ धंद्यातून पैसे कमवायची जिवावर येईल किंवा लय मोकळा वेळ मिळेल तेव्हा पुन्हा एकदा त्यात खेळ खेळू.
मार्केटकडे लक्ष द्यायला वेळ नाही, अन म्युच्वल फंडात पैसे टाकून श्रीमंत होईन अशी स्वप्ने असतील तर ती झूट आहेत, इतकेच म्हणतो. १५ फंडात पैसे टाकाल तर ५ बरे चालतात, ५ कसेबसे ब्रेक इव्हन अन ५ लॉसमधे असतात.
हा माझा अनुभव.
बाकी चर्चा चालू द्या, आमच्या सारख्यांचं शिक्षाण होईल.
28 Sep 2015 - 10:01 am | प्रसाद भागवत
कोणत्याही धंद्यात फुलटाईम डोकं घातलं तरच फायदा होतो.......
असे असेल तर आपल्याला प्लंबींग पासुन गॅजेट्स रिपेअर करणे व्हाया मेडिकल सायन्स आणि गॅरेज मॅकेनिक्स...असे अनेक कोर्सेस करावे लागतील. माझ्या मते आपण सगळ्याच्या सगळ्या ६४ विद्या शिकण्याचा आणि त्यात फुलटाईम करियर करण्याचा अट्टाहास सोडुन प्रत्येकासाथी योग्य माणुस शोधण्याची कला अंगी बाणवली तरी पुरे होते. बाकी 'शिक्षाण' ही कधीच न संपणारी गोष्ट आहे, ते होतच राहील.
नाही पटलं तर द्या सोडुन...
30 Sep 2015 - 1:00 pm | तर्राट जोकर
कोणत्याही धंद्यात फुलटाईम डोकं घातलं तरच फायदा होतो.
शंभर टक्के सहमत. शेअर बाजारात गुंतवणूक करा असे सांगणारे सुरुवातीला फार सोपे आहे असे चित्र मांडतात. माणसं तिकडे खेचल्या गेली की खुप अभ्यास करावा लागेल अशी तांत्रीक क्लिष्टता समोर येते जिला सामान्य माणूस समजून घेऊन निर्णय घेऊ शकत नाही. प्रश्न पैशाचा असतो. नेहमी फायदाच होईल असे चित्र दिसलेले असते, आत गेल्यावर अभिमन्यू सारखी हालत होते. मग हेच शेअर बाजाराचे भाट "आम्ही आहोत ना मदतीला" म्हणून परत एक जाळं टाकणार. तुम्ही त्यांच्यावर विसंबून आपले पैसे त्यांच्या सल्ल्याने गुंतवणार, थोडक्यात नुकसान झाले तरी तुमचे, फायदा झाला तरी तुमचा पण या दोन्ही प्रकरणात सल्लागार कमाई करणारच. म्हणजे तुमच्या पैशावर सल्लागार कमाई करणार, निमित्त काय तर तुम्हाला शेअरबाजाराची तांत्रीक बाजू समजून येऊ शकत नाही.
भारतात आजकाल सर्व माध्यमांतून शेअरबाजाराची जी हवा तयार केल्या जाते तो एक मोठा बनाव आहे. जणू काही बाजार म्हणजे शेअर बाजारच. बाकीचे बाजार नाहीतच जगात.पण उदो उदो फक्त शेअरबाजाराचाच होतो. कारण यात दलालांना प्रचंड पैसा मिळतो. भरपूर पैसे कमावुन देणारे इतरही बाजार आहेत जगात.
उदा.
१. कांदाबाजार. नवा कांदा बाजारात येत असतांनाच येत्या हंगामात कांदा किती चढणार हे जाणकारांना माहित असते. १० लाख गुंतवून काही टन कांदा घेऊन स्टोरेज मध्ये ठेवायचा. पुढच्या सहा महिन्यात तोच कांदा ४० लाखाला विकायचा. सर्व खर्च धरून नफा फक्त २८ लाख तेही सहा महिन्यात. ह्यात जाणकार असलेलेच हा नफा कमावू शकतात. हाच हिशोब सगळ्या धंद्यांत लागू होतो. एखादा जाणकार पकडून त्याच्याद्वारे तुम्ही कांदा बाजारात गुंतवणूक केली तर हाच नफा तुम्ही ही मिळवू शकता.
