नटांच्या सिक्स पॅकअॅब्जचे प्रदर्शन असू द्या किंवा नट्यांच्या पुष्ट उरोजांचे अर्धावृत्त दर्शन आजच्या चित्रपटातील हा मसाला भलताच चटकदार बनविला जातोय. याची चटक डोळ्यांना अशी लागते की कुठून कुठून लौल्यस्राव सुरु होतील याचा नेम नाही. सेन्सार मंडळच नेमके आतपर्यंत कोरडे ठणठणीत पडलेय की काय याची शंका येते. अशा उत्तान दृश्याला ते कात्री लावण्याच्या भानगडीत पडत नाहीत की त्यांच्या अनेक भानगडींतून त्यांना वेळ मिळत नाही याचा शोध घ्यावा लागेल. आजच्या चित्रपटसृष्टीला अश्लीलतेचे एवढे मोठे खग्रास ग्रहण लागलेय की ते सुटता सुटण्याची शक्यता मावळलीय. नटनट्यांच्या अंगावरचे एकेक वस्त्र मात्र फिटत चाललेय...
कुठे त्या मधुबालेचा सोज्वळ अन् कुठे आजच्या हिरॉईन्सचे स्वीमिंग पुलावरचे देहप्रदर्शन, खोलवरचे किसींग शॉटस्, अन् बेडवरचे नग्न सीन्स. ही त्रयी असल्याशिवाय पिक्चर चालणारच नाही काय? चित्रपटाच्या कथेवर संवादावर मेहनत घेण्यापेक्षा अशा अश्लीलतेवरच भर देण्याचा प्रयत्न निर्माता, दिग्दर्शक व नट नट्यासुद्धा करतात. अभिनयाच्या बाबतीत पूर्णतः शून्य कामगिरी बजावून अंगप्रदर्शनाच्या वेळी मात्र शंभर टक्के योगदान देणाऱ्या कैक अभिनेत्री (खरे तर बायाच!) पैशाला पासरी झाल्यात.
एखादी नवी नटी तिच्या अंगभूत अभिनयाऐवजी तिच्या उघड्या अंग'ऊता'नेच जाणली गणली जाते. तिला जर जास्तीच ऊत असेल तर पटकन नको ते पिक्चर्स मिळत जातात आणि ती भाबडी त्या ऊतातच ऊतू जाते. इतकी की भानावर आल्यावर अंगावर तसेच मनावर बरेच परिणाम झालेले असतात. आपली इमेज सुधारण्यात तिची जिंदगी जाते. काही नट्या लवकर सावरतात तर काही वाहतच जातात. आजच्या नंबर वन अभिनेत्रीँचे पहिले चारपाच चित्रपट आठवून पहा. तेव्हा त्यांनी कशी स्वस्तात मदमस्त कामं केली होती ते कळेल. मग तो खिलापमधला किस असो वा परिंदामधला बेडसीन, तालमधली फोटोग्राफी असो वा आजुबामधली आरसेमहालाची न्हाणी किंवा जंगललवमधले मध चाटणे असो वा हममधला चिल्लर काढण्याचा शॉट. कुठलीच नटी या देहप्रदर्शनाला मुकली नाही अन् ते शॉट देतांना एकदाही चुकली नाही हे विशेष!
प्रतिक्रिया
9 Aug 2011 - 10:38 am | वसईचे किल्लेदार
डॉ. साहेब
पैशाला अवास्तव महत्व आल्यामूळे हे सगळे अभीप्रेत आहे.
पश्च्यात्यांचा थोडाफार प्रभाव ही सुद्धा एक बाब आहे ... यांखेरिज आणखी काही कारणे असू शकतात.
यांवर काही उपाय असल्यास सांगा.
_________________________________________________
जो जे वांछील तो ते लाहो ...
9 Aug 2011 - 12:09 pm | मराठी_माणूस
ह्या क्षेत्रात सुमार बुध्दिमत्तेचे, पैशाला हपापलेले लोक जास्त आहेत, त्यांच्या कडुन कसल्या अपेक्षा करणार . त्यात त्याना प्रोत्साहीत करायला प्रेक्षकही आहेत. (नुकत्याच एका धाग्यात एका चित्रपटात दाखवलेल्या किळसवाण्या दृश्यांचा उल्लेख आहे, तरीही , लोक म्हणातात एकदा पहायला हरकत नाही. आता बोला)
9 Aug 2011 - 12:15 pm | परिकथेतील राजकुमार
कुठला हो कुठला शिणीमा ?
9 Aug 2011 - 12:27 pm | विनायक प्रभू
मी पण - मी पण
परा मला पण घेउन चल
9 Aug 2011 - 1:05 pm | परिकथेतील राजकुमार
चेक आला का आपला ?
