टिम जॉइन करून तीन महिने झाले होते. सगळे लोक मोस्टली फ्रेशर्स होते!. कॉलेजमोड मधून मुलं अजून बाहेर पडली नव्हती! मॅनेजमेन्ट ची केबिन्स आमच्या कयुबिकल्सपासून दूर होती. फक्त टीम लीड आमच्या बरोबर बसायचे. पण तेहि तसे यंग होते. आणि टिम मध्ये सगळी बॅचेलर मुला! अगदि मेकॅनिकल ईन्जीनियीरिन्ग चा वर्ग झाला होता! त्यामुळे मुलं संधी मिळेल तेन्व्हा धुडगुस घालयची!.
एका शुक्रवारी टिम लिड म्हणाला- " सोमवापासून तुमचा दंगा बंद. एक मुलगी टिम जॉइन करते आहे. सुधरा आता!" पोर एकदम खुश! बनियान विचरला "तुमने उसका इन्टरव्हि लिया है क्या?दिखने मै कैसी है?". टिम लिड म्हणाला "हा लिया है! पर तुम सपने देखना छोड दो मजनू, उसकि शादी हो चुकी है!"
दोन मिनिटापूर्वी खुललेले चेहरे आता स्वप्नभंग झाल्यासारखे झाले होते. बनिया तर दोन दिवस जेवायला न मिळाल्यासारखा तोंड करून उभा होता. मी त्याच्याकडे बघत महणालो- " चलो अच्छा है कि वोह मॅरीड है. काम और लफडा एक हि जगह पे नही करना चाहिये!" मुलाना ते पटल्यासारखा वाटला!.
आणि सोमवार उगवला! पोरांनी पहिल काम त्या दिवशी केल म्हणजे ऐश्वर्या, अमॄता, रानी, करीना, प्रीती, शकिरा, ब्रिटनी अशा सगळ्या देवींना, आपापल्या डेस्कटॉपच्या वॉलपेपरवरून हलवला, त्यांची जागा आता सुर्योदय, समुद्र, हिमालय, कार आणि विमानं यांनी घेतली. सगळ्यानी आपापली टेबलं आवरली. कधी नव्हे ते क्युबिकल्स चकाचक झाली होती. आणि अकरा वाजता ती आली. मॅनेजरनं तिची इन्ट्रोडक्षन करून दिली. " बॉईज, थिस इज गीता, शी विल् वर्क विथ अस एज अ क्यु ए."
दुपारि ती जेवायला आमच्याबरोबर आली. रोज दंगा करत हादड्नारी पोर आज, शांतपणे पटापटा जेवन करून पळत होती! तीला आमच्या( मी आणि बनिया) क्युबिकल मध्ये जागा दिली होती. जेवन आवरून ती वर आली. माझ्या डेस्कटॉपकडे पहात म्हणाली- "हे सुखोई आहे ना? ते मलाही खूप आवडतं!" मी -"हो". हा आमच्यामधला पहिला आणि शेवट्चा सुसंवाद, त्यानंतर फक्त भांडणच झाली.
मी पूढ तिला विचारला " ह्या आधी कुठ काम करत होता." ती म्हणाली " कुठही नाहि. सहा महिन्यपूर्वीच लग्न झाला आहे! लग्नाआधी यु. के. मध्ये आधी एम. एस. केल. आणि मग दोन वर्ष तिथच जॉब केला!" मी -" कुठ्ल्या एरियात एम. एस. केलत?" ती म्हणाली "टेर्रैन मप्पिन्गशी रेलतेड." आश्चर्य वाटून मी म्हणालो, "मग आता इथ काय करताय?" ती म्हणाली " काम अजून काय? पण तुला नक्की म्हणायचाय काय?" मी म्हणालो " तुम्ही इतका चांगल शिक्षण घेतला आहे. ह्या इर्रेलेव्हन्ट एरियात काम करून डिग्री वाया नाही का जाणार तुमची?" ती म्हणाली " तु म्हणतोस ते ऐकायला बर आणि सांगायला खूप छान वाटत. पण ह्या शहरात माझ्या एरियात काम करणारी एकही कंपनी नाही. शिवाय माझ्या नवर्याहे इथच एक स्टार्ट अप जॉइन केली आहे. ती बघ ती पलिकडची बिल्डिंग, खिडकितून बाहेर बोट दाखवत म्हणाली. " कुठून मला विनोद सुचला देव जाणे. मी म्हणालो "म्हण्जे इथ बसून नवर्यावर लक्ष ठेवने हे मुख्य काम आहे तर!" ती वैतागून म्हणाली " सकाळी माझ्या नवर्याने पण हाच टोमणा मारला होता. तुम्ही सगळे पुरूष एका माळेतले मणी! " त्यात बनिया पचकला " सहि तो कह रहे तो वोह, सोफ्ट्वेर मै लडकिया करती क्या है और?" तीचा पारा चढला होता. ती आमच्यावर रागवली - " तुम लोगो को अकल नहि है लडकीयोंसे कैसे बात करते है? पर तुम दोनो को एक महिने मै ठिक कर दुन्गी!" साक्षात दुर्गा अवतार! डोक्यात घोषणा दुमदुमली " जय भवानी!"
