कोषातून बाहेर (Ice-Breaker)

राघवेंद्र's picture
राघवेंद्र in जनातलं, मनातलं
15 Mar 2016 - 12:56 am

मला लोकांसमोर बोलायला आवडते. (No Stage Fear)
मला २-३ तासांच्या कार्यक्रमाचे सूत्र-संचालन करता येते. (Host a Meeting)
मला लोकांच्या विचारावर अभिप्राय, टिप्पणी करायला आवडते. (Evaluation)
मी कोणत्याही प्रश्नावर उत्स्फूर्त १-२ मिनिटे मत देऊ शकतो. (Impromptu Speech)

या वरील एखादे वाक्य तुम्हाला लागू होत नसेल तर पण लागू व्हावे असे वाटत असेल
तर जगभरात या विषयावर एक संस्था कार्यरत आहे आणि तिचे नाव Toastmasters International. ही ना नफा - ना तोटा या तत्वावर चालणारी संस्था आहे. हि संस्था जगातील पहिल्या क्रमांकाची संभाषण व नेतृत्व गुण विकास करणारी संस्था असून तिचे ३३२,००० सभासाद १५४०० क्लब मधुन १३५ देशात आहेत. अधिक माहिती साठी इथे पहा.

नवीन वर्षाचा एक उपक्रम म्हणून जानेवारी मध्ये मी घराजवळील क्लब मध्ये पाहुणा सदस्य (फुकट प्रवेश असतो ) म्हणून गेलो. कार्यक्रमाचे स्वरूप असे होते.

साधारणपणे २५-३० सदस्य क्लब मध्ये हजर होते. सुरुवातीला पाहुणे सदस्याशी विचारपूस करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. Toastmaster of Day (सूत्रसंचालक) हा कार्यक्रमाची सुरुवात करून, बाकीचे सभासद आपले भूमिका(रोल) सांगतात जसे की
Word of Day भूमिका(रोल) - नवीन बोलताना वापरण्याजोगा शब्द सांगणे व जो पुढील भाषणामध्ये प्रत्यकाने वापरण्याचा प्रयत्न करायचा,
Joke of Day, Thought of Day भूमिका - हे पात्र सर्व सदस्यांना स्टेज कडे केंद्रित करायला मदत करतात. तसेच त्या पात्राला स्टेज वर बोलायची संधी मिळते.
Am- Counter - हे पात्र संपूर्ण कार्यक्रमात प्रत्येकाने किती वेळा Am असा उच्चार, एखादा शब्द किती वेळा परत परत वापरला याची नोंद करतात.
Timer- हे पात्र प्रत्येक जण किती वेळ बोलतात याची नोंद करतात. तसेच भाषण, अभिप्राय लांबले की खुणेने सांगतात.

त्यानंतर वेगवेगळ्या विषयावर सभासद त्यानी तयार केलेली भाषणे सादर करतात. भाषणाला विषयाचे बंधन नसते पण भाषण द्यायची पध्दत, वेळेचे नियोजन, विषयाचा अभ्यास यासाठी मार्गदर्शक तत्वे असतात्त. साधारणपणे एक भाषण ५-७ मिनिटाचे असते व ते झाल्यावर १ मिनिटे अभिप्राय लिहायला असतो. एका कार्यक्रमात ३-५ भाषणे असतात. त्यानंतर Table Topics हा प्रकार ज्यात पाहुणे सदस्य व सदस्य भाग घेऊ शकतात. या मध्ये सूत्र-संचालक एक विषय देतात. पुढे आलेल्या सदस्याला १-२ मिनिटात आपले मत प्रदर्शित करायचे असते. येथे विषय काय असेल हे माहित नसल्याने उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा लागतो. साधारणपणे ८-१० सदस्य यात भाग घेतात. त्यानंतर छोटासा ब्रेक घेऊन कार्यक्रमाचा उत्तरार्धात प्रत्येकाच्या भाषणावर एक स्वतंत्र अभिप्राय एखाद्या सदस्य कडून दिला जातो. तसेच Ah-Counter, Timer आपल्या नोंदी सांगतात. General Evaluator कार्यक्रम कसा झाला याचा अभिप्राय देतो. त्यानंतर सगळ्यांनी दिलेल्या मता नुसार प्रथम क्रंमाक आलेल्या वक्त्यास, उत्स्फूर्त प्रतिसाद देणाराल्या बक्षीस देऊन कार्यक्रमाची सांगता होते.

