कॉर्पोरेट तमाशा ८ - विषाणूची लागण

रन्गराव's picture
रन्गराव in जनातलं, मनातलं
2 Oct 2010 - 12:41 am

सोमवारी ऑफिसमध्ये थोडा ऊशिरा गेलो. क्युबिकलमध्ये जाता क्षणीच गीतान सांगितला -" किती ऊशिर तो. सर दोनदा तुला शोधून गेले. जा लवकर भेटून ये त्याना. चांगलीच काळजी लागून राहिली आहे अस दिसतय. " लगेच सरांना भेटायला गेलो. सर म्हणाले -" Looks like you had pretty adventurous week! But you don't need to worry about all these issues anymore. I will talk to you manager and HR and make sure that you will report to me directly. And one more thing, you might feel that nobody wants to listen to you. But be patient, give others some time, they will eventually agree with you. " सरांनी शेवटचा वाक्या का सांगितला ते काही समजल नाहि.

क्युबिकल मध्ये गेल्यावर बनियान पकडला "दोस्त तुम्हे एक बात बतानी है. तुम्हे मॅनेजर के साथ इतना पंगा लेने की जरूरत नही है. उसकी बात मानेगा तो कोनसा पहाड तुटनेवाला है? " मी-" अगर वो सही बात सही ढंग से बतायेगा तो शायाद मानलू. पर उसकी बात अगर गलत है तो मानना जरूरी नहि है!" पण बनीया आज ऐकन्याच्या मूड्मधे नव्हता -" अरे सभी जगह ऐसेही होता है. और सब लोक बात मानते है. तुम्हे क्या दिक्कत है?" मी म्हणालो -" बनिया देख, अपना मॅनेजर उसके सिनीयरस के सामने हांजी हांजी करके मॅनेजर बना है. कल ये सब करके तूभी मॅनेजर बनेगा और फिर उम्मीद करेगा की ज्युनियरस तुम्हारे बूट चाटे. येह साईकल तूटेगा कब फीर? मुझे इसमे नही फसना है! " माझा भाषण ऐकून बोअर झालेली गीता बनियाला म्हणाली "ईसके चक्कर मै आओगे तो तुम भी डूब जाओगे!" मला म्हणाली "तुझ्यासाठी एक गिफ्ट आनला होत. घरीच विसरून आले". तिच्या चेहर्यावरच ते खट्याळ हास्य पाहून मला समझला की आता टांग खेचली जाणार. वेळ मारून नेण्याच्या प्रयत्ना करत म्हणालो-" काय तलवार, बंदूक, तोफ वगैरे मिळाली की काय? " ती-" छे हो! नवरत्न तेल आणल होत. डोका शांत रहाव तुमच म्हणून!" सगळ्यानी दात दाखवले!

दुपारी बनिया मला कॅफे मध्ये घेवून गेला! म्हणाला "जो module तुमने implement करनेसे मना किया था, वोह मॅनेजरने अब मुझे पकडा दिया है. तु उस दिन मिटींग मै बोल रहा था की उसके तरिकेमै कुछ problem है. क्या है समझा दे मुझे! " मी त्याला माझा म्हनना समजावून सांगितल. तो म्हणाला-"तेरी बात तो सहि है पर वह मानेगा नही. कोई बिचका रास्ता नही है क्या?" मी-" दो ही ऑप्शन्स है. या तो मना कर दे. उस केस मै तुझे भी वार्निंग मिलेगी. या फिर वह जो बोलता है वो कर दे. पर एक बात ध्यान मे रखना जिस दीन कोड कम्प्लीट होगा उसी दीन मै उसे तोड दूंगा. और फिर वह तुम्हारी तरफ उंगली दिखाके कट लेगा. " तो म्हणाला -"इसका मतलब है with me or against me वाली बात बन गयी है. पर मै कोई साईड नहि लेना चाहता." मी म्हणालो: "कोई एक साईड लेले बेटा नही तो बिना कुछ कियेही cross-fire मे मारा जायेगा! वैसे तू एक काम कर सकता है. Send him a mail. tell him that you dont understand it. when he explains it, mail the MoMs back. So it will safeguard you to some extent."
इतक्यात QA फौज तावातावन तिथ आली. मी विचारला-" आज अचानक कुठ मोर्चा काढलात? " कुनीही काहि बोलला नाहि. नक्किच काहि तरी झाला होता त्याशिवाय हे गायीसारखे गरीब दिसनारे प्राणी इतके चिडण्याची काही शक्यता नव्हती. एक गरम कॉफी पिउन सर्व थोडे थंड झाले. त्यांचा टीम लीड म्हणाला -"मॅनेजरचा डोक फिरला आहे. आधी तीन महिन्याचा टेस्टींगचा प्लॅन होता आत त्यान तो दोन महिन्यावर आणला आहे. आम्ही त्याला सांगन्याचा प्रयत्न केला की फार कमी वेळ आहे हा. तर तो एकायला तयार नाहि. मग आम्ही त्याला विरोध केला. तर तो म्हणाला तूम्हाला मान्य असो वा नसो काम दोन महिन्यातच करावे लागेल. मग आमची जोरात जुंपली. आणि गीतान तर त्याला चांगलच सुनावल."
मला धक्क्यावर धक्के बसत होते. नेहमी शांत राहून मीटींग मध्ये हो ला हो म्हणनारे लोक आज चक्क मॅनेजर बरोबर भांडून आले आणि त्यात गीतान पुढाकार घेतला. गीता कपाळाला हात लावून बसली होती. दोन मिनीटाने माझ्याकड बोट दाखवून म्हणाली. " He is responsible for all this. I cant believe that I fought with the manger. All this is the result of the stupid speech that he gave to Baniyaa! His ideology is infecting all of us like a virus. I must stay away from him." अस म्हणून ती जावू लागली. मला फार हसू येत होत. तिला म्हणालो "माझ्यासाठी आनलेल्या नवरत्न तेलाची तुम्हालाच जास्ती गरज आहे अस दिसतय. " "नशीब आमचा" अस रागान म्हनून ती निघून गेली.
बनिया माझी टांग खेचत म्हणाला- "यार तेरी fan following तो बहोत बढ रही है. " मी-" fan? she does not even like me." तो-" That makes it even more interesting, she does not like you but has started following ur ideology. बाबा आपकी जाय हो. मै कल आपके लिये एक कफनी खरिद के लाता हू! " मी हसत म्हणालो " उसपे येह भी लिख देना - Don't follow me!" आणि तेवढ्यात सकाळी सरांनी सांगितलेल्या वाक्याचा अर्थ लक्षात आला!

