एका स्कोर्पिओ च्या मागे
"बघतोस काय ? मुजरा कर .....! "
एका सुमोपाठी लिहिलेले 'बघ माझी आठवण येते का ?
' ''पाहतेस काय प्रेमात पडशिल''.
खुबसूरत हू मै, मुझे नजर मत लगाना, कसम है रोजीकी पीकर मत चलाना
रस्त्याची अखंडता, देशाची एकात्मता
एका जीपवर लिहिलं होतं:
साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.
'दम है तो पास कर, नही तो बर्दाश्त कर'
'चक दे फट्टे, नप दे गिल्ली, सुबह जलंधर, शाम मे दिल्ली'
एम पी च्या एका शाळेच्या बस मागे हे लिहिलेले असायचे
' मुझे मत छेड, मै तो बच्चोंवाली हूं"
मत ले पंगा
पटक दुंगा.
एका ट्रक मागे लिहिलेलं वाक्य: अं हं. घाई करायची नाही.
धक्का लागी बुक्का
१) तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही
२) कटकट करु नका, जावा फुढ
३) (घरात कोण न्हाय) पुढ जावा
४) गोमू चल सन्गतीनं, माझ्या तू येशिल
"गपगुमान माझ्या मागं मागं सांग-लीला येतीस का ?"
ये ३० का जाऊ
"मी चक्रम आहे,
माझ्या मागे राहु नका,
आणि माझ्या पुढेही जाऊ नका."
बाई(क) च्या मागे नका लागु...माझ्याशी गाठ आहे...
नानाचा जोर...
पप्पु , पिंकी , छोटी , चिंटु , ताई , अमोल , बबलु
=============================
एका ट्रक च्या मागे लिहले होते: राजू, चिंटू , सोनू ....!
अणि खाली लिहले होते .....
बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !
=====================================
एका टेम्पों च्या मागे लिहले होते .......
भाड्याने मिळेल अणि खली लिहले होते ............. आईचा आशीर्वाद
=====================================
TRUCK IN PUNE - THOK DU KYAAA ???
=====================================
एका CAR च्या मागे लिहले होते .......
YES..it's my dad's Road .....any problem...... Chalak Kavvahi GACHANKAN Break dabu sakto........
=====================================
बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने!
=====================================
"Buri Nazarwale tere bacche jiye, Bada hokar tera he khun piye"
=====================================
"मै कब लौटुंगा मेरा इंतजार मत करना, ड्रायव्हर हु मै, मुझसे प्यार मत करना"
=====================================
एका रिक्षाच्या मागे लिहिलेल वाक्य............. येता का जाउ...............
=====================================
एका रिक्शा वर लिहले होते: सावन को आने दो अणि त्याच रिक्शाला एका ट्रक ने उडवले अणि ट्रक च्या मागे लिहले होते आया'' सावन जूम के ..........
=====================================
एका रिक्शाच्या मागे लिहिलेल होत: गरीब असाल तर लाजू नका, श्रीमंती आली तर माजू नका.*
=====================================
गर्दीतुन खुप स्लो चाललेल्या एका जुनाट खटारा गाडीवर लिहीलेले वाक्य: my other car is Rolls-Royce!
=====================================
. "जलो मत, बराबरी करो..."
=====================================
पुढे जाणार्या ट्रकच्या मागे लिहिले होते: शिस्तीने देश मोठा होतो!!!"
पण अर्धा तास तो ओवर टेक करु देत नव्हता. शेवटी एका वळणावर ओवर टेक केल्यावर मागे वळुन बघितलं तर पुढच्या बाजुला लिहीले होते: " हे असचं चालायचं......!!!!"
=====================================
एका टेम्पोच्या मागे लिहिलेले: "मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल " आणि खाली लिहिले होते....
"ड्रायवर शिकत आहे" (बारीक़ अक्षरात)
=====================================
एका ट्रकच्या मागे जे काही होतं ते मी असं वाचलं,
अप्पा हॉर्न, माऊलींचा आशिर्वाद ओके, आई प्लीज
=====================================
पुण्यात एका गाडीच्या (बहुतेक रिक्शा) मागे वाचलं होतं..
