पहिलि नोकरी पहिला दिवस! डोक्युमेन्ट्स सबमिट करने आणि आपन किती महान कम्पनी जोइन केली आहे हे गाण आइकण्यात गेला. दुसर्या दिवशी एक नामवन्त आईटि कम्पनि कशी असेल ह्याचा विचार करत ओफिस मध्ये पोहचलो. मेनेजर साहेबानि सगल्यान्शी ओलख करुन दिली. म्हनाले आज सन्ध्याकाली अमेरिकन टीम सोबत मीटीन्ग आहे. उत्सुकता अजून शिगेला. ए सी चा गारवा, कफेतील स्नक्स, दुपारचे मस्त जेवन! सो फार सो गूड!
विचारपूस करून शुभेच्छा आदन प्रदान होवून मीटीन्ग सुरू झाली. फीरअन्ग साहेब म्हनाले आज तुमच्या साठी मोठा दीवस आहे. आम्हि एक महत्वपूर्न प्रोजेक्ट भारतात शिफ्ट करनार आहोत. भारतीय लोकन्च्या परिश्रमा वर आपनास पूर्न विश्वास आहे. आम्हि मोउन्टन व्हिवु मधिल ओफिस बन्द केले आहे. ह्या प्रोजेक्ट साठि तिथे ५ मिलिअन डोलर्स खर्च होत होते. भारतात हे काम १ मिलिअन डोलर्स मध्ये होइल. आनि कोम्पनिला ४ मिलिअन डोलर्स फायदा होइल. ब्ला ब्ला ...
पुढे तो काय बोलला ते ऐकु आले नाहि. स्वाभिमान ह्या शब्दाची नक्कि काय अर्थ असतो ते सुचत नव्हत. आपन स्वावलम्बि होनार आनि चान्गल काम करनार कारन आपन एका चान्गल्या इन्स्टीटुत मधून पास झालो म्हनून. पन आपन नोकरि करनार ते चिप लेबर म्हनून ? ए सि चा गारवा आता सुखद वाटन्या अएवजि, मनाला चट्के देत होता. आजुबाजुला पाहिजे तर सगले आनन्दि दिसले. मला अजून हि हे कलाला नाहि के ते लोक आनन्दी होते कि त्यानी तसे मुखवटे घातले होते.
गोन्धळ्लेल्या मनस्थीत एक विचार आला. ईट्स टू अर्ली टू जज! आनि कुठ्लहि काम हलका नसत. मनाचि समजूत घातली. नव्हे स्वतहला फसवल!
प्रतिक्रिया
22 Sep 2010 - 10:06 pm | संकेत
हे काम करणार नाही, ते काम करणार नाही म्हणून आपल्या तोंडातला घास इतरांना देऊन स्वतःच्या पायावर बेकारीची कुर्हाड मारून घेण्यापेक्षा आणि देशाला मंदीच्या खाईत लोटण्यापेक्षा एसीच्या थंड हवेत बसून, मस्त लंच खाऊन, काम केल्याचं अध्येमध्ये नाटक करून बाकी भारताच्या मानाने गलेलठ्ठ पगार कमावणे चांगले.
22 Sep 2010 - 10:15 pm | रन्गराव
तूमची बाजू अर्ध्य सत्य आहे. पडेल ते काम करावा पण ह्याचा अर्थ असा नाहि कि फसवनूक करावि. आणि पैसाच कमवायचा असेल तर नोकरि करण्याईतका मोठा मूर्खपना नाहि! तो पैसा काय कामाचा जो तुम्हला ताठ मानेन जगु देत नाहि ?
22 Sep 2010 - 10:16 pm | शिल्पा ब
मग आता तुम्ही काय करता?
22 Sep 2010 - 10:19 pm | रन्गराव
नोकरी, एका छोट्या भारतीय कम्पनी मध्ये!
22 Sep 2010 - 10:21 pm | संकेत
अहो तुम्ही पडेल त्या कामाची कसली गोष्ट करता? तुम्ही काम करूच नका. नाहीतर मिपावर येऊन लिहायला वेळ राहणार नाही.
