पूर्वसूचना : हे लिखाण केवळ ह. घेण्याकरिता असून त्यातून कोणतेही गर्भित अर्थ किंवा संदर्भ काढण्यात आल्यास (आणि पर्यायाने सदर व्यक्तीचे ब्लड प्रेशर वाढल्यास) त्याची जबाबदारी संपूर्णपणे तसे अर्थ किंवा संदर्भ काढणार्या व्यक्तीवर राहील. :)
शब्दसंग्रहा धार लावुनी
बोटे निज कळफलकामाजी
सज्ज ठेवुनि चला करूया
कंपूबाजी कंपूबाजी
लेख काव्य अन चर्चा टाकून
खरडीमधुनी येई बांग
नियमां सार्या टांग मारुनी
प्रतिसादांची लावू रांग
भिती न आम्हा असे कुणाची
आमची निष्ठा आमचा कंपू
बाकी सारे ऐरे गैरे
सोम्या गोम्या चंपू गंपू
कंपूबाहेरचा आयडी
दिसता बकरा त्यास करू
ठळक पुसट प्रतिसादांमधुनी
हलाल त्यासी खास करू
कधी भेटता कोणी खमका
एकजुटीने घालू वार
थकता सारे उपाय तरीही
संपादक हा आधार
गिल्ट बाय असोसियेशनने
कंपूगणांसी वाढवूया रे
कंपूबाजीची ध्वजा सदोदित
मिसळपाववर उंच धरा रे
- भटोबा
प्रतिक्रिया
6 Mar 2009 - 3:16 pm | दशानन
=))
सही भट... लै भारी !
सिग्नेचरचा सल्ला येवढ्या लवकर मनावर घ्याल असं वाटलंच नव्हतं !
तुम्ही तर दिवसाच चालू झालात का काय B)
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
6 Mar 2009 - 3:22 pm | घाटावरचे भट
१) हे सगळं बिना सिग्नेचर आहे. म्हणजे सिग्नेचरमुळे काय होईल कल्पना करा.
२) आत्ता इथे रात्र आहे.
6 Mar 2009 - 3:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हाहाहा
भटोबा, एक लंबर हो!
(एक लंबर कंपूबाज भटाची) मैत्रिण अदिती ®
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
6 Mar 2009 - 3:19 pm | छोटा डॉन
मस्त हो भटोबा,
कंपुबाजीचा चांगलाच अभ्यास दिसतोय , चालु द्यात ...
भारी जमले आहे, एकदम फुल्तु ...!!!
अवांतर : आता कंपुबाजीमुळे तुम्हाला येणार्या प्रतिसादांचे काय (ह्.घ्याच) ;)
---------
( १ नंबरचा कम्पुबाज व अवांतरविर ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
6 Mar 2009 - 8:31 pm | बिपिन कार्यकर्ते
अति अति अति सुंदर आहे रे कविता... तुझा सगळा अभ्यास दिसतोच आहे. चालु द्या...
बिपिन कार्यकर्ते
23 Dec 2009 - 6:54 pm | llपुण्याचे पेशवेll
कोणीतरी जुन्या आठवणी जागवल्यामुळे बरे वाटले.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
6 Mar 2009 - 3:18 pm | अवलिया
भटोबा!!!
जोरदार.... जोरदार... जोरदार
--अवलिया
6 Mar 2009 - 3:21 pm | झेल्या
मिश्किल कविता आवडली.
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
6 Mar 2009 - 3:26 pm | आनंदयात्री
भट आमच्या कंपुचा म्हणुन हा प्रतिसाद !!
अवांतरः
लै लै भारी जमलीये कविता !!
6 Mar 2009 - 3:26 pm | विनायक प्रभू
इब्लिस भट
6 Mar 2009 - 3:27 pm | मिंटी
कविता मस्तच बरं का... आवडली. :)
6 Mar 2009 - 4:00 pm | मृगनयनी
भटो.... मस्त आहे हो कविता.!.
