पण तुमचं आमचं सेम नसतं..

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
30 Dec 2010 - 11:19 am

प्रेम म्हणजे प्रेम असतं पण तुमचं आमचं सेम नसतं..

कॊलेजच्या शेवटच्या वर्षी मी प्रेमात पडल्याची मला खात्रि झाली होती आणि ती माझ्या मित्रांना पण असेल असं मला वाटत होतं. मी माझ्या आठवणींवर जोर दिला तेंव्हा असं लक्षात आलं की, हे सगळे मागच्या वर्षी म्हणजे दुस-या वर्षी सुरु झालेलं होतं. एका दिवशी माझा शर्ट आणि तिचा टॊप सेम टु सेम डिझाईनचा होता, काही मित्रांनी त्यावरुन चिडवलं आणि मनातल्या त्या कोमल प्रेमाच्या भावना वाढीस लागल्या. आमच्या कॊलेजातलं वातावरण फार मोकळं वगॆरे नव्हतं पण मुलं+मुली अशा शाळेच्या वातावरणातुन इथे आलेला मीच होतो, बाकी माझ्या ग्रुपचे सगळे फक्त मुलांच्या शाळेतुन आलेले होते.

प्रॆक्टिकल वगॆरे आम्ही एकत्रच असायचो तरी सुद्धा फार बोलणं वगॆरे नव्हतंच, फक्त समोर बसणं, कधीतरी फाईल, सबमिशन या वरुन बोलणं व्हायचं तेवढंच. तरी पण असं वाटायचं की आता जे मला वाटतंय तेच तिला पण वाटत असणार आहे. अशा विचारात एक वर्ष कसं गेलं ते कळालंच नाही. त्या वेळी १४ फेब्रुवारी पेक्षा १४ नोव्हेंबरलाच अजुन जास्त महत्व होतं निदान आमच्या लेखी तरी. नाही म्हणायला मी एकदा आमच्या वर्गातल्या सगळ्या मुलींना आमच्या घरी नाष्ट्याला बोलावलं होतं, ती पण आली होती.

त्यादिवशी त्या सगळ्यांना सोडायला गेल्यावर गेलाबाजार दोस्तीचा तरी विषय काढायचा असा माझा विचार होता, पण ते सोलापुरातले रस्ते, रहदारी छे सगळंच माझ्या नशीबाच्या विरोधात होतं. हात हलवत आणि पायडल मारत परत आलो घरी. पण तिस-या वर्षी मात्र एकदा घरुन कॊलेजला जाताना तिच्या रस्त्यावरुन गेलो होतो, बरोबर तो रस्ता आधी ब-याच वेळा पाहुन ठेवलेला होता, दोघंही सायकलवर, नव्हं एकाच नाही आपल्या आपल्या, मागुन जात असताना सायकल जरा जोरात दामटली आणि तिच्या बरोबर जाउन तिला विचारलं, मुझसे दोस्ती करोगी?

आणि काय सांगु मंडळी माझा अंदाज कधी नव्हे ते बरोबर आला, अगदी मनकवडी होती ती, लगेच माझ्या मनातलं ओळखुन बोलली ती हं............... नाही. आज लक्षात येतंय की हिंदीतुन विचारलेल्या माझ्या प्रश्नाला तिनं दिलेलं मराठी उत्तर हे सध्या गाजणा-या भाषाप्रश्नाचं मुळ आहे. तिनं नाही म्हणल्याबरोबर मी ज्या स्पीडनं सायकल चालवली म्हणता की विचारयाची सोय नाही. त्या वर्षी कॊलेज संपताना आमच्या कडे स्क्रॆपबुक भरायची फॆशन होती, त्यात सगळ्यांच्या म्हणजे सगळ्या मुलींच्या स्क्रॆपबुकात एकच ओळ लिहिलेली होती - छोटीसी ये दुनिया पहचाने रास्ते हॆ तुम कही तो मिलोगे कभी तो मिलोगे तो पुछेंगे हाल....

