प्रस्तावना-
नमस्कार!
या कव्यमालिकेत आम्ही आम्हास डोळ्यांस खुपलेल्या बातम्यांवर आमचे मौलिक विचार काव्याद्वारे मांडायचा विचार करतो आहोत. बातमी एखाद दिवसाची शिळी असू शकेल. आपणांस कविता वाचून बातमी हुडकून त्याचा दुवा प्रतिसादात द्यायचा आहे. बातम्या आंतरजालावर शोधता येण्यासारख्या निवडण्याची काळजी आम्ही घेऊ. परंतु काव्यात बातमी सरळ साधो सोपेपणाने मात्र येणार नाही.
नुसते वृत्तपत्र वाचून आमचा वेळ जात नसल्याने असल्या चकाट्या पिटून लोकांना वृत्तपत्र वाचण्यास प्रवृत्त करावे असा आमचा हेतू आहे. त्यामुळे कविता वाचून त्यातल्या शब्दकळा समजून घेऊन आपणांस बातमी शोधायची आहे.
ह्या चकाट्यांमध्ये कोणत्याही वृत्तपत्राचे आम्हाला कोणतेही जाहीर अथवा छुपे पाठबळ नाही हे आम्ही नमूद करू इच्छितो.
आजची बातमी -
राष्ट्रपित्याच्या नावे कसला गळका तरणोपाय
गढुळलेल्या पाण्यावरती जिव्हाळ्याची साय
जबाबदारी टाळून शासन तुम्हाआम्हांला पीडे
पाण्यामध्ये जपून पोहा! दिसले काही किडे!
शोधा पाहू बातमी!
प्रतिक्रिया
21 Sep 2007 - 1:56 pm | उग्रसेन
गमभन वाला माणूस बी गमतीदारच हाये ,मह्या मनात कविताच लिव्हली तुमी.
इथं लै कविता अशाच येऊ राह्यल्या म्हून म्हणलं :)
बातम्या पाहतो बरं का ? सकू आन ग आजचे पेपर सगळे हिकडं !
21 Sep 2007 - 2:11 pm | प्रमोद देव
तरण तलावासंबंधी ही बातमी असावी.
21 Sep 2007 - 2:50 pm | विसोबा खेचर
बातमी एखाद दिवसाची शिळी असू शकेल. आपणांस कविता वाचून बातमी हुडकून त्याचा दुवा प्रतिसादात द्यायचा आहे.
ओंकारराव, तुम्ही सुरू केलेला खेळ उत्तमच आहे हो. पण आम्हाला काही या खेळात भाग घेता यायचा नाही. कारण आमचं वृत्तपत्रांचं वगैरे फारसं वाचनच नाही. आम्ही फक्त शेअरबाजारातले भावांचे आकडे वाचणारी माणसं! :)
तेव्हा तुम्हा मंडळींचं चालू द्या..
बाय द वे, लगे हाथ एक विनंती मात्र आपल्याला करू इच्छितो. आपण रेखाचित्र फार सुरेख काढता. तेव्हा आपलं एखादं उत्तमसं रेखाचित्र इथे चढवलंत तर बरं होईल आणि आम्हालाही त्या कलेचा आनंद घेता येईल...
तात्या.
21 Sep 2007 - 2:53 pm | आजानुकर्ण
सुंदर उपक्रम आहे. ही बातमी काही ओळखता आली नाही. पण प्रमोदकाका म्हणतात तशी तरणतलावासंबंधीची बातमी वाटते.
आणि ते रेखाचित्राचंही बघा. ;)
21 Sep 2007 - 3:04 pm | जुना अभिजित
रेखाच चित्र??
मी पण बघतो एखाद सदाबहार..
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
21 Sep 2007 - 3:02 pm | जुना अभिजित
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow.cms?msid=2387661
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
21 Sep 2007 - 7:17 pm | ॐकार
मला शंका होती कोणाला चकाट्यांमध्ये रस असेल की नाही याची. पण तसे काळजीचे काही कारण दिसत नाही.
आम्ही फक्त शेअरबाजारातले भावांचे आकडे वाचणारी माणसं! :)
तात्या , हे बरं नाही. तुमचा व्यासंग वाढावा असे नाही का हो वाटत तुम्हाला? ;)
भेळेचे कागद वाचत चला सुरुवातीला, हळूहळू पूर्ण वर्तमानपत्राची सवय होईल ;)
रेखाचित्रे सद्ध्या नवी नाहीत...:( एखाद दुसरे काढले की इथे चढवतो. हाटेलात फ्रेम करून ठेवा :ड
तोवर जमल्यास शोधून इंजिनिअरिंगच्या दिवसांत पेनाने काढलेली चित्रे चढवता येतात का ते पाहतो.
वर आलेला बातमीचा दुवा अचूक आहे.
22 Sep 2007 - 12:51 am | विसोबा खेचर
भेळेचे कागद वाचत चला सुरुवातीला, हळूहळू पूर्ण वर्तमानपत्राची सवय होईल ;)
हरकत नाही! त्यानिमित्ताने भेळ खाणे होईल..:)
...:( एखाद दुसरे काढले की इथे चढवतो. हाटेलात फ्रेम करून ठेवा :ड
तोवर जमल्यास शोधून इंजिनिअरिंगच्या दिवसांत पेनाने काढलेली चित्रे चढवता येतात का ते पाहतो.
चालेल, वाट पाहात आहे..
तात्या.
21 Sep 2007 - 11:59 pm | सर्किट (not verified)
छान प्रोजेक्ट आहे. त्यानिमित्तानी आम्हाला बातम्याही कळतील.
- सर्किट