ते अमेरिकन जेवढी तुमची फसवणूक करता त्यापेक्षा तुम्ही त्यांची दसपट फसवणूक करता.
काय काय कामे केलीत हो आतापर्यंत?
22 Sep 2010 - 10:34 pm | रन्गराव
मुद्दा अमान्य असन्यात काहि गैर नाहि! पण तुम्हि तो वैयक्तिक केलात ह्याचा अर्थ, तुमच्या मनला कुठ तरि खलला आहे! असो. प्रश्न त्यानी आपली फसवनूक किन्वा आपन त्यान्ची फसवनूक करन्याचा नाहि आहे. आपन स्वत।शी किती प्रामाणिक आहोत हा आहे!
22 Sep 2010 - 10:16 pm | शुचि
अमेरीकेत वर्णद्वेष माझ्या पहाण्यात नगण्य आला आहे. एक खवट शेंगदाणा निघाला पण तो कॅनेडीअन होता.
असं असताना स्वतःला चीप लेबर म्हणवून कशाला हिणवून घायचं? आपल्याकडे मनुष्यबळ मुबलक आहे त्याचा कोणी जर फायदा करून घेत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. डॉलर ची किंमत रुपयाच्या तुलनेत जास्त आहे हे वास्तव आहे. त्यामुळे आप्लया स्वभिमानाला ठेच लागायचं कारण नाही.
22 Sep 2010 - 10:23 pm | शिल्पा ब
मान्य...आणि नको तिथे जर मन अपमान वगैरे मनात राहिलो तर हा उद्योग जाईल चीनमध्ये....मग परत रडारड.
ते लोक काम कुठलेही असो काम आहे म्हणून करतात.
22 Sep 2010 - 10:25 pm | रन्गराव
जे लिहला तो फक्त ट्रेलर आहे. प्रश्न डॉलर आणि रूपयाचा नाहि आहे. तडजोड आपण सगलेच करतो. पण वाइट गोश्ट ही आहे कि त्त्याचि सवय लागून जाते आणि मग बरोबर काय आणि सोयिस्कर काय यातला फरक कळत नाहि :(
22 Sep 2010 - 10:33 pm | शुचि
ह्म्म बरोबर आहे तुमचं म्हणणं.आयुष्य हीच मुळी एक तडजोड आहे.
पण आपलं कुटुंब रस्त्यावर आलेलं आपण पाहू शकतो का? नाही.
दारूण आजारात पैशाशिवाय आपले आप्त तळमळताना आपण पाहू शकतो का? नाही.
म्हणून तशा मोठ्या तडजोडी नको असतील तर लहान तडजोडी करायच्या. शहाण्या मुलासारख्या :) आता हसा पाहू :)
22 Sep 2010 - 10:38 pm | रन्गराव
ही चान्गली पळ्वाट आहे. कुटुम्ब! जगात अस काम नाहि ऊरल का जे करून स्वाभिमान आणि कुटुम्ब दोन्ही साम्भळता येइल?
22 Sep 2010 - 10:48 pm | शिल्पा ब
तुम्ही एवढं म्हणताय...मग आता तुम्ही अमेरिकेचे काम करता का नाही? म्हणजे तुम्हाला स्वाभिमान आहे कि नाही हे कळेल...तुम्ही म्हणताय म्हणून हो...नाहीतर नसतं विचारलं.
22 Sep 2010 - 11:00 pm | रन्गराव
प्रश्न तीखट आहे आणि उत्तर हि तितकेच मसालेदार. पण चार वर्षाचा प्रवास आहे. एका वाक्यात सान्गण्यात म़ज्जा नाही !
22 Sep 2010 - 10:51 pm | अर्धवटराव
तुमचा स्वाभिमान कुठल्याही कामाच्या आड येत नाहि.. येउच शकत नाहि. कारण "मी काम करतोय" ही भावनाच मुळी स्वाभिमानाच्या पोटी येते. तुमचा अहंकार मात्र तुमच्या कामाच्या आड येउ शकतो. तेव्हढं सांभाळलं कि काहि गल्लत होत नाहि.
