यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग तीन

यशवंतकुलकर्णी's picture
यशवंतकुलकर्णी in जनातलं, मनातलं
5 Oct 2010 - 3:46 pm

यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग दोन

आतापर्यंतचा युजींचा प्रवास रेखाटून झाल्यानंतर आणि या लेखमालेत “त्या स्फोटाचा” ओझरता का होईना पण संदर्भ आल्यानंतर युजी ज्याला कॅलॅमिटी:चक्रीवादळ म्हणतात ते नेमके काय हे पाहाणे मनोरंजक आहे. सुदैवाने युजींच्या या प्रवासाबद्दल मिनीट-टू-मिनीट नोंदी उपलब्ध आहेत, खुद्द युजींच्याच तोंडून नेमके काय आणि कसे घडले त्याचा वृत्तांत उपलब्ध आहे आणि आजही जिज्ञासूंना तो ऐकायला, वाचायला मिळतो
.

“मला कसे कळणार हीच ती स्थिती म्हणुन?” हा प्रश्न काही काळ शरीराच्या रोमरोमात भिनला, पेटून उठला आणि तो प्रश्नच युजींचे अस्तित्व बनून गरगरत राहिला, गरगरत राहिला आणि अचानक गायब झाला. युजींमध्ये निर्माण झालेल्या या मूलभूत प्रश्नाला कोणतेच उत्तर नव्हते किंवा ज्या स्थितीत ते खेचले गेले ती स्थितीच त्या प्रश्नाचे उत्तर आहे असे म्हणावे वाटते. उत्तरच नाहीय असे दिसल्यानंतर तो मूलभूत प्रश्न गायब होण्याची परिणिती शरीराच्या आत, बाहेर आणि एकूणच युजी म्हणून जी कुणी व्यक्ती होती तिचा मानवी इतिहासात कधीही कुणाचा झाला नाही अशा कायापालटात झाली. याबद्दल बोलताना म्हणतात युजी म्हणतात, “तो आत अचानक झालेला एक “स्फोट” होता ज्यामुळे शरीरातील प्रत्येक पेशी, प्रत्येक धमणी आणि प्रत्येक ग्रंथी त्या स्फोटात भाजून निघाली, भडकून उठली. या स्फोटासोबतच विचार सतत टिकून असतो, आत कुठेतरी केंद्र असते हा भ्रम नाहीसा झाला आणि विचारांची जोडाजोड करणारा “मी” त्यानंतर तिथे राहिला नाही.” युजी पुढे सांगतात:
त्यानंतर विचार टिकून राहून त्याची जुळणी होऊन तो उभा राहू शकत नव्हता. विचाराची जुळवाजुळव खंडीत होते, आणि एकदा ती तशी खंडीत झाली की खेळ, खलास! या एकाच वेळी विचाराचा स्फोट होतो असे नव्हे, तर त्यानंतर ज्या-ज्या वेळी विचार उमटतो, त्याचा स्फोट होऊन तो नाहीसा होतो. त्यामुळे हे सातत्य संपून जाते आणि विचार त्याच्या नैसर्गिक तालात पडतो.
तेव्हापासून, या घटनेपासून मला कसलेही प्रश्न पडत नाहीत, कारण प्रश्न तिथे राहूच शकत नाहीत. मला पडणारे सर्वसाधारण प्रश्न उदाहरणार्थ “हैदराबादला कसे जायला लागेल?” असल्या प्रकारचे साधेसुधे प्रश्न असतात जे जगात चालण्याबोलण्यासाठी, साध्यासुध्या कामासाठी आवश्यक असतात. आणि असल्या प्रश्नांना लोकांकडे उत्तरे असतात. पण त्या तसल्या प्रश्नांना (“आध्यात्मिक” किंवा “आधिभौतिक” ) कुणाकडेच, कुठलीही उत्तरे नसतात. त्यामुळे आता प्रश्न शिल्लक राहिले नाहीत.

डोक्यात असणारी प्रत्येक गोष्ट भयानकपणे ताणली गेली होती – दुसर्‍या कुठल्याच गोष्टीला तसूभरही वाव राहिला नव्हता. आयुष्यात पहिल्यांदाच मला सर्वकाही “खचाखच” भरून घट्ट झालेल्या माझ्या डोक्याची जाणीव झाली होती. या वासना (पूर्व संस्कार) किंवा तुम्हाला जे संबोधन योग्य वाटते ते घ्या, त्या काहीवेळा डोके वर काढू पाहातात, पण मेंदूतील पेशी एवढ्या “घट्ट” होतात की वासनांमध्ये गुंतण्याची संधीच मिळत नाही. दुभागणी (पूर्व संस्कार आणि विचारांच्या रूपातून झालेली) तिथे राहू शकत नाही. ते शारीरिकदृष्ट्या अशक्य आहे. त्यासाठी काहीही करावे लागत नाही. त्यामुळेच मी नेहमी म्हणत असतो की, हा “स्फोट” घडून येतो तेव्हा (मी हा शब्द वापरतो कारण ते अणुस्फोटासारखे असते), त्यातून प्रतिक्रियांची साखळी मागे सुटते. शरीरातील प्रत्येक पेशी, हाडाच्या कोषांची प्रत्येक पेशीला या “बदलातून” जावे लागते – मला ते शब्द वापरायचे नाहीत – पण हा एक कधीही न पुसला जाणारा बदल आहे, कसलीतरी अल्केमी आहे.
ते आण्विक स्फोटासारखेच असते. त्यातून संपूर्ण शरीर विखरून जाते. ती साधी गोष्ट नाही; तो माणसाचा शेवट असतो. त्या क्षणांतून जाताना मला भयंकर शारीरिक यातना झाल्या आहेत. तुम्ही तो स्फोट अनुभवू शकता असे नव्हे, तर फक्त त्याचे नंतरचे परिणाम भयानकपणे जाणवतात. या “कायापालटातून” शरीराचे पूर्ण रसायनशास्त्रच बदलते.
त्या (स्फोटा) नंतरचा परिणाम म्हणजे, आता इंद्रिये कोणत्याही समन्वयकाशिवाय किंवा केंद्राशिवाय संचालित होत आहेत – एवढेच मी सांगू शकतो. आणखी एक गोष्ट म्हणजे: शरीराचे रसायनशास्त्र बदललेय – मी सांगू शकतो की रसायनशास्त्रात या बदल घडल्याशिवाय, विचारापासून, विचाराच्या सातत्यापासून ही घडण मुक्त होण्याचा कोणताच मार्ग नाही. त्यामुळे, त्यावेळपासून विचाराचे सातत्य नसल्याने, काहीतरी घडलेय असे तुम्ही सहज सांगू शकता, पण खरंच, तंतोतंत काय घडलेय, ते अनुभवण्याचा मला कोणताच वाव नाही.
ही गोष्ट मला अपेक्षित होते, मी कल्पना रंगवल्या होत्या, मला बदलायचे होते त्या क्षेत्राबाहेर घडाली आहे. त्यामुळे मी याला “बदल” म्हणत नाही. माझ्यासोबत काय घडलय ते मला खरंच माहीत नाही. मी आता जे तुम्हाला सांगत आहे ते फक्त माझे कार्य कसे चालतेय त्याबद्दलचे बोलणे आहे. तुम्ही ज्या पध्दतीने कार्य करताय आणि मी ज्या पध्दतीने करतोय त्यात काहीसा फरक वाटू शकतो, पण मूलत: त्यात कसलाही फरक असू शकत नाही. तुमच्यात आणि माझ्यात कसला फरक असू शकतो? कसलाही नाही. पण आपण ज्या पध्दतीने स्वत:ला व्यक्त करतोय, त्यात काहीसा फरक दिसतो. काहीतरी फरक आहे असे मला जाणवतेय आणि तो काय आहे ते मी समजून घेतोय.
या “स्फोटा”दरम्यानच्या आठवड्यात युजींना त्यांच्या इंद्रियांच्या कार्यात काही मूलभूत बदल आढळून आले. शेवटच्या, सातव्या दिवशी त्यांचे शरीर “शारीरिक मृत्यूच्या” प्रक्रियेतून बाहेर पडले आणि त्यानंतरचे बदल ही कायम टिकून राहाणारी वैशिष्ट्ये बनली.
शेवटी: बदलांना सुरूवात झाली. सात दिवसांपर्यंत, प्रत्येक दिवशी बदल घडत गेला. युजींना आढळले की त्यांची त्वचा अत्यंत मुलायम झालीय, डोळ्यांची उघडझाप थांबलीय आणि स्वाद, गंध आणि ऐकण्याच्या संवेदनांत बदल घडलाय.
पहिल्या दिवशी त्यांना आढळून आले, त्वचा की मलमली वस्रासारखी मऊ झालीय आणि त्यावर विचित्र चमक, सोनेरी चमक आलीय. “मी दाढी करत होतो, आणि प्रत्येक वेळी रेझर फिरवताना, ते घसरू लागले. मी ब्लेडस बदलल्या, पण काही उपयोग झाला नाही. मी माझ्या चेहेर्‍याला स्पर्श केला. माझी स्पर्शाची संवेदना वेगळी होती.” युजींनी या गोष्टीला कोणतेही अवास्तव महत्व चिकटवेले नाही. त्यांनी फक्त ही निरिक्षणे केली आहेत.
दुसर्‍या दिवशी त्यांना सर्वप्रथमच आढळून आले की त्यांचे मन, ते नेहमी जो शब्द वापरतात त्याप्रमाणे “पकडमुक्त स्थितीत” आहे. युजी वर असलेल्या किचनमध्ये होते आणि आणि व्हॅलेण्टाईनने काहीतरी टोमॅटो सूप बनवले होते. त्यांनी ते पाहिले आणि ते काय आहे ते त्यांना कळेना. ते सूप आहे असे व्हॅलेण्टाईनेने सांगितले. त्यांनी त्याची चव घेतली आणि मग ते समजले, “टोमॅटो सूपची चव अशी असते तर!.” त्यांनी सूप चाखले आणि परत ते मनाच्या त्या विचित्र चौकटीत शिरले, नव्हे तर ती “मनोमुक्त” स्थिती होती. त्यांनी व्हॅलेण्टाईनला पुन्हा विचारले “हे काय आहे?” पुन्हा व्हॅलेण्टाईन म्हणाली ते सूप आहे. पुन्हा युजींनी चव घेतली, ते गिळले आणि पुन्हा एकदा ते काय होते ते विसरून गेले. माझी काहीकाळ अशी मजा झाली. मजेशीरच होते ते सगळे – ती “पकडमुक्त स्थिती.”