२. कॅलिफोर्निया बदामांचा एक कंटेनर ह्या व्यवसायतली छदाम माहिती नसलेल्या व्यक्तिने याच व्यवसायात असलेल्या नातेवाइकाने दिलेल्या माहितीच्या आधारावर ऑर्डर केला. ऑर्डर देते वेळी किंमत होती १०० रुपये किलो. कंटेनर मिळाल्यावर पैसे द्यायचे होते. अमेरिकेहुन भारतात कंटेनर पोचायला काही महिने लागले. तोवर इकडे बदामची किंमत झाली २०० रुपये किलो. एकही पैसा पदरचा न खर्च करता त्या व्यक्तीने काही कोटी रुपये घरबसल्या कमावले.
त्यामुळे कुठल्याही धंद्यात नफा मिळवायचा तर त्यात फुल्टाइम डोकं घातले पाहिजे हे खरेच.
30 Sep 2015 - 2:39 pm | प्रसाद भागवत
........ह्या व्यवसायतली 'छदाम माहिती नसलेल्या व्यक्तिने' याच व्यवसायात असलेल्या 'नातेवाइकाने दिलेल्या माहितीच्या आधारावर' ऑर्डर केला.......
.......एकही पैसा पदरचा न खर्च करता त्या व्यक्तीने काही कोटी रुपये घरबसल्या कमावले.
त्यामुळे कुठल्याही धंद्यात नफा मिळवायचा तर त्यात फुल्टाइम डोकं घातले पाहिजे हे खरेच......
आपण अस काही बिनतोड युक्तीवाद केला आहे हे उदाहरण देवुन, की आपल्याला खरोखर आधुनिक 'तर्कतीर्थ'च म्हणावयस हवे.
30 Sep 2015 - 2:40 pm | प्रसाद भागवत
एखादा जाणकार पकडून त्याच्याद्वारे तुम्ही कांदा बाजारात गुंतवणूक केली तर हाच नफा तुम्ही ही मिळवू शकता....हे वाक्य राहिले
30 Sep 2015 - 7:22 pm | तर्राट जोकर
तुम्हाला उपरोध कळला नाही याबद्दल क्षमस्व.
त्या व्यवस्थेतल्या परिपूर्ण माहितीशिवाय किंवा जाणकाराशिवाय यश मिळत नाही हेच नमुद करायचे होते, आनंदी गोपाळ यांनीही हेच सांगितले. पण सातत्याने यशच मिळेल अशी जाहिरात करणारे 'जाणकार' आपल्या 'सेवा विक्री'साठी अचाट दावे करतात, शेअरबाजार ही दुभती गाय आहे असे खोटे चित्र दाखवतात त्याबद्दल आक्षेप आहे. त्यांचेही काही चुकत नाही म्हणा, कधी फायदा, कधी तोटा होइल असे स्पष्ट सांगितले तर कोण 'जाणकारां'कडे जाईल? आपण ज्याच्याकडे जातोय तो खराच जाणकार आहे का याचाही जास्तीचा अभ्यास आणि कसोट्या गुंतवणूकदाराने कराव्या असाही उपदेश पुढे येईल.
थोडक्यात काय तर काहीही करा, पूर्ण अभ्यासाशिवाय यश मिळत नाही हेच खरे की नाही?
30 Sep 2015 - 7:31 pm | प्रसाद भागवत
TJराव, क्षमस्व. या मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
28 Sep 2015 - 4:41 pm | जिमहेश
छान माहिती. सध्या 1 SIP चालू आहे.returns चांगले आहेत.काही सल्ला देवू शकाल का?
व्यनी कसा करायचा ते कळत नसल्याने येथे विचारत आहे. क्षमस्व.
28 Sep 2015 - 4:50 pm | द-बाहुबली
ठीक लिखाण.
