शेअरबाजार : 'डिस्काऊण्ट...पहावा मिळवुन' !!!

प्रसाद भागवत's picture
प्रसाद भागवत in काथ्याकूट
8 Apr 2016 - 4:04 pm
गाभा: 

"चिरंजीव शेअरबाजारांत करियर करणार आहेत म्हणे...." अशी माझ्या (कु)प्रसिध्दीची नुकतीच सुरवात होवु लागलेला, 20 एक वर्षांपुर्वीचा काळ, पोटापाण्याचे काहितरी बघावे या विवंचनेत घराबहेर पडलेला मी टळटळीत दुपार झाल्याने घरी परतण्यासाठी बस स्टॅंड्वर उभा होतो, तितक्यांत माझ्या ओळखीचे एक सदगृहस्थ व त्यांच्या पत्नी सुहास्य वदनाने येताना दिसले. दोघांच्याही हातात एक/एक ड्रायफ्रुटसचा पॅक !!... तो जमाना असे बॉक्स फक्त दिवाळींत मिळण्याचा होता. मी एखाद्या गोलंदाजाने पंचांकडे केवळ औपचारिकता म्हणुन अपील करावे, तसे नुसतेच मान व डोळे हलवुन बॉक्सकडे पहात 'आज काय विषेष??' अशी विचारणा केली. झाSSSले... पानशेतचा प्रलय प्रलय म्हणजे काय असेल..त्याची अनुभुती मला पुढच्या काही वेळांत आली
(नशीबवान आहात तुम्ही, येथे मी तुम्हांला फक्त सारांश सागतोय....) मुद्दा असा होता की हे साहेब काही ठराविक कंपन्याचे प्रत्येकी २ शेअर्स घरातील प्रत्येकाच्या नावे घेत. आणि मग हे आख्खे 'शेअरहोल्डर्स' कुटुंब अशा कंपन्यांच्या पुणे शहरांत होणाऱ्या 'वार्षिक सर्वसाधारण सभेला'(AGM) अगदी न चुकता हजेरी लावे....."सभा ही कोणत्यातरी पॉश ए.सी सभागृहांतच होणार, तास दोनतास छान विश्रांती…..मस्त सरबराई होते,आणि वर अशी सप्रेम भेट मिळते...शिवाय डिव्हीडंड आहेच, तो कुठे जातोय??" श्री काका उवाच. मला उगीचच मेसच्या जेवणाचे आवढण आले की शोधुन शोधुन काढलेल्या मित्र/नातेवाईकांकडे संध्याकाळी उशीरा जाणारे माझे होस्टेलवर रहाणारे मित्र आठवले.
"...बघ, XXXचे मुळ शेअर्स घ्यायला दहा हजार पण नाही लागले, आत्ता मार्केट व्हॅल्यु कैकपट आहे, पुर्वी माझ्या एकट्याच्या नावे होते, आता डि-मॅटची सोय झाल्याने तेच शेअर्स तिघांच्या नावे केले. तेवढीच एखाद्-दुसरी गिफ्ट एक्स्ट्रॉ. उगीच सोडा कशाला?? नाही का..” म्हणुन ते गडगडाटी हसले. काकांच्या या उद्गारांतुन मला मात्र शेअरबाजारांतील गुंतवणुकीचा एक नवा धडा मिळत होता.
एक मात्र आहे,कोणत्या कंपनीची AGM पुण्यांत होते आणि कोणाच्या 'पाहुणचाराचा' दर्जा किती आहे याचा या काकांचा अभ्यास जबरदस्तच होता..
पुढे काही दिवसांनी सुदर्शन कंपनीतील माझे एक वरिष्ठ सहकारी माझ्याकडे आले, त्यांना TELCO मध्ये एक F.D.करावयाची होती. फोर्मवरील 'शेअरहोल्डर्सना अर्धा टक्का जास्त व्याज' ही ओळ पहाताच माझ्या मनांत श्री. काकांचे मौलिक विचार विजेसारखे चमकुन गेले.. 'सर, आपण दोन/तीन दिवसांनी करुयात F.D...." मी म्हणालो. "आधी 02 शेअर्स विकत घेवुन शेअरहोल्डर बनु... दोन शेअर घ्यायला जेमतेम 250 रुपये लागतील, जे ही फुकट जाणार नाहीतच मात्र त्यामुळे आपल्याला पुर्ण डिपॉझिटवर दरवर्षी अर्धा टक्का जास्त व्याज मिळेल.." आयडियेच्या ह्या कल्पनेने माझ्यातला आर्थिक सल्लागार आणि सरांमधला एक गणिती..दोघेही खुष झालो..
'एखादी गोष्ट दोनदा घड्ली ..की ती वारवार घडते Everything that happens once may never happen again. But everything that happens twice will surely happen a third time " असा काहीसा एक सिद्धांत आहे म्हणे, खरे खोटे देवास ठावुक.. पण मला त्याचा प्रत्यय आला. काही कारणाने माझ्या ओळखीच्या एका समव्यवसायी गुजराथी मित्राला भेटायला चर्चगेट्ला गेलो असता पठ्ठ्या 'ताज' मध्ये नाश्ता करावयास गेला आहे असा गौप्यस्फोट त्याने फोनवरुन केला.....त्या काळी अगदी सचिन तेंडुलकरनेही असे करणे धाडसाचे झाले असते तिथे 'ह्याची' काय कथा??.. सहाजिकच मी चक्रावुन गेलो. पुढे अलिबाबाच्या गोष्टीतील कासिमच्या पत्नीला जसे 'भानगड काय आहे?' हे कळल्याशिवाय रहावले नव्हते तसेच माझे झाल्याने मी तो भेटल्यावर हळुच विषय काढला तेंव्हा खुलासा झाला.. "अरे यार, ये इंडियन हॉटेल वाले शेअरहोल्डर्स को 30% डिस्काउंट वाली कुपने देते है....एक बडा 'बकरा' मिला था..सोचा..थोडा ईंप्रेस कर दुं.." थंडपणे तो म्हणाला. ईकडे मी मात्र ‘ह्या ताजचे मालक असलेल्या इंडियन हॉटेलवाल्यांची AGM कुठे होत असेल बरे??' या विचाराने श्री.काका झालो होतो.
दरम्यानच्या काळांत रिलायन्स, अरविंद मिल्स, मफतलाल, रेमंड्स सारख्या कंपन्या त्यांच्या शेअरहोल्डर्सना कंपनी शोरुममधुन खरेदीसाठी 15/20% भरघोस सवलत देतात हे मला पहावयास मिळाले. मला मिळालेली अशी कुपन्स मी कोणा ईच्छुकांस आवर्जुन देत असे आणि ‘नाखुन काट के शहिद होना’’ असा काहीसा वाकप्रचार हिंदीत आहे, त्याचा प्रत्यय घेत असे. ‘हॉकिन्स कुकर्स’ हे आणखी एक नाव मला येथे जोडावे लागेल. ही कंपनीही भागधारकांना तिच्या उत्पादनांवर 20% सवलत देते ज्याचा वापर करुन मी आमच्या संसारातील पहिला फ्युचुरा नॉनस्टीक संच घेतला.
अनेक जगप्रसिद्ध महिलांप्रमाणेच माझ्या कन्येला सतत नवनवीन चप्पल्स,सॅंडल्स वापरायचा सोस आहे. मुलीचे पाय चप्पलांत (तेही निरनिराळ्या) दिसल्याने त्रस्त होतात्सा तिच्या एका वाढ्दिवशी गुरुवर्य श्री. काकांचे आदरपुर्वक स्मरण करुन मी तिच्या व माझ्या डि-मॅट खात्यांत 'बाटा' कंपनीचे दोन दोन शेअर्स घेतले. पाच एक वर्षे झाली असावीत, मला आठवते मला 310 च्या भावाने साधारण 1250 रु.चे आसपास गुंतवणुक झाली. हे 'बाटा'वाले प्रत्येक शेअरहोल्डरला 20% सवलतीची 02 कुपन्स देत असल्याने चप्पल्स पर्सेस ई. 'अत्यावश्यक'(?) खरेदीपोटी मला दरवर्षी किमान 600/700 रुपये डिस्काउंट मिळतो. कंपनी दरवर्षी 60/65% लाभांश देते, आणि शेअरचा भाव वाढतो ते निराळेच (आजचा भाव रु. 525).
शेअर्स का घ्यावे आणि शेअर्सच का घ्यावे अशी भुमिका नेहमीच अहममिकेने मांडणारा मी आज ह्या अशा ‘ऑफ-बीट’ गोष्टींकरता वेळ का दवडतोय असे अनेकांना वाटल्याशिवाय रहाणार नाही. पण एकापेक्षा एक क्लिष्ट कायदे, चक्करदार वाजवुन दर्दी लोकांच्या टाळ्या घेणारे उस्तादही जसे नवीन, शिकावु प्रेक्षकांसाठी तबल्यावर रेल्वेचा, पाउसाचा आवाज काढणे असे सोप्पे प्रकार करतात (आणि त्यात गैर काहीही नाही असे मी मानतो)… तसेच काहीसे हे आहे.
अर्थात उत्तम, ब्ल्यु-चीप शेअर्स मधील दीर्घकालीन गुंतवणुकीची भुमिका केवळ कुपने वा एखादे उत्तम जेवण वा गिफ्ट मिळविण्यापुरती मर्यादित ठेवणे म्हणजे घरांतील असलेल्या ऐतिहासिक तलवारीचा उपयोग कांदे बटाटे भाजी चिरण्यासाठी करण्यासारखे वा दारी असलेल्या कल्पवृक्षापासुन फुकट पाने मिळतात त्यातुन पत्रावळींचा व्यवसाय करण्यासारखे आहे, अगदीच हल्लीच्या भाषेत A.T.M.चा वापर आतील A.C ची थंड हवा अनुभवण्यासाठी करण्यासारखे आहे असे माझे मत आहेच.
आणि हो..महत्वाचे. अशा गिफ्ट/डिस्काउंट कुपन्स देणारी कोणतीही कंपनी म्हणजे अगदी डोळे झाकुन खरेदी करावी अशी उत्तम कंपनी, असे मला बिलकुलच सुचवायचे नाही. किंबहुना बाजारांतील भविष्यकाळांतील भाव वा लाभांश अशा गोष्टींप्रमाणेच ही कुपन्स वा गिफ्ट्स मिळतील याची कोणतीही हमी नसते बरं का. उलट खरेतर हल्ली कंपनी कायद्यान्वये कंपनीच्या वार्षिक वा कोणत्याही सभेत थेट भेटवस्तु वाटण्यावर निर्बंध आहेत. मात्र सवलतीची कुपन्स देण्यावर अथवा सभेस उपस्थित सभासदांचे आदरातिथ्थ्य करण्यावर मात्र असे निर्बंध नाहीत.
तर मंडळी, हे सारे, या लेखाचे, सव्यापसव्य करण्याचे कारण, म्हणजे कालच वाचलेली एक बातमी.
जर्मनीतील प्रख्यात Daimler AG या, जगांतील लक्झरी कार बनविणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या कंपनीच्या नुकत्याच संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत(AGM) दोन शेअरहोल्डर्समध्ये चक्क बाचाबाची झाली ज्यात कंपनी व्यवस्थापनाला मध्यस्थी करुन दिलगिरी व्यक्त करावी लागली.
….निमित्त होते सभेनंतरच्या Buffet मध्ये कमी पडलेल्या खाद्यपदार्थांचे. जर्मनीत म्हणे अशा सभांनंतर भरगच्च मेनु असलेला ‘अल्पोपहार’ ठेवण्याचा प्रघात आहे, ज्याचा हजारो शेअर होल्डर्स फन्ना उडवतात…येथे sausage चे पाउचेस कमी पडण्याच्या शक्यतेने हा अनावस्था प्रसंग ओढवला..
शेवटी घरोघरी मातीच्याच चुली..दुसरे काय. – प्रसाद भागवत