अनेकांना सावधानतेचा इशारा मिळाला असावा!, अशी माफक अपेक्षा आहे! ;)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
6 Mar 2009 - 3:32 pm | सखाराम_गटणे™
कधी भेटता कोणी खमका
एकजुटीने घालू वार
क्लासच.
मानले भटा तुला
----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
6 Mar 2009 - 3:35 pm | आनंदयात्री
तुला नाय रे तो खमका म्हणाला !!
6 Mar 2009 - 3:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
करून हसले! =))
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
6 Mar 2009 - 3:39 pm | सखाराम_गटणे™
तुम्ही संपादक लोक, काहीही करु शकता.
----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
6 Mar 2009 - 3:38 pm | सखाराम_गटणे™
चला, माझ्या आमच्यावर वार होतात म्हणाय्चे.
जरी आम्ही खमके नसलो तरी.
आम्ही कसले खमके??
आमच्या थोडीच कंपु आहे.
----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
6 Mar 2009 - 4:02 pm | अवलिया
पळा !! पळा रे पळा !!
आभाळ पडलय !! आभाळ पडलय !!!
असे करत जंगलभर धावणारा भित्रा ससा अचानक आठवला ब्वॉ !!!! :)
--अवलिया
6 Mar 2009 - 5:08 pm | सखाराम_गटणे™
>>असे करत जंगलभर धावणारा भित्रा ससा अचानक आठवला ब्वॉ !!!!
=)) =))
मस्तच आवडले
----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
6 Mar 2009 - 4:29 pm | विसोबा खेचर
हलकीफुलकी कविता आवडली परंतु,
कंपूबाजीची ध्वजा सदोदित
मिसळपाववर उंच धरा रे
या ओळी खटकल्या. मीदेखील चार संस्थळं वावरलो आहे आणि कम्पूबाजी हा प्रकार मला सर्वत्रच पाहायला मिळाला. त्यामुळे एकट्या मिपाचंच नाव घेण्याऐवजी कंपुबाजीच्या संदर्भात मिपा ऐवजी मराठी आंतरजालाचा उल्लेख आला असता तर कविता अधिक व्यापक वाटली असती..
असो,
मिपाला नावं ठेवणार्यांची काही कमी नाही. वरील ओळीदेखील मिपावरच राहतील..
चालू द्या..
तात्या.
--
स्वत:च्या खिशाला अक्षरश: हजारो रुपयांची चाट लावून झक मारली आणि मिपा काढलं ते मिपावरच मिपाचे आरोप वाचायला! चालायचंच, हा तात्या सगळ्याच मिपाद्वेष्ट्यांना अंगाखांद्यावर खेळवत पुढे जाईल हे निश्चित!
6 Mar 2009 - 4:43 pm | आनंदयात्री
>>मिपा ऐवजी मराठी आंतरजालाचा उल्लेख आला असता तर कविता अधिक व्यापक वाटली असती..
या मुद्द्याशी सहमत आहे. पण कवीने आंतरजाल इक्वल टु मिपा असा व्यापक दृष्टिकोण ठेउन लिहले असावे असेही मानण्यास जागा आहे. जणु कवीच्या भावविश्वात मिपा सोडुन दुसरे मराठी संस्थळ नसावेच.
तरीही एक कविता म्हणुन एस्टाब्लिश व्हायला तात्यांनी सुचवलेला बदल व्हावा असे वाट्ते.
-
(सहमत)
आंद्या
6 Mar 2009 - 4:45 pm | विसोबा खेचर
जणु कवीच्या भावविश्वात मिपा सोडुन दुसरे मराठी संस्थळ नसावेच.
अस असेल तर फारच उत्तम! माझे शब्द मी मागे घेतो.. :)
आपला,
(मनमोकळा) तात्या.
6 Mar 2009 - 4:51 pm | छोटा डॉन
यात्रीचा आणि तात्यांचा संवाद वाचुन मला मी एक मिपाकर असल्याचा अभिमान वाटला.
असेच चालु राहु द्यात ...