यापेक्षा जास्त आकर्षक कँपेन पाहिली आहेत. माझा सल्ला इतकाच आहे शेअर बाजार जोखमीचा आहे. तगडा फयदाही मिळतो फक्त तुमचे डॉके चालले पाहिजे. आनी ते कोनाचे कुठे चालावे यासाठी कोणताही कोर्स उपलब्ध्द नाही... त्यामुले जर का तुम्हाला वाटतय की तुमच यात डोकं चालत नाही तर यात अजिबात पडू नका.
बाकी आपण सर्वज्ञानी असुच असे नाही त्यामुले योग्य माणुस नेमणे हा नक्किच उपाय आहे पण जेंव्हा विषय पैसा सोपवण्याचा येतो समोरचा माणूस योग्य आहे हे समजायचा कोणताही मार्ग अस्तित्वात नाही. वॉरनबफेटने कधीही त्याचा पैसा मॅनेज करायला योग्य माणूस हुडकला नाही त्याचे डॉके चालले म्हणून त्याने गुंतवणुकी केल्या तुमचे चालत नसेल तर धोका पत्करु नका.
30 Sep 2015 - 7:14 pm | प्रसाद भागवत
वॉरन बफेटने कधीही त्याचा पैसा मॅनेज करायला योग्य माणूस हुडकला नाही........सहाजिकच आहे कारण गुंतवणुक करणे हाच त्यांचा पुर्णवेळ व्यवसाय आहे. पण जर बफेट आपली कारही स्वतः दुरुस्त करीत असते आणि स्वतःचा कोटही स्वतः शिवत असते तर आपले उदाहरण समर्पक या सदरंत आले असते. बाकी प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
28 Sep 2015 - 5:45 pm | पगला गजोधर
:)
28 Sep 2015 - 11:47 pm | दिवाकर कुलकर्णी
शेअर्स मध्ये पैसे मिलवणं सोपं पण आहे आणि अवघड पण आहे,
एकदम हा पि एच् डी चा अ भ्यास वाटेल पण अभ्यास करून निफ्टी ५० मधील चागला शेअर ,ज्याचे ट्रॉक रेकॉर्ड चांगले आहे ,शोधून त्याच्या
फ्युचर ऑप्शन मध्ये(चार मित्रात मिलून,कारण एक सौदा दोन लाखाच्या वरचा असतो) महिन्यात लॉस होत असेल तर डीलीव्हरी घेण्याच्या
तयारीने पुट विकल्यास महिन्यात ४ ते ५ टक्के मोबदला मिलू शकतो निदान ब्लू चीप शेअर बाजार भावापेक्शा स्वस्त मिलू शकतो
जाणकराच्या सलेलयाने हे करावे,इथं त्या शेअरमध्ये तेजी होइल असे अपेक्शिले आहे ,मंदी झालेयास डिलीव्हरी घेणे अपेक्शित
धरले आहे
चांगला शेअर घेउन(पुन: एक लॉट, निदान दोन लाख रु.), त्याचा कॉल विकणे हा पण एक रूढ मार्ग आहे इथहि महिना ४ ते ५ टक्के मोबदला
मिलू शकतो
हे मार्ग पैशावर रिटर्न मिलवणयाचे आहेत,इथ शेअर्स शी देणंघेणं फारसं नाही
डी व्ही आर घेणे इ.इ. अन्य मार्ग हि आहेत तेयावर चर्चा पुन: कधातरी
29 Sep 2015 - 11:24 am | दिवाकर कुलकर्णी
व्याजात अर्धा टक्का कट
स्वामींच्या धमकिला राजन घाबरले काय?
शेअरवाल्याना शॉर्ट टर्म मध्ये चांगले दिवस यावेत
29 Sep 2015 - 7:21 pm | स्वप्क००७
अतिशय छान लेख.long term साठी ठीक आहे.
पण जर महिन्याचा उत्पन्न हवा असेल तर काय सल्ला द्याल ?