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

8 Apr 2016 - 4:34 pm | तुषार काळभोर

नववर्षाच्या मुहुर्तावर पुन्हा सक्रीय झालात... :)

AGM मध्ये अशा भेटी मिळत असतात हे माहितच नव्हते. बऱ्याच AGM साठी पत्र येते पण बहुतेक सर्वच मुंबईत होत असल्याने आतापर्यंत कधीच जाणे झाले नव्हते.

शेयर्ससंबंधात एका वेगळ्याच विषयावर लेख. आवडला.

प्रसाद भागवत's picture

8 Apr 2016 - 4:40 pm | प्रसाद भागवत

लेखात लिहिल्याप्रमाणे पुर्वी मिळात असत..आता निर्बंध आहेत.

प्रसाद भागवत's picture

8 Apr 2016 - 4:42 pm | प्रसाद भागवत

कमिन्स, किर्लोस्कर,सुदर्शन, यांच्यासारख्या काही ठराविक पुणेस्थित कंपन्या येथेच, पुण्यांत एजीएम घेतात

दुर्दैवाने एकाही पुणेस्थित कंपन्यांचे शेयर्स नाहित. टाटा मोटर्स सोडून.

नाखु's picture

9 May 2016 - 12:56 pm | नाखु

ट्रक खरेदीवर २०% सूट असलेले कुपन मिळोत असी देवाकडे प्रार्थना करतो.

एस्बीआय एसायपी वाला नाखु

प्रसाद भागवत's picture

9 May 2016 - 1:06 pm | प्रसाद भागवत

धन्यवाद.. टक बनविणार्या कंपनीज्चे शेअर्स आधी घ्या तर नाखु सरकार...असा कुपन्समधुन नव्हे तर तसा appreciation च्या माध्यमांतुन डिस्काऊण्ट मिळेल..आपल्याला काय, आम खाने से मतलब..

नाखु's picture

9 May 2016 - 1:55 pm | नाखु

मिळणार है त्यांच्याकडे टाटा मोटर्सचे समभाग आहेत. मी फक्त क्लिन्नर म्हणोनी आहे.

खुलासेदार नाखु

प्रचेतस's picture

9 May 2016 - 2:09 pm | प्रचेतस

अगागागागा =))

सतिश गावडे's picture

8 Apr 2016 - 4:42 pm | सतिश गावडे

लेख आवडला.

लहानपणी अनेक मराठी चित्रपटांमधून अनेक पैसेवाले शेअर्स बुडून कंगाल झाल्याचे पाहीले असल्याने मी शेअर्सच्या वाटेला जात नाही. कधी मोह व्हायला नको म्हणून डीमॅट अकाऊंटही काढले नाही. =))

प्रसाद भागवत's picture

8 Apr 2016 - 4:45 pm | प्रसाद भागवत

बहुतेक चित्रपटांत नायक गोल्ड मेडल मिळवुन परिक्षा उत्तीर्ण होतो, किंवा डायररेक्ट पुलिस इन्स्पेकटर... आपण हे ही पाहिलेच असेल श्री. सतिशराव..

सतिश गावडे's picture

9 Apr 2016 - 11:29 pm | सतिश गावडे

ते ही आहेच म्हणा.

पण मी मुच्युअल फंडच्या माध्यमातून शेअर बाजारात राहणे पसंत करतो. आपल्या डोक्याला विशेष ताप नाही.
लार्ज क्याप घेऊन शांत बसलो आहे. मार्केट गंडले की पोर्टफोलीओचा उतरता आलेख पाहताना जीव घाबरा होतो. आणि हे फंड हाऊसेसना माहिती असते. अशा वेळी ते "स्टे इन्वेस्टेड"च्या मेलर्सचे ग्लुकोज पाजतात. ते वाचले की पुन्हा तरतरीत होतो. :)

प्रसाद भागवत's picture

11 Apr 2016 - 9:23 am | प्रसाद भागवत

अनेक लोक हा मार्ग स्विकारतात निर्गुण निराकार परमेश्वरप्राप्तीसाठी जसे कोणा सद्गुरुच्या माध्यमांतुन भक्तीमार्ग...आपण करता त्यात फर्काही चुकीचे आहे असे मला वाटत नाही.

मस्त लिहिलय, नविन माहिती मिळतेय काका
SIP mutual funds बद्दल पण लिहा एकदा

भंकस बाबा's picture

8 Apr 2016 - 5:47 pm | भंकस बाबा

नेहमीप्रमाणे यु रॉक्स,
बर्र आता नवीन वर्षासाठी काही खरेदी करावे का?
रूरल इलेट्रिक व् कोल इंडिया पडलेल्या भावात घेऊन ठेवले आहेत, अनुक्रमे 156, 278. तुमचे काय मत,
ओएनजीसी कसा वाटतो 205 ला?
प्रतिसादाचि वाट पहात आहे.

प्रचेतस's picture

8 Apr 2016 - 6:04 pm | प्रचेतस

कोल इंडिया घेऊनच ठेवा. सलग दोन वर्षे सणसणीत लाभांश देते आहे कंपनी.