संध्याकाळी तिचा नवरा आदित्या तिला न्यायला आली. तिने सर्वांशी त्याची ओलख करून दिली. माझ्या बद्दल म्हणाली "तुला हे पात्र आवडेल आदी!"
दुसर्या दिवशी टीम लिड मिठाई घेवून आला. त्याचा लग्न ठरला होता! मी त्याला म्हण्टला. "या सरकार तुम्हाला तुमचा भविष्य दाखवतो. " त्याला एक फोटो दाखवला. त्याचा टाईटल होतो "वाईफ इज
वाईफ नो मॅटर व्हू यु आर!" फोटो मध्ये सिहीन गर्जना करत होती आणि सिन्ह घाबरून उभा होता!
सगळी मुल तो फोटो बघून हसू लागली. तोपर्यन्त गीता तिथ आली आणि म्हणाली "बघु दे मला. ........ दुसरा काहि काम नाहि आहे का रंगराव तुम्हाला! आणि तुम्हे सगळे बघत काय उभारलाय. जा आता कामला लागा!" हा दुर्गा अवतार दुसर्यान्दा पाहून पोरा पार घाबारली. त्यात लंचब्रेक मध्ये ती नसताना टीम लिड ना अजून भिती घाताली. " तुम सब लोग ध्यान से सुन लो. उस गीता के साथ थोडा ढंग से पेश आना. ऊसने अगर तुम्हारे खिलाफ कंप्लेन्ट कर दी तो तुम गये काम से. लडकीकी कंप्लेन्ट बहोत सिरियसलि ली जाती. कोई नाहि बचा पायेगा तुम्हे. और रंगराव पर्टीक्युलरली तुम!" पोर आता पार घाबरली.
संध्याकाळि आदी तिला न्यायला आला. ती म्हणाली "थांब अर्धा तास. माझा काम व्ह्यायचा आहे. " "ठीक आहे" अस म्हनून तो माझ्यजवळ येवून बसला. म्हणाला " काय चालु आहे राव". मी म्हणालो "एक मज्जा बघायची आहे का?" तो म्हणाला "दाखव ". मी त्याना सकाळ्चा फोटो दाखवला. " सहि आहे मेल कर. मी मित्राना फोरवर्ड करतो". गीतान मोनिटर बन्द केला आणि म्हणालि. " चल आदि आपल्याला उशिर होतो आहे" आदि -" अग पन तुच म्हणालि होतीस कि अजून काम आहे म्हनून. " ती -" पण आत मूड नाहि" अस म्हनून चालु लगली. आदी मला म्हणाल " तु काळजी करू नको. घरी पोचुपर्यन्त थन्ड होइल! "
टिम लीडना परत मला सांगितला. " ती कंप्लेन्ट करणार तुझ्या विरूद्ध! " मी -" पैज लाव. अस होनार नाहि!" तो -" का? ती तुला घाबरते अस वाटता तुला!" मी -" तस नाहि. कंप्लेन्ट मन्द आणि दुबले लोक करतात. ज्या पद्धतिना पोरान दोन दिवसात गप्प बसवला आहे- शी इज स्मार्ट, अन्ड क्नोज होऊ टू हॅन्डल बॉयिज!"