माफक थट्टामस्करी, शाब्दिक चिमटे वगैरे चालते, नव्हे असायलाच हवे. तरच ह्या आभासी दुनयेत मज्जा आहे.
मात्र ह्याचा कधी कडेलोट होऊन कुस्करी होणार नाही ह्याची काळजी घेणे फार महत्वाचे असते.
नेमके हेच इथे जागरुक आणि हुशार असे सन्मानयीन मिपाकर नेहमीच करत असतात व त्यामुळे मिपावरील वातावरण दिलखुलास व नव्या लेखनाला प्रोत्साहन देणारे राहिले आहे, ह्याचाही आम्हाला अभिमानच आहे.
हे सर्व असेच राहो अशीच सदिच्छा ...!!!
अवांतर : विषयाला सोडुन हा प्रतिसाद आहे खरा पण अगदीच रहावले नाही म्हणुन दिला. ह्याउपर संपादकांची मर्जी ...
------
( अभिमानी मिपाकर )छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
6 Mar 2009 - 4:54 pm | आनंदयात्री
मिसळपाव डॉट कॉमचा .. विजय असो !!
तात्या अभ्यंकराचा .. विजय असो !!
अन फोकलिच्या
छोट्या डॉनाचाही .. विजय असो !!
:)
6 Mar 2009 - 6:44 pm | विसोबा खेचर
मिसळपाव डॉट कॉमचा .. विजय असो !!
खरं आहे. मिपाची ध्वजा उंच धरण्याबद्दल कवीनेही सांगितले आहेच!
तात्या.
6 Mar 2009 - 6:48 pm | विसोबा खेचर
नेमके हेच इथे जागरुक आणि हुशार असे सन्मानयीन मिपाकर नेहमीच करत असतात
जागरुकता किंवा संवेदनशीलता प्रत्येकाची वेगळी असते..
एकाला जो मुद्दा गंभीर आणि संवेदनशील वाटेल त्याबद्दल कदाचित दुसर्याला काहीच वाटणार नाही आणि कदाचित तो वा! वा! छान! छान! असं म्हणून मोकळाही होईल!
चालायचंच!
तात्या.
6 Mar 2009 - 7:12 pm | टारझन
क वि ता आवडेश रे भटा ... एकदम क्लास .. कवितांच्या कॉलम मधे आम्ही कधी घुसत नाही पण आपल्या कंपुबंधूचं म्हणून पाहिलं ..
अवांतर : एकाला जो मुद्दा मजेशीर हल्काफुल्का वाटेल त्याबद्दल कदाचित दुसर्याला बराच काही वाटेल आणि कदाचित तो त्याला हिण आणि हिडिस असं म्हणून मोकळाही होईल!
चालायचंच!
(हळूच चिमडे काढणारा) टार्या
मिसळपाव व्यतिरिक्त आमचा कोठेही आयडी वापरात नाही.
6 Mar 2009 - 7:20 pm | विसोबा खेचर
अवांतर : एकाला जो मुद्दा मजेशीर हल्काफुल्का वाटेल त्याबद्दल कदाचित दुसर्याला बराच काही वाटेल आणि कदाचित तो त्याला हिण आणि हिडिस असं म्हणून मोकळाही होईल!
अगदी खरं! आम्ही सहमत आहोत..
अवांतर - परवाच आमच्या नाकाला मिरच्या झोंबल्या होत्या. अजून आग होते आहे! :)
आपला,
(३८७३ सभासदांना एकत्र आणणारा कंपूबाज!) तात्या.
6 Mar 2009 - 8:06 pm | सखाराम_गटणे™
बजबजपुरी: 278
मी मराठी: 97
उपक्रम, मनोगत, मायबोली; माहीती सापडली नाही.
----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
7 Mar 2009 - 5:59 am | धमाल नावाचा बैल
बजबजपुरी: 278
मी मराठी: 97
ह्याचा इथे काय संबंध? की राजेंनी तुमचं भांडं फोडलं म्हणून हा केविलवाणा प्रयत्न?