प्रसाद भागवत's picture

9 Apr 2016 - 9:41 am | प्रसाद भागवत

मला REC पेक्षा पॉवरग्रीड आणि ONGC पेक्षा रिलायन्स अधिक योग्य वाटल्याने मी ते घेतले आहेत. येत्या वर्षभराच्या काळात सिमेट हा मला एक आश्वासक विभाग वाटतो आहे, त्यातही मध्यम आकाराच्या सिमेट कंपन्या अधिक लाभदायक ठराव्यात. कमॉडिटी सायकलच्या काही ठोकताळ्यांवरुन ॲप्कोटेक्स बद्दल मी आशावादी आहे. मान्सुन उत्तम झाल्यास बाजार नवीन उंची गाठेल असी माझी अटकळ आहे.

महत्वाचे म्हणजे एखाद्या विषिष्ट शेअर्स बद्दल टीप्स देणे हा येथील लेखमालेचा उद्देश नाही. सबब असा एखादा शेअर घ्यावा का अथवा किती किंमतीला घ्यावा या चर्चेत मी खुप काही सहभाग घेइन असे वाट्त नाही. येथे दिलेली नावे ही मी केलेली शिफारस समजु नये, मी कोणत्याही नफ्याची अथवा नफा होईलच याचीही, हमी देत नाही.. धन्यवाद

बँकिंग चे शेअर हल्ली का पडत आहेत इतके, आणि सध्या ते लाँग टर्म च्या हिशोबात घेणे योग्य ठरेल ककाय?

प्रसाद भागवत's picture

9 Apr 2016 - 10:12 am | प्रसाद भागवत

आपल्या बहुतेक राष्ट्रीकृत बॅकानी त्यांच्या ताळबंदात दाखविलेला नफा हा त्यानी दिलेली वेळेवर नियमितपणे वसुल न होणारी बुडीत खाती जावु शकतील अशी कर्जे पहाता अवास्तव आहे व आशा कर्जांपोटी या बॅकानी पुरेशी तरतुद करावी अशी सुचना आपले गव्ह्रर्नर श्री. राजन यांनी केली. उपल्ब्ध आकडेवारीप्रमाणे ही अशी संशयास्पद येणी एकत्रित केल्यास दीड लाख कोटीपेक्षाही जास्त आहेत. यशिवाय कर्जे देण्याची पद्धती अधिक कार्यक्षम व पारदर्शक बनविणे...वित्तीय धोरणात (credit policy) मिळालेले फायदे ग्राहकांकडे पोहोच्विण्याबद्दल आग्रही रहाणे अशा धोरणांचा पुरस्कार रिझर्व्ह बॅकेकडुन झाल्याने सहाजिकच बॅकाचे शेअर्स कोसळले. जोडीला एकुणातच बाजारात असलेली नकारात्मकता, निराशाजनक तिमाही व वार्षिक निकाल, काही जागतिक, काही स्थानिक घट्कांचा परिणाम अशी मस्त भेळ बनली....

निदान मला तरी कोणाच्या असतीलच तर त्यासर्व मुदत ठेवी मोडुन स्टेट बॅक 155 रुपयांस घ्यावा असे वाटत होते. बाकी जाणकार अधिक प्रकाश टाकतीलच.

स्पा's picture

9 Apr 2016 - 10:16 am | स्पा

धन्यवाद, icici, hdfc सारख्या बँकांचे पण असेच धोरण आहे काय, कारण सध्या धरल तर चावतय आणी सोडलं तर पळतय अशी गत झालिये

प्रसाद भागवत's picture

9 Apr 2016 - 10:24 am | प्रसाद भागवत

अगदीच तसे नसले, सरकारी दुरावस्थेपासुन काही बाबतीत स्थिती बरी असली ईश्वराप्रमाणेच श्रीमान मल्ल्यांसारखे लोकही चराचर व्यापुन उरले आहेतच की. शेवटी मुळ प्रवाहच्या विरुद्ध खुप काही वेगळी ट्रीटमेंट बाजार देत नाही. ओल्याबरोबर सुके ( की उलट ?? मी गोंध्ळलोय) जळतेच.

थोडक्यात काय, जर धरलं असेलच तर सोडु नये.. सुटलं असेलच तर थोSSडं थांबावे..

स्पा's picture

9 Apr 2016 - 11:11 am | स्पा

धन्यवाद सर

मार्मिक गोडसे's picture

8 Apr 2016 - 5:50 pm | मार्मिक गोडसे

रिलायन्स व रेमंड्सची कुपन्स वापरली आहेत. रेमंड्स १२.५% सुट देत असे. कंपनी शोरुममधुन खरेदी केल्यास १२.५% इतकीच सुट मिळते आणि तीही रु.२००० च्या खरेदीपर्यंतच, म्हणजे रु.२५० ची सूट. इतर दुकानात रेमंडचे कपडे खरेदी करताना ही कुपन्स वापरली तर १८-२०% सूट मिळते(१२.५ कुपन सवलत व बाकीची ग्राहक हातचा जाऊ नये म्हणून) रिलायन्सचे डिस्काउंट कुपन वापरून विमलचे सुटिंग एकदा घेवून बघितले, खराब निघाले(बॉबलींग प्रॉब्लेम).

सुबोध खरे's picture

8 Apr 2016 - 7:01 pm | सुबोध खरे

मी बर्याचशा कंपन्यांचा डिस्काउंट सेल असेल तेंव्हाच खरेदी करतो. परंतु कधीही या सेल मध्ये कुपन्स ने अधिक डिस्काउंट मिळत नाही. उदा २ महिन्यापूर्वी बाटाचा ५० % सेल होता तेंव्हा २००० रुपयांचे हश पप्पीचे सांडल १००० रुपयात मिळाले. २० % डिस्काउंटची कुपने असूनही त्याचा अधिक फायदा होत नाही. इंडियन हॉटेलचे २० % डिस्काउंटची कुपने आहेत पण ताजला जाणे परवडणारे नाही. टायटन ची पण २० % डिस्काउंट ची कुपने आहेत पण काय करता? ट्राफिक जाम मध्ये अडकल्यावर रिक्षाच्या मीटरकडे सारखे लक्ष जाणारी मध्यम वर्गीय माणसे आम्ही.
तस्मात गाय विकत घेताना दुध किती देते ते पाहून घ्या.
भरपूर शेण मिळाले तर उत्तम, नाही तरी वाहवा

टवाळ कार्टा's picture

8 Apr 2016 - 9:08 pm | टवाळ कार्टा

+१

प्रसाद भागवत's picture

9 Apr 2016 - 9:29 am | प्रसाद भागवत

असे सेल मर्यादित कालवधीकरिताच असतात व त्यातही अनेकदा सर्व उत्पादने समाविष्ट नसतात.

माझा बाटाबद्दलचा अनुभव म्हणजे पुणे वानवडी येथील त्यांच्या शो रुम मधुन मी 'डिस्काउंट पे डिस्काउंट' मिळविण्यात यशस्वी झालो आहे, अर्थात कुपन्सवर असे करता क्लबींग करता येणार नाही असे लिहिलेले असते हे खरेच आहे त्यामुळे माझा अनुभव अपवादात्मक असेल पण प्रयत्न करावयास काहीच हरकत नसावी.

बाकी ताज. टायटन, हॉकिन्स (थॉमस कुक ही अशीच कुपने देतात असे एका वाचकाने कालच सांगितले आहे) यांच्या कुपन्स्चा वापर दरवर्षी करणे कठीणच मात्र ही कुपन्स सहजी हस्तांतरीत करता येत असल्याने कुटुंब, मित्र परिवार, काही निवडक क्लायटस यापैकी कोणाकडे तरी मंगल कार्य असते,काहे कारणाने आपल्याला त्यांना काही गित द्य्वाय्ची असते, कोणी होतकरु तरुण झगडुन यश मिळवतो, अशा प्रसंगी आपण ही कुपन्स सत्कारणी लावु शकतोच..शेवटी या जगात जसे फुकट काही मिळत नाही तसेच दिलेले फुकट जात ही नाही.... यावर माझा विश्वास आहे.

समजा एखाद्याने मी उदाहरण दिले त्याप्रमाणे 500/1000 रुपये गुतवुन शेअर होल्डर बनला आणि गेलीही एखादी कुपन्स फुकट तरीहे फारसे बिघडत नाही आणि शेवटी मी म्हटल्याप्रमाणे गुंतवणुक कुपन्स वा अशा किरकोळ हेतुने नसावीच. ह्या कुपन्स पासुन लाभ मिळवणे म्हणजे घासायला ट्कावयाच्या अगोदर दुघाच्या पातेल्यामधील राहिलीली साय खरवडुन खाणे ईतकेच.. तेही आनंददायी असते, वाद्च नाही पण तसे करायला मिलावे म्हणुन कोणी दुघ तापवत नाही. अर्थात हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे...

