काय..? कुठे..? कधी..? (पुणे)
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
काय..? कुठे..? कधी..? (पुणे)
अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात.
(आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात)
तर.. पुण्यात होणार्या अशा कार्यक्रमांची माहिती या धाग्यावर एकत्र करूया.
मी प्रतिसादातून सुरूवात करतो आहे.
काही मुद्दे..
१) अन्य शहरातील मंडळींनी कृपया वेगळा धागा काढावा - हे केवळ कार्यक्रम शोधणे सोयीचे पडावे म्हणून.
"""अन्य कोणताही उद्देश नाही"""
२) या कार्यक्रमांना जोडून कट्टा झालाच पाहिजे असा आग्रह नाही. कार्यक्रमाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे इतकाच या धाग्याचा उद्देश आहे.
३) कार्यक्रमासंदर्भात शक्य तितकी माहिती देण्याचा प्रयत्न करावा. वेळ, ठिकाण, आयोजकांचा संपर्क क्रमांक (गरज असल्यास) वगैरे माहिती असावी. नसली तरी हरकत नाही, कोणीतरी शोधून प्रतिसादातून भर घालेलच.
४) पुणे म्हणजे पिंपरी चिंचवड, उपनगरे असा सर्व भाग गृहीत धरावा. जवळच्या एखाद्या गडावरील कार्यक्रमही या धाग्यावर देण्यास हरकत नाही.
५) मिपाव्यवस्थापनाचा आणि या उपक्रमाचा काहीही संबंध नाही - हे ही एक.. असावे म्हणून. ;)
आणखी काही सूचना असल्यास स्वागत आहे.
प्रतिक्रिया
आजुन कुठे मिळेल...
Pagination