शेअरबाजार; प्रासंगिक - तांत्रिक विष्लेषणाच्या नजरेतुन काही रचना

प्रसाद भागवत's picture
प्रसाद भागवत in काथ्याकूट
6 Oct 2015 - 5:29 pm
गाभा: 

http://www.misalpav.com/node/31247

आज दिवसाअखेर निफ्टीच्या दैनेंदिन फ्युचर्सच्या आलेखावर (chart) तांत्रिक विष्लेषणाच्या भाषेत ज्याला 'हॅंगिग मॅन' असे म्हटले जाते, अशी, येत्या दिवासांत (अल्प्कालीक) मंदीचा संकेत ठरणारी रचना झालेली दिसते.

तेजीच्या आवर्तनादरम्यान आणखी एका सकारात्मक सुरवातीनंतर बाजार अचानक ढेपाळतो,...पण थोड्याच वेळांत सावरुन झालेले नुकसान भरुन काढत तो दिवसाच्या सुरवातीची पातळॅए ओलांडुन वर जातो. मात्र उत्तरार्धात तो थोडासा नरमुन जवळ्पास दिवसाच्या सुरवातीच्याच पातळी जवळ तो बंद होतो. या रचनेस 'हॅंगिग मॅन' अशी संज्ञा आहे.

बाजारांतील तेजीस कारणीभुत असणारे काही मोठे भिडु ( बाजाराच्या परिभाषेत strong hands) या तेजीबद्दल साशंक झाल्याने सुरवातीसच विक्रीचा जोर लावतात. मात्र तेजीच्या प्रवाहात काहीसे उशीरा शिरलेले हौशी वा तुलनेने कमकुवत घटक त्यांनी केलीली ही विक्री म्हणजे 'खरेदीची सुसंधी' असे मानुन विक्रीचा मारा पचवतात. मात्र त्यांचे अवसान फारकाळ न टिकल्याने बाजार दिवसांतील उच्चांकी पातलीपासुन खाली येतो... असा या घडामोडीमागचा अनव्यार्थ असल्याने ही रचना येत्या काळांतील मंदीकडे अंगुलीनिर्देश करणारी आहे भरीस भार म्हणजे आत्ता बाजार तांत्रिकदृष्ट्या महत्वाच्या अशा 200 दिवसांच्या सरासरीच्या अगदी जवळ आहे....

अर्थात हा काय किंवा असेच अन्य संकेत हे फक्त ठोकताळे वा अंदाज आहेत, हमखास यशाचे सुत्र वा काळ्या दगडावरची रेघ नव्हे. तेंव्हा पाहुया काय होते. - प्रसाद भागवत

प्रतिक्रिया

तर्राट जोकर's picture

6 Oct 2015 - 10:51 pm | तर्राट जोकर

हा काय किंवा असेच अन्य संकेत हे फक्त ठोकताळे वा अंदाज आहेत, हमखास यशाचे सुत्र वा काळ्या दगडावरची रेघ नव्हे.

याचेच मला कायम कौतुक वाटत राह्यलंय.

मी-सौरभ's picture

6 Oct 2015 - 11:53 pm | मी-सौरभ

पु.ले.प्र.

प्रसाद भागवत's picture

13 Jan 2016 - 9:48 pm | प्रसाद भागवत

आजचा दिवस (13 जानेवारी 2016) तीव्र हेलकाव्यांचा होता. सकाळी 47.60 अंशाची आघाडी घेत 7557.90 वर उघडलेल्या निर्देशांकाने दिवसाच्या मध्यात अचानकपणाने गटांगळ्या खाल्ल्या.(दिवसतील न्युनतम पातळी 7425.80) मात्र उत्तरार्धात पुन्हा तेजी आली व दिवसाअखेरीस निफ्टी 52.10 पॉईंट्स वर म्हणजे 7562.40 येथे बंद झाला.