पगला गजोधर's picture

8 Apr 2016 - 9:34 pm | पगला गजोधर

और आंदो …

एस's picture

9 Apr 2016 - 2:01 am | एस

वाह उस्ताद, वाह!

श्री गावसेना प्रमुख's picture

9 Apr 2016 - 10:16 am | श्री गावसेना प्रमुख

उत्तम लेख!

काळा पहाड's picture

9 Apr 2016 - 2:13 pm | काळा पहाड

थोडासा बाळबोध प्रश्न आहे. इक्विटी स्मॉल कॅप म्युचुअल फंड न घेता ब्ल्यू चिप कंपन्यांचे डायरेक्ट शेअर घेण्यात काही वेगळे गणित आहे का? इक्विटी स्मॉल कॅप साधारण पणे १८% रिटर्न्स देतात असं मानलं जातं. त्याला ब्ल्यू चिप चे शेअर्स मात करू शकतात का?

प्रसाद भागवत's picture

9 Apr 2016 - 3:59 pm | प्रसाद भागवत

खरेतर नाही. उलट मी म्युच्युअल फंडस मधे करावयाच्या गुंतवणुकीला प्राधान्य देइन.

काळा पहाड's picture

9 Apr 2016 - 5:18 pm | काळा पहाड

धन्यवाद.

श्री गावसेना प्रमुख's picture

9 Apr 2016 - 6:01 pm | श्री गावसेना प्रमुख

भागवत राव जर एखाद्या नावाजलेल्या कंपनीचे शेअर जर 10/15 % खाली आलेले असतील तर घेण्यात काहीच हरकत नसावी कि नाही,जसे जानेवारीला टाटा मोटार च्या शेअर ची किंमत बहुतेक 280 च्या आसपास होती जी कि 52 आठवडे सर्वात कमी अशी होती ती आता 370 च्या आसपास आहे ।
साधारण 1 महिन्यापूर्वी अशोक लेलँड च्या शेअर ची किंमत(दीड वर्षात 40 ते 110) 90 ते 97/98 च्या आसपास घुटमळत होती आणि बाकीचे cnbc चे आमंत्रित तज्ञ 67 च टार्गेट देत होते आणि लेलँड ने चौकाने वाली पारी खेळून 110 टार्गेट पूर्ण केलं ,त्यामुळे फंडापेक्षा अग्रेसीव ट्रेडिंग केलं तर फायदा असतोच ।

प्रसाद भागवत's picture

9 Apr 2016 - 8:51 pm | प्रसाद भागवत

गासेप्र साहेब, 52 आठवड्यांतील सर्वांत कमी भाव असताना वा खुप खाली आला आहे या एकमेव निकषावर एखादा शेअर घेणे म्हणजे नफ्याची हमी असे नव्हे. या बाबत अनेक सांख्यिकी अभ्यास झाले आहेत, मी ही एका जुन्या लेखांत याचा उहापोह केला आहे.

हमखास फायदेशीर ठरेल अशी कोणतीही व्युहरचना कोणासही ठावुक नाही म्हणुन तर बाजार चालु आहे. लीळाचरित्रांतील हत्ती म्हणजे बाजार आणि आपण त्या कथेतील आंधळे...सबब कोण चुक , कोण बरोबर ठरविणे कठीण पण माझा अनुभव आपल्याशी मिळता जुळता नाही

@डॉक्टर खरे साहेब, राग मानु नका पण माझ्या जवळपास प्रत्येक लेखांच्या प्रतिक्रियेत आपला वैधानिक ईशारेवजा '...अशा धंद्यात मध्यमवर्गीय मराठी माणसाने पडू नये असेच मी तरी सुचवेन.'.... हा सुर वाचुन आता माझी करमणुक होते. एकच प्रतिक्रिया/वेगवेगळे लेख हे कॉम्बिनेशन पाहुन मला 'डर्टी पिक्चर' सिनेमातील विद्या बालनच्या तोंडी असलेला '.... पर क्या आपने कभी एक ही लडकीसे ५०० बार ट्युनिंग की है??' हा डायलॉग आठवतो.

सुबोध खरे's picture

10 Apr 2016 - 11:17 pm | सुबोध खरे

भागवत साहेब
आपली गल्लत होते आहे. मी सट्टा खेळू नका असेच म्हणतो. गुंतवणूकदार(investor) जरूर व्हा. सटोडिया/ दलाल(trader) नको.
आपल्याला कोणत्या प्रतिक्रियेत असा सूर आढळला ते कृपा करून दाखवाल काय?
लोकांच्या "टीप" वर समभाग घेऊ नका एक तर स्वतः अभ्यास करा किंवा चांगल्या सल्लागाराची मदत घ्या.
उगाच चहापानाच्या गप्पा ऐकून आपले अमुल्य धन मातीमोल करू नका असेच माझे म्हणणे आहे. .

प्रसाद भागवत's picture

11 Apr 2016 - 9:29 am | प्रसाद भागवत

धन्यवाद. आपल्या या विचारंशी मीही सहमत आहे. मात्र मी माझ्या प्रत्येक लेखांतुन केवळ दीर्घ कालीन गुंतवणुकीबद्दलच लिहिले आहे असे असतानाही अनेक ठिकाणी मुळ लेखाच्या भुमिकेशी विसंगत उमटणारे सुर अनेक ठिकाणी पहायला मिळतील. शक्य आहे कदाचित ते मुळ लेखापेक्षाही विषिष्ट अशा प्रतिक्रियेसंद्र्भात असतील.ते कधीकधी अनावश्यक्पणेही असतात हे खरेच आहे..

फंडापेक्षा अग्रेसीव ट्रेडिंग केलं तर फायदा असतोच ।
ट्रेडिंग हा एक सट्टा आहे. जितका धोका जास्त तितका परतावा जास्त हि वस्तुस्थिती असली तरी अशा सट्ट्यात पूर्णपणे धुतले जाण्याची पण शक्यता असते. हा फावल्यावेळात करण्याचा उद्योग नसून पूर्ण अभ्यासानंतर नक्की जोखीम पत्करण्याची तयारी असेल तर यात उतरावे. अन्यथा. सहा महिन्यात मिळवलेले पैसे एका तासात घालवून रिकामे झालेले लोकही मी पाहिलेले आहेत.
चुकीच्या बातमीमुळे पडलेला समभाग विकत घेऊन त्याच दिवशी विकून दोन तासात दीड हजार नक्त नफा मी सुद्धा कमावलेला आहे. परंतु असे काही झाले नसते तरीही ते समभाग मी पुढचे ५ वर्ष स्वतः कडे ठेवण्याच्या तयारीनेच विकत घेतलेले होते. पण अशा धंद्यात मध्यमवर्गीय मराठी माणसाने पडू नये असेच मी तरी सुचवेन.

भंकस बाबा's picture

9 Apr 2016 - 6:41 pm | भंकस बाबा

यस सर , मी पण नेमके हेच करतो, यासाठी मी रूरल इलेक्ट्रिक व् कोल् इंडिया निवडले आहेत. 52 आठवद्याच्या न्यूनतम किमतीला उपलब्ध आहेत. 100 घेतले तर दिवसाकाठि 2/3 रूपये जरी वर खाली गेला तर 200/300 रूपये फायदा देतात. नाहीतर डिलीवरी घ्यायची.
बनी तो बनी नहीं तो अब्दुल घनी!
सेक्युलरवाद्यांनो ही म्हणं आहे बर्र, नाहीतर परत इकडे युद्ध सुरु कराल!

