राम राम मंडळी. मंडळी सर्वप्रथम '१ एप्रिल'च्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. मंडळी, आपण माहिती तंत्रज्ञानाचं नेहमी कौतुक करत आलो आहोत. वगैरे वगैरे.......
मंडळी, ऑर्कुट,फेसबूक, विविध मराठी संकेतस्थळे, चॅट, वाट्सअॅप आणि इतर सर्व सेवादात्यांनी संवादाच्या निमित्ताने प्रत्येक अॅप्लीकेशनने एकापेक्षा एक पाऊल पुढे टाकत आपल्या रोजच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे. मग ते राजकारण,समाजकारण आणि मग ते कोणतंही क्षेत्र असू द्या तिथे तिथे संवादाच्या माध्यमाने अनेकांना जखडून टाकलं आहे.
मराठी संस्थळं हे आंतरजालावरचं लोकप्रिय साधन. (नै काका हल्ली कट्टे जोरात चालतात असं म्ह्टलं तरी माझी हरकत नाही) लाखो करोडो लोक नेट कनेक्टेड असतील तर एकमेकांशी क्षणात जोडल्या जातात. जालजोडणी (इंटरनेट कनेक्शन) भ्रमनध्वनीवर सहज मिळू लागली. आणि खेड्यापाड्यापासून ते अगदी जगभरातल्या कोणत्याही मोठ्या शहराशी माणसं जोडल्या जाऊ लागली. आणि क्षणात संदेश पाठविता येऊ लागल्याने त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.
मंडळी, संवादाचं माध्यम मग ते कोणतंही असो त्याचं एकदा व्यसन लागलं की ते सुटणं अवघड होत जातं. मराठीसंस्थळांवर एकदा काथ्याकूट यायला लागले की नवीननवीन खूप आनंद वाटायला लागतो. आणि मग तेच तेच सुरु झालं की त्याचा कंटाळा यायला लागतो. राजकीय लोकांची, चित्रपट कलाकारांची, कोणा व्यक्तीची चांगली, व्यंगात्मक चलचित्र, चित्र, किंवा काही अश्लिल तसेच उत्तम माहितीपूर्ण गोष्टीही मराठी संस्थळांवर यायला लागली. विविध कंपू निर्माण झाले आणि मग लक्षात यायला लागतं की हे अति होत आहे, हे थांबवलं पाहिजे.
उदाहरण म्हणुन.... कशाला?????????????? सगळ्यांना म्हायते की! ;)
मराठी संस्थळांवर सर्वच वाईट नाही. काही कंपू चांगले असतील. काहींना खूप चांगले अनुभव असतील तर कोणाला वाईट अनुभव असतील. कोणी म्हणेल सरळ गमन करा, कोणी म्हणेल सरळ मराठी संस्थळांवर चपलांचा वापर करुन टा़का. कोणी म्हणेल वाईट लोक असतील तर त्यांना संपादक मंडळाची धमकी देऊन टाका, मंडळी, या सर्वच विषयावर मुक्त आणि भलीबुरी चर्चा, आणि एकमेकांचे अनुभव, उपाय, किस्से, एकमेकांना कळावे, म्हणुन हा प्रपंच.
विनंती : आमच्याकडे मराठी संस्थळ उघडत नाही, भारीतले ड्यु आयडी नाहीत वगैरे टाळता आले तर टाळावे.
(१.जास्त बदल न करावे लागल्याबद्दल प्रा. डॉ. सरांचे हार्दिक आभार.
२. मराठी संस्थळ च्या जागी आवश्यक तो बदल स्वतः करुन घेणे
३. उदाहरण म्हणून आजूबाजूच्या आयडींना व्यनि/ खरडी कराव्यात.)
सर्वांना पुन्हा एकदा 'फूल'ण्या 'फूलवण्या'साठी हार्दिक शुभेच्छा!
प्रतिक्रिया
1 Apr 2014 - 2:45 pm | सस्नेह
कुणाला 'फूल'वण्यासाठी ?
1 Apr 2014 - 3:04 pm | आशु जोग
नो मझा रे !
1 Apr 2014 - 3:07 pm | जेपी
मराठी संस्थळ . ऐक डोकेदुखी ?
खरच आहे . पण संस्थळ पैक्षा एखादा सदस्य डोकेदुखी ठरतो .
वरुन तो सदस्यच सांगतो माझ्याकडे लक्ष देत जाऊ नका .
1 Apr 2014 - 3:28 pm | स्वप्नांची राणी
+१०८...सध्या ईतकच!!
1 Apr 2014 - 4:34 pm | सानिकास्वप्निल
=))
+१११११
1 Apr 2014 - 5:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
:)
1 Apr 2014 - 3:09 pm | आत्मशून्य
अग फुलवा तु फुलवायचे की....
1 Apr 2014 - 3:18 pm | आदूबाळ
शिंगरू मेलं हेलपाट्यानं - असं नाही चालायचं ;)
1 Apr 2014 - 3:13 pm | अजया
=))
1 Apr 2014 - 3:22 pm | सूड
नारायण नारायण !!
1 Apr 2014 - 3:31 pm | मारकुटे
चान चान
1 Apr 2014 - 3:33 pm | प्यारे१
भावनाओंको समझो कुटे नाना ;)
लिमिटेड ;) कंपनी
1 Apr 2014 - 3:37 pm | मारकुटे
समज समजके समज को जो समजे मेरी समज से उसे समज हय
फाऊंडेशन ट्रस्ट
1 Apr 2014 - 3:40 pm | प्यारे१
:) :) :)
_/\_
1 Apr 2014 - 3:40 pm | कंजूस
ऑँ ? कोणाची डोकेदुखी ?वेळीच एक मिपा गोटी सोड्याबरोबर घेणे .