(अहंकारी) अर्धवटराव
22 Sep 2010 - 11:13 pm | रन्गराव
स्वाभिमान आणि अहंकार ह्यातिल रेषा खूप पूसट असते. ती सोयिनुसार कुठेहि हलवलि नाहि म्हण्जे मिळवल!
23 Sep 2010 - 12:47 am | अर्धवटराव
स्वाभिमान आणि अहंकार अगदी भिन्न आहेत. जीथे फक्त स्वतः आपण आणि आपले कार्य आहे तिथे स्वाभिमान आहे. जिथे आपल्यासहीत इतर दुसरा कोणि आहे (कंपेअर करायला) तिथे अहंकार आहे. बघा प्रयत्न करुन.
अर्धवटराव
23 Sep 2010 - 2:23 pm | गणेशा
मी तडजोड शक्यतो करत नाही ..
काम परफेक्ट आहे.. साहेबाला काढायचे असेल तरी १०० दा विचार करावा लागेल ..
पण कसे आहे .. साहेबांना हाजी हाजी करणारे लागतात ..
जाउद्या
22 Sep 2010 - 10:46 pm | शिल्पा ब
वर्णद्वेषाच म्हणशील तर मला बराच अनुभव आहे....काही गोरे अन बरेच चीन्केपिंके...इथे बे एरियात
22 Sep 2010 - 10:53 pm | पारुबाई
होय,ही तडजोड आहे हे मान्य आहे.
परंतु सद्य परिस्थितीत हाच एक उत्तम मार्ग आहे.
कधीतरी भारताची पण अशी वेळ येईल कि आपण आपली किमत ठरवू.
सध्या आपली गरज त्यांना आहे आणि त्यांची आपल्याला आहे, असा सकारात्मक विचार करू या.
22 Sep 2010 - 11:06 pm | रन्गराव
आपण म्हणताय ते काही अन्शी बरोबर आहे. कुठ तरी काहि तरी चुकता आहे ह्याची जाणीव असणे गरजे चे आहे. जो पर्यन्त चूक मान्य करन्याची हिम्मत येत नाहि तोपर्यन्त परिस्थिती बदलता येत नाहि! आशा करूयात कि हे चीत्र बद्ल्न्याचि जिद्द नेहमी आप्ल्यात जीवन्त राहिल.
22 Sep 2010 - 11:09 pm | अनामिक
अहो रंग॑राव, चिप लेबर आहे ते कंपॅरेटीवली चिप लेबर आहे हे कळतंय का तुम्हाला? भारतातल्या इतर क्षेत्रातल्या सामान्य जनते पेक्षा कैक पटीने कमवतात की भारतातले आयटीवाले. तसेच दोन्ही देशातल्या स्टँडर्ड ऑफ लिविंगमधला फरक लक्षात घ्याल की नाही? आणि भारतात राहून, भारतात काम करून तुम्हाला अमेरिकन लिविंग स्टँडर्डप्रमाणे पगार मिळावा अशी अपेक्षा तरी कशी करू शकता. (अमेरिकेतल्या देशी माणसाचा पगार ऐकला की लगेच सगळे गुणीले ५० करून मोकळे होतात, पण इथला खर्च त्याच पटीने असतो हे सोईस्कररित्या विसरतो).
22 Sep 2010 - 11:17 pm | रन्गराव
प्रश्न पैशाचा नाहि! अपेक्षा होती कि लायकि आहे म्हनून काम मिलेल. चिप आहे म्हनून काम दिल आहे ह्याची जाणीव फार त्रासदयक आहे
22 Sep 2010 - 11:22 pm | शुचि
पण कोण म्हणतय की लायकी नाही?????
तुम्हीच म्हणताय.