श्री गावसेना प्रमुख's picture

9 Apr 2016 - 7:02 pm | श्री गावसेना प्रमुख

सध्या बाटा, पॉवर ग्रीड ,लेलँड,icici बँक ,टाटा मोटार ,लार्सन,natco फार्मा, एवरेडी ,सिंटेक्स हे आहेत ।पुढील एका वर्षात सर्व मिळून 20/30% नफा मिळू शकतो पावसाळा चांगला झाला तर।
....चांगल्या कंपनीत जर पैसे टाकले तर ते बुडण्याची शक्यता कमीत कमी असते,आपण जरी 10 20 शेअर चे मालक असलो तरी मोठ्या संख्येने भागधारक असलेले जाब विचारतात,त्यामुळे चांगली कामगिरी करण्याचा त्यांच्यावर दबाव असतो।
Asian paints ने मागे फार्मात असलेली डेकोरेटीव कंपनी विकत घेतली ह्यांनी विकत घेतल्यानंतर ती तोट्यात आली(आली नाही ह्यांनी आणली)दोन तीन वर्ष ती कंपनी तोट्यात चालेल आणि अचानक एखाद्या वर्षी ती फायद्यात येईल आणि तो पर्यंत सर्व सामान्य भागधारक मिळेल त्या किमतीला विकून मोकळे होतील आणि हे फायद्यात आल्यावर ते शेअर चढ्या भावाने विकून गब्बर होणार त्यामुळे जर एखाद्या चांगल्या कंपनीचे शेअर उतरले तर ते न विकता अजून संख्या वाढवावी म्हणजे प्रॉफिट मध्ये आल्यावर आपल्यालाही फायदा होईल। हे वरचे उदाहरण खरे असले तरी उदाहरणच समजावे

ज्ञानव's picture

17 Jul 2016 - 11:06 am | ज्ञानव

सट्टा म्हणजे काय?? मला वैद्यकीय क्षेत्रातले काहीही कळत नसताना मी सर्रास जर सर्दी पडश्यापासून सांधे दुखी पर्यंत सगळ्यावर औषधे सुचवत असेन आणि ती एखादा माणूस माझ्यावर विश्वास ठेऊन घेत असेल तर तो माणूस सट्टा खेळतोय असे म्हणता येईल का ? पण जर तेच एखाद्या निष्णात डॉक्टरांनी सांगितले म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेऊन तो औषध घेत असेल तर तो हि सट्टाच आहे का ? कारण माझ्यासारख्याचे चुकले तर मी काही डॉक्टर नाहीच असे मी म्हणू शकतो पण एखाद्या डॉक्टरांनी चुकीचे निदान करून चुकीची औषधे दिली तर काय ? मुळात जर माहितीविना केलेला धंदा हा स्वतःसाठी आणि इतरांना सल्ले दिल्यास इतरांनाही तो एक सट्टाच ठरतो. सहा महिन्यात मिळवलेले पैसे एका तासात घालवून रिकामे झालेले लोक पाहिलेले असून हि तुम्ही शेअर मार्केट मध्ये काहीतरी करता आहात ते काय ? जर ती पंचवार्षिक गुंतवणूक दोन तासात आपल्या बाजूने निर्णय न झाल्यास गुंतवणूक म्हणून कन्वर्ट केली अशी असेत तर तो एक दीर्घ कालीन सट्टाच नाही का ? चुकीच्या बातमीमुळे पडलेला समभाग विकत घेऊन त्याच दिवशी विकून दोन तासात दीड हजार नफा तुम्ही क्मावालात म्हणजे तुम्हला सट्टा धार्जिणा आहे असा निकष काढून तुम्ही सट्टा खेळा असे सांगणारे महाभाग मार्केट मध्ये बर्यापैकी आहेत. तर तुम्हाला सट्टयाचा अनुभव किती आहे ? मध्यमवर्गीय माणसाने अशा धंद्यात पडूच नये तर का पडू नये ?

स्नेधा's picture

9 Apr 2016 - 11:04 pm | स्नेधा

भागवत साहेब,
आपले शेअर मार्केट विषयीचे इत्तर भाग वाचण्यासाठी आपण लिंक या भागाबरोबर दिली तर बरे होइल. आपले लेख वाचनीय असता :)

तुषार काळभोर's picture

10 Apr 2016 - 6:37 am | तुषार काळभोर

इथे प्रसाद भागवत यांचे सर्व लेख आहेत, ज्यातील बहुतेक सर्व अर्थव्यवस्था/गुंतवणूक्/शेअरबाजाराविषयी आहेत.

प्रसाद भागवत's picture

11 Apr 2016 - 9:20 am | प्रसाद भागवत

पैलवान साहेब.. मनःपुर्वक धन्यवाद. मला कदाचित हे जमले नसते.

प्रसाद भागवत's picture

11 Apr 2016 - 9:40 am | प्रसाद भागवत

धन्यवाद. वाचुन साधक बाधक प्रतिक्रिया अवश्य द्यावी.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Apr 2016 - 11:58 pm | निनाद मुक्काम प...

मान्सून चांगला झाला तर शेअर बाजार तेजीत येतो हे अनेकांच्या तोंडून ऐकले आहे.
ह्यामागील तार्किक काय आहे जर जाणून घ्यायला आवडेल भागवत साहेब ,
विषय मोठा असेल तर वेगळा धागा काढा
पण मान्सून व शेअर बाजाराचे नाते समजावून सांगा

प्रसाद भागवत's picture

11 Apr 2016 - 9:39 am | प्रसाद भागवत

साहेब, आजही आपली अर्थव्यवस्था शेतीप्रधानच आहे, चांगला मान्सुन म्हणजे चांगली शेती, दुष्काळाची शक्यता कमी. याने ग्रामिण विभागांतील उपभोक्त्यांची क्रयशक्ती (purchasing power) वाढते ज्याचा उत्पादन क्षेत्राला मोठा फायदा होतो... अर्थव्यवस्थेची स्थिती घड्याळांतील अनेक चक्रांप्रमाणे असते, एकांत एक अडकलेली, एकाला गती मिळाली की बाकीचीही फिरु लागतात..उदा. उत्तम पीकपाणी,ग्रमिण भागाताल लोकांची क्रयशक्ती वाढते, वस्तुंव्ही मागणी वाढते, जास्त औद्योगिक उत्पादन, शेतीमालाला अधिक चांगला भाव... उत्तम मान्सुन हा अशी गती देणारी किल्ली ठरु शकतो. म्हणन त्याचे महत्व.

सुबोध खरे's picture

11 Apr 2016 - 10:52 am | सुबोध खरे

मॉन्सून चांगला झाला तर ताबडतोबीने बियाणे ( उदा मोन्सान्तो, कावेरी सीड्स), खते(झुआरी फर्टीलायझर) , कीटक नाशके ( रैलिस इंडिया), जैन इरिगेशन, फिनोलेक्स, महिंद्र tractors अशा कंपन्यान्चे समभाग तेजीत येतात.
जशी पिके हातात येतात तसे शेतकऱ्यांचा हातात पैसा खेळू लागला कि त्यांना खरेदी करावीशी वाटू लागते. मग सोने (टायटन) मोटार सायकल( हिरो, बजाज) घराचा रंग ( एशियन पेंट्स कन्साई नेरोलैक). इ कंपन्यांचे समभाग वधारू लागतात. सुगी किंवा दिवाळी नंतर लग्नाचा मोसम चालू झाला कि कापड बाजाराला तेजी येते आणि जसे या कंपन्यांचे नफे वाढतात तसे त्यांच्या कर्मचार्यांचे पगार वाढतात असा cascading effect सर्व अर्थव्यवस्थेवर येतो.
यासाठी मॉन्सून चांगला झाला कि कोणत्या कंपन्या तेजीत येणार आहेत हे हेरून त्यात गुंतवणूक केली असतान चांगला नफा मिळू शकतो.

प्रसाद भागवत's picture

11 Apr 2016 - 10:59 am | प्रसाद भागवत

मोटार सायकल... बाकी सहमत फक्त थोडीशी भर..यात सर्वाधिक लक्षवेधी नाव एन्फिल्ड बुलेट्वाल्या Eicher Motors चे आहे याची नोंद घ्यावी

भंकस बाबा's picture

11 Apr 2016 - 6:59 pm | भंकस बाबा

पण चांगल्या मॉनसूनच्या भाकिताने वा चाहुलीने fmcg सेक्टर धावु लागते हे पण तितकेच खरे.
ग्रामीण जनतेवर या सेक्टरचा चांगलाच प्रभाव असतो.
यंदा एलईडी बल्ब बनवण्यार्या कंपन्या तेजीत असतील.
थोडा जास्त पैसा हातात असला की लोक पैसे वाचवन्यासाठी थोड़े जास्त पैसे खर्च करतील.
हां माझा अंदाज आहे साहेब, बाकी भागवत साहेब आहेत मार्गदर्शन करण्यासाठी.

प्रसाद भागवत's picture

11 Apr 2016 - 8:30 pm | प्रसाद भागवत

मार्गद्र्शन वगैरे शब्दांची मला भीती वाटते हो, आणि तसेही हल्ली 'साहेब' लोकांपेक्षा 'बाबा' लोकांचे मार्गदर्शन जास्त प्रभावी ठरते.. असो. हलके घ्या. धन्यवाद.