नोकरीअनुभव

प्रतिक्रिया

शुचि's picture

2 Oct 2010 - 12:46 am | शुचि

आईशप्पत कसली हसले मी :)
गाईसारखी दिसणारी टीम वगैरे ..... हा हा ..... मस्त मस्त मस्त!!!!!!!!!!

रन्गराव's picture

2 Oct 2010 - 12:51 am | रन्गराव

धन्यवाद :)

रन्गराव कथेत मस्तच रंग भरताय राव...
चालद्या..

क्रमशः लेखन तेही सर्वात जलद .. आणि दर्जा ला धक्क न पोहोचु देता...
क्या केहेने..
{तुम्हाला मिपावरील "सर्वोत्कृष्ठ जलद क्रमशः कथालेखकाचा पुरस्कार" देण्यात यावा अशी शिफारस करत आहे...}

रन्गराव's picture

2 Oct 2010 - 9:24 am | रन्गराव

आपली पसंती हाच सर्वोत्तम पूरस्कार आहे! वाचत राहा आणि जशी पसंती कळवलित, तशी एखादी गोष्ट आवडली नाही तर बिनधास्त टीका ही करा. कदाचित मी ती लवकर मान्य नाही करनार, पण ती गोष्ट कुठतरी मनात रहाते आणि मग पुढा सुधारणा करण्याची संधी मिळते.

अचूक नीरीक्षण आहे.
क्यू ए टीम नेहमी क्रायसिस मधेच असते कारण एन्व्हायर्नमेन्ट सेटप, कोडींग, युनिट टेस्टींग वगैरे ला डेल्टा उशीर लागत लागत शेवटी ती भरपाई शेवटच्या टीमला म्हणजे क्यू ए टीमलाच करावी लागते.
हो ला हो करणं, गाईसारखं दिसणं - लै भारी ;)
पण हो ला हो करत असले तरी ही टीम बदकासारखी असते बदक वरून शांत दिसतं पण जोरात पायानी पाणी वल्हवत असतं त्यामुळे त्यांचा सहभाग हा मोलाचा असतो बरं का.

(अशाच एका टीममधली गरीब गाय)
शुचि

रन्गराव's picture

2 Oct 2010 - 9:40 am | रन्गराव

मान्य आहे. खर पहाता क्यू ए जवळ्पास एक समांतर सिस्टीम उभी करतात. and to figure out developers' mistake u need to be smarter than them. And if the product is part of any critical system, QA's role becomes most prominent in terms of imagining every damn scenario. but its unfortunate that QAs are always treated like second citizen. when the product is pulled off, all the stardom mostly goes to dev community. And lack of aggression in the community is largely responsible for that. QAs explain their opinions towards the end of the release. That's a trend not a rule. Ask the questions at the design time itself.

सगळे भाग आवडलेत. या पुढचे पण लवकर टाका.

- सूर्य.

रन्गराव's picture

2 Oct 2010 - 9:41 am | रन्गराव

प्रयत्न करतो!

स्वाती२'s picture

2 Oct 2010 - 4:34 pm | स्वाती२

छान झालाय हा भागही.

कुंदन's picture

2 Oct 2010 - 4:59 pm | कुंदन

मस्त लिहिताय रंगराव , मजा येतेय वाचताना.

आवडाबाई's picture

3 Oct 2010 - 5:37 pm | आवडाबाई

सगळे भाग आत्ताच वाचले, आवडले आहेत
तुमची स्वतःची एक स्टाईल आहे, हरवू नका

थोडं टंकनाच्या अ‍ॅक्युरसीकडे पण लक्ष दिलंत तर जेवताना दाताखाली खडा आल्यासारखं वाटणार नाही
तुमच्याकडे वेळ नसेल हे समजण्यासारखे आहे, पण ते जमवणे तितकेसे अवघडही नाही

आणि मागचे भाग शोधावे लागताहेत, तेवढं लिंक्स देता आल्या तर पहा

पुलेशु

राजेश घासकडवी's picture

3 Oct 2010 - 9:30 pm | राजेश घासकडवी

अजून येऊ द्यात.

अब् क's picture

5 Oct 2010 - 3:08 pm | अब् क

क्रमशः लेखन तेही सर्वात जलद .. आणि दर्जा ला धक्क न पोहोचु देता...
क्या केहेने..
{तुम्हाला मिपावरील "सर्वोत्कृष्ठ जलद क्रमशः कथालेखकाचा पुरस्कार" देण्यात यावा अशी शिफारस करत आहे...}