शनिवारी लगेच पोचतोच बघा ठाण्याला ;)
9 Aug 2011 - 12:33 pm | शाहिर
अशा चित्र पटांची यादी जाहिर करा बघु ..म्हणजे आम्ही ते पाहुन त्यांचा निषेध करु
अवांतर : चटकदार आहे हे मान्य करत आहत तर ??
अति अवांतर : बूम बघितला का हो तुम्ही ??
9 Aug 2011 - 12:31 pm | विनायक प्रभू
खोलवरचे किसिंग शॉट मी कधीच बघितले नाहीत हे नमुद करु इच्छितो.
9 Aug 2011 - 3:18 pm | धमाल मुलगा
=)) =)) =))
मास्तऽऽर...मास्तऽर भावनांना आवर घाला मास्तऽऽर! ;)
9 Aug 2011 - 1:16 pm | इंटरनेटस्नेही
असे णट णट्या सौंर्दयाचा बाजार मांडत असले; तरी असे चित्रपट डोक्यावर घेणारे प्रेक्षक आपल्या अकलेचा बाजार मांडातात असे आम्चे स्पष्ट मत आहे. मुर्ख कुठचे!
9 Aug 2011 - 1:30 pm | इंटरनेटस्नेही
असे णट णट्या सौंर्दयाचा बाजार मांडत असले; तरी असे चित्रपट डोक्यावर घेणारे प्रेक्षक आपल्या अकलेचा बाजार मांडातात असे आम्चे स्पष्ट मत आहे. मुर्ख कुठचे!
9 Aug 2011 - 1:30 pm | इंटरनेटस्नेही
असे णट णट्या सौंर्दयाचा बाजार मांडत असले; तरी असे चित्रपट डोक्यावर घेणारे प्रेक्षक आपल्या 'अकलेचा' बाजार मांडातात असे आम्चे स्पष्ट मत आहे. मुर्ख कुठचे!
9 Aug 2011 - 2:05 pm | धन्या
इंटया, कबुल आहे विषय तुझ्या आवडीचा आहे. पण म्हणून काय एकच प्रतिसाद तीन वेळा दयायचा?
9 Aug 2011 - 1:34 pm | गवि
कशाला सेन्सॉरबिन्सॉर?
जबरदस्तीने तर करत नाहीयेत ना तसे सीन्स..?
करेनात..
फार तर काही काळाने बघून बघून डिसेन्सिटायझेशन होईल.. तेही ठीकच.
ज्यांना अभिनय बघायचाय त्यांच्यासाठी काही अभिनयाचा दुष्काळ झालाय आणि त्याऐवजी वस्त्रगहाळपणाचा सुकाळ झालाय असं वाटत नाही.
9 Aug 2011 - 1:35 pm | वपाडाव
अधोरेखीतांची यादी मिळाल्यास छान वाटेल...
वाहत्या पाण्यात हात धुवुन घेण्याची इच्छा आहे....
9 Aug 2011 - 2:07 pm | सुनील
फार बारकाईने पिक्चर पाहता बॉ तुम्ही!
9 Aug 2011 - 2:23 pm | योगप्रभू
बाळ श्याम,
अरे असा हताश होऊ नकोस. सध्या जरी हे निर्माते, कलाकार आणि प्रेक्षक 'थर्ड क्लास पीपल' असले तरी काळाच्या ओघात सुधारतील. वाईटानंतर चांगले येतच असते. तू आशावादी राहा. उद्या 'संत राखी', 'वीरबाला मल्लिका' असे उदात्त चित्रपट नक्की निर्माण होतील. आपल्याकडे आता कुठे डायनासॉरच्या जीवनशैलीवरचे ज्युरासिक पार्कसारखे चित्रपट बनू लागले आहेत. आदिमानवांच्या जीवनावरचा चित्रपट कधी बनणार? आपण खूप मागे आहोत रे अजुन.
तुझी मॉम
9 Aug 2011 - 2:26 pm | परिकथेतील राजकुमार
योगप्रभू ह्यांच्याशी सहमत.
सध्या आम्ही 'ब्राह्मण मुळचे स्पार्टन' ह्या डॉक्युमेंटरीची आतुरतेने वाट पहात आहोत.
9 Aug 2011 - 3:22 pm | धमाल मुलगा
शिवाय, 'स्पॅनिअर्ड्स आणि कोकणस्थ साम्यस्थळे ' ह्या 'हे सारे येते कोठून' च्या पुढील अभ्यासपुर्ण विवेचनाच्या प्रतिक्षेत आम्हीही आहोत.
9 Aug 2011 - 10:16 pm | पंगा
...'स्पॅनिअर्ड्स आणि कोकणस्थ स्थळे' असे वाचले.