प्रसाद भागवत's picture

21 Apr 2016 - 10:17 am | प्रसाद भागवत

समजा, तुम्ही एका मिट्ट अंधार असलेल्या खोलीत गेला जेथे एक उदबत्ती, समई, मेणबत्ती कंदील, माचिस आणि पेट्रोमॅक्स ठेवले आहे तर तुम्ही सर्वात आधी काय पेटवाल??... आपल्या लहानपणी मुलांना हे कोडे घातले जात असे, आपण सर्वच आता मोठे झालो असल्याने कोड्याचे उत्तर सांगण्यांत मी वेळ घालवत नाही....

आता मला सांगा..जर मान्सून चांगला झाला तर सामान्यतः शेअर बाजार तेजीत येतो..कारण चांगला मान्सुन म्हणजे चांगली शेती, मुबलक पीकपाणी.. याने ग्रामिण विभागांतील उपभोक्त्यांची क्रयशक्ती (purchasing power) वाढते ज्यामुळे ऑटॉ/FMCG क्षेत्राला मोठा फायदा होतो आणि गाड्या, टीव्ही, फ्रिज, ए.सी यांच्यासारख्या चैनीच्या वस्तुंची विक्री वाढते.

हे जर खरे आहे, तर मग आपण कोणते शेअर्स घ्यावे ??

माझ तर्क असा की ज्याप्रमाणे कोणताही दिवा पेटवायला पुर्वी माचिस लागत असे, तसे कोणतेही उपकरण चालवायला आधी वीज हवी आणि गाडी चालवायला टायर्स (पेट्रोल हा उत्पादन आपल्याकडे होत नसल्याने वेगळा विषय आहे)...

म्हणुनच पोवर ग्रीड, ॲप्कोटेक्स यांच्यासारखे शेअर्स या आधुनिक कोड्याचे उत्तर असु शकते.... तुम्हाला काय वाटते?? -प्रसाद भागवत

सुबोध खरे's picture

21 Apr 2016 - 10:38 am | सुबोध खरे

यात एक खोच आहे.
सध्या भारतात अतिरिक्त उर्जा/ वीज उपलब्ध आहे त्यामुळे जोवर औद्योगिक उत्पादन तितके वाढत नाही तोवर या उद्योगाला तितकी चालना मिळणार नाही.
http://articles.economictimes.indiatimes.com/2015-08-26/news/65886756_1_...
तसेच पेट्रोलीयमचे भाव कमी असल्याने जगात इतर ठिकाणी मंदी आहे त्यामुळे तेथे असलेल्या टायर उत्पादकांच्या अतिरिक्त क्षमतेमुळे आयात टायर स्वस्त झाले आहेत. टायर उत्पादकांनी सरकारला मागच्या वर्षीच आयात टायर वर २० % आयात करा लावण्याची विनंती केली होती. परंतु अजून तसे झालेलं नाही. आयात कर १० % होता. उरलेला १० टक्के हा नफ्याचा एक मोठा हिस्सा आहे त्यामुळे भारतीय टायर उत्पादक आजही खूप मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकतील असे वाटत नाही.
http://auto.economictimes.indiatimes.com/news/tyres/increase-duty-on-fin...
http://www.business-standard.com/article/economy-policy/atma-urges-govt-...
तेंव्हा या क्षेत्रात गुंतवणूक करताना त्यातील वेचक समभागात गुंतवणूक करावी असेच मी सुचवेन.

प्रसाद भागवत's picture

21 Apr 2016 - 10:49 am | प्रसाद भागवत

डॉक्टर्साहेब, आपण म्हणता त्या पलिकडेही जाणारी गणिते बाजारांत मांडली जातात त्यामुळे आपल्या दुव्यांवरही खुप विसंबुन रहाता येणार नाही, पण तरीही '... त्यातील वेचक समभागात गुंतवणूक करावी या मताशी मी सहमत आहे. ...तसेही माझ्या ह्या प्रतिक्रियेचा उद्देश कोणतीही टीप देणे हा नसुन गुंतवणुकदारांचा तर्क विकसित करणे एवढ्यापुरताच मर्यादित आहे..

सुबोध खरे's picture

21 Apr 2016 - 12:06 pm | सुबोध खरे

भागवत साहेब
दुवांवर विसंबून राहता येणार नाहीहे खरे असले तरीही दोन्ही दुवे बाजाराशी निगडीत अशा "महत्त्वाच्या वृत्तपत्रांचे" आहेत.
त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे माझी स्वतःची या क्षेत्रातील गुंतवणूक आज अडकून पडलेली आहे. भारताची अर्थव्यवस्थेच्या प्रगतीची अशा दाखवून पायाभूत सुविधात मोठी गुंतवणूक करा अशा घोषणा २००९-१० मध्ये यू पी ए सरकारने केल्या होत्या त्या वर विश्वास ठेवून गुंतवलेला पैसा आजही तेथेच अडकून आहे.
मुद्दल सुटले तरी नशीब अशी परिस्थिती इतरांची होऊ नये या हेतूने मी वरील माहिती लिहिली आहे.

प्रसाद भागवत's picture

21 Apr 2016 - 3:35 pm | प्रसाद भागवत

कालचीच अगदी ताजी गोष्ट सांगतो...

जगांतील सर्वांत मोठ्या ईन्व्हेस्ट्मेंट्स व बॅंकिंग कंपन्यांपैकी एक समजल्या जाणार्या गोल्ड्मन सॅच्झ या कंपनीचे तिमाही निकाल लागले आणि हे निकाल गेल्या 12 वर्षांच्या काळातील सर्वाधिक विदारक तिमाही निकाल होते. उदा. त्यांच्या equity securities business' या काही शे कोटी डॉल्रर्स नफा मिळविणात्या शाखेची कमाई 'शुन्य' होती. 'Investing & Lending या शाखेचा महसुल 95% घटला... investment-banking या विभागांत 23%, financial advisory या विभागांत 20%, underwriting धंद्यांत 27% घट नोंदविली गेली. दिवसाच्या सुरवातीस ही नफ्याची आकडेवारी जाहिर झाली आणि मग दिवसाअखेर....

गोल्ड्मन सॅच्झचा शेअर जानेवारीनंतरच्या आपल्या सर्वाधिक पातळीवर 2.28% वर बंद झाला.

बाजार बातम्या,आकडेवारी, विष्लेषकांची मते या पलिकडे जावुन वागतो असे मी म्हणतो ते हेच..- प्रसाद भागवत

भंकस बाबा's picture

21 Apr 2016 - 6:41 pm | भंकस बाबा

आपण या क्षेत्रातिल चांगलेच जाणकार आहात. मुख्य म्हणजे तुमचा व्यवहार या क्षेत्रात होत असतो. त्यामुळे तुमच्या मताला एक वेगळीच किमंत प्राप्त होते.
तुमच्या गोल्डमैन सैशच्या निरीक्षणा बद्दल, मला यात काहीच आश्चर्यकारक वाटत नाही आहे. जो नफा नाही झाला आहे त्यासाठी मार्केट आधीच तयार होते असे दिसते. शेयर मार्केट नेहमी पुढचा विचार करते. म्हणजे जसे सामान्य गुंतवणूकदार कंपनीचा रिजल्ट तपासतो तसे मार्केट कधीच करत नाही. कंपनी पुढे भविष्यात काय करणार आहे याचा आढावा मार्केट घेते. गोल्डमैन्सचा भूतकाल घाबरवणारा असला तरी भविष्य आश्वासक वाटत आहे असा आढावा त्यातून निघत असेल. आता मार्केट वर जात असून देखिल सुस्तावलेल्या सरकारी कंपन्या कदाचित् सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदीमुळे धास्तावल्या असतील पण नंतर त्या पण या रैलीत सहभागी होणारच आहेत.
रच्याकने हे माझे वैयक्तिक मत आहे, त्यामुळे गंभीरपणे घेऊ नये

प्रसाद भागवत's picture

21 Apr 2016 - 11:14 pm | प्रसाद भागवत

बाबाश्री, '... आपण या क्षेत्रातिल चांगलेच जाणकार आहात' हे सुरवातीचे वाक्य वगळता आपल्या आशयाशी सहमत आहे..धन्यवाद

प्रसाद भागवत's picture

21 Apr 2016 - 3:38 pm | प्रसाद भागवत

कालचीच अगदी ताजी गोष्ट सांगतो...