'सुरक्षित अंतर ठेवा...लहानांमधे आणि वहानांमधे
=====================================
नुसती झीट
=====================================
आप्पा कावत्यात
=====================================
१३ १३ १३ सुरूर !
=====================================
एका फटफटीच्या मागे लिहिलं होतं -
१ किस २ ना
=====================================
आणखी काही बाई(क)
बाईक डे
बाई कडेला
बाईक वेडा
बाई(क) फुर्रर्रर्र!!!
बाईक वर बसा!!!!!!!!!!
=====================================
एका ट्रकच्या मागे लिहिलं होतं..
'तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..'
---------------------------------
हे पूण्यातल्या रिक्षा वरचे...
'अहो, इकडे पण बघा ना...'
'चला जाऊयात की....'
पूना से निकली कुँवारी,
दिल्ली में सिंगार हुआ,
मालिक की बनी दुल्हनिया,
ड्राइवर से प्यार हुआ!"
याचा मी काढलेला अर्थ असा:
'बजाज टेम्पो' मध्ये जन्मलेली रिक्षा, दिल्ली ला तशीच पाठवली गेली; तिथे सर्व प्लास्टिक, कुशन वगैरे काम झाले. मालकाने विकत घेतली; पण राहते कुणाबरोबर? ड्रायव्हरबरोबर!
'कृष्ण करे तो लीला , हम करे तो अपराध.
"keep safe distance. I work with fevicol "
" चिटके तो फटके "
पुणयात आ़ज काल रिक्षा च्या पाठिमागे बघायला मीळ्ते. "ये नाही आहो रिक्षावाले म्हणा"
एका रिक्षाच्या पाठिमागे लिहिलं होतं...
"हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर".
प्रतिक्रिया
12 Oct 2010 - 10:53 pm | जिप्सी
पण सगळं तुमीच लिहिल्यावर आम्ही काय लिहायचं???
कोल्हापूरातं एका रिक्षाच्या मागं लिहिलेलं होतं :- ईतिहास मत पुछो ! (मालक खुनाच्या शिक्षेला जाउन खडी फोडून आलेला होते!)
12 Oct 2010 - 10:55 pm | शिल्पा ब
<<<पुढे जाणार्या ट्रकच्या मागे लिहिले होते: शिस्तीने देश मोठा होतो!!!"
पण अर्धा तास तो ओवर टेक करु देत नव्हता. शेवटी एका वळणावर ओवर टेक केल्यावर मागे वळुन बघितलं तर पुढच्या बाजुला लिहीले होते: " हे असचं चालायचं......!!!!"
हे खुप हसवुन गेलं
13 Oct 2010 - 5:53 am | शुचि
(१) अमेरीकेमधे फ्रीवे वर गाड्यांना अफाट वेग असतो. त्यामुळे २ गाड्यांमधे बरच बरच सुरक्षीत अंतर ठेवावं लागतं. इतकं की बारीक अक्षरातल्या पाट्या वाचता येऊ नयेत. त्यामुळे एका गाडीच्या मागे मोठ्ठ्या अक्षरात लिहीलं होतं "हाय हाऊडी?" पण त्याच्याच खाली बारीक अक्षरात होतं "डॅमीट!!"
(२) एका गाडीच्या मागे लिहीलं होतं - आय लाइक माय कारस जस्ट लाइक माय वीमेन - टॉपलेस
13 Oct 2010 - 11:22 pm | शाहरुख
एका गाडीमागे लिहिलं होतं " गेट ऑफ माय अॅस"....आपोआप अंतर वाढवले गेले :-)
13 Oct 2010 - 12:04 am | मराठमोळा
आणखी काही..
कब आओगे.. आणि सोबत झाडाखाली बसलेल्या तरुणीचे चित्र.
चलती है गाडी उडती है धुल, जलते है दुश्मन खिलते है फुल.
हायवे की रानी और ड्रायवरो का राजा.