दिवसाभराची चांगली सुरवात होवुन, मध्येच मोठी घसरगुंडी झाल्याने आधल्या दिवशीच्या तुलनेने खाली जाणे व शेवटी पुन्हा झालेली पिछेहाट भतुन काढत दिवसातील सर्वोच्च भाव नोंदविणे आणि तेजीची पकड सैल न करता दिवसाअखेर किमान सुरवातीच्या भावपातळी जवळच बंद होणे या आकृतिबंधास तांत्रिक परिभाषेंत 'dragonfly doji' असे म्हणतात.

ही संरचना बाजाराचा कलबदल (trend reversal) होत असल्याची निदर्शक आहे. दिवसादरम्यान विक्रीच्या तीव्र प्रहाराने झालेली 'खोल' जखम बाजाराने ज्या पद्धतीने वेगाने भरुन काढली ते पहाता खरेदीदार बाजारात परतत असल्याचे दिसते. शिवाय बोलावयाचे तर निफ्टीच्या फ्युचर्समध्ये आज सर्वाधिक व्यवहारांचीही नोंद झाली.

निफ्टीच्या फ्युचर्सचा खालील आलेख कदाचित मला काय म्हणावयाचे आहे ते अधिक स्पष्ट करेल

उद्या बाजारांत आजच्याप्रमाणेच सकारात्मक कल राहिल्यास तो 'तळनिश्चिती'चा व सहाजिकच खरेदीच्या संधीचा संकेत असेल. पाहुया काय होते ते. - प्रसाद भागवत

प्रसाद भागवत's picture

24 May 2016 - 9:24 pm | प्रसाद भागवत

माझ्या तांत्रिक विष्लेषणांतील तज्ज्ञ् मित्राने सांगितेलेला हा मुद्दा --

त्याच्या अभ्यासानुसार गेले वर्षे जुन महिन्यांत बाजारांत सर्वाधिक हालचाल/चढउतार पहावयास मिळतात.. 2010 सालापासुन पाहिले तर बाजाराच्या जुन महिन्यांतील सर्वाधिक आणि न्युनतम भाव यांतील फरकाची सरासरी (Range) 8.11% आहे.

(जिज्ञासुंकरिता- 2010 जुन मध्ये ती 8.1% होती, 2011 - 8.8%, 2012 - 10.8%, 2013 - 7.99%, 2014 - 6.3% आणि 2015 साली ती 6.66% होती. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे जुनमधील गेल्या 16 वर्षांचा तपशील असे सांगतो की 11 वेळा बाजार वर गेला आणि 05 वेळा(च) खाली...)

या उलट या महिन्यांत निर्देशांक अगदीच संधीवाताने आखडलेल्या रुग्णासारखा वागतोय*. या महिन्यांत आजपर्यंत हीच 'Range' फक्त 3.4% हालचाल दाखवते, जी गेल्या अनेक महिन्यांतील सर्वाधिक सुस्त्,थंड हालचाल आहे.

येत्या महिन्यांत होणारी अमेरिकन फेडरल बॅकेची बैठक, युरोपमधील Brexit प्रश्नावर होणारे सार्वमत, मान्सुनमुळे RBI च्या धोरणांत होणारा संभाव्य बदल वा गव्हर्नरपदाबाबतची घोषणा....असे धमाकेदार मुद्दे आहेतच. तेंव्हा मित्राच्याच शब्दात सांगावयाचे तर *Be Rady, Fireworks Coming!! - प्रसाद भागवत*

भंकस बाबा's picture

14 Jan 2016 - 12:23 am | भंकस बाबा

भागवत साहेब , मी बरचशे A ग्रुपचे शेयर घेऊन ठेवले आहेत. बोटम फिशिंग म्हणा ना.
रूरल इलेक्ट्रिक, स्टेट बैंक, सेल, कोल् इंडिया , बघू बोटम फिशिंग होते का आम्ही बॉटम ला जातो

मी-सौरभ's picture

25 May 2016 - 12:17 am | मी-सौरभ

ऑल द बेस्ट!!