आता युजींसाठी ती स्थिती सामान्य झाली होती. ते म्हणतात आता ते बिलकुल कल्पनारंजन, काळजी, संकल्पना मांडणे किंवा इतर लोक एकटे असताना करतात तसे कोणतेही विचार करीत नाहीत. फक्त गरज असेल तेव्हाच त्यांचे मन उभे राहाते, उदाहरणार्थ, कुणीतरी प्रश्न विचारला किंवा त्यांना टेपरेकॉर्डर दुरुस्त करायचा असेल तेव्हा. अशी गरज संपते तेव्हा, तिथे मन राहात नाही, विचारही राहात नाही. फक्त जीवन राहाते.
तिसर्‍या दिवशी, युजींच्या काही मित्रांना त्यांनी जेवणासाठी बोलावले होते. स्वत: स्वयंपाक करायला ते कबूल झालेले होते. पण त्यांना नेहेमीसारखा गंधही घेता येईना आणि चवही घेता येईना. “या दोन संवेदना रूपांतरीत झाल्या आहेत याबद्दल मला जाणीव झाली. प्रत्येकवेळी माझ्या नाकपुड्यांत कोणताही गंध शिरला तेव्हा त्यामुळे गंध घेण्याच्या केंद्राला त्रास होऊ लागला – मग तो गंध महागड्या अत्तराचा असो की गायीच्या शेणाचा असो. आणि त्यानंतर मी कधीही कशाची चव घेतली तेव्हा, मला फक्त त्यात जास्त प्रमाणात असलेला घटकच जाणवत असे – इतर घटकांची चव थोडीशी उशीरा जाणवू लागली. त्या क्षणापासून पुढे मला कसल्याही परफ्युमचे काही वाटेना आणि चमचमीत जेवणाबद्दलही काही वाटेना. मला त्यात जास्त प्रमाणात असलेल्या घटकाचीच चव जाणवू लागली – तिखट किंवा जे काही टाकले असेल ते.”
चौथ्या दिवशी, त्यांच्या डोळ्यांबाबत काहीतरी झाले. युजी आणि त्यांचे मित्र गेस्टाड मधील रियाल्टो रेस्टॉरंटमध्ये बसले होते. याच ठिकाणी त्यांना बर्हिवक्र भिंगासारख्या प्रचंड “दृष्टी केंद्रणाची” जाणीव झाली. “माझ्या दिशेने येत असलेल्या गोष्टी, माझ्या आत शिरत असल्यासारखे दिसत होते. आणि माझ्या जवळून दूर जाणार्‍या गोष्टी माझ्या आतून बाहेर पडत असल्यासारखे वाटत होते. मी एवढा कोड्यात सापडलो होतो – माझे डोळे महाप्रचंड कॅमेर्‍याप्रमाणे झाल्यासारखे वाटत होते, आणि मी काही न करता ते त्यांचा अवधान बिंदू बदलत होते. आता मला या विचित्रपणाची सवय झालीय. आजकाल मी असाच पाहात असतो. तुम्ही मला तुमच्या कारमध्ये बसवून घेऊन जाता, तेव्हा माझी कॅमेरा सरसावून हिंडत असलेल्या कॅमेरामन सारखी स्थिती असते. समोरून येणार्‍या कार माझ्या आत शिरत असतात, आणि आपल्याला मागे टाकून पुढे जाणार्‍या कार माझ्यातून बाहेर पडत असतात. माझे डोळे कशावर तरी रोखले जातात, तेव्हा पूर्ण अवधानासह ते तिथे चिकटतात, कॅमेर्‍यासारखे.”
रेस्टॉरंटमधून युजी परत आल्यानंतर त्यादिवशी आरशात पाहात असताना त्यांच्या डोळ्याबाबत त्यांना आढळले की ते “स्थिर” झाले आहेत. ते खूपवेळ आरशासमोर थांबून राहिले आणि निरिक्षण केले तर त्यांच्या पापण्यांची उघडझापच होत नव्हती. जवळपास पंचेचाळीस मिनिटे ते आरशात पाहात राहिले – पण एकदाही पापण्यांची उघडझाप दिसली नाही! “उपजतपणे होणारी माझी पापण्यांची उघडझाप कायमची संपली होती. ”
पाचव्या दिवशी युजींना त्यांच्या श्रवणेंद्रियात झालेला बदल जाणवला. कुत्रा भुंकत असताना त्यांना ऐकू आले तेव्हा, कुत्र्याचा आवाज त्यांच्या आतून येत असल्यासारखे जाणवले. सर्व आवाज माझ्या आतूनच येत आहेत, बाहेरून नाही असे जाणवले. अजूनही ते तसेच आहेत.
पाच दिवसांत पाच इंद्रिये बदलली. सहाव्या दिवशी युजी सोफ्यावर निवांत पडून होते. व्हॅलेण्टाईन किचनमध्ये होती.
“आणि अचानक माझे शरीर अदृश्य झाले. माझ्यासाठी, तिथे शरीर नव्हते. मी माझा हात पाहिला.. “हा हात माझा आहे?” असा प्रश्न नव्हता, पण ती पूर्ण स्थितीच काहीशी तशी होती. स्पर्श वगळता, संपर्काचा बिंदू सोडता इतर काही तिथे आहे असे मला जाणवेना. मी व्हॅलेण्टाईनला बोलावले आणि तिला विचारले “तुला माझे शरीर सोफ्यावर दिसतेय का? ” माझ्या आतून मला काहीच जाणवत नाही की हे शरीर माझे आहे म्हणून. तिने माझ्या शरीराला स्पर्श केला आणि म्हणाली, “हे तुझे शरीर आहे.” आणि तिच्याकडून खात्री करून घेतली तरीही मला बरे वाटेना, माझे समाधान झाले नाही. मी स्वत:ला म्हणालो, “काय गंमत चाललीय ही? माझे शरीर हरवलेय. माझे शरीर सोडून गेले होते, आणि ते कधीही परत आलेले नाही.”
आता त्यांच्या शरीराच्या बाबतीत, युजींकडे फक्त स्पर्श होणारे बिंदूच तेवढे शिल्लक आहेत, कारण, ते म्हणतात दृष्टीची संवेदना ही स्पर्शाच्या संवेदनेपासून विभक्त आहे. त्यांच्या स्वत:च्या शरीराची संपूर्ण प्रतिमा तयार करणे त्यांना शक्य नाही, कारण स्पर्शाच्या संवेदनेच्या अनुपस्थितीत, त्यांच्या अवधानात संबंधीत बिंदू हरवलेले असतात.
आणि सर्वात शेवटी सातव्या दिवशी, युजी त्याच सोफ्यावर पडून होते, आराम करीत होते, “पकडमुक्त स्थिती”ची मजा घेत होते. व्हॅलेण्टाईन आत यायची, तेव्हा ती व्हॅलेण्टाईन आहे हे ते ओळखायचे. ती खोलीबाहेर जायची. त्यानंतर, फिनीश, कोरेपणा – कसलीही व्हॅलेण्टाईन कुठेच नाही. “हे काय आहे नेमके?” व्हॅलेण्टाईन कशी दिसते ती कल्पनाही मी करू शकत नाहीय”, त्यांना वाटायचे. ते किचनमधून येणारे आवाज ऐकत आणि स्वत:ला विचारत, “माझ्या आतून हे कसले आवाज येत आहेत?” पण मला त्या आवाजांशी संबंध काही जोडता येत नसे.” त्यांना आढळून आले की त्यांची सर्व इंद्रिये त्यांच्या आतल्या समन्वय साधणार्‍या यंत्रणेशिवाय काम करीत आहेत: समन्वयक हरवला होता. आणि तेव्हाच...
माझ्या शरीरात काहीतरी घडत असल्याचे जाणवले: शरीराच्या विविध भागांतून जीवन ऊर्जा एका दृश्य केंद्राकडे जात होती. मी स्वत:ला म्हणालो, “आता तुझे आयुष्य संपले. तु मरणार आहेस.” तेव्हा मी व्हॅलेण्टाईनला बोलावले आणि म्हणालो, “मी मरतोय व्हॅलेण्टाईन आणि तुला या शरीराचे नंतर काहीतरी करावे लागणार आहे. हे डॉक्टरांना देऊन टाक, कदाचित त्यांना त्याचा वापर होईल. माझा दहन किंवा दफन क्रियेवर विश्वास नाही. तुला हवी तशी या शरीराची विल्हेवाट लावावी लागेलच. एकदिवस यातून दुर्गंध येऊ लागेल. त्यामुळे, ते देऊन टाक कुणाला तरी, व्हॅलेण्टाईन म्हणाली, “युजी, तुम्ही एक परदेशी माणूस आहात. स्वीस सरकार तुमचे शरीर स्वीकारणार नाही. विसरा त्याबद्दल.”
त्यांचे जीवन बल भयानकपणे एका दृश्य बिंदूवर येऊन पोचले होते. व्हॅलेण्टाईनचे बेड रिकामेच होते. ते त्या बेडवर जाऊन पडले, मरायला तयार होऊन. ते जे बोलत होते त्याकडे व्हॅलेण्टाईनने, निश्चितच दुर्लक्ष केले होते. पण तिथून जाण्यापूर्वी ती म्हणाली होती, “एक दिवस तुम्ही म्हणता ही गोष्ट बदललीय, दुसर्‍या दिवशी म्हणता आणखी दुसरंच काही बदललंय, तर तिसर्‍या दिवशी आणखी तिसरंच काहीतरी बदलतं. काय चालु आहे नेमकं? आता तर तुम्ही म्हणताय तुम्ही मरणार आहात. तुम्ही काही मरणार वगैरे नाही. तुम्ही ठिकठाक आहात, एकदम ठणठणीत” असं म्हणून ती खोलीबाहेर पडली. युजी त्यांची आपबिती पुढे सांगतात:
नंतर एक असा बिंदू आला जसे एखाद्या कॅमेर्‍याच्या अपार्चरचा पडदा स्वत:ला बंद करून घेत असावा. ही एकच उपमा मला सुचते. मी आता जे वर्णन करीत आहे ते आणि वास्तविक जसे घडले त्यात फरक आहे कारण त्यावेळी याप्रकारे विचार करायला तिथे कुणीच नव्हते. हा सर्व माझ्या अनुभवाचा भाग असला पाहिजे, नाहीतर मला त्याबद्दल बोलता आले नसते. तर, अपार्चर स्वत:ला बंद करून घेत होते, आणि आणखी काहीतरी होते जे तो पडदा उघडा ठेऊ पाहात होते. त्यानंतर थोड्यावेळाने काहीही करण्याची इच्छा राहिली नाही, ते अपार्चर बंद होणे रोखावेही वाटत नव्हते. अचानक, जसे झाले त्याप्रमाणे, ते बंद झाले. त्यानंतर काय झाले ते मला माहित नाही.
ही प्रक्रिया – ही मरण्याची प्रक्रिया एकोणपन्नास मिनीटे चालू राहिली. तो शारीरिक मृत्यू होता. युजी म्हणतात की अजूनही त्यांना तसे होते:
माझे हात आणि पाय थंड पडतात, शरीर ताठते, हृदयाचे ठोके मंदावतात, श्वास मंद होतो आणि श्वास घ्यायची मारामार होते. एका बिंदूपर्यंत तुम्ही तिथे असता, तुम्ही तुमचा शेवटचा श्वास घेता आणि मग, फिनीश. त्यानंतर काय घडते ते कुणालाही माहीत नाही.
युजी त्या प्रक्रियेतून बाहेर आले तेव्हा व्हॅलेण्टाईनने त्यांच्यासाठी कुणाचा तरी कॉल आला असल्याचे सांगितले. गोंधळलेल्या स्थितीत ते फोन घेण्यासाठी खाली गेले. काय झाले होते त्यांना माहीत नव्हते. ते शारीरिक मृत्यूमधून बाहेर पडले होते. ते कशामुळे परत जगात आले, त्यांना माहित नाही. कितीकाळ तो मृत्यू टिकून राहिला, त्यांना माहित नाही. “मी त्याबद्दल काही सांगू शकत नाही, कारण अनुभव घेणाराच समाप्त झाला होता: त्या मृत्यूचा अनुभव घेणाराच तिथे बिलकुल नव्हता...”