सुरुवात कशी करावी:
नेतृत्व गुण (Competent Leadership) - कार्यक्रमात केलेल्या भूमिका (Toastmaster, Table Topics Master, Evaluator, Ah Counter, Timer) या आपले नेतृत्व गुण विकसित करायला मदत करतात आणि ते कसे करायचे याचे मार्गदर्शक पुस्तिकेत लिहिलेले असते. तसेच आपण केलेली भूमिका आपण एखाद्या सदस्याकडून लिखित स्वतंत्र अभिप्राय घेऊ शकतो.
संभाषण गुण (Competent Communication Track) - याच्या १० पायऱ्या आहेत. पहिली पायरी म्हणजे सहज आपल्या बद्द्ल ४-६ मिनिटे बोलणे. यातून क्लबला आपली ओळख होते. पुढील पायरी मध्ये भाषणची सुरुवात व शेवट कसा करावा, Visual Aid चा वापर कसा करावा, प्रेक्षकातून अभिप्राय कसा घ्यावा अश्या १० पायरया आहेत. पत्येक पायरी वर एक सदस्य लिखित स्वतंत्र अभिप्राय देतो. या रितीने आपण Stage Fear कमी करू शकता

हा असा कार्यक्रम मला नवीन विषयाची माहिती, नवीन मित्र तसेच संभाषण -नेतृत्व गुणा बद्दल अभिप्राय (Feedback) देत आहे. याच्या पहिल्या पायरीचे नाव Ice-Breaker असे आहे. मागच्या आठवड्यात मी माझी पहिली पायरी पार केली व आता पहिला लेख मिपा वर लिहित आहे.
खूप मित्रांना या क्लबचे नाव माहिती होते होते पण क्लब कसा चालतो ह्या माहितीसाठी हा लेख.
तसेच आपल्या मिपाकरा कडून अभिप्राय /अनुभव ऐकण्यास उत्सुक !!!

वावरसमाजजीवनमानतंत्रप्रकटनविचारप्रतिसादआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखअनुभवशिफारसमाहितीसंदर्भविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

15 Mar 2016 - 1:27 am | श्रीरंग_जोशी

या क्लबबद्दल प्रथमच कळले :-) .

मोलाच्या माहितीसाठी धन्यवाद.

महासंग्राम's picture

15 Mar 2016 - 9:23 am | महासंग्राम

कुठे असतो हा क्लब … जगातल्या प्रत्येक बाबतीत स्वातःचे मत असलेल्या पुण्यात नक्कीच नसावा :)

राघवेंद्र's picture

15 Mar 2016 - 9:50 am | राघवेंद्र
महासंग्राम's picture

15 Mar 2016 - 10:12 am | महासंग्राम

धन्स रे राघवा

बर्‍याच आयटी कंपनी मध्ये हा क्लब कार्यरत आहे.

इंग्रजीतूनच बोलावे लागते का ?

राघवेंद्र's picture

15 Mar 2016 - 10:04 am | राघवेंद्र

हो. बहुतेक क्लब हे इंग्रजीतुन काम करतात. तरी जवळच्या क्लब मध्ये जाऊन या.

भाऊंचे भाऊ's picture

15 Mar 2016 - 10:01 am | भाऊंचे भाऊ

व्यासपीठ जिंकु शकतो कारण इथे कोण काय काउंट करेल अन रोखठोक अभिप्राय देइल याचा नेम नाही पण मला लेख अन संकल्पना आवडली... आयस ब्रेकर. कुल.

रच्याकने तिथे कंपूबाजी शिकवत नसतील तर नेत्रुत्वगुन विकसित होणार नाहित याची नोंद घ्यावी

राजाभाउ's picture

15 Mar 2016 - 10:09 am | राजाभाउ

अरे वा. चांगल आहे की. माहीती बद्दल धन्यवाद.

नीलमोहर's picture

15 Mar 2016 - 10:32 am | नीलमोहर

असे उपक्रम शाळा, कॉलेजेस पासूनच सुरू करण्याची नितांत आवश्यकता आहे. बाहेरच्या जगात आत्मविश्वासाने वावरण्यासाठी या सर्व गोष्टी खूप गरजेच्या आहेत.
छान उपक्रम आणि माहिती. अभिनंदन आणि धन्यवाद.

क्रेझी's picture

15 Mar 2016 - 10:52 am | क्रेझी

वाह छान माहिती दिलीत ह्या नविन गोष्टीबद्दल. त्यांच्या साईटवर पुण्यामधले क्लब्स चेक केले तर ३३ आहेत असं समजलं. ब-याच आय.टी. कंपन्यांमधे पण आहेत असं दिसतं.

सस्नेह's picture

15 Mar 2016 - 10:59 am | सस्नेह

पुणेमुंबई बाहेर कुठे आहेत का हे क्लब्ज ?

बाळ सप्रे's picture

15 Mar 2016 - 11:05 am | बाळ सप्रे

मस्त राघवेंद्र !!
तुला पुढच्या पायर्‍यांसाठी शुभेच्छा.. टोस्टमास्टर राघवचा व्हिडीओ पहाण्यास / ऐकण्यास उत्सुक.. :-)

राघवेंद्र's picture

15 Mar 2016 - 6:56 pm | राघवेंद्र

धन्यवाद बाला !!!

उणेकरांसाठी उत्तम आहे! ;-)

प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद !!!

पैसा's picture

15 Mar 2016 - 10:39 pm | पैसा

एका उपयोगी उपक्रमाची माहिती दिली त्यासाठी धन्यवाद!

बोका-ए-आझम's picture

15 Mar 2016 - 11:07 pm | बोका-ए-आझम

मुंबईत नक्की असेल. जाऊन बघेनच आता!

कुमार१'s picture

23 Dec 2021 - 7:51 am | कुमार१

छान उपक्रम !