पुढ पूर्ण आठवडा पोर पूर्ण शान्त राहिलि. बनिया म्हणाला "मै जेंटलमॅन बनके दिखावुंगा!" मला फार हसू आला. गीताचे आणि माझे रोज खट्के उडत राहिले! आणि आदिशी चांगली मैत्री वाढत गेली!
एक दिवस मुल कॅफे मध्ये खिदळत बसली होती. आणि गीताला तिथ येवून पहताना पानिपतातून पराजयाची खबर आल्याप्रमाणे शांतता पसरली!. ती टेबलापाशी येत म्हणाली " तुम लोग बडे हि बोअरिन्ग हो!" मी- " हे सगळा तुमच्यामुळ झालय! तुम्हि येण्याआधी एकदम लाईव्हली ग्रूप होता आमचा! तुम्हि आल्यापासून हा जेंटलमॅन बूरखा घातला आहे सगळ्यानी!" ती सगळ्यांकडे पहात. " तुम लोग और जेंटलमॅन, भूल जावो! साथ मै बहोत बोअरिन्गभी हो" अस म्हनून एक खट्याळ स्माईल देवून निघून गेली.
मी जोर जोरात हसू लागलो! बनिया " हस क्यो रहा बे कमिने?" मी " बहोत सहि गेम बजा के गयी है वोह तुम लोगो का! वैसे बोअरिन्ग लेबेल सुट करता है तुम्हे!" तो चिडून म्हणाला " तुम्हारि कोणसी आरती उतारती है वो?" मी "आय अम बॅड बोय फ्रोम डे वन बट नोट बोअरिन्ग लाईक यू!"
दुसर्या दिवशी मेकॅनिकल ईन्जीनियीरिन्ग चा वर्ग पून्हा सुरु झाला! ती आता टिमचा पार्ट होती. ती आल्यापासून एक ॠतु चक्र पूर्न् झाला होता. नेव्हर अन्डर ईस्टिमेट अ वूमन!
प्रतिक्रिया
25 Sep 2010 - 7:58 pm | चिरोटा
मस्त. आता काही प्रॉब्लेम नाही आहे ना?
25 Sep 2010 - 8:09 pm | रन्गराव
उत्तरासाठि अजून थोडि वाट पहावी लागेल! :)
25 Sep 2010 - 8:06 pm | पैसा
हा घ्या फोटु. मला दिसत नव्हता.
25 Sep 2010 - 8:08 pm | रन्गराव
धन्यवाद!
26 Sep 2010 - 12:31 am | आदिजोशी
लेखमाला छानच आहे.
इंग्रजीमधले शब्द इंगग्रजीतच लिहावे ही विनंती. वाचायला प्रचंड त्रास होतो आणि लिंक तुटत राहते.
26 Sep 2010 - 8:41 am | रन्गराव
This is an interesting suggestion! I'll follow it! [;)]
26 Sep 2010 - 2:14 am | डावखुरा
रंगराव खरंच उत्तम लिखाण होतंय....
थोडं शुध्द्लेखनाकडे म्हणजे लेखन शुध्द्च आहे पण टंकताना होणार्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा...
मी सुरुवातीला जरा दुर्लक्ष केलं होतं लेखमालेकडे पण पराभाऊंनी सांगितले..कॉर्पोरेट तमाशाचा आस्वाद घेतोय..आणि माझीही उत्सुकता चाळवली......आताच चारही भाग वाचुन संपवले...
पुलेशु...पुढील भागही असेच पटापट येऊ द्या...
:)
26 Sep 2010 - 8:52 am | रन्गराव
धन्यवाद्!
26 Sep 2010 - 8:20 am | प्रीत-मोहर
पुढचा भाग?
26 Sep 2010 - 8:51 am | रन्गराव
वेल मिळेल तसा लिहित जाइन! सध्या आमची release and night-outs चालु आहे . I write in whatever time I get while the modules are built and run . अशुद्द्ध लेखन हा त्याचाच परिणाम आहे [:)]
26 Sep 2010 - 12:01 pm | स्वानन्द
मग लिहील्यानंतर लगेच प्रकाशित न करता सेव्ह करून ठेवा, आणि मग टायपिंग च्या चुका सुधारून मग प्रकाशित करा..