गटणे, बाकीच्या संकेतस्थळांची आकडेवारी गोळा करण्यापेक्षा स्वत:ची डागाळलेली इमेज सुधारा जरा.
आयपी ऍड्रेस चोरणे आणि मिपा वरच्या महिला सदस्यांना चावट मेसेज पाठवणे असल्या उद्योगांनी तुमचे खाते एकदा उडालेले आहे. जरा चड्डीत रहायला शिका :D
7 Mar 2009 - 2:00 am | घाटावरचे भट
यात्रीसाहेब आमच्या कंपूमधील असल्याने त्यांना आमचे विचार लगेच समजले. आम्ही मिपा सोडून इतरत्र फार कुठे नसतो. त्यामुळे आंतरजालीय कंपूबाजी म्हटल्यावरही आमच्या डोळ्यापुढे मनोगत, उपक्रम, बजबजपुरी इ. नावे न येता मिपाच आले. असो.
कवीचे भावविश्व हीच कवितेच्या अभिव्यक्तीची मर्यादा आहे असं कोणीतरी म्हटलंच आहे, त्यामुळे आमच्या मर्यादित भावविश्वाची अभिव्यक्ती असलेले हे ४ तोडकेमोडके शब्द तसेच राहातील. बाकी मनात कोणाहीविषयी कोणतेही किल्मिष नाही.
शेवटी डिसक्लेमर टाकूनही ब्लडप्रेशरं वाढायची ती वाढतातच.
7 Mar 2009 - 11:02 am | टारझन
ऑफकोर्स भटा ... शिग्रेटाच्या पाकिटांव वैधाणिक इशारा असतोच की ... पब्लिक फुकायचं थोडीच थांबतं ... डिस्केमर्स फक्त फॉर्मॅलिटी आहे ..
9 Mar 2009 - 1:47 am | chipatakhdumdum
स्वत:च्या खिशाला अक्षरश: हजारो रुपयांची चाट लावून झक मारली आणि मिपा काढलं ते मिपावरच मिपाचे आरोप वाचायला! चालायचंच, हा तात्या सगळ्याच मिपाद्वेष्ट्यांना अंगाखांद्यावर खेळवत पुढे जाईल हे निश्चित!
वा वा तात्या, आमची उर्सुला म्हैस आणि तुम्ही, बहुतेक एकाच गावातले,
ती सुद्धा परवा सान्गत होती,
आमच्या अजिबात बोक्याला दूध पाहीजे, म्हणून ती फळायला हो म्हणते..
6 Mar 2009 - 4:30 pm | कवटी
बहारदार कविता.... मजा आली वाचताना...
कवटी
6 Mar 2009 - 4:53 pm | प्रकाश घाटपांडे
चला घाटावर्च्या भटाने चांगलाच घाट घातलाय. मस्त रे!
घाटावरचा पांडे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
6 Mar 2009 - 5:03 pm | यशोधरा
भटोबा :)
6 Mar 2009 - 6:02 pm | परिकथेतील राजकुमार
प्रतिसाद राखुन ठेवत आहे ! कंपु मध्ये ठरेल त्या प्रमाणे पुढिल प्रतिसाद मिळेल !
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
6 Mar 2009 - 7:00 pm | ब्रिटिश टिंग्या
परा, काय प्रतिसाद ठरवला रे कंपुने?
काही वेगळा की नेहमीसारखा +१, +२, +३ .........+२७,+२८ इ.इ.?
6 Mar 2009 - 7:11 pm | शितल
:)
7 Mar 2009 - 1:42 pm | धमाल मुलगा
तोडलंस रे भटा तोडलंस :)
एक नंबर! बाकी तुमच्या काव्यप्रतिभेबद्दल आम्ही पामरानं काय बोलावं?
साक्षात सर्किटकाकांशी काव्य-जुगलबंदी खेळणारे तुम्ही.....
मस्त जमली आहे रे प्रासंगीक कविता.