जगांतील सर्वांत मोठ्या ईन्व्हेस्ट्मेंट्स व बॅंकिंग कंपन्यांपैकी एक समजल्या जाणार्या गोल्ड्मन सॅच्झ या कंपनीचे तिमाही निकाल लागले आणि हे निकाल गेल्या 12 वर्षांच्या काळातील सर्वाधिक विदारक तिमाही निकाल होते. उदा. त्यांच्या equity securities business' या काही शे कोटी डॉल्रर्स नफा मिळविणात्या शाखेची कमाई 'शुन्य' होती. 'Investing & Lending या शाखेचा महसुल 95% घटला... investment-banking या विभागांत 23%, financial advisory या विभागांत 20%, underwriting धंद्यांत 27% घट नोंदविली गेली. दिवसाच्या सुरवातीस ही नफ्याची आकडेवारी जाहिर झाली आणि मग दिवसाअखेर....

गोल्ड्मन सॅच्झचा शेअर जानेवारीनंतरच्या आपल्या सर्वाधिक पातळीवर 2.28% वर बंद झाला.

बाजार बातम्या,आकडेवारी, विष्लेषकांची मते या पलिकडे जावुन वागतो असे मी म्हणतो ते हेच..- प्रसाद भागवत

प्रसाद भागवत's picture

6 Oct 2016 - 4:08 pm | प्रसाद भागवत

मी एप्रिलमधे मान्सुन्चा बाजारावरील परिणाम या विषयी केलेल्या पोस्ट्मधे टायर्स कंपन्याचे शेअर्स घेणेसंबंधी सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती.. तेंहा त्यावर येथे नेहमीप्र्माणे साधक/बाधक चर्चाही झाली.

सांगावयाचे हे की गेल्या ४/५ महिन्यांत जवळ जवळ सर्व प्रमुख टाय्र्स कंपन्यांनी ३०% पेक्षा अधिक परतावा दिला आहे..मी कालच माझ्याजवळील ६०% शेअर्स विकुन माझे मुद्दल जवळ्पास परत मिळवले.

लिंक दिल्याबद्दल धन्यवाद :)

नीलमोहर's picture

11 Apr 2016 - 10:28 pm | नीलमोहर

उत्तम लेख आणि माहितीपूर्ण प्रतिसाद,
धन्यवाद.

विवेक्पूजा's picture

12 Apr 2016 - 4:45 pm | विवेक्पूजा

उत्तम लेख.

धन्यवाद साहेब.

प्रसाद भागवत's picture

20 Apr 2016 - 8:48 pm | प्रसाद भागवत

माझ्या सततच्या शेअरबाजाराशी संबंधीत (बोअरिंग??) पोस्ट्स वाचुन कंटाळलेल्यांसाठी हा खास वेगळा पोस्ट..... बॅकेत करावयाच्या गुंतवणुकीविषयी.

IDBI बॅंकेने आवर्ती स्वरुपाचे (Perpetual) बॉड्स विक्रीला आणले आहेत. हे विकत घेणाऱ्या बॉड्धारकास प्रतिवर्षी 10.75% दराने वार्षिक स्वरुपात 'परतावा' (व्याज नव्हे) मिळेल...एका बॉड्ची किंमत १० लाख रुपये आहे.

व्याज देणे हे कोणत्याही स्थितीत बंधनकारक असते, मात्र 'परतावा' हा बॅकेला होणार्या नफ्यावर अवलंबुन असतो व बेंकेस तोटा झाल्यास बॅंकवर तो देणे सक्तीचे नाही हा महत्वाचा फरक येथे लक्षांत ठेवावयास हवा. (त्याच वेळी IDBI बॅंक ही एक सरकारी बेंक असुन भारत सरकार व L.I.C यांचा हिस्सा 88% पेक्षा अधिक आहे ही गोष्ट निर्णायक ठरु शकते.)

सदर बोंडस हे केवळ डी-मॅट प्रकारातच मिळणार असुन बॉड्धारक ऑनलाईन पद्धतीने ते केंव्हाही विकु शकतील, उलट बॅकेस मात्र किमान 10 वर्षे ह्यांची परतफेड करता येणार नाही ही ही गुंतवणुकदारांच्या दृष्टिने फायदेशीर बाब आहे.

दिवसेंदिवस कमी होत जाणाऱ्या व्याजदरांच्या काळात किमान 10 वर्षे प्रतिवर्षी 10.75% दराने 'परतावा' मिळण्याची संधी यातुन मिळणार आहे..

थोडक्यांत दीर्घ काळाकरिता प्रचलित व्याजदरापेक्षा अधिक परतावा आश्वसित करणारी एका राष्ट्रीयकृत बेंकेकडुन सादर झालेली, आणि म्हणुनच 'कमी' जोखमीची अशी ही योजना आहे. योजना खुपच छोटी आणि मर्यादित काळाकरिताच आहे.

आपणा कोणास या योजनेंत रस असल्यास साधक बाधक चर्चेकरिता व अन्य मदतीकरिता अवश्य संपर्क करा..

एक बॉण्ड जर दहा लाखांचा असेल तर लहान गुंतवणूकदारांना यात गुंतवणूक करणे अवघडच जाईल असे वाटते.

प्रसाद भागवत's picture

21 Apr 2016 - 9:23 am | प्रसाद भागवत

येस बॉस. सहमत. पण हे असेच आहे..काय करणार ??

रिस्क रिटर्न्स पहाता ही योजना अजिबात व्यवहार्य नाही असे मला वाटते. आयडीबीआय बँकेने मल्या ला तब्बल ९५० कोटी रुपये कर्ज दिलेले आहे. आणि त्यांना २०१८ पर्यंत बॅसेल कंप्लायंट व्हायचे आहे. या दोन्ही गोष्टी साठी (राईट ऑफ आणि कंप्लायन्स) पैसा लागणार आहे. हा पैसा बुडीत खाती आहे. म्हणजे हा पैसा बँकेच्या फायद्यासाठी वापरला जाणार नाही. परपेच्युअल बाँड हा एक प्रकारे इक्विटीच असतो. त्यामुळे त्यांच्यावर डिव्हीडंड देण्याचं बंधन नाही. जास्तीत जास्त रिटर्न्स १०.७५%. कमीत कमी ०%. जितका पैसा लावावा लागतो तो पहाता (आणि बँकेची सध्याची स्थिती पहाता) बँक किती पैसे उभे करू शकेल याबद्दल शंका वाटते.
हा पूर्वीचा अनुभवः Perpetual bonds fail to woo investors: http://www.business-standard.com/article/finance/perpetual-bonds-fail-to...

प्रसाद भागवत's picture

21 Apr 2016 - 6:31 pm | प्रसाद भागवत

पहाड्साहेब,होय.आपण व्यक्त केलेल्या शंका ह्या योग्य आहेत आणि असा अभ्यास वा विचार हा प्रत्येकानेच करावयास हवा. मी ही माझ्या प्रतिक्रियेत हे व्याज नाही असे स्पष्टच सांगितले आहे, यात 'कमी' जोखीम आहे असेच निरिक्षण नोंदविले आहे..

आपण म्ह्णता ते सर्व घटक विचारंत घेवुनही या ईश्शुला क्रिसिलने 'A' (म्ह्णजे समाधानकारक) पतदर्जा दिला आहे. बॅंकेकडे ५००० कोटींचा रेवेन्यु रिझर्व्ह आहे, सरकारचा बॅंकेला भक्कम पाठिंबा आहे आणि एकुणातच स्थिती नियंत्रणाच्या पलिकडे आहे असे दिसत नाही. बाकी मल्य्या हा खरेतर बॅकापेक्षा मिडियाच्या चरितार्थाचा विषय अधिक बनला अहे.

या प्रकारच्या बॉड्स घेण्यामागे दुसरी व्यहरचना म्ह्णजे सतत खाली येणारा Gsec yield पहाता योग्य वेळी भांडवली नफा पदरांत पाडणे..मान्सुन्च्या बहुप्रतिकक्षीत आगमनानंतर आक्रमकपणे वा सतत दोन तीनदा व्याजदर कपात झाल्यास अशी संधी मिळु शकेल..