नंतर त्यातल्या काही भेटल्या काही आजपर्यंत कधीच नाहीत, कधी भेटतील माहित नाही. आज जर तिनं हे वाचलं तर तिच्या पण मनांत त्या आठवणी उभ्या राहतील तशाच आणि एक रात्र जाईल अर्धवट झोपेत अर्धवट जागेत, तिची आणि माझी पण.

आज वाटतं जे मी केलं ते प्रेम नव्हतंच ते फक्त आकर्षण होतं, प्रेम तर अजुन होतंय, मी अजुन पर्यंत माझ्यावरच्या प्रेमातुनच बाहेर पडत नाहिये तर दुस-या कोणावर काय प्रेम करणार आहे.

हर्षद

वाचकांना नम्र विनंती बरा वाईट जो असेल तो प्रतिसाद द्यावा.

पुर्व प्रकाशित - http://harshad-gaaanikha.blogspot.com/

इतिहासकथाजीवनमानराहणीशिक्षणविचारअनुभवसल्लामाहितीवादविरंगुळा

प्रतिक्रिया

हर्षद....
मस्त लिहिलं आहेस रे...........

खरच बऱ्याच प्रेम कहाण्या या अधुऱ्याच राहतात....
(म्हणून वेळेवर प्रेम व्यक्त करा, भले समोरून नकार आला तरी चालेल)

-लवगुरू स्पावडेश्वर महाराज

रुद्रकर्ना's picture

16 Nov 2011 - 3:36 pm | रुद्रकर्ना

छान आहे

पियुशा's picture

30 Dec 2010 - 11:34 am | पियुशा

अरे मस्त लिहिलय तु

महेश-मया's picture

30 Dec 2010 - 11:35 am | महेश-मया

संपले कॊलेजचे दिवस, आता आफिसात कोण भेटतात का ते पाह्तोय,
बाकि हर्षद.... छान लिहितात तुम्ही.

विनायक बेलापुरे's picture

30 Dec 2010 - 11:52 am | विनायक बेलापुरे

काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
येईल लवकरच ........ काळ कुणा साठी थांबत नाही. ;)

छाण आहे. णॉस्टॅल्जिक झालो ... :) कॉलेजात एका पोरीला फ्रेंडशिप विचारली .. दिसायला अगदीच साधारण होती. पण मी फ्रेंडशिप काय विचारली ती तर माधुरी दिक्षीतंच झाली ;) मला म्हणे "कशाला ? " मग त्या नंतर आम्ही नव्या माधुर्‍या बनवल्या नाही :)

-( अधुर्‍या माधुर्‍यांच्या आठवणींत ) टारझन

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

30 Dec 2010 - 5:19 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

हे असं "फ्रेंडशीप देणार का" असं का विचारतात देव जाणे.... ती काय द्यायची वस्तू आहे का?... देता का?... कशी किलो?.. असं विचारल्यासरखं वाटतं!
चुचु तुला विचारली होति का गं कोणी...फ्रेंडशीप देता का म्हणुन?
:)

पर्नल नेने मराठे's picture

30 Dec 2010 - 5:40 pm | पर्नल नेने मराठे

हो ग ;) मला बर्याच जणानी फ्रेंडशीप विचारली होती न म्हणे मी दिली असती तर ते लोक्स सत्यनारायणाची पुजा टाकणार होते

=)) =)) =))

मी एकाला दिली ग पण मग पुढे काही नाही जमले नाही :(

पर्नल नेने मराठे's picture

30 Dec 2010 - 12:15 pm | पर्नल नेने मराठे

आमचे पण बरेच शाहरुख होते..त्यांची आठवण झाली ;)

आमचे म्हणजे कितीजणींचे हो चुचुतै ?? ;)

पर्नल नेने मराठे's picture

30 Dec 2010 - 12:53 pm | पर्नल नेने मराठे

आमचे = स्वतला आदरार्थी संबोधले आहे.