इथे, या “कॅलॅमिटी”चा एकमेव साक्षीदार डग्लस रोजस्टोन काय म्हणतो ते पाहाणे अगदी सुयोग्य होईल:
चोवीस उन्हाळे उलटले आहेत आता या गोष्टीला, जेव्हा सर्व रूपांतरणांत अत्यंत दुर्मिळ असणार्‍या, हे एकच खरे रूपांतरण आहे असे वाद ज्याबद्दल आहेत त्या रूपांतरणाचा – एका सामान्या माणसाच्या मृत्यूचा आणि पुनर्जन्माचा मला साक्षीदार होता आले. हा माणूस “देव माणूस”, “निवड झालेला” किंवा जगदगुरू असण्यापेक्षा एक सर्वसामान्य माणूस होता. जे. कृष्णमूर्तींची व्याख्याने ऐकण्यासाठी १९६६ च्या उन्हाळ्यात मी सानेनला गेलो होतो तेव्हा या सगळ्याची सुरूवात झाली. त्या दिवशी मी गेस्टाड येथील माझ्या अपार्टमेंटमध्ये होतो. सायंकाळची वेळ होती. चंद्र नुकताच क्षितीजावर आला होता. कशामुळे तरी मला युजींना, त्यांच्या चॅलेटमध्ये कॉल करावा वाटला. मी केला. घराच्या मालकिणीने फोन घेतला. तिने मारलेली “युजीऽऽऽ तुमच्यासाठी फोना आहेऽऽऽ” अशी हाक मला फोनमधून ऐकू आली. तिच्या आवाजावरून व्हॅलेण्टाईनचे काहीतरी बिनसले आहे असे वाटत होते. ती म्हणाली, “युजींना काहीतरी होतंय, त्यांचं शरीर हलू शकत नाहीय. कदाचित ते मरत असतील.” मी म्हणालो, “जा आणि युजीला बोलवा, मी त्यांना बोलतो.” व्हॅलेण्टाईन म्हणाली, “ते येतील असे मला वाटत नाही.” पण मी अडूनच बसलो. आणि तेव्हा युजी फोनवर आले. त्यांचा आवाज फार दूरून येत आहे असे वाटत होते, “डग्लस, तुच इकडे ये आणि काय होतंय ते पाहा,” एका मेलेल्या माणसाला पाहायला येण्याचे ते आमंत्रण होते. मी पळालो. त्यावेळी रेल्वे चालू नव्हत्या. गेस्टाड आणि सानेनमधील अंतर तीन किलोमीटर आहे. मी चॅलेटमध्ये शिरलो आणि युजींच्या खोलीकडे गेलो. मला ते दृश्य अजूनही चांगलेच आठवते:व्हॅलेण्टाईन भीतीने पांढरीफटक पडली होती, आणि युजी कोचावर होते, शुध्दीवर नव्हते. त्यांचे शरीर धनुष्याकृती सारखे वाकले होते. नुकताच डोंगरावरून चंद्र वर आला होता. मी युजींना उठवू लागलो आणि खिडकीकडे घेऊन गेलो. त्यांनी चंद्राकडे ज्या पध्दतीने पाहिले ते माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. त्या खोलीत काहीतरी विचित्र प्रकार चालला होता. मी त्यांना विचारले, “काय होतंय?” ते म्हणाले, “हा शेवटचा मृत्यू आहे.”
महेश भट आणि मित्रांसमोर डग्लसने हे कथन केले आहे. युजींच्या मित्रांपैकीच एक, डग्लसचे आतापर्यंतचे ऐकणारे श्री. मूर्ती डग्लसला मध्येच थांबवत विचारतात, “म्हणजे ते मरणार आहेत असं ते सांगत होते असे तुला म्हणायचे आहे का?” डग्लस, “नाही, ते आधीच घडून गेले होते. युजी म्हणाले माझा फोन आल्याने ते परत येऊ शकले.” मूर्ती विचारतात, “तुझा काय प्रतिसाद होता डग्लस?” “मला खूप आनंद झाला होता; त्यांच्यामुळे मला खूपच आनंद झाला.”
त्यांच्यात काही उल्लेखनीय बदल दिसत होते काय?
“त्यांचे व्यक्तिमत्व बदलले नव्हते. ते नेहमीसारखेच हाताळायला विचित्र असणारा माणूस दिसत होते. पण त्यांच्यावर कसलाच तणाव जाणवत नव्हता. ”

