शुक्रवारी आर्किटे़क्टनी मला भेटायला बोलावला -" Rangraav, I have gone through your mail. There are some minor changes. I have mailed it to. u. You can finish it over next two weeks. Your manager is insisting on a new approach. I need to explain him where It can go wrong. I will do that on Monday. " तेवढ्यात फोनची रिंग वाजली. फोन ठेवून ते म्हणाले. " I will have to leave immediately, wont be here through out next week. You carry on with your work." "yes sir" असा म्हनून मी बाहेर पडलो आणि ते हि निघाले.
सोमवारी मॅनेजरन बोलवून घेतले. " रन्गराव मी एक पद्धत सांगितली होती त्याचा काय झाला?". मी- " सर बोलनार आहेत त्याविषयी." मॅनेजर- "अस्स! तुझी पद्धत सम्जावून सांग". मी त्याला थोड्क्यात काय करणार आहे ते सांगितला. " वेळ किती लागेल?" त्याने विचारला. मी " दोन आठवडे" . तो म्हणाला "माझ्या पद्धतीन काम केलस तर ३-४ दिवसात सम्पून जाईल". मी- " but this module is critical and everything else depends on this. your approach does not take into account all future scenarios." तो म्हणाला "अजून विचार करून बघ!"
शुक्रवारी दुपारच्या मिटींगमध्ये मॅनेजरन मला विचारला "काम कुठवर आला आहे? " मी " अर्ध झाला आहे ." तो म्हणाला " इतका वेळ घालवून चालनार नाहि. तू जे करतोयस ते आत्तच्या आत्ता थांबव आणि मी सांगितल्या प्रमाने implement करून दोन दिवसात सम्पव." मी- " ते शक्य नाहि. चुकीची पद्ध्त मी वापरणार नाही. " तो म्हणाला- " ती चुकीची आहे याला काहिही पूरावा नाहि." मी:- "सर तुमचाशी ते बोलणार होते ." तो -" त्यानी मला तसा काहीही सांगितल नाहि आहे. त्यामुळे मी सांगेल तसा करावा लागेल." मी-" तस होणार नाही." तो आता चिडून म्हणाला "this is insubordination! I'm writing a mail to u and ur HR " त्याने मेल टाईप केली आणि सगळ्यांसमोर वाचून दाखवली-. "You are being given a warning against professional code of conduct for your insubordination and attitude to deliberately slow down the project. Any further violation will not be taken lightly and will result in appropriate action against you." सगळे लोक आश्चर्यचकित होवून पाहत राहिले. मी बाहेर चालू लागलो. तो म्हणाला "कुठा निघाला आहेस? "
मी - "I'm going to reply ur mail." सगळ्याच्या चेहर्यावर हा पार वेडा झाला आहे असे भाव होते.
मी माझ्या डेस्क जवळ गेलो. सरांसोबतचे सारे communication मेलला अॅटॅच केले. आणि टाईप केल. " All the communications with the architect (his address is in the cc ) are attached. There is no evidence whatsoever to prove that I have deliberately slowed down the project. On the contrary, there is substantial evidence to prove that I am being forced to implement a technically wrong approach. This does make a strong case for violation of ethical code of conduct against my manager provided the organization has one!" मेल पाठवून दिली.
मिटींग अजून संपली नव्हती. मी खाली आलो. तिथ आदी कार शेजारी गीताची वाट बघत थांबला होता. मला पाहून म्हणाला अरे एक सही विनोद आहे " एकदा एका कंपनीत झेन्डावदनासाठी मोठा खांब आनलेला असातो. त्याला दोरी किती आणायची ह्यावर तीन मॅनेजरस मध्ये एकमत होत नसत. मग ते ठरवतात. आपण खांबाची उंची मोजायची. प्लन असा ठरतो की दोन लोक खांब धरून उभारनार. तीसरा खांबावर चढून टेप खाली सोडणार. पण एवढ्या उंच खांबावर चढन काहि त्याना जमत नाहि. बाजूने एक ईंजिनियर चाललेला असतो. एक मॅनेजर म्हणतो. चल ह्याची मज्जा करू यात. त्याला विचारतात ह्या खांबाची उंची किती ते सांग. ईंजिनियर खांब आडवा पाडतो. एका टोकापासून दुसर्या टोकापर्यन्त टेपने अंतर मोजतो आणि सांगतो. मॅनेजर हसायला लागतात. ते म्हणतात.- ह्याला उंची विचारली होती आणि ह्याने लांबी सांगितली."
आम्हि दोघही हसायला लागलो. तेवढ्यात गीता तिथ आली. " अस नोबेल मिळाल्याच्या अविर्भावात हसताय काय? वार्निंग मिळाली आहे. सुधरा आता." आदिन विचारला "काय झाला रे?" झालेला किस्सा सांगितला. तो म्हणाला. " उत्तर पाठवलस हे बर केलस." गीता त्याच्यावर रागावली; " आधिच बाजीराव पेशव्यांसारखा वागतोय तो. तु त्याला जास्ती चढवून ठेवू नको. स्वतःला शिवाजी महाराज वगैरे समजून बसला तर पंचाईत व्हायची!"
प्रतिक्रिया
28 Sep 2010 - 9:30 am | बहुगुणी
झटापटी आणि कुरघोड्या वाचायला मजा येते आहे, येऊ द्या पुढचे भागही लवकर.
28 Sep 2010 - 11:24 am | चिगो
लढो, लढो.. (आपल्याला काय, कपडेपण सांभाळायची गरज नाहीये... ;-) ) मस्तच. पु भा प्र त
28 Sep 2010 - 11:42 am | अब् क
शाब्बास!!!!!!!!!!!!!!!
28 Sep 2010 - 11:49 am | स्वानन्द
युध्दस्य कथा: रम्या: :)मज्जा मज्जा!!
बाकी पुन्हा एकदा रावसाहेबांना सलाम.
28 Sep 2010 - 1:05 pm | कुसुमिता१२३
इंटरेस्टींग आहे..पुढील लेखाच्या प्रतिक्षेत!
28 Sep 2010 - 5:35 pm | शुचि
बाप रे डेडली होता हा भाग.
28 Sep 2010 - 5:39 pm | अनिल २७
रन्गराव... द बाँड ! भाग - ७, समाप्त !
(हुश्श !)
28 Sep 2010 - 5:41 pm | गांधीवादी
समाप्त ! अनादर डे, नॉट टुडे
28 Sep 2010 - 10:10 pm | रन्गराव
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! शेवटच्या विनोदाबद्दल कुणी काहि बोललेल नाहि. आवडलेला दिसत नाहि कुणाला. ;(