कॉर्पोरेट तमाशा १० : पहिली पार्टी

रन्गराव's picture
रन्गराव in जनातलं, मनातलं
10 Oct 2010 - 11:39 pm

गेले तीन महिने मी आर्किटेक्ट बरोबर काम करत होतो. बाकिच्या टिमचा काम आणि माझ काम आता रेल्वेच्या रूळासारखे समांतर चालले होते. सरांनी मला सांगितल होता -"Your code might not be part of the release now, but i'm sure it will be needed at some point of time." मी-" The convergence is going to be a nightmare. If they were to include my code at later point of time, they cant do it without affecting the design. " सर -" None the less continue your work."
बनिया म्हणाला- " लगता है अपना प्रोडक्ट जल्दीही कोड कंप्लीट हो जायेगा. तेरा काम कहा तक आया है, वो प्रोडक्ट्मे कब जायेगा?" मी- "मुझे नही ये पता ये सब. सर जब बोलेंगे तब जायेगा!" गीता म्हणाली " आम्हालाही टेस्ट सेट अप तयार ठेवायला सांगितला आहे! घोडामैदान जवळ आहे. डेव्हलपर लोकांनी काय दिवे लावलेत ते कळेलच लवकर!" माझा चेहर्यावर गूढ हास्याची रेषा उमटली. गीताच्या नजरेतून ती सुटली नाहि. तीनं विचारला " तुझ्या डोक्यात काही तरी किडा चालू आहे, काय झाल ते सांग." मी -" काहि नाही" अस म्हणून वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला. पण ती हट्ट सोडायला तयार नव्हती. मी म्हणालो- "माझ्यावर तुमच्या टेस्टींगचा काहि फरक पडनार ना़ही." ती -" तू झिरो बग कोड लिहिला आहे का? एवढे हवेत राहू नका, पाय जमीनीवर ठेवा आपले. पण तू अजून ही काही तरी लपवतो आहेस!" मी-"झिरो बग माहित नाही. पण माझा कोड अजून प्रोड्क्ट्मध्ये गेलाच नाही तर तुम्ही काय ढेकळ टेस्टींग करनार! त्यामुळे माझी चूक पकड्न्याची संधी काही नाही मिळ्नार नाही तुम्हाला! तुमचा नशीब इतका चांगला नाही! " तिला बिचारिला आता थोडा राग आला होता. आणि ती मूळ मुद्दा विसरून गेली होती. स्त्रीच्या प्रश्नांच्या फैरीतून सूट्का करून घ्यायची असेल तर तिचा ईगो थोडासा हर्ट करना फायद्याचा असत याची परत एकदा प्रचिती आली.
गुरूवारी संध्याकाळी मॅनेजरची मेल आली. " Tomorrows build will be considered for code complete. Bug tracker has been setup for all QA and developers. A preliminary round of testing will be done tomorrow and if all goes well, we will declare code complete in the evening's meeting with US team! And in the night we can go to Le Meridien to celebrate all the hard work everybody has put!"
आणि तो शुक्रवार उजाडला. मी ऑफिसमध्ये पोहोचलो. बिल्ड तयार होत. डेव्हलपर्स अँक्शियस आणि क्यु ए उत्साही दिसत होते. मी बिल्ड डाऊनलोड केल. इन्स्टॉल चालू केला आणि एकटाच कॅफेमध्ये गेलो. परत आलो तोवर मॅनेजर तिथ आला होता. मला म्हणला " रंगराव जरा वेळ मिळाला तर बघा कसा झालाय प्रोडक्ट तो. इतका दिवस काही विशेष योगदान दिला नाही, आज कमीत कमी एकदा डोळ्याखालून घ्या!" सगळे लोक आमच्या दोघांकडे पहात होते. मी काही तरी उर्मट उत्तर देनार अशी अपेक्षा होती. मी -" हो जरूर. का नाही? कंपनीसाठी एवढतरी केलच पाहिजे!" तो निघून गेला! गीता " बर केलस तु त्याच्याशी भांडला नाहिस ते. असच जरा शहाण्यासारखा वागत जा!"
आतापर्यंत इन्स्टॉल पूर्ण झाला होत. प्रोड्क्ट चालू केल. पंधरा मिनीटात काय बघायचा होत ते बघून झाला. सरांनी सांगितलेला काम संपवला. मग पूर्ण दिवस टिवल्या बावल्या करन्यात घालवला. साडेचारला मॅनेजर पून्हा आला. क्यु ए. ना विचारला- " कसा चालू आहे!". क्यु ए लीड -" Mostly all the functionality is fine. There is some issues but mostly minor or cosmetic!" पाच वाजता सगळे लोक मिटींगला निघाले होते. मी आपला पी सी शी चाळा करत बसलो होतो. बनीया " मिटींगमे नही आन है क्या तुम्हे?" गीता -" छोड दो उसे सुबह से कुछ टेस्टींग नही किया. मिटींगमे बताने लायक कुछ् है नही उसके पास." मी- "हा यार सही तो बोल रही है ये." ते निघून गेले! मी पाच मिनिटानी दाखल झालो. आत भाषण चालू होता. " QA has completed the sanity check. The product is looking really great. I'm, proud of your hard-work! Our meeting with US team will start in half an hour. I want to give this nice surprise. I'll send them a mail right now, declaring code complete!" त्याने मेल बॉक्स उघडला.