(उद्याच्या भागात कॅलॅमिटी नंतर युजींचे लोकांशी झालेले बोलणे )

व्युत्पत्तीसमाजजीवनमानविज्ञानप्रकटनविचारआस्वादलेखअनुभवमतमाहितीसंदर्भचौकशीभाषांतर

प्रतिक्रिया

विलासराव's picture

5 Oct 2010 - 8:33 pm | विलासराव

पुढील भाग वाचण्यास उत्सुक.

अडगळ's picture

5 Oct 2010 - 9:06 pm | अडगळ

पण एकूणच तत्वविचाराची नवी मांडणी वगैरे या माणसाने कशी केली हे काही समजले नाही.(कदाचित ते पुढे येईल)
जर वैयक्तिक अनुभव हाच या नव्या विचारांचा पाया असेल तर मात्र अडचण आहे.
परत जे शारीरिक बदल नोंदवले आहेत , ते जसे चमत्कार तसेच विकार/भ्रम पण असू शकतात असे शंकेखोर मनाला वाटते.

बाकी लेखन , मांडणी छान.
वाचत आहे.

इन्द्र्राज पवार's picture

7 Oct 2010 - 9:25 am | इन्द्र्राज पवार

+ सहमत....

~ नेमक्या याच शब्दात [यु.जी.के. समजून घेताना] मला जाणिवलेली अडचण मांडण्याच्या बेतात असतानाच श्री.अडगळ यांचा हा प्रतिसाद नजरेसमोर आला आणि समाधान वाटले की असे वाटणारा मी एकटाच नाही.

श्री.यशवंतराव यांच्या लेखनशैलीवर सरस्वती प्रसन्न आहे असे तिन्ही लेखावरून दिसून येतेच, त्यामुळे आमच्यासारख्यांच्या मनात भिरभिरणार्‍या शंकेच्या पाकोळ्या ते आपल्या लेखणीने दूर करतील...येणार्‍या पुढील भागातून....असा विश्वास आहेच.