शिल्पा ब's picture

30 Dec 2010 - 12:27 pm | शिल्पा ब

तुमचं हिंदी तिला कळलं नसेल...मराठीत विचारायला काय धाड भरली होती?

सहमत आहे. काही मुली खरोखर मंद असतात. समोरचा काय बोलतो ते बर्‍याचदा कळत नाही त्यांना.
मंद मुलीची णिवड केली हीच सगळ्यात मोठी चुक आहे असे येथे खेदाने णमुद करावेसे वाटते. :)

त्यापेक्षा जिच्याशी बोलायचंय तिला समजेल अशी भाषा शिकुन घ्या..बाकी मुली कदाचित मंद असतीलही....म्हणूनच बावळट मुलांना त्या मिळतात.

नगरीनिरंजन's picture

30 Dec 2010 - 12:45 pm | नगरीनिरंजन

खर्‍या प्रेमाला भाषेची गरज नसते म्हणतात. ते मुक्यानेच होते. (हे बर्‍याच मुलींना का कळत नाही?)
:-)

सहमत आहे. मंद आणि अक्कलशुन्य मुलींच्या मागे धावणारी पोरं बावळट नाही , महा बावळट असतात. फाट्यावर मारावं अशा पोरींना सरळ :)

शिल्पा ब's picture

30 Dec 2010 - 12:53 pm | शिल्पा ब

करुन करुन भागले अन.... ;)

टारझन's picture

30 Dec 2010 - 12:56 pm | टारझन

हे कोणासाठी होतं ? :)

मी मंद मुलींविषयी बोलंत होतो :) शिवाय ते मुलींविषयी असल्याने आंटीज ऑटोमॅटिकली कटऑफ होतात ;)

शिल्पा ब's picture

30 Dec 2010 - 12:59 pm | शिल्पा ब

अरे काय हे? तरुण मंद पोरी पटत नाहीत म्हणून आँटींच्या मागे? ;) अरेरे!!

टारझन's picture

30 Dec 2010 - 1:07 pm | टारझन

ख्या ख्या ख्या .. मंद पोरींच्या मागे पडंच कशाला ? साला तो महामंदते चा पुतळा पाहिल्यावर सगळ्या फँटसीज झोपतात पार =))

बाकी आपल्या वाक्यामुळे आंटीज ह्या मंद मुलींच्याही खालच्या पातळीवर आहेत ह्या वाक्याला पुष्टी मिळते ;)
आता मिपा वरच्या आंटिज पासुन देव तुमचे रक्षण करो ;)

अवांतर : चाळीशीतली आंटी बर्फी का काय तरी असते असं कोणत्या एका मराठी सिनेमात पाहिलं होतं. कुतुहल आहे ;)

- (क्युरिअस) टारझन

स्मिता.'s picture

30 Dec 2010 - 2:11 pm | स्मिता.

चाळीशीतली(की पस्तीस?) बाई बर्फी असते हे रमेश भाटकरने 'सवत माझी लाडकी' मध्ये मोहन जोशीला सांगितलंय. लहानपणी लई आवडलेला विनोदी सिनेमा होता तो!

पर्नल नेने मराठे's picture

30 Dec 2010 - 2:12 pm | पर्नल नेने मराठे

हल्ली 'बर्फी 'जाउन 'तुकडा' हा श्बद आलाय :|

शिव शिव्..काय हे शब्द..

स्मिता.'s picture

30 Dec 2010 - 2:24 pm | स्मिता.

'तुकडा' नाही आवडलं... तुकडा तोडल्यासारखं वाटतं :(
बर्फीच बरं होतं, गोड वाटतं!

स्पा's picture

30 Dec 2010 - 2:26 pm | स्पा

+१

तुकडा.. म्हणजे सुरमई आठवते...
बर्फी च मस्त वाटत

नगरीनिरंजन's picture

30 Dec 2010 - 2:29 pm | नगरीनिरंजन

काहींना 'खरवस'पण आवडतो.