त्याच्या चेहर्यावरचे भाव बदलत गेले! "रंगराव काय चालवलय हे!" कुणालाही मी नेमका काय केला हे माहित नव्हता! सगळ्यांचे चेहरे गोंधळात पडले होते!" मी-" सकाळी तुम्हीच तर योगदान द्यायला सांगितला होता. I just followed the order!" तो- "Enough! Developer is not supposed to file a bug and he cant decide whether its showstopper or not!" मी- "You have the administrative right to change the priority! Make it P3 if can justify that! And as far as developer not filing a defect is considered, I have been a bit unorthodox there. I hope I have not violated any kind of code of conduct. And if I have, I am ready to apologize! " तो - " Devs can go now. We cancel the code complete plan and the treat. I need to have some discussion with QA team!"
बनिया " ये क्या किया है यार तुम्हने! और ऐसा कोनसा बग मिला तुम्हे जो बाकी कोई धुंड नही पाया!" मी " याद है तुम्हे मैने उस दीन क्या कहा था जब मुझे वार्निंग मिली थी?" बनिया "मै तो भूल ही गया था यार. पर साले तेरी चक्कर मै हमारी ली मेरीडियन की पार्टी मिस हो गयी!" मी -"अबे फोकट्चंद कोड ब्रेक हुआ उसकी कोई पर्वा नही, पार्टी की पडी है! " तो -" वो तो होनाही था जैसे तुमने पहले बताया था. पर यार कंपनी पहेली बार पार्टी दे रही थी!" त्याचा चेहरा थोडा नाराझ झाला होता! मी म्हणालो- " ठिक है. एक काम करते है. मै ट्रिट देता हून तुम लोगोको! पर ली मेरीडियन मै नही. पराठा और आईसक्रिम खिला सकता हू सबको! तुम लोग यहा थोडा वेट करो मै ATM से पैसे निकालके लाता हू तब तक कयु ए भी आ जायेंगे" . मी बाहेर जावून पैसे घेवून आलो. गीताचा नवरा आदि तिथ भेटला! " काय रंगराव बर्याच दिवसात भेटला नाहीत आणि आज कोड रीलीज होता म्हणे. त्यामुळे मला गीतान आज पुढा घरी जायला सांगितला आहे! " मी - " प्लॅन कॅन्सल करा तो. आणि माझ्यबरोबर पार्टिला चला." झालेली गोष्ट तेव्ढ्यात बनियाचा फोन आला " भाग गया क्या हिरो चूना लगा के! ये क्यु ए तो तुम्हे बहोत ढूड रहे है! " मी -" एक काम कर. तुम सबको लेके निचे आ जाओ मै पहूच ता हू दो मिनिट्मे! " मी आदीला म्हणालो "साहेब आज चला तुम्हिच नाहितर राणी लक्ष्मीबाई चिरून काढतील मला." आम्ही दोघ त्याच्या कारने ऑफिसला पोहोचलो! सगळे लोक वाट पहात होते. क्यु ए लिड म्हणाला " तू पार्टी दे रहा है इस लिये बच गया! मॅनेजरने हमारी बहोत लेली. और बोला है - You should find any bug before he does!" गीता म्हणाली -"लोक मिठाचा खडा टाकतात. ह्या इदर कल्यानी मानसाने पूर्ण पोतं ओतल आहे! पण हे शेवटचा. पैजेवर सांगते ह्यापुढे तुला अशी संधी मिळ्णार नाही!" मी -" मग तर तुम्ही आधीच पैज हारला आहात!" ती -" एवढा काय शहाणा लागून गेला आहेस तू! मी अजीबात घाबरत नाही पैज लावायला!" आदी - " लावू नकोस पैज विनाकारण त्याच्याशी." नवर्यानही साथ न दिल्यामुळे तिचा संताप वाढला होता. " तुम्हाला काय वाटता आम्ही महिला पैज जिंकू शकत नाही." आदी -"मुद्दा आत लिंगभेदावार आला तर. असो ते आपण नंतर ठरवू. But let me explain you why its not a safe bet. What you guys are doing is black-box testing. But it can't catch all the bugs quickly and the kind of bugs he is talking about can be found by white-box testing. He know the design and code in and out and you don't have time to do that!" तिचा राग आत शांत झाला होता! बनियाने विनोद करायचा प्रयत्न केला " सारी टिम जा रही है, सिर्फ एक बन्दे को अकेला छोड के." मी- " उसकी याद आ रही तो मै बूला दू क्या? पर बिल तुम्हे देना पडेगा ." बनिया काहि बोलनार इतक्यात गीता: " बनिया बेट मत लगा उसके साथ. बेशरम है वो. वोह बुला के ले आयेगा और तुम्हे बिल देना पडेगा! " आणि हसत हसत आम्ही पार्टीला गेलो!