इन्द्रा

(जाताजाता > अजूनही दोन्ही कृष्णमूर्तींच्या शिकवणीमध्ये ठळक असे फरक जाणवत नाही; जे ओशोमध्ये आढळतात....अर्थात माझे हे किरकोळ असे निरिक्षण आहे...अभ्यास नव्हे)

कवितानागेश's picture

7 Oct 2010 - 9:56 am | कवितानागेश

दोन्ही कृष्णमूर्तींच्या शिकवणीमध्ये>>>>
कृष्णजींबद्दल (जे.के) बोलताना 'शिकवण' हा शब्द योग्य वाटत नाही,
त्यानी कुणालाही काहीही 'शिकवले' नाही, त्यांनी फक्त निरिक्षणे माडली,
त्या अनुषंगानी समोर 'प्रश्न' घेउन बसलेल्या लोकांना, अजून खोल खोल जण्यास उद्युक्त करणारे प्रश्न विचारले,
त्यांनी कधीही ' मी शिकवतो' असे विधान केले नाही.

ओशोनी देखिल माझ्या माहितीप्रमाणे फक्त 'मेडिटशन शिकवले',
त्यांच्या प्रवचनातून केवळ विचार व निरिक्षणे मांडली.

इन्द्र्राज पवार's picture

7 Oct 2010 - 10:57 am | इन्द्र्राज पवार

"...कृष्णजींबद्दल (जे.के) बोलताना 'शिकवण' हा शब्द योग्य वाटत नाही,>

~~ वेल, आय अ‍ॅक्सेप्ट ! मी प्रतिसादात कबुली दिलेलीच होती की, या विषयात माझे फक्त वाचन वा निरिक्षण आहे, अभ्यास नाही. श्री.महेश भट्ट हे युजींचे कट्टर भक्त. त्यांच्या पुस्तकात कुठेतरी युजींबद्दल लिहिताना 'टीचिंग' शब्दाचे प्रयोजन आल्याचे स्मरत होते.....ते 'शिकवण' या अर्थाने मी घेतले...इतकेच.

श्री.यशवंत कुलकर्णी अधिक प्रकाश पाडतील यावर.

इन्द्रा

गणपा's picture

5 Oct 2010 - 9:08 pm | गणपा

हे ही वाचतोय. :)

भाऊ पाटील's picture

6 Oct 2010 - 3:10 pm | भाऊ पाटील

यु जीं बद्दल काहीच माहीत नव्हते. फक्त नाव तेवढे ऐकून होतो.
येउ द्यात पटापट.

साक्षात्काराची अनुभूती इतरांपेक्षा* खूप वेगळी मांडली आहे.
पुढील भाग वाचण्यास उत्सुक

बाकी लेखन , मांडणी खरोखरच छान आहे.

* इतरांपेक्षा वेगळी आहे हे माझे व्यक्तिगत मत आहे.

कवितानागेश's picture

7 Oct 2010 - 9:12 am | कवितानागेश

कुत्र्याचा आवाज त्यांच्या आतून येत असल्यासारखे जाणवले. सर्व आवाज माझ्या आतूनच येत आहेत, बाहेरून नाही असे जाणवले. अजूनही ते तसेच आहेत.>>>>>>>>>>>
अशाच प्रकारचे अनुभव कृष्णजी ( जे.कृष्णमूर्ती) या>नी लिहिले आहेत.
"... ...... ते हलणारे गवताचे पाते मीच आहे, ..आगगाडीची चाकेसुद्धा मीच आहे........" अशा प्रकारची खरोखरच 'विस्तृत' म्हणता येइल अशी जाणीव , त्यानी अतिशय सुंदर रितीनी लिहिली आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

7 Oct 2010 - 5:02 pm | llपुण्याचे पेशवेll

हम्म. मी जे.केंचे वाचलेले नाही पण . ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत असे लिहील्याचे स्मरते आहे. नक्की ओवी आठवली, सापडली तर देईन. त्या ओवीत मुंगीचे मनोगत असे काहीतरी आहे.

यशवंतकुलकर्णी's picture

7 Oct 2010 - 2:25 pm | यशवंतकुलकर्णी

अडगळ, इंद्रराजसाहेब आणि लीमाऊजेट,
कालच भाऊ पाटलांना मी खरड टाकलीय त्याप्रमाणे या लेखमालेतून युजींची फक्त आणि फक्त ओळख करून द्यायचेच मनात आहे; वाचकांच्या मनात येणार्‍या प्रामाणिक, लहानसहान शंका त्यांनी स्वत: दूर करुन घ्याव्यात असे वाटते कारण
"Tell them that there is nothing to understand."
If you listen to me year after year, you are only clarifying your thoughts. It's useless.
Anything I do to help you would be adding to your misery--that's all. You add one more misery to those you already have by listening to me.
All experiences, however extraordinary they may be, are in the area of sensuality.
The talk of intuition and insight is another illusion. Every insight you have is born out of your thinking.
Whatever we experience is thought-induced. What you don't know you can't experience. To experience a thing you have to know.
Society is built on a foundation of conflict, and you are society. Therefore you must always be in conflict with society.
If, when this body is buried, the memories people have of me are also buried along with it , that will be the end of me.
I don't give a hoot for a sixth-century B.C. Buddha, let alone all the other claimants we have in our midst. They are a bunch of exploiters, thriving on the gullibility of the people

ही युजींची विधाने आहेत. मी सुंदर पध्दतीने युजींबद्दल लिहीत आहे असे वाटू शकते - पण वर युजी म्हणतात त्याप्रमाणे ते "यूसलेस" आहे याची मला जाण आहे; मग सगळंच यूसलेस असेल तर काहीही करण्यात अर्थ नाही आणि काहीही न करण्यातही काही अर्थ नाही - तरीही सतत आपण काहीतरी करीत असतो; करावंच लागतं - असल्या विचित्र मनोवस्थेतून मी हे लिहीत आहे. त्यामुळे आता यूसलेसपणे तुमच्या शंकाबद्दलही मला काय वाटते ते सांगतो.

अडगळ,

जर वैयक्तिक अनुभव हाच या नव्या विचारांचा पाया असेल तर मात्र अडचण आहे.

होय. युजींचा वैयक्तिक "शारीरिक" अनुभव हाच पाया आहे; पण युजींनी स्वत: होऊन कुठलेही विचार मांडलेले नाहीत - इव्हन आजूबाजूला लोक गोळा होतात म्हणून ते तीन महिन्यांपेक्षा जास्त कुठेही थांबत राहात नसत - फक्त लोकांना टाळण्यासाठी; खरंच विचार हा पाया असता तर त्यांच्याभोवती एखादी तरी "संस्था" उभी राहिली असती. आजपर्यंत ती राहिलेली नाही. युजींबद्दल जे काही वाचायला मिळतं ते प्रश्न विचारणार्‍यांच्या प्रश्नाच्या चिंध्या करून झाल्यानंतर, "गेट अप, अ‍ॅण्ड गो," "आय हॅव नॉट इन्व्हायटेड यू हेअर", "गेट लॉस्ट अ‍ॅण्ड स्टे लॉस्ट" अशी त्यांची वाक्ये पचवून ऐकावं लागतं.

परत जे शारीरिक बदल नोंदवले आहेत , ते जसे चमत्कार तसेच विकार/भ्रम पण असू शकतात असे शंकेखोर मनाला वाटते.

ओके. इटस हेल्दी.

लीमाऊजेट,

दोन्ही कृष्णमूर्तींच्या शिकवणीमध्ये>>>>
कृष्णजींबद्दल (जे.के) बोलताना 'शिकवण' हा शब्द योग्य वाटत नाही,
त्यानी कुणालाही काहीही 'शिकवले' नाही, त्यांनी फक्त निरिक्षणे माडली,
त्या अनुषंगानी समोर 'प्रश्न' घेउन बसलेल्या लोकांना, अजून खोल खोल जण्यास उद्युक्त करणारे प्रश्न विचारले,
त्यांनी कधीही ' मी शिकवतो' असे विधान केले नाही.