अर्थात ही माझी भुमिका झाली जी मी अभ्यासाच्या दृष्टिकोनांतुन मांडली आहे. ही हे बॉडस विकत घेण्याची शिफारस समजु नये अथवा हा व्यवहार फायदेशीर होईलच याची हमीही मानु नये हे ओघाने आलेच

सरकारचा बॅंकेला भक्कम पाठिंबा आहे आणि एकुणातच स्थिती नियंत्रणाच्या पलिकडे आहे असे दिसत नाही

The government currently owns 76.5% of IDBI Bank. IDBI Bank is governed by the IDBI Act and the government can lower its stake without having to approach Parliament. That's in contrast with the position at other state-run banks, where the government has committed to retain a 52% holding at least.
याचा अर्थ या बँकेचे सरकारी भाग भांडवल ५० % च्याही खाली येऊ शकते आणी बँकेचे नियंत्रण खाजगी आस्थापनाच्या हातात जाऊ शकते.अशा स्थितीत हे रोखे "बुडीत" जाऊ शकतात किंवा मुदतपूर्व निकाली निघू शकतात किंवा म्हणाले आहेत तितका नफाही देऊ शकतात. थोडक्यात हे रोखे इतर सरकारी रोख्यान्सारखे सुरक्षित आहेत असे म्हणता येत नाही.
पहा
IDBI bank may be merged with private lender

प्रसाद भागवत's picture

21 Apr 2016 - 11:12 pm | प्रसाद भागवत

डॉक्टर साहेब, शेकड्यानी कायद्यांचे प्राबल्य असलेल्या या देशात त्यातील प्रत्येकाची अंमलबजावणी होईल अशा अंदाजाने वागलेच पाहिजे असे नाही, अशा कुठल्याश्या कायद्यातील एखाद्या कलमाकडॅ बोट दाखविताना आणि त्याची संभाव्यता, वास्तविकता महत्वाची.

सध्याची स्थिती अशी आहे की मध्यंतरी या बॅकेत सरकारने 2229 कोटी रुपयाचा भांडवल पुनर्भरणा केला जो देशांतील SBI व BOI वगळता तिसर्या क्रमांकाचा अहे. सरकारी पाठबळ आहे असे मी म्ह्णतो त्याचा अर्थ हा आहे. तेंव्हा भविष्यात काय होईल ते होवो, आज तरी सरकारचा मनोदय या बॅकेची भांडवल पर्याप्तता वाढविणे, तिचे भाडवल उभारणे हीच आहे.

आणि पुढे जावुन महत्वाचे म्हणजे खासगीकरणाची शक्यता मानलीही तरी ६५ लाख खातेदार असलेल्या बॅकेचे हस्तांतरण एखाद्या कमकुवत वा बुडित खाती जावु शकणार्या बॅकेकडॅ सरकार करेल हा आणखी एक अतिश्योक्तीपुर्ण निराशावाद आहे. खरेतर खासगीकरण झालेच तर उत्तम अशी स्थिती आहे, युनिट ट्रस्ट बद्दल आपण ते अनुभवतोच आहोत..

बाकी हे रोखे सरकारी रोख्यांईतके सुरक्षित नाहीत असा निष्कर्ष काढणे यात नविन ते काय ?? यातील धोक्यांची चर्चा आधी झालीच आहे की...

ज्ञानव's picture

17 Jul 2016 - 11:25 am | ज्ञानव

आठवण अशी कि युनाटेड वेस्टर्न बँक रातोरात(खरे तर दुपारी दुपारी ३.३० नंतर) बुडाली आणि त्याच्या भाव १२ रुपयापर्यंत आला मी ५००० शेअर्स घेतले डीलरने वेड्यात काढले भाव १० रुपयांच्या खाली गेला मी आणखीन ५००० शेअर्स घेतले डीलर म्हणाला "क्यो गुप्त दान कर राहे हो यार मेरा पैसा इसमे अटका है मेरेको हि देदो वैसेभी डूबा हि रहे हो " २००६ची गोष्ट असावी. ७० करोड नेट वर्थ (आणि माझे खाते असलेली उत्तम स्टाफ असलेली माझी जिव्हाळ्याची बँक )असलेली बँक बुडली हे खरेच वाटेना
काही दिवसात म्हणजे अगदी थोड्या दिवसात आय डी बी आय ने ती बँक विकत घेण्याचे ठरले त्या पोटी तिला १५० करोड युनाटेड वेस्टर्न ला देणे बंधन कारक आहे हेहि छापून आले आणि भाव ३२ रुपये झाला. आता हा सट्टा आहे कि ट्रेडिंग ते ज्याने त्याने पाहावे पण मी आणि माझे काही निवडक क्लायंट अक्षरशः मालामाल झालो होतो.

हे आपले सहज आठवले म्हणून

शाम भागवत's picture

17 Jul 2016 - 10:41 pm | शाम भागवत

त्यादिवशी तो शेअर ७ पर्यंत खाली आला होता व १४ ला बंद झाला होता. खरेच चांगली बँक होती ती. कर्मचारीपण चांगले होते. सुंदर सेवा. "आपुलकीने वागणारी" ही निव्वळ जाहीरातीची टॅग लाईन नव्हती तर ते वास्तव होते. हम्म. जाऊदे. न बोलणेच बरे.

स्वीट टॉकर's picture

9 May 2016 - 12:08 pm | स्वीट टॉकर

मी संपूर्‍णपणे म्यूचुअल फंडांच्या स्टेपल डायटवर असूनही तुमचे लेख वाचायला मजा येते. माहिती तर भरपूर असतेच, लिहिता ही खुसखुशीत.

प्रसाद भागवत's picture

9 May 2016 - 1:03 pm | प्रसाद भागवत

धन्यवाद..

वेदांत's picture

31 May 2016 - 12:48 pm | वेदांत

कॅस्ट्रॉल (ई) बद्द्ल काय मत आहे ?

प्रसाद भागवत's picture

31 May 2016 - 1:04 pm | प्रसाद भागवत

सर्वाधिक वेळा बोनस देणारी आनि शेअरहोल्डर्सचे भले करणारी ही एक अतियय उत्तम कंपनी आहे यात वादच नाही. पण बाजारात नेहमीच आवडी निवडी बदलतात, जुनी साम्राज्ये खालसा होतात, नवनवीन नायक उदयास येतात. येथे ही तसेच आहे. माझा या कंपनीविष्यीचा अभ्यास नाही पण तरीही BP, Shell सारख्या कंपन्यांचे परफोर्मन्स पहाता येथे निकटच्या काळात खुप काही सकारात्म्क घडेल अशी आशा करणे चुकीचे ठरेल..

वेदांत's picture

31 May 2016 - 1:56 pm | वेदांत

धन्यवाद.

वेदांत's picture

15 Jul 2016 - 11:18 am | वेदांत

टायटन ने दिड महिन्यात २०% रीटर्न दिलाय..

टवाळ कार्टा's picture

18 Jul 2016 - 11:17 am | टवाळ कार्टा

एक शंका...कदाचीत धाग्याच्या विषयानुरुप नसेल

समजा मी अ कंपनीचे १० शेअर्स रु.१० प्रत्येकी या हिशोबाने घेतले तर माझी गुंतवणूक = रु.१००
समजा ६ महिन्यांनी शेअर्सची किंमत प्रत्येकी रु.२० झाली आणि त्यावेळेस मी ५ शेअर्स विकले, तर माझे रु.१०० मुद्दल मला परत मिळेल...उरलेले ५ शेअर्स मी तसेच ठेवले...या केसमध्ये मला इंन्कम टॅक्स लागेल का? माझा फायदा/तोटा रु.० आहे

प्रसाद भागवत's picture

18 Jul 2016 - 12:58 pm | प्रसाद भागवत

लागेल..05 शेअर्सची एकुण ( विक्री -खरेदी) =नफा.. ज्यावर कर द्यायला लागेल.

टवाळ कार्टा's picture

18 Jul 2016 - 1:13 pm | टवाळ कार्टा

अच्छा...धन्यवाद

शाम भागवत's picture

18 Jul 2016 - 3:37 pm | शाम भागवत

खरेदी व मग विक्री यामधे १ वर्ष अथवा जास्त अंतर असेल तर कर नाही.

सिरुसेरि's picture

18 Jul 2016 - 11:40 am | सिरुसेरि

Sovereign Gold Bond Scheme कितपत फायदेशीर आहे ? त्यामध्ये लॉक इन पिरीयड आहे का ?

प्रसाद भागवत's picture

18 Jul 2016 - 1:04 pm | प्रसाद भागवत

व्यक्तीशः मी या योजनेत काही तशीच खास परिस्थिती असल्याशिवाय गुंतवणुक करावी या मताचा नाही.

प्रसाद भागवत's picture

21 Jul 2017 - 5:41 pm | प्रसाद भागवत

Y'day Wipro announced a share buyback of Rs 11,000 crore entailing 34.3 crore equity shares at *Rs 320* apiece

We would be buying wipro worth less than 2.00L for a buyback.

We think, there is a very good chance of a decent % of buyback.

Will prefer to buy around 280 to retain a good return.... At Rs. 280, the returns would be approx 14%, in 3 months.

*Importantly*,though I feel this a a very calculated move having a good favorable risk/reward ratio, anything mentioned in this post shouldn't be taken as *any kind of guarantee*

further, any such profit would attract short term capital gains .

Careful, if you own only recently issued bonus shares as they will be taxed heavily. - prasad Bhagwat