नोकरीअनुभव

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

11 Oct 2010 - 12:38 am | कानडाऊ योगेशु

रंगराव ही कथा आहे असे समजुन प्रतिसाद देतो आहे.(भाग नऊ आणि भाग दहा दोन्हींना मिळुन हा प्रतिसाद आहे.)

आतापर्यंत वाचल्यावर एक गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे ही कथा टिपिकल मसालेदार हिंदी पिक्चरच्या वळणाने जात आहे.म्हणजे नुकताच कंपनीत जॉईन झालेला होतकरु तरुण..त्याला नेहेमीच चुकीचा विचार करणारा मॅनेजर मिळणे..तरुणाला कोणीतरी गॉडफादर भेटणे... हिंदी पिक्चरमध्ये हिरो जसा सर्वगुणसंपन्न असतो तसा हा तरुणही आउटसोर्सिंग/क्वालिटी वगैरेबद्द्ल अधिकारवाणीने बोलतो.. वगैरे वगैरे... (गीता जर विवाहीत नसती तर तिथे थोडा रोमान्सही टाकता आला असता..) थोडक्यात आय.टी च्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही तिच बॉलिवुडची नेहेमीची कहाणी चढवली आहे.

माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरुन हे निश्चितपणे म्हणु शकतो ही इतकेही मूर्ख लोक आयटीत नसतात.सर्विस कंपन्या क्लायंट्सना एका मर्यादेपर्यंतच मूर्ख (खरा शब्द चुत्या) बनवु शकतात. आऊटसोर्स करण्याआधी कुठलीही कंपनी व्हेन्डर कंपनीला पी.ओ.सी. (प्रूफ ऑफ कन्सेप्ट) प्रोटोटाईप बनवायला सांगते आणि त्यानंतरच काम सोपवायचे की नाही हा निर्णय घेते.मी स्वतः एका नामाकिंत कंपनीत ह्या प्रक्रियेचा एक भाग होतो आणि क्लायंटने कसे आडवे तिडवे प्रश्न विचारले आणि काम योग्य कंपनीत जातेय की नाही/व्हेन्डर कंपनीत ह्यासाठी योग्य रिसोर्सेस आहेत की नाही ह्याची हरप्रकारे शहानिशा करुन घेतली होती ह्याचा साक्षीदार आहे. (मिपावर इतरही असे अनेक नक्कीच असतील ज्यांनी ह्या प्रक्रिया दोन्ही बाजुंनी हाताळल्या असतील.)

तुमची उमेद खच्ची करण्याचा हेतु मुळीच नाही पण तुम्ही रंगवत असलेल्या मॅनेजरबद्द्ल सहानुभुती निर्माण झाली म्हणुन हे लिहिले.

बाकी कथा नेहेमीप्रमाणेच वाचनीय झाली आहे.

चु.भु.दे.घे.