ओशोनी देखिल माझ्या माहितीप्रमाणे फक्त 'मेडिटशन शिकवले',
त्यांच्या प्रवचनातून केवळ विचार व निरिक्षणे मांडली

.

हीच तर अडचण आहे ना - पार भगवान बुध्दांपासून युजींपर्यंत सगळे लोक "मी काहीही शिकवत नाही" असं एकीकडे म्हणतात आणि दुसर्‍या बाजूला पसारा मात्र तयार होत राहातो. युजींच्या क्लिप्समध्ये उत्तर देतानाची त्यांची चीड, राग, शिव्या पाहाता युजींकडे शिकवायला काही नव्हतं, पण काहीतरी सांगितल्याशिवाय पर्याय नाही म्हणून, फक्त एक "रिस्पॉन्स" म्हणून ते सांगितलं जात होतं असं दिसतं.

ओशो आणि जेके या दोघांच्याही "त्या" अनुभवोत्तोर आयुष्यात त्यांनी लोकांना, मेडीटेशनचा का होईना पण मार्ग ऑफर केलेला आहे; यापैकी ओशोंनी तर "ध्यान आणि संबंधित प्रॉडक्टस (११२ ध्यानपध्दतींसह आश्रमात चालणार्‍या "सेक्स ऑर्गीस" धरून ) " चा तर खुलेआम बाजारच सुरू केला होता.

पुढच्या भागानंतरच्या भागात अजून तपशीलात लिहीण्याचा प्रयत्न करतो.

अशाच प्रकारचे अनुभव कृष्णजी ( जे.कृष्णमूर्ती) या>नी लिहिले आहेत.
"... ...... ते हलणारे गवताचे पाते मीच आहे, ..आगगाडीची चाकेसुद्धा मीच आहे........" अशा प्रकारची खरोखरच 'विस्तृत' म्हणता येइल अशी जाणीव , त्यानी अतिशय सुंदर रितीनी लिहिली आहे.

जाणीवेबद्दल इंटरप्रिटेशन्स, तिचे ट्रान्सलेशन करणे (आयुष्यभर, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर बसून, पुस्तकांतून तेच करीत राहाणे) वेगळे - आणि युजींसारखा भाजून टाकणारा "पूर्णत:" शारीरिक अनुभव येणे, शरीराच्या प्रत्येक भागावर त्याची लक्षणे दिसणे, मूळापासून शेंड्यापर्यंत पूर्ण लाईफ स्टाईलच बदलणे वेगळे आहे असे वाटत.

शेवटी मी पण कुठल्याच गोष्टीवर जोर देत नाहीय, कुठल्याच गोष्टीला चिकटून बसत नाहीय. पण हे सगळं असं आहे.

कवितानागेश's picture

7 Oct 2010 - 3:21 pm | कवितानागेश

पसारा करणे हा मानवी स्वभावच आहे!
तो कुणीच अनुभवी लोक ( युजीके, जेके, ओशो, वगरै....) मुद्दाम करत नाही.

जेके सुद्धा , 'माझी विधाने स्वतः तपासून पहा, आंधळेपणाने विश्वास ठेउ नका' असेच सांगायचे,
पण लोकाना स्वतः विचार करायचा नसतो, त्यासाठी अंतर्मुख व्हायची बिल्कुल हिम्मत नसते,
फक्त, कुणाच्यातरी मागे लागून, फुकट मोकळीक हवी असते.
( मोक्ष वगरे नाही, फक्त स्वतःच निर्माण केलेल्या चित्रविचित्र प्रश्नांपासून मोकळीक.
युजीके त्यामूळेच चिडत असावेत!))

त्यातच सगळा घोटाळा होतो.....मूळ तत्वांवर काजळी चढते....
शिवाय स्वतः अनुभव घेण्यापेक्षा नुसत्याच शब्दबंबाळ चर्चा करण्यात लोक समाधान मानतात.
(आपल्यासारखे! )
..आणी मग सगळेच ज्ञान हरवते.

युजींसारखा भाजून टाकणारा "पूर्णत:" शारीरिक अनुभव येणे
..असे अनुभव अनेक जणाना आले आहेत.
त्याबद्दल वेग्वेगळ्या पद्धतीनी लिहिले गेले आहे.....
त्यामूळे प्रत्येकाचा अनुभव वेगळा भासतो.
( त्याची चर्चा इथे नको...... अंनिसवाले गळा धरतील!)

कृष्णजी (जेके) आणी डेविड बोह्म यांची एक अत्यंत किचकट चर्चा आहे, त्यात या प्रकारच्या पेशींतील बदलाबद्दलच कृ्ष्णजी 'म्युटेशन' हा शब्द वापरतायत....

यशवंतकुलकर्णी's picture

7 Oct 2010 - 3:34 pm | यशवंतकुलकर्णी

शिवाय स्वतः अनुभव घेण्यापेक्षा नुसत्याच शब्दबंबाळ चर्चा करण्यात लोक समाधान मानतात.

माझ्यापुरतं बोलायचं तर या चर्चा बिलकुल शब्दबंबाळ नाहीत... आणि मी सध्या "त्याच" अनुभवातून जातोय...कुणी समदु:खी/समसुखी मिळतात का पाहात होतो..

कवितानागेश's picture

8 Oct 2010 - 12:22 am | कवितानागेश

मी सध्या "त्याच" अनुभवातून जातोय...>>>>>
म्हणजे सध्या तुमची त्वचा मलमली वस्त्रासारखी मऊ झालीये आणी तुम्हाला चवी देखिल कळत नाहीत!??

हलके घ्या.

यशवंतकुलकर्णी's picture

8 Oct 2010 - 1:05 am | यशवंतकुलकर्णी

तुम्ही शब्दबंबाळ चर्चा हा शब्द वापरल्यानं मी माझी बाजू गरजेपुरती स्पष्ट केली होती; पुढे काही सांगणं अनावश्यक आहे.

पैसा's picture

7 Oct 2010 - 6:28 pm | पैसा

आम्हाला भावातीत ध्यान (समाधी) शिकवणार्‍यानी "कोणाला काही अतींद्रिय अनुभव आले तर त्याची वाच्यता किंवा चर्चा करू नका" असं सांगितलं होतं. ते बहुतेक असला "पसारा" टाळण्यासाठीच असावं.

यशवंतकुलकर्णी's picture

7 Oct 2010 - 6:42 pm | यशवंतकुलकर्णी

युजी या अनुभवातून बाहेर पडले तेव्हा "आय वील डिस्कस अबाऊट इट ओपन्ली (हे "इट" म्हणजे युजींबद्दल लिहीणारे लोक त्यांची "एन्लायटन्मेंट" मानतात, युजी एन्लायटन्मेंट नाहीच असं हज्जारदा सांगतात ) ..."

आम्हाला भावातीत ध्यान (समाधी) शिकवणार्‍यानी "कोणाला काही अतींद्रिय अनुभव आले तर त्याची वाच्यता किंवा चर्चा करू नका" असं सांगितलं होतं. ते बहुतेक असला "पसारा" टाळण्यासाठीच असावं.