लायकीशिवाय कोणतही पद्/नोकरी १ दिवस तरी टिकेल का?
काय बोलता?
22 Sep 2010 - 11:27 pm | रन्गराव
चांगला मुद्दा आहे. त्यावेली जे वाटला ते लिहिला! तुमच्या मुद्द्याच स्पष्टिकरऊ पुढच्या लेखनात होईल.
22 Sep 2010 - 11:25 pm | अनामिक
त्यांनी चिप लेबर आहे म्हणून दिलं, पण काम करून घेताना प्रॉडक्ट क्वॉलीटीमधे काही तडजोड केली का? शिवाय ते काम करण्याची लायकी आहे म्हणूनच दिलं असणार. कोणतीही कंपनी व्यवसायीक दृष्टीकोणातूनच विचार करेल आणि कंपनीला जास्तीत जास्तं फायदा कसा होईल तेच बघणार. त्यात काही वावगं आहे असे वाटते का तुम्हाला? आणि पॉझीटीवली विचार केलात तर इंटरनॅशनल प्रॉजेक्टवर काम केल्याचं तुमच्याच रेझ्युमेवर जाईल की!
23 Sep 2010 - 1:29 pm | योगी९००
प्रश्न पैशाचा नाहि! अपेक्षा होती कि लायकि आहे म्हनून काम मिलेल. चिप आहे म्हनून काम दिल आहे ह्याची जाणीव फार त्रासदयक आहे
फक्त लायकी असून उपयोग नाही. तुमच्या सारखे हजारो मिळतील..कदाचित तुमच्या पेक्षा चांगले काम करणारे सुद्धा मिळतील..finally चिप असणे हा ही एक गुण असू शकतो.. चांगले केलेले काम ते पण कमी पैशात..म्हणूनच आपल्या देशाची तरक्की होते आहे. (थोडे दिवस थांबा आणि बघा कसे चिनी लोकं आपला धंदा घेतात ते..त्यावेळी कोठल्या मुद्धयावर पुढे जाणार ते पहा..आधीक माहिती साठी मि.भो. काकांशी संपर्क ठेवा..)
बाकी अनामिक, अर्धवटराव, कानडाऊ योगेशु आणि अपर्णा अक्षय यांच्याशी सहमत.. अर्धवटराव यांनी म्हणाल्याप्रमाणे "तुमचा अहंकार मात्र तुमच्या कामाच्या आड येउ शकतो"..
एक प्रश्न..घरी कोठलीही वस्तू घेताना कोठल्या कोठल्या गोष्टींचा विचार करता? किंमत हा मुद्दा विचारात घेता का?
22 Sep 2010 - 11:09 pm | नावातकायआहे
कटू पण सत्य आहे
चिप आहे म्हणुनच काम आहे आणि म्हणुनच अजुन ओपनिंग्स आहेत.
आता तर तुमच्या पे़क्षाही 'चिप' लेबर फोर्स (चिनी, फिलिपिनो, ग्रीक, कझाकी ) बाजारात आहे.
तुमच्याच पातळीचे उत्तम शिक्षण झालेले तेवढेच उत्तम ईंग्रजी समजणारे.
४५ रु. तासावर आपण काम द्यायला अजुन बराच पल्ला गाठायचा आहे.
22 Sep 2010 - 11:27 pm | चिरोटा
रंगराव, अमेरिकेत गेलात तरी चीप लेबर म्हणून ऐकून घ्यावे लागेल.ऑफशोअरचा मूळ उद्देशच पैसे वाचवणे हा आहे. तेव्हा वेगळा मार्ग म्हणजे-स्वतःची कंपनी काढणे.ती काढलीत तर आपल्या व्याख्येनुसार स्वाभिमानाने आणि ताठ मानेने जगता येण्याची शक्यता जास्त.अर्थात कंपनी यशस्वी रित्या चालवायची असेल तर 'कॉर्पोरेट तमाशा' थोडाफार तुम्हालाही करावाच लागेल.