(आय टी तला हमाल मुलगा) योगेश

योगी९००'s picture

11 Oct 2010 - 2:29 am | योगी९००

मी सुद्दा रंगराव यांचे सर्व लेख बारकाईने वाचत आहे...उगाच negative प्रतिक्रिया द्यायला आवडले नाही, म्हणून आजपर्यंत जास्त काही प्रतिक्रिया दिल्या नाहीत. (फक्त पहिल्या भागात एक असहमती दर्शवली होती.)

कानडाऊ योगेश यांच्याशी १००% सहमत...(माझे नाव सुद्धा योगेश आहे किंवा मी सुद्धा IT मध्ये आहे म्हणून नाही..पण त्यांचे विचार पटले..)

ही जर एक कथा असेल तर ठिक, पण सत्यकथा असेल तर जरा स्व:ताचे कौतूक अति होतेय असे उगीच वाटले. केवळ आपण किती सर्वांपेक्षा वेगळे आणि वरचढ आहोत...प्रत्येक वेळी मॅनेजर आपल्याशी कसा वाईट वाटला आणि आपण कशी कुरघोडी केली हे दाखवले गेले आहे. मॅनेजर लोकं काय इतकी वाईट नसतात..

(माझ्यामते जर एखादा होतकरू(नवशिका..?) तरूण जर खरोखर चांगले काम करत असेल आणि मॅनेजरला त्या तरूणापासून जर स्व:ताच्या अस्तित्वाबद्दल धोका वाटत असेल..तर जास्त पंगा न घेता मॅनेजर लोंक (नमते घेऊन) most of the time अश्या लोकांबरोबर जुळवून घेतात आणि त्यांचा योग्य तो वापर करून स्व:तची सुद्धा तरक्की करून घेतात. मी जर मॅनेजर झालो तर असेच वागेन..)

बाकी सर्व भाग वाचनिय आहेत..लेखनशैली आवडली..पु.ले.शु.

तुमचाही नाव योगेश आहे आणि आणि विचारही योगेश सारखे म्हनून त्याना दिलेल उत्तर तुमच्याही प्रश्नांना लागू आहेत ;)

रन्गराव's picture

11 Oct 2010 - 8:30 am | रन्गराव

सर्व प्रथम प्रामाणिक प्रतीक्रिया दिलीत ह्याबद्दल धन्यवाद.

>>आतापर्यंत वाचल्यावर एक गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे ही कथा टिपिकल मसालेदार हिंदी पिक्चरच्या वळणाने जात आहे.म्हणजे नुकताच कंपनीत जॉईन झालेला होतकरु तरुण..त्याला नेहेमीच चुकीचा विचार करणारा मॅनेजर मिळणे..तरुणाला कोणीतरी गॉडफादर भेटणे... हिंदी पिक्चरमध्ये हिरो जसा सर्वगुणसंपन्न असतो तसा हा तरुणही आउटसोर्सिंग/क्वालिटी वगैरेबद्द्ल अधिकारवाणीने बोलतो.. वगैरे वगैरे... (गीता जर विवाहीत नसती तर तिथे थोडा रोमान्सही टाकता आला असता..) थोडक्यात आय.टी च्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही तिच बॉलिवुडची नेहेमीची कहाणी चढवली आहे.

कल्पना आवड्ली मला! कॉपीराईट्स घेवून ठेवतो. गीताला अविवाहीत दखवून एकता कपूरच्या सिरिअल सारखी एक लांबलचक सिरियल काढता येइल. किंवा चित्रपट ही. तसा ह्या विषयावर हिंदी चित्रपटही फारसे निघाले नाहित. जोक्स अपार्ट, कंपनीम्ध्ये दोन प्रकारच्या क्षमतांची गरज असते. इंटर पर्सनल आणि टेकनिकल! ह्या गोष्टी मॅनेजमेंट आणि ईंजिनीयर ह्या दोघांसाठी महत्वाच्या असतात हे आपल्याला मी सांगन्याची गरज नाही. आता ह्या दोन्ही स्किल्सवर रंगराव आणि मॅनेजर दोघांनाही अप्लाय करून पहा! तमाशा का म्हंटल आहे ते कळेल! पूर्ण उत्तर आता देवू शकत नाही, पूढच्या काही भागात चित्र पूर्ण होईल.