<तुला अजुन श्रीखंड हवं आहे का? :P >
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
6 Mar 2009 - 6:27 pm | मदनबाण
भटोबा लयं भारी !!! :)
मदनबाण.....
Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
6 Mar 2009 - 6:40 pm | सूहास (not verified)
सुहास..
आता मी "अजुन"काय करू ?
6 Mar 2009 - 6:42 pm | विसोबा खेचर
हे लिखाण केवळ ह. घेण्याकरिता असून त्यातून कोणतेही गर्भित अर्थ किंवा संदर्भ काढण्यात आल्यास (आणि पर्यायाने सदर व्यक्तीचे ब्लड प्रेशर वाढल्यास) त्याची जबाबदारी संपूर्णपणे तसे अर्थ किंवा संदर्भ काढणार्या व्यक्तीवर राहील.
ते तर आहेच!
आपला,
(जबाबदार!) तात्या.
6 Mar 2009 - 8:11 pm | चतुरंग
एकदम 'अभ्यासपूर्ण' कविता आहे! ;)
चतुरंग
6 Mar 2009 - 8:21 pm | सखाराम_गटणे™
एकदम सत्य परी स्थीती सांगितली आहे.
----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
8 Mar 2009 - 10:13 pm | केशवसुमार
रंगाशेठशी सहमत आहे..
(कंपुतल्या माणसाचा प्रतिसाद शोधून सहमत)केशवसुमार
6 Mar 2009 - 9:05 pm | नंदन
कविता, (अ. ग.) भटो :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
7 Mar 2009 - 2:04 am | घाटावरचे भट
सर्व वाचकांचे, प्रतिसाददात्यांचे आणि अर्थातच आमच्या सर्व कंपू म्येंब्रांचे मनापासून आभार.
- भटोबा
7 Mar 2009 - 2:17 am | बिपिन कार्यकर्ते
यू आर वेल्कम!!!
म्येंबर बिपिन कार्यकर्ते
7 Mar 2009 - 2:06 am | शिवापा
माझ्या एकट्याच्याच कंपूला आवडली हि कोबिता!
7 Mar 2009 - 2:22 am | देशपांडे१
छान आहे कविता.
विषय योग्य शब्दात मांडला आहे.
कंपूबाजीमुळे वैचारीक म्रुल्य ढासळते. कल्पकता , व्यापक द्रुष्टीकोन जाउन एक प्रकारे कंपूबाजांचे कुंपन तयार होते.
असो व्यक्ति तितक्या प्रवुत्ती
सन्मय देशपांडे
भावनांचा आभाव अस्ल्यास आणि शब्दांचे भांडवल व विचारांची गूतवणूक संपल्यास अस्थिरता जाणवते व ईथेच अस्तित्वासाठी कंपूच्या राजकारणाची सूरूवात होते.
7 Mar 2009 - 4:10 pm | प्रदीप
नियमां सार्या टांग मारुनी
प्रतिसादांची लावू रांग
टांग हा शब्द असलेली मी तरी वाचलेली ही दुसरीच कविता.
पहिली:
"जिथे मारते कांदेवाडी
टांग जराशी ठाकुरद्वारा" --- बा. सी. म.
बाकी तुमचे चालू दे.
7 Mar 2009 - 6:31 pm | मुक्तसुनीत
"रांग"शी जुळणार्या मर्ढेकरी ओळी :
अनोळख्याने ओळख कैसी
गतजन्मीची द्यावी सांग ?
कोमल ओल्या आठवंणींची
येथल्याच नच बुजली रांग
7 Mar 2009 - 7:30 pm | प्रदीप
आवडले!
23 Dec 2009 - 5:37 pm | दशानन
आजच्या सद्य परिस्थीतीमध्ये ही कविता चपखल बसते असा माझा कयास आहे ;)
©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
23 Dec 2009 - 9:43 pm | प्रकाश घाटपांडे
मप्ली तर खात्री हाये! अगदी नीट्ट बसते! कुनी उकरुन काल्ढी
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
2 Nov 2015 - 11:14 pm | टवाळ कार्टा
चायला =))