हाच तर मुद्दा आहे ना. असल्या ध्यान पध्दती शिकवण्यासाठी अवास्तव स्तोम माजवायचं, लोकांकडून पैसे वसूल करायचे, कधीकधी तर त्यांना "हॅंण्डल"ही करायचं...पुन्हा काखा वर करायला मोकळे..ते तिकडं, आपण इकडं..
हे म्हणजे गाडी चालवता न येणार्‍या माणसाला गाडीवर बसवून उताराला लाऊन द्यायचं आणि पडून मेंदू वगैरे फुटला किंवा टाळके सरकले तर "त्याची वाच्यता करू नका किंवा चर्चा करू नका" असं म्हणण्यासारखं आहे..

आमच्या सारखे सामान्य लोक यावर फारसं वाचन किंवा विचार करत नाहीत, त्यामुळे असले अ‍ॅक्सिडंट होत नाहीत. अति विचार करणार्‍यांसाठी मात्र ते धोकादायक आहे.

हा 'कोल्ह्याला द्राक्षे आम्बट' चा प्रकार आहे का यावर पण अवश्य विचार करा.

बाजारात खरी खोटी नाणी असणारच. म्हणून कुणी चलन की कल्पना मोडीत काढत नाही की अर्थशास्त्राच्या, अर्थशास्त्रज्ञान्च्या नावाने सरसकट शिवीगाळ करत नाही. माझे बोलणे कुत्र्याचे भुन्कणे आहे असे म्हणल्याने सरसकट शिवीगाळ करण्याचा अधिकार तर मुळीच येत नाही. असो.

ओशो, जे. आणि यु.जी. इतकेच 'अध्यात्म' आहे असे समजाल तर कायम गोन्धळात रहाल आणि जग 'युसलेस' आहे, सगळेच मूर्ख आहेत असले निष्कर्ष निघतील.

तुमची लिहीण्याची शैली छान आहे. तुम्हाला 'खरीखुरी गोड द्राक्षे' मिळावीत (जशी गुळवणी महाराजाना लोकनाथतीर्थ स्वामी महाराजानी दिली, स्वामी स्वरूपानन्दाना गणेशनाथ वैद्य महाराजानी दिली) यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा. बाकी चू.भू.दे. घे. काही वावगे बोललो असल्यास क्षमस्व.

यशवंतकुलकर्णी's picture

7 Oct 2010 - 9:51 pm | यशवंतकुलकर्णी

धन्यवाद!

यशवंतकुलकर्णी's picture

7 Oct 2010 - 7:01 pm | यशवंतकुलकर्णी

मॅडम, आत्ताच तुम्ही म्हणालात की "अतिंद्रिय अनुभव आले तर वाच्यता किंवा चर्चा करू नका...."
हे असले अतिंद्रिय अनुभव विचार करून (किंवा तुमच्या म्हणण्याप्रमाणं अति विचार करून) येत नसतात - काहीकाळ सगळी शारीरिक यंत्रणा त्यात इन्व्हॉल्व्ह झाली तरच तशी शक्यता असते...
वन्स यू माऊंट, देअर इज एव्हरी पॉसीबिलीटी ऑफ अ‍ॅक्सीडेंट...
राजहंस प्रकाशनने नुकत्याच प्रकाशित केलेल्या "अज्ञात विवेकानंद" या विवेकानंदांवरील पुस्तकात तर अशी नोंद आहे की ध्यान करीत असताना "मेंदुतील शीर तुटून" विवेकानंदांचा मृत्यू झाला...काय म्हणायचं आता?

कारण वसंत पोतदारांचे 'योद्धा संन्यासी' माझ्याकडे आहे त्यात विवेकानंदांनी देह ठेवला त्याचे वर्णन आहे. त्यात कुठेही असे वर्णन नाही की त्यांनी ध्यान करत असताना मेंदूतील शीर वगैरे तुटली...(अचूक वर्णन मी पुस्तकातून देऊ शकेन.)
त्यामुळे तुझा हा संदर्भ विचारात पाडणारा वाटतोय.

-रंगा

यशवंतकुलकर्णी's picture

7 Oct 2010 - 10:03 pm | यशवंतकुलकर्णी

चतुरंग,
विवेकानंदांवरील हे पुस्तक अगदी अलिकडलं आहे आणि ते कुणीतरी "म" यांनी मूळ बंगालीत लिहीलं आहे. यात विवेकानंदांबद्दल आतापर्यंत अज्ञात असलेली बरीच माहीती दिलीय हे नावावरूनच कळतं.
यापूर्वी ओशोंनी त्यांच्या व्याख्यानात विवेकानंदांवर दिलेल्या उत्तरात नेमका हाच मुद्दा मांडला होता; पण तो "ओशों"चा असल्याने बेसलेस म्हणून मी दुर्लक्ष केले होते. ही जुनी गोष्ट. पण हे पुस्तक तर आताचं आहे. एक-दोन दिवसात पुस्तक मिळाले तर ती नोंद असलेले ते पान नक्की स्कॅन करून टाकतो.

मूकवाचक's picture

7 Oct 2010 - 10:19 pm | मूकवाचक

एकदा अधिकारी सद्गुरू मिळाल्यावर त्या तार्किक, बुद्धिमान युवकाने 'स्वात्मदान' दिले, गुरुपदिष्ट राहून निष्ठेने सत्कार्याला वाहून घेतले. नुकतेच अचाट, अफाट, भन्नाट अनुभव आणि उलटसुलट लोकविलक्षण विचारान्च्या मागे लागले नाहीत हे महत्वाचे. एकदा असे सद्गुरू, सत्शिष्य एकत्र आले, की आपोआप शिष्याची जीवननिष्ठा दृढ होते आणि सद्गुरूप्रणित जीवितकार्यही पूर्ण होते. असो.

ध्यान करत असताना मेन्दूची शीर तुटून मृत्यु आला (हे बरोबर आहे असे गृहीत धरू) याचा अर्थ ध्यान केल्याने मेन्दूची शीर तुटून मृत्यु आला असा सोयिस्करपणे का घ्यावा? आमच्या अल्प माहितीनुसार त्याना मधुमेह आणि रक्तदाबाचा विकारही होता. (स्वामीजी 'सक्रिय ध्यान', 'एन्काउन्टर ग्रुप' वगैरे ध्यान 'प्रयोग' करत नव्हते. त्याना रामकृष्णानी शक्तिपाताने व्यवस्थित दीक्षा दिलेली होती आणि ध्यान ही त्यान्ची जीवनशैली होती. )

चतुरंग's picture

7 Oct 2010 - 10:52 pm | चतुरंग

स्वामी विवेकानंदांना मधुमेह, रक्तदाब तर होताच शिवाय सायटिकाचा सुद्धा विकार होता. अत्यंत तिखट मांसाहाराची त्यांना आवड होती आणि ते शीघ्रकोपीही होते! पण ह्या कोणत्याही गोष्टीचा त्यांच्या ध्यानाशी संबंध नाही.
अवघ्या ३९ वर्षांच्या आयुष्यात डोंगराएवढे कार्य करणार्‍या ह्या नरसिंहाला 'योद्धा संन्यासी' हेच नाव समर्पक आहे!

-रंगा

इन्द्र्राज पवार's picture

10 Oct 2010 - 11:20 am | इन्द्र्राज पवार

"....अत्यंत तिखट मांसाहाराची त्यांना आवड होती...."