29 Sep 2015 - 8:13 pm | प्रसाद भागवत
छान प्रश्न. सर्वसाधारणतः मी अशी गरज असलेल्या व कमीत कमी धोका स्वीकारु पहाणारे क्लायंट्सच्या करावयाच्या गुंतवणुकीतुन त्यांना आवश्यक असलेले तीन वर्षांचे उत्पन्न हे अगदी कमी धोका असलेल्या मंथली इन्कम प्लॅन मध्ये गुंतवुन त्यातुन पुढील तीन वर्षांची उत्पन्नाची तरतुद करतो. मग उर्वरित रक्कम मात्र 2/3 चांगल्या ईक्विटी फंडांत गुंतवतो....बाकी नित्यनेमाने स्थितीचे अवलोकन, वेळोवेळी योजनेचा आढावा, हे अव्याहतपणाने असतेच. आणि ते असायलाच हवे.
थोडी अधीक जोखीम पत्करणारे क्लायंट्स असतील तर मग मंथली इन्कम प्लॅन ऐवजी योग्य वेळ साधुन काही हायब्रीड फंडस (ICICIPru Balanced Advantage, principal Smart equity किंवा Franklin PE ratio Fund ) अशा योजना स्वीकारता येतात.
30 Sep 2015 - 7:40 pm | स्वप्क००७
प्रतिसाद बद्धल धन्यवाद.
मी अतिशय नावाखा असल्यामुळे विस्कटून सांगू शकाल का?
2 Oct 2015 - 2:13 pm | श्रीगुरुजी
शेअरबाजारात नफा मिळविणे अवघड नाही. मात्र हाव टाळली पाहिजे आणि काही वर्षे थांबण्याचा संयम हवा. माझा फारसा अभ्यास नसला तरी माझ्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून हे लक्षात आले आहे की ब्ल्यू चिप शेअर्स बहुतेकवेळा मोठा नफा मिळवून देतात. इन्फोसिस, टीसीएस, मारूती-सुझुकी, टाटा मोटर्स, लार्सन अॅण्ड टूब्रो, स्टेट बँक इ. समभाग नेहमीच फायदा देतात.
सध्या या कंपन्यांव्यतिरिक्त येस बँक, अॅक्सिस बँक, अशोक लेलँड, टेक महिंद्रा या कंपन्यांचे समभाग घेण्यायोग्य आहेत. रोज त्यांच्या भावावर नजर ठेवून जेव्हा जेव्हा भाव कमी होईत्ल, तेव्हा तेव्हा पडत्या भावाने थोडे थोडे शेअर्स घेऊन ठेवल्यास पुढील २-३ वर्षात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.
6 Oct 2015 - 6:28 pm | बिहाग
मध्यंतरी चीनी शेअर बाजार कोसळला तेव्हा असे विशलेषण आले होते की त्यांचा सरकारने लोकांना बाजारात पैसे टाकायला प्रोत्साहन दिले नंतर अति उत्साहामुळे बाजार कोसळला. आपण पण त्याच मार्गाने चाललो आहोत का?
https://en.wikipedia.org/wiki/2015_Chinese_stock_market_crash
Causes[edit]
In the year leading up to the crash, encouraged by state-owned media,[1][3] enthusiastic individual investors inflated the stock market bubble through mass amounts of investments in stocks often using borrowed money, exceeding the rate of economic growth and profits of the companies they were investing in.[2] Investors faced margin calls on their stocks and many were forced to sell off shares in droves, precipitating the crash.[4]
6 Oct 2015 - 6:59 pm | प्रसाद भागवत
निदान मला तरी असे वाटत नाही. चीनच्या भांडवली बाजारातील स्थिती व आपल्याकडील स्थिती यात खुप अंतर आहे.
6 Oct 2015 - 7:53 pm | बिहाग
थोडे विस्ताराने सांगला का? मी मागची पाच वर्ष SIP केला आहे आणि पुढची दहा वर्ष करणार आहे. पण भारतात जर चीन सारखी स्थिती आली तर आधी ओळखायचे कसे हे कळले तर फार बरे होईल.
7 Oct 2015 - 11:23 am | श्री गावसेना प्रमुख
भारतात तरी अजुन सरकार ने इक्वीटी साठी कर्ज द्यायला सुरवात केलेली नाही ,अन भविष्यात सुद्धा शक्य नाही,आठे कामस्ले पैसा नही सेतस तव्हय मार्केट साठी कथाइन कर्ज देतिन.