23 Sep 2010 - 12:55 am | कानडाऊ योगेशु
पहीली गोष्ट म्हणजे मुळात कमी पैशात काम करणे म्हणजे (नेहेमी) स्वाभिमानाशी तडजोड हे तुमचे गृहीतकच चुकीचे आहे.
तुम्ही तुमचे स्किल्स कुणासाठी तरी वापरत आहात.जर त्याने तुम्हाला काम द्यावे असे तुम्हाला वाटत असेल तर त्याला तुम्हाला कामावर ठेवण्यात त्याचा कसा फायदा आहे हे पटवुन देणे आवश्यक आहे.
कमी पैशात योग्य काम (कॉम्पिटेटीवनेस) हा तुमच्याकडचा एक यु.एस.पी होऊ शकतो.
दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला तुमची योग्य किम्म्त माहीती असेल तर कुणी तुम्हाला म्हणाला चार मिलियन्चे काम तुमच्या कडुन एक मिलियन मध्ये करवुन घेतो आहोत तर तुम्हाला मिरच्या झो.न्ब्ण्याचे कारण नाही.
तुमच्या विचारसरणीनुसार मुळात कुठलीही नोकरी करणे हीच एक तडजोड आहे.कारण मालक तुम्हाला लाखभर पगार देऊन त्यातुन २-३ लाखाचा फायदा करवुन घेणार.तिथेही तुम्ही हाच विचार करणार की २-३ लाखाचे काम माझ्याकडुन लाखात करवुन घेतो आहे.
दहा किलोमीटर अन्तर टॅक्सीने जायला मला २०० रूपये लागत असतील आणि तेच अन्तर रिक्षाने जायला मला १०० रुपये लागत असतील आणि रिक्षात बसल्यावर जर मी रिक्षावाल्याला म्हणालो की बाबा टॅक्सीने जायला २०० रू. लागतात पण रिक्षाने १०० रूपयेच लागतात तर रिक्षावाल्याचा स्वाभिमान उफाळुन आला आणि त्याने तुम्हाला रिक्षातुन उतरवले तर चालेल काय?
गोष्ट स्म्पली.
(टारोभाऊ सही)योगोबा नोकर
23 Sep 2010 - 11:07 am | स्पंदना
१००% सहमत.
रंगराव याला बिझनेस म्हणतात. त्या दुकानदारा पेक्षा माझा माल चांगला तर आहेच पण थोडा स्वस्त ही आहे अस म्हणन म्हणजे काही स्वाभिमान सोडण नव्हे...आणी काही फक्त चीप लेबर म्हणुन नाही हे सारे प्रोजेक्ट आपल्या कडे येत, आपण कसुन काम करतो म्हणुन सुद्धा येतात. हिरवाईत समर मध्ये सुट्टी, रिझन? फॉर गार्डनिंग, प्रोजेक्ट असतात जगभराचे याच्या गार्डनिंग साठी थांबले तर काय दशा होइल? पण भारतात एक्मेकाला अॅडजस्ट करत सुट्ट्या मारल्या जातात्...अर्थात हे माझे एक दोन प्रत्यक्ष अनुभव म्हणुन्...सार्यांना पटतिलच असे नाही.
आणि कमवाल निदान वन मिल्लियन, तेव्हढे तरी....चोर्या तर नाही ना करत आहात? हळु हळु यातुनच आपण वर वर सरकत जाउ.
बघा बा मला वाटल ते लिहिल, देशाभिमान मला ही आहे, आणि तो मी स्वाभिमाना पेक्षा मोठ्ठा समजते.
23 Sep 2010 - 12:53 pm | रन्गराव
रिक्षावाले आणि स्वाभिमान ह्या दोन्ही गोष्टी विसंगत आहेत. स्वभिमान उफाळून आला तर प्रवाशाला खाली उतरवन्याऐवजी कार कशी घेता येईल ह्याच विचार करावा!
23 Sep 2010 - 1:57 pm | सविता
विसंगत का बरे? उगाच आपले स्वतःचा मुद्द लावून धरायचा म्हणून काहीही बोलू नका.....