~ इतकेच नव्हे तर त्यांना शाकाहाराचे महत्व कुणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी त्याला (पत्राद्वारे...) मांसाहार आणि शाकाहार या संबंधी लिहिले :

"..... जीवहत्या करणे हे पाप होय यात संशय नाही; तथापि, जोपर्यंत शाकाहारी अन्न हे रासायनिक प्रक्रियांद्वारा मानवी शरीराला यथोचित असे खाद्य बनत नाही तोपर्यंत मांसाहाराखेरीत गत्यंतर नाही. जोवर माणसाला आजच्यासारख्या अवस्थांत राहून रजोगुणाची कामे करावी लागतील तोवर मांसाहाराखेरीज उपाय नाही. यावर असेही म्हणता येईल की; अंगमेहनतीची कामे करून ते पोटाला मिळवीत नसतात अशा उच्च वर्गाच्या लोकांनी मांसाहार करू नये, परंतु ज्यांना रात्रंदिवस काबाडकष्ट करून खाणे-लेणे कमवावे लागत असते अशांना जबरदस्तीने शाकाहारी बनविणे हे आमच्या देशाचे स्वातंत्र्य गमाविण्याचे एक कारण होय. उत्तम पुष्टिकारक अन्नाने काय होऊ शकते ह्याचे जपान हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.....अस्तु....विवेकानंद..."

नियम आणि शिस्त याच्या अतिरेकावरपण स्वामींनी खूप प्रभावी असे भाष्य केले आहे; पण इथल्या धाग्याचा तो विषय नाही; त्यामुळे त्यावर लिहिणे अवांतर होईल.

इन्द्रा

कवितानागेश's picture

7 Oct 2010 - 7:12 pm | कवितानागेश

कोणि अतिशहाण्यानी हा शोध लावला?
मेंदूतील शीर वगरै?
विवेकानंद मरेपर्यन्त पूर्ण जागे होते, त्यांची शेवटच्या क्षणापर्यंतची वाक्य लिहून ठेवली गेली आहेत.
शिवाय शीर-बीर तुटायला त्यांना 'हाय बीपी' कधीही नव्हते!

यशवंतकुलकर्णी's picture

7 Oct 2010 - 7:23 pm | यशवंतकुलकर्णी

आता तो अतिशहाणा होता की नाही ते माहीत नाही पण ही एका डॉक्टरची नोंद आहे एवढं नक्की.
सध्या पुस्तक नाहीय माझ्याकडं नाहीतर पान स्कॅन करून टाकलं असतं.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Oct 2010 - 11:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हो पण ब्रेन हॅमरेज होण्यात एवढं काय अप्रूप?

यशवंतकुलकर्णी's picture

8 Oct 2010 - 1:43 am | यशवंतकुलकर्णी

अप्रुप काही नाही.
अशी कथा आहे की स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांनी विवेकानंदांना शक्तीपात दिक्षेद्वारे समाधीत प्रवेश करण्याची गुरूकिल्ली दिली.
विवेकानंद ध्यानाला बसत त्यावेळी त्या अवस्थेतून ते इतरांच्या मनावर नियंत्रण ठेऊ शकत - बोलू शकत.
रामकृष्ण परमहंसाच्या सान्निध्यात कुणीतरी एक व्यक्ती राहात असे आणि त्या माणसाची खोली देव-देवतांच्या मूर्ती, तसबिरी यांनी भरून गेलेली होती. त्याचा दिवसच त्या देवदेवतांची पूजा करण्यात खर्च होत असे. थोडक्यात तो भलताच भक्त माणूस होता. विवेकानंदांना त्याच्या त्या पूजा-अर्चा आणि भजन-पूजन आवडत नसे.
विवेकानंदांना समाधीचा अनुभव येऊ लागला तेव्हा विवेकानंदांनी पहिले काम केले ते म्हणजे समाधीत असताना त्या माणसाला सगळ्या मूर्ती आणि सगळ्या तसबीरी गंगेत टाकून यायला सांगितले; त्या माणसाला फार दु:ख झाले पण झालेल्या प्रकारावर विश्वास ठेऊन तो सगळ्या मूर्ती, तसबीरी घेऊन त्या गंगेत टाकण्यासाठी निघाला.
तो गंगेकडे जात असताना रामकृष्ण परमहंस गंगेत स्नान करून परत येत होते. रामकृष्णांनी त्या माणसाला मूर्ती आणि तसबीरी घेऊन परत जायला सांगितले आणि विवेकानंद जिथे बसले होते तिथे आले आणि त्यांनी -
"तु गैरवापर करू लागलायस, तुला दिलेली गुरूकिल्ली मी परत घेतोय - मरण्यापूर्वी एक दिवस तुला ती परत मिळेल " असे विवेकानंदांना सांगितले.
विवेकानंद फार तळमळले, रामकृष्णांची खूप वेळा करूणा भाकली. पण तो अनुभव त्यांना पुन्हा आला नाही. शेवटच्या दिवसांतही विवेकानंदांना तो अनुभव येईना; तेव्हा ध्यानात ते स्वत:च्या शारीरिक बळाचा वापर करू लागले. विवेकानंद जीवनभर अस्वस्थ, तणावात (भले मातृभूमीच्या कल्याणासाठी असोत, पण अस्वस्थता, तणाव सुटला नव्हता ) होते हे त्यांची पत्रे आणि जीवन चरित्र वाचून कळू शकते.
या पार्श्वभूमीवर, ध्यानात असताना ब्रेन हॅमरेज होऊन मृत्यू घडण्याच्या घटनेतून बरेच काही ध्वनित होते.
पण त्यात अप्रुप असं काही नाही.

वर सांगितलेली कथा रामकृष्ण मिशनच्या पुस्तकांत आढळणार नाही.
ओशोंनी ती सांगितलेली आहे.
त्यांना कुठून कळाली, माहीत नाही.

काय ध्वनित होते? थोडे इस्कटून सान्गाल काय? समजले नाही.

(आमच्या शेजारचे नाना आयुष्यभर ध्यान इ. फन्दात पडले नाहीत. रोज एक क्वार्टर, चिकन, कट्ट्यावर बसून चकाट्या पिटणे, पत्ते खेळणे वगैरे करत मस्त मजेत जगले. पण मेन्दूची शीर अचानक तुटूनच गेले हो!)

यशवंतकुलकर्णी's picture

10 Oct 2010 - 6:17 pm | यशवंतकुलकर्णी

माझा विचार, तुमचा विचार होऊ शकत नाही. सांगून फायदा नाही.

युवर नेबर नाना मे रेस्ट इन पीस.

मूकवाचक's picture

11 Oct 2010 - 1:37 am | मूकवाचक

आभारी आहे. (नाना पण आभारी असावेत)

तेव्हा ध्यानात ते स्वत:च्या शारीरिक बळाचा वापर करू लागले.

शारिरीक बळाचा वापर आणि ध्यानात ??? ;)
कुलकर्णी साहेब , मी एक लेख इथेच लिहीला होता.. ह्या सगळ्या गुरुपध्दतीवर. कदाचित आपल्या नजरेतुन सुटला असेल.
ही त्याची लिंक http://misalpav.com/node/18228

आणि ओशोनी सांगितलेल्या सर्वच कथा विश्वासार्ह मानणे धोक्याचे ठरेल. कारण त्यामागे त्यांचा बर्‍याचदा वैयक्तिक पूर्वग्रह ही असायचा.............

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Oct 2010 - 12:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हम्म, वाचतोय........!

-दिलीप बिरुटे

धमाल मुलगा's picture

18 Jul 2011 - 8:31 pm | धमाल मुलगा

.