पर्नल नेने मराठे's picture

30 Dec 2010 - 2:31 pm | पर्नल नेने मराठे

बापरे !!!

स्मिता.'s picture

30 Dec 2010 - 3:07 pm | स्मिता.

आयला! काय हे? कोणत्याही आवडत्या खाद्यपदार्थाचं नाव ठेवता की काय?

किचेन's picture

16 Nov 2011 - 5:31 pm | किचेन

हे भगवान!

नगरीनिरंजन's picture

30 Dec 2010 - 9:12 pm | नगरीनिरंजन

सहज डोक्यात एक विचार आला, चाळिशीतली बाई बर्फी असेल तर चाळिशीतला पुरुष काय? बर्फ?

पेढा कंस वाटतय?आणि गुलकंद हा शब्दही ऐकल्लाय कोणत्यातरी चित्रपटात! ;)

शिल्पा ब's picture

30 Dec 2010 - 12:52 pm | शिल्पा ब

काय म्हणता? :O :-O :shock: न बोलताच !! ....हल्लीची पिढी फार्फारच पुढे गेलीये म्हणायची..प्रेम बिम करण्यात ...

अर्धवटराव's picture

30 Dec 2010 - 11:53 pm | अर्धवटराव

>>खर्‍या प्रेमाला भाषेची गरज नसते म्हणतात. ते मुक्यानेच होते.

अहो पण फारशी ओळख-पाळख नसताना एकदम मुका कसा काय घ्यायचा ??

>>(हे बर्‍याच मुलींना का कळत नाही?)
बर्‍याच मुली नकोत हो... जीचा मुका घ्यावासा वाटला तिला कळलं आणि तिने दिला म्हणजे झालं...

(मुकेश) अर्धवटराव

खर्‍या प्रेमाला भाषेची गरज नसते म्हणतात. ते मुक्यानेच होते.

ननि, एकदम बरोब्बर बोललात बघा.... हर्षदराव...तिला एक मोका दे नाही म्हणावं वाटलं का?

पर्नल नेने मराठे's picture

30 Dec 2010 - 12:46 pm | पर्नल नेने मराठे

=)) =)) =))

(हुशार मुलगी)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Dec 2010 - 12:44 pm | निनाद मुक्काम प...

काय दिवस आठवण करून दिलेस यार
मयूर पंखी आठवणी
डोंबिवलीतील सोवळ्या वातावरणातून मुंबापुरीत राहायला व कॉलेजात शिकायला येणे हा एक सांस्कृतिक सुखद धक्का होता मला
फ्रेंड शिप डे च्या दिवशी खूप दिवस नेत्र पल्लवी चालू असललेल्या मला तिने आंग्ल भाषेत मुझसे दोस्ती करोगे हे भर वर्गात विचारले
दहावीचा निकाल ऐकतांना जसा पोटात गोळा आला होता तसा आला .अन घशाला कोरड पडली शब्द तोंडातून फुटेनासे झाले .(तिचे कोन्वेंत इंग्लिश पार डोक्यावरून गेले) मला गप्प पाहून ती हिरमुसली .आणि मी त्या दिवसापासून वर्गात बेप्पता झालो नि कट्टेकरी झालो .मग कळले त्या बिचारीला खूप वाईट वाटले माझ्या वागण्याचे (येथे आमच्या इंग्रजीचे वांदे होते हे कशाला तिला मी सांगू ? आणि माझा होता नव्हता तो अहं दुखाहून घेऊ ) आता वाटते .नेहमी खरे बोलावे असा बापूजींचा संदेश जर अमलात आणून माझी भाषिक व्यथा मी तिला सांगितली असती तर ....
बापू मी तुमचे सत्याचे प्रयोग तेव्हा वाचले नव्हते हो ,

पिवळा डांबिस's picture

30 Dec 2010 - 1:04 pm | पिवळा डांबिस

ती मुलगी श्री. एस के त्रिपाठींची मुलगी होती का?
नाहीतर कंसातल्या मजकुराचा या धाग्यात संदर्भ कळला नाही.....