10 Aug 2011 - 12:10 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मी 'स्पॅन्यर्ड्स आणि कोकणस्थी चाळे' असं वाचलं.
10 Aug 2011 - 12:59 am | पंगा
याबद्दल सविस्तर माहिती मिळू शकेल काय?
10 Aug 2011 - 5:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्या नजरचुकीबद्दल आणखी माहिती देऊ शकत नाही. तसदीबद्दल क्षमस्व.
10 Aug 2011 - 1:32 pm | धमाल मुलगा
=))
हे हौस म्हणून विचारताय की इंट्रेष्ट म्हणून? ;)
9 Aug 2011 - 3:14 pm | योगी९००
तुमचा लेख वाचून बरेच चित्रपट पहायचे राहून गेले असे वाटले..(खिलाप, जंगललव)..
अजून काही उदाहरणे द्यावीत म्हणजे ते सर्व चित्रपट पाहून (जर चित्त ताळ्यावर असेल) तर मोठी प्रतिक्रिया देईन..
उदाहरणे देताना पुढील शब्दांचा मुक्त वापर असावा..म्हणजे लेख वाचूनच मुड बनेल..
मादक, उत्तान, मदमस्त, मुसमुसलेली जवानी, भरगच्च,अंतर्वस्त्रं, काचोळी (अजून सुचत नाहीत...तुम्हीच सुचवा.....)
9 Aug 2011 - 3:25 pm | धमाल मुलगा
अरे बाबा...
डाक्टरांचं नाव श्रीराम आहे...मस्तराम नव्हे!
असं काय करतोयस? :D
-कडक बुन्देला.
9 Aug 2011 - 3:35 pm | परिकथेतील राजकुमार
आम्ही तर ऐकलय की डाक्टरांना मराठी आंतरजालचे मस्ताराम* म्हणतात म्हणुन ?
*रमताराम वेगळे आणि मस्ताराम वेगळे.
=)) खपलो =)) परवाच पुन्हा एकदा वाचुन संपवले.
ठोक्या तुकाराम
10 Aug 2011 - 12:45 am | रमताराम
*रमताराम वेगळे आणि मस्ताराम वेगळे.
खुलाशाबद्दल धन्यवाद. पण ते रमताराम नि मस्तराम यांची भेट घडवून आणण्याचे काम तुम्ही शिरावर घेतले होते त्याचे काय झाले?
9 Aug 2011 - 4:32 pm | मिसळपाव
.. "सर्वोत्तम प्रतिक्रिया संच पुरस्कार" देण्यात यावा अशी मी संपादक मंडळाला विनंती करतो !!
:-))))))))))))))))))))))))))))
- "स्ट्रेस मॅनेजमेंट" ची नड भागलेला, मिसळपाव
9 Aug 2011 - 8:44 pm | टवाळ कार्टा
_/\_
9 Aug 2011 - 8:46 pm | टवाळ कार्टा
कोएना मित्राला कसे विसरलात :P
9 Aug 2011 - 8:49 pm | प्रियाली
मधुबालेसारख्या तथाकथित सोज्ज्वळ बाया आज सिनेमाबाहेर प्रत्यक्षात तरी आढळतात का?
हा लेख म्हणजे कहींपे निगाहे कहींपे निशाना असे तर नाही ना?
9 Aug 2011 - 9:56 pm | डॉ.श्रीराम दिवटे
इम्रान हाशमीच्या गाठोड्यातील कोणतीही दशमी काढून पहा, म्हणजे त्याला सिरियल किसर का म्हणतात ते कळेल.
9 Aug 2011 - 11:08 pm | दैत्य
इम्रान हाशमीच्या गाठोड्यातील कोणतीही दशमी काढून पहा, म्हणजे त्याला सिरियल किसर का म्हणतात ते कळेल.
अहो डॉक, मागणी तसा पुरवठा.....
सिनिमे समाज 'प्रबोधना' साठी नाही 'धना'साठी काढले जात असावेत...आणि अश्या शॉट्समुळे प्रबोधन होत नाही हेही खरं कसं मानावं? तीही एक कला आहे ;)
9 Aug 2011 - 11:30 pm | शाहरुख
"ओन्ली सेक्स अॅन्ड शाहरुख गेट सोल्ड इन द इंडस्ट्री" असे मधे कुठल्यातरी सौंदर्यवतीने म्हटले होते.
10 Aug 2011 - 1:08 am | रमताराम
काय अभ्यास, काय अभ्यास.. (पहा/ऐका: कणेकरांची फिल्लमबाजी)
10 Aug 2011 - 10:45 am | इरसाल
पहिल्या दोन प्रतिसाद नंतर एकही प्रतिसाद लेखाला धरून नाही.
10 Aug 2011 - 10:58 am | गवि
असहमत.
माझा सातवा आठवा असेल. पण विषयाला सोडून नाही.