>>माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरुन हे निश्चितपणे म्हणु शकतो ही इतकेही मूर्ख लोक आयटीत नसतात.सर्विस कंपन्या क्लायंट्सना एका मर्यादेपर्यंतच मूर्ख (खरा शब्द चुत्या) बनवु शकतात. आऊटसोर्स करण्याआधी कुठलीही कंपनी व्हेन्डर कंपनीला पी.ओ.सी. (प्रूफ ऑफ कन्सेप्ट) प्रोटोटाईप बनवायला सांगते आणि त्यानंतरच काम सोपवायचे की नाही हा निर्णय घेते.मी स्वतः एका नामाकिंत कंपनीत ह्या प्रक्रियेचा एक भाग होतो आणि क्लायंटने कसे आडवे तिडवे प्रश्न विचारले आणि काम योग्य कंपनीत जातेय की नाही/व्हेन्डर कंपनीत ह्यासाठी योग्य रिसोर्सेस आहेत की नाही ह्याची हरप्रकारे शहानिशा करुन घेतली होती ह्याचा साक्षीदार आहे. (मिपावर इतरही असे अनेक नक्कीच असतील ज्यांनी ह्या प्रक्रिया दोन्ही बाजुंनी हाताळल्या असतील.)

काही अंशी मुद्दा मान्य! पण हे घडण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या असतात. मॅनेजर चे टेक्निकल क्वॉलेफिकेशन आणि पर्फेक्शन किती गरजेचा आहे! इथ दोन्हीही गोष्टीची बोंब होती.

>>तुमची उमेद खच्ची करण्याचा हेतु मुळीच नाही पण तुम्ही रंगवत असलेल्या मॅनेजरबद्द्ल सहानुभुती निर्माण झाली म्हणुन हे लिहिले.
बाकी कथा नेहेमीप्रमाणेच वाचनीय झाली आहे.

अमान्यता दर्शवन्यात गैर काहिच नाहि. आणि आतापर्यंतेचे भाग वाचून कुठ्तरी काही तरी अपूर्ण आहे हे तुमच्या लक्षात आलेला दिसतय. that means you are thinking pretty fast, but hold on big picture is not yet clear!

कानडाऊ योगेशु's picture

11 Oct 2010 - 12:04 pm | कानडाऊ योगेशु

कल्पना आवड्ली मला! कॉपीराईट्स घेवून ठेवतो. गीताला अविवाहीत दखवून एकता कपूरच्या सिरिअल सारखी एक लांबलचक सिरियल काढता येइल.

विवाहबाह्य संबंध हीच एकता कपूरच्या सिरियलमधुन सातत्याने दिसणारी गोष्ट आहे. लांबलचक सिरियल साठी एकता कपूरकडेच जायचे असेल तर गीताला विवाहीत असलेले दाखवणे ही एक अट एकता कपूर स्वतःच घालेल पाहा. (ह.घ्या.)
ते असो. पण संपूर्ण कथानकात एकदम नॉर्मल (व जिंदादील ) वाटलेले पात्र म्हणजे गीताचा नवरा आदीत्य.त्यामुळे केवळ टी.आर.पी साठी गीता/आदीत्यला कथानकात ओढुन कहानीमे ट्विस्ट आणणे पटले नाही म्हणुन मी तसे डायरेक्ट लिहायचे टाळले.
पण तिच्याशी सातत्याने होणारे तुमच्या नायकाचे वाद/संवाद पाहता कथेतील नायिका तिच असावी/व्हावी असे वाटुन गेले.

कंपनीम्ध्ये दोन प्रकारच्या क्षमतांची गरज असते. इंटर पर्सनल आणि टेकनिकल! ह्या गोष्टी मॅनेजमेंट आणि ईंजिनीयर ह्या दोघांसाठी महत्वाच्या असतात हे आपल्याला मी सांगन्याची गरज नाही.

मान्य.पण तुम्ही पहील्या भागातच लिहिले आहे

पहीली कंपनी पहीला दिवस

.थोडक्यात कथानायक कॉर्पोरेट क्षेत्रात नवा आहे आणि तुम्ही उल्लेखिलेला मुद्दा हा अनुभवांतीच येतो.(कथानायक कोडिंग करत असल्याने एम.बी.ए असण्याची शक्यता कमी आहे.)एकुण कथानायकाला तुम्ही जुन्या काळातील कथेत वा चित्रपटात सातत्याने आढळणार्या सुधारकाचाच आधुनिक चेहरामोहरा दिला आहे आणि त्यासाठी सर्वस्वी योग्य अशी परिस्थिती पण त्याच्या अवतीभवती निर्माण केली आहे.