चिगो's picture

30 Dec 2010 - 5:33 pm | चिगो

>>ती मुलगी श्री. एस के त्रिपाठींची मुलगी होती का?
नाहीतर कंसातल्या मजकुराचा या धाग्यात संदर्भ कळला नाही.....

अरारा... अवो पिडाकाका, फ्फॉक्कन फुटलो हो मी.... =))

परिकथेतील राजकुमार's picture

30 Dec 2010 - 3:08 pm | परिकथेतील राजकुमार

ती मुलगी श्री. एस के त्रिपाठींची मुलगी होती का?

क ह र ! =)) =)) पिडांकाका ती स्वाक्षरी आहे म्हणे त्यांची.

पण तुमचं आमचं सेम नसतं..

खरे आहे :P काहीना काही फरक असतोच.

स्पा's picture

30 Dec 2010 - 4:10 pm | स्पा

पण तुमचं आमचं सेम नसतं..

खरे आहे Tongue काहीना काही फरक असतोच.

पऱ्या हा कहर आहे..... छ्या फुटलोय

आपला प्रत्येक ठिकाणी दिसलेला कहर पाहुन आम्हाला अलिफ लैला मधला "डाकु कहरमान" आठवला ;)

- झा

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Dec 2010 - 4:02 pm | निनाद मुक्काम प...

स्वाक्षरी गडद अक्षरात कशी लिहायची ? खुपदा हा गोंधळ उडतो .
अडाणी
मुक्काम मुक्काम पोस्ट

सूर्यपुत्र's picture

30 Dec 2010 - 5:53 pm | सूर्यपुत्र

एका मस्त प्रसंगाची आठवण करून दिली आहे.
एकदा कॉलेजमधे एका मुलीने (जी सर्वांच्या दिलाची धडकन वगैरे होती );"Friendship Day" च्या दुसर्‍या दिवशी (कारण रविवार होता), मी कॉलेजमधे व्हरांड्यात निरीक्षण करत होतो, तेव्हा मला भर गर्दीत गाठले. आणि एकदम "Hi, Happy Friendship Day" म्हणत शेकहॅन्ड केला.
आजूबाजूला असणारे सर्वजण टुकुर-टुकुर बघताहेत.....
आणि आमच्या पोटातील मिक्सर सकाळचा ब्रेकफास्ट पचवण्याचे काम नॉर्मल स्पीडलिमिट कधीच क्रॉस करून शंभरपट वेगाने आपले काम करू लागला होता.....

आपली शाळा मुलींची आणि कोलेज बी मुलीन्च्च!त्यामुळे हि असली संधी कधी आलीच नाही. :(
कामावर मात्र पोर होती.स्मार्त व्हती,कधी नव्ह ती हुशार बी व्हती! त्यामुळच बा माझा रोज सकाळच्याला न सांच्याला घ्यायला यायचा मला.त्यामुळ इथ्बी की फायदा झाला न्हायी.शेवटी गयी जवानी पाणी मै .. :(

वपाडाव's picture

16 Nov 2011 - 5:46 pm | वपाडाव

तुम्ही तुमचं मन मोकळं केलंत हे फार्फार बरं केलं....

एक शंका :: आपल्या पिताश्रींनी कधी आपल्याला ड्वळ्याच्या झडपा उघडु दिल्या नाहीत, म्हणुन तर नाही तुम्ही हल्ली लग्न लावुन देण्याच्या बहाण्याने तरणे-चिकणे मुलं बघत असता....

वप्या,

लेका तुला पोचच नाही. अस गुपीत चारचौघात भसकन फोडायच असतं का?

- ('पोच'लेला) सोकाजी