उदाहरणात्....रिक्षावाल्याची सर्विस "चीप" आहे....म्हणुन "तुम्ही त्याच्या रिक्षातून जात आहात्"...असे वाटून.."रिक्षावाल्याचा" स्वाभिमान उफाळून आला तर... असे म्हणतायेत ते....
23 Sep 2010 - 4:23 pm | कानडाऊ योगेशु
जाऊ द्या हो सवितातै!
रंगरावांना आपले शेपुट सरळ करायचेच नाहीये.त्यांचा स्वाभिमान आड येतोय.
सोडुन द्या!
23 Sep 2010 - 12:31 pm | स्पा
"दहा किलोमीटर अन्तर टॅक्सीने जायला मला २०० रूपये लागत असतील आणि तेच अन्तर रिक्षाने जायला मला १०० रुपये लागत असतील आणि रिक्षात बसल्यावर जर मी रिक्षावाल्याला म्हणालो की बाबा टॅक्सीने जायला २०० रू. लागतात पण रिक्षाने १०० रूपयेच लागतात तर रिक्षावाल्याचा स्वाभिमान उफाळुन आला आणि त्याने तुम्हाला रिक्षातुन उतरवले तर चालेल काय?"
जबराट उदाहरण......................
पटलं बुवा एकदम.... :) :) ;)
23 Sep 2010 - 2:17 pm | गणेशा
मुंबई मध्ये २ महिण्यापुर्वी कंपणी जॉइन केली आहे.
माझा बॉस चेन्नई मधेय असतो.
येथे ही एक दुसर्या टीमचा बॉस आहे.
माझे काम अजुन जलद सुरु नाहीये . आणि डॉकुमेंटेशन चांगले असल्याने. एथला बॉस माझ्याकदुन त्याची बरीच डॉक्युमेंटची कामे करुन घेवु लागला आहे. आणि शिफ्ट संपत येते तेंव्हाच ह्याला जाग येते. आणि त्याला लगेच १ तासात सगळॅ हवे असते
१ दा झाले .. २ दा झाले आता त्याला स्पष्ट नकार दिला. मी करणार नाही. काय कराय्चे ते कर. आधी ही २ र्यांदा करताना माझ्या मेन बॉस ला कळवले होते मी. नविन म्हंटल्यावर पिळवनुक् का करायची. सगळे पण बाकीचे ह्याच्या हाताखाली वैतागलेलेच आहेत म्हणा..
मराठी बाणा आवडणार नाही काहींना पण ह्यांची लाचारी पहिल्यापासुन पत्करणे म्हणजे स्वताला गहान टाकण्यासारखे आहे.
म्हणुन नका का जमेना पण "स्व" ला गहान टाकुन काही फायदा होत नाही.
management ला मतलब फक्त त्यांच्या कामाशी असते .. काम करणार्याचे काही ही होवो ..
म्हनुन जरब घालावी त्यांना
23 Sep 2010 - 2:26 pm | रन्गराव
आपण म्हनताय ते बरोबर आहे. पण लोक जन्मत: मॅनेजर नसतात. त्यान्चे मॅनेजर त्यान्च्यशी जसे वागतात तसे ते पुढे त्यान्च्या ज्युनियरशी वागतात. हे चक्र कुठ तरी थाम्बल पाहिजे आनि आपन ते थाम्बवल पाहिजे!
23 Sep 2010 - 5:44 pm | गणेशा
बरोबर आहे तुमचे,
पण माझ्या बाबतीत तरी अशी वागणुक माझ्या ज्युनियर्स ना मी देणार नाही.
काम करताना १०० % पाहिजे हे योग्य आहे, पण पॉलिटीक्स करणे आवडत नाही ..
तुमच्या मुळ थ्रेड चा मुद्दा बाजुलाच राहिला या मुळे माझ्याकडुन .. असो बाकीच्या लोकांची मते बोलकी आहेत पण ..
-