परंतु खाली पु.पें नी लिहिल्याप्रमाणे तुमचा वापर करुन तुमचा आर्किटेक्ट बॉस मॅनेजरला धोबीपछाड घालण्याचाच प्रयत्न करत असावा असे वाटते. ह्या पध्दतीचे राजकारण कुठल्याही क्षेत्रात पाहायला मिळते.
असो.पु.ले.शु आणि ते नक्कीच वाचेन.

प्रतिक्रिया सकारात्मक घेतल्याबद्दल धन्यवाद.

नेत्रेश's picture

11 Oct 2010 - 5:56 am | नेत्रेश

आशी आणी या पेक्षाही वाईट उदाहरणे पाहीली आहेत. त्यामुळे ही सत्यकथा असेल तर मुळीच आश्चर्य वाटणार नाही.

रंगरावांनीही स्वतःचे फार कौतुक केलेले नाही. पण दुसर्यांचा मुर्खपणा दाखवला आहे.
त्यांना प्रोजेक्ट्चे संपुर्ण आर्किटेक्चर माहीत होते. डिझाईन फ्लॉज माहीत होते. ते एक्सल्पॉईट करून बग एक्स्पोज करणे फार कठीण नसते. अशी कामे डेव्ह टीम, पॅरलल डेव्ह टीम, आर्किटेक्ट आणी लीड प्रोजेक्ट क्यु.ए. ला डिलीव्हरी करायच्या आधी करतच असतात. फक्त रंगरावांनी सकाळी ताबडतोब मेल न करता शो स्टॉपर बग शेवटच्या क्षणी लॉग केला (मॅनेजर ची मारायला किंवा स्वतःचे महत्व अधोरेखीत करायला).

नगरीनिरंजन's picture

11 Oct 2010 - 7:58 am | नगरीनिरंजन

ही कथा म्हणून चांगलीच रंजक आहे पण सत्यकथा असेल तर वरती कानडाऊ योगेश म्हणाले तशा काही गोष्टी निश्चितच खटकतात. ही गोष्ट वाचताना मला राहून राहून एका जपानी माणसाचे उद्गार आठवतात. त्याच्या मताप्रमाणे एका भारतीय इंजिनिअरची क्षमता पाच जपानी इंजिनिअर्सएवढी असते पण दहा भारतीय इंजिनिअर मिळून दहा जपानी इंजिनिअर्सच्या एक दशांशही काम करू शकत नाहीत. याचं कारण सगळ्यानाच माहिती आहे आणी ही कथाही तेच अधोरेखित करते असं मला वाटतं.

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Oct 2010 - 11:07 am | llपुण्याचे पेशवेll

यात दुसरी बाजू अशीही असू शकते असे वाटते आहे ते म्हणजे सदर रंगरावाचा आर्किटेक्ट बॉस त्याला मॅनेजरचे कच्चे दुवे हेरून रंगरावाकरवी टार्गेट करत असणे.
:) आमच्या धंद्यात आम्ही भांडण करणार्‍या डेव्हलपर कडून अशा गोष्टी जाणून घेऊन नंतर खुबीने त्याचा टेस्टींगच्या वेळेला वापर करून , डेव्हलपरपेक्षा QA किती Technically , Functionally matured आहे असे प्रशस्तीपत्रक घेणार लोक पाहीले आहेत. अशा गोष्टी फ्रस्ट्रेशन मधे बाहेर काढणारे Developer च फक्त दोषी आहेत असे नाही पण मैत्रीचा असा prefessional वापर करणारे टेस्ट लीडही तितकेच दोषी आहेत.
त्यामुळे आर्किटेक्टाने रंग्याचा वापर करून मॅनेजरला उघडा पाडला असण्याची शक्यता देखील आहेच.

रन्गराव's picture

11 Oct 2010 - 11:25 pm | रन्गराव

थोड हळू पेशवे. ;)

अनिल २७'s picture

11 Oct 2010 - 11:21 am | अनिल २७

रन्गराव - द सुपर हिरो.. भाग - १०.. समाप्त...

हुश्श !

नारायण मुर्तींनंतर आम्हीच !