1 Apr 2014 - 3:44 pm | प्रचेतस
हभप प्यारेबुवा वाईकर आपली महान अध्यात्मिक प्रतिभा अशा विडंबनात वाया घालवीत असल्याचे पाहून मनापासून खेद वाटतो.
1 Apr 2014 - 3:54 pm | बॅटमॅन
गुढीपाडव्याचे आध्यात्मिक महत्त्व किंवा गेलाबाजार संतांची शिकवण आणि सण असा एखादा धागा अतिशय समयोचित झाला असता.
1 Apr 2014 - 3:56 pm | अत्रुप्त आत्मा
खाटुकशी अत्यंत सहमत आहे. =))
2 Apr 2014 - 8:55 am | चौकटराजा
बुव्बाशी सहमत होने भाग आहे . आमचा चाबरट कंपू आहे ना ? कट्टावाला !
1 Apr 2014 - 4:04 pm | प्रसाद गोडबोले
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ =))))
1 Apr 2014 - 4:16 pm | सूड
सहमत !! आध्यात्माचा सखोल असलेल्या व्यक्तीने आपली ऊर्जा वायफळ काथ्याकूटात दवडलेली बघून अंमळ हळहळ झाली. कसं होणार आता !!
1 Apr 2014 - 4:54 pm | प्यारे१
:)
1 Apr 2014 - 5:34 pm | स्वप्नांची राणी
>>>आध्यात्माचा सखोल असलेल्या व्यक्तीने....>>> आँ...काय सखोल?
अवांतरः गुढी पाडवा आणि नीट बोल गाढवा... असं का म्हणत असावेत? *unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz: *give_rose* @}->-- @}-:-- @>}--,-`--- (F) (f) @}->--
1 Apr 2014 - 5:45 pm | सस्नेह
कुणाचं ?
तुमचं की प्यारेभौंचं की मिपाचं..??
2 Apr 2014 - 3:01 am | स्पंदना
कस होणार आता? :(
1 Apr 2014 - 3:59 pm | प्यारे१
:) आपणास खेद वाटल्याबद्दल खेद वाटला. :)
1 Apr 2014 - 4:11 pm | पैसा
ज्या गोष्टींपासुन डोकेदुखी होईल अशा गोष्टींच्या नादी लागायची सवय सोडणार नाहीत आवले !!!!
- सा र काडी
1 Apr 2014 - 4:15 pm | प्यारे१
>>> सा र काडी
चान चान! कबूल केलेत तर ;)
1 Apr 2014 - 4:23 pm | पैसा
आहे ते आहे! आम्ही तसेच्च!
1 Apr 2014 - 4:18 pm | अत्रुप्त आत्मा
@ सा र काडी>>>
1 Apr 2014 - 5:18 pm | किसन शिंदे
हौ ना पैताय. निग्रह करून करून मोडतात प्यारेकाका. :-)
1 Apr 2014 - 5:14 pm | जोशी 'ले'
सद्यस्थितीत मराठी संस्थळं हे 80% चांगले म्हणता येईल व 20% त्रासदायक म्हणता येईल. चांगल्या आणि वाईट या दोन्हीसाठीची कारणे तुम्ही आधीच वर दिलेली आहेत. कंपुमधुन बाहेर पडणं म्हणजे तिथल्या लोकांवर/कंपुंवर निषेध व्यक्त करणं हा एक नविन प्रकार सध्या फार वाढीस लागला आहे. काही मोजके कंपु वगळता मी ही बरेचश्या कंपुंमधून बाहेर पडलोय. :-)
1 Apr 2014 - 5:20 pm | किसन शिंदे
=))
जोशीब्वाॅ, यु टू??
1 Apr 2014 - 6:08 pm | रेवती
काय डोकेदुखी आहे राव!
सध्या स्वयंपाकाचं काम कमी झालेलं दिसतय यांचं!
नैतर एवढा वेळ कधी मिळाला नव्हता! ;)
1 Apr 2014 - 8:14 pm | प्यारे१
साडेसात मिन्टात केलंय विडंबन.
आहात कुठं? व्हेअर यु आर?
बोअर झालेलं. डोक्याला खुराक हवा होता.
मिपा उघडून बघितलं तर प्रा. डॉंं. चा लेख आत.
म्हटलं त्याचाच कच्चा माल करावा. चविष्ट नाहीये फार पण पोट भरल्याशी कारण!
(वेळेला केळी खाणारा) प्यारोजीराव एकलोकेकर
2 Apr 2014 - 8:58 am | चौकटराजा
एकलोकेकर म्हणजे एकाच लोकेशनवर नजर ठेवून रहाणारा ! नक्की एकच लोकेशन का ?
1 Apr 2014 - 8:23 pm | विकास
रेवतीताईंशी सहमत. सध्या स्वयंपाकाचं काम कमी झालेलं दिसतय यांचं! :)
1 Apr 2014 - 8:29 pm | प्यारे१
हम स्वयंपाक करेगा तो कूक क्या करेगा?
-फक्त रेशनिंगचा वाटा देणारा ;) प्यारे
2 Apr 2014 - 3:12 am | स्पंदना
स्वैपाकाच काम कमी झालय हे तर खरच्,पण त्याबरोबर झोप ही कमी झाली आहे हे आलं का लक्षात? ;)
1 Apr 2014 - 6:47 pm | कंजूस
भुताचा सिनेमा पाहावत नाही आणि फार वेळ मान वळवता येत नाही उत्सुकता आहेच पुढे काय होतंय ?पावलं उलटी आहेत का सुलटी आहेत .