एका नव्या कोर्या पांढर्या सफारी मागे नंबर प्लेट ऐवजी हे लिहिले होते-- "फक्त साहेब"
बाकईच्या मागे सापडलेली काही वाक्ये--
१. सुसाईड मशिन
२. मिसगाईडेड मिसाईल
३. मॉम सेज नो गल्स
४. ALFA- Q ;)
13 Oct 2010 - 12:21 am | रुपी
माझी सगळ्यात आवडती पाटी:
A जलता Q है? :)
दुसरी एक, मी स्वतः नाही पाहिली, पण कुठेतरी वाचलं होतं:
(अपघात झालेला एक ट्रक आणि दुर्दैवाने चालक वाचला नाही)
मिठाई, खिलौने कुछ न लाना | पापा जल्दी घर आना || :(
13 Oct 2010 - 12:34 am | रेवती
१ १३ ६ रा.
थांब लक्षुमी कुंकू लावते!
13 Oct 2010 - 1:05 am | अडगळ
कोल्हापूरात एका रिक्षाच्या मागे भलं मोठं फक्त " टाळू " असं लिहीलेलं वाचलं आहे.(साळोखेनगर भागात).
13 Oct 2010 - 2:59 am | तर्री
हमरस्त्यावर टँकरच्या मागे लिहिले होते: काळूबाईचा highly inflamable आशीर्वाद.
15 Oct 2010 - 2:14 am | रेवती
हा हा हा हा हा!
13 Oct 2010 - 7:37 am | पाषाणभेद
इशय जुनाच हाय. आमच्यावालाबी आसलाचा दोरा व्हता.
कालपरवाच एका टरकवर बधीतलं व्हतं
"बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलं वाघानं"
13 Oct 2010 - 8:21 am | नगरीनिरंजन
एका ट्रकवरः सटलास तं गईलास बाबा
13 Oct 2010 - 9:57 am | विजुभाऊ
पुण्यात बर्याच पी एम टी च्या मागे लिहिलेले असते.
भक्ती शक्ती निगडी
याचा अर्थ काय?
13 Oct 2010 - 11:09 am | मनि२७
अहो विभा..
भक्ती शक्ती निगडी... हा stop आहे PMT चा....
13 Oct 2010 - 11:13 am | प्रमोद्_पुणे
हा बस आगार आहे पी सी एम टी चा. प्राधिकरणामधे आहे.
13 Oct 2010 - 10:32 am | पारुबाई
एका रिक्षाच्या मागे लिहिले होते
तुमचे लक्ष आमच्याकडे का ?
13 Oct 2010 - 12:11 pm | गुंड्या
एकदा एका ट्रकला ओव्हरटेक करताना त्याच्यामागं 'जाटां दी गड्डी' असं वाचलं...
ओव्हरटेक नाही केला..!!!
13 Oct 2010 - 12:12 pm | सदाची पहुणी
एका ट्रुक्च्या मागे " सो मे से नब्बे बेइमान फिर्भी मेरा भारत महान "
13 Oct 2010 - 12:13 pm | जासुश
एका ट्रक मागे लिहीलेले:
कीचड़ मे पैर डालोगी तो धोना पड़ेगा,
और ट्रक ड्राइवर से शादी करोगी तो रोना पड़ेगा...
13 Oct 2010 - 1:40 pm | sagarparadkar
एका रिक्षाच्या मागे लिहिले होते --- capacity 3 idiots
एका ट्रकचा जबरी अपघात झाला होता, रस्ता सोडून बाजूच्या खांबाला धडकून एका खड्ड्यात पडला होता, त्याच्या मागे लिहिले होते --- झक्कास sss
"मालिक है दिलदार मगर चमचोंसे है परेशान"
"ड्रायव्हर वही जो गाडी मन भाये"
आणखी काही उच्च दर्जाच्या कटिकापार्श्व अवतरणांसाठी फर्ग्युसन रोडवरील हॉर्न ओके प्लीज ला भेट द्यावी.
13 Oct 2010 - 10:20 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
१३ मेरा ७
खटक्याव बोट्...जाग्याव पलटी!
अचानक म्हसोबा प्रसन्न
13 Oct 2010 - 10:23 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
मारोती कार क्या चलाते हो?
साबुनदानी है
ट्रॅक्टर क्या चलाते हो?....
जनानी है
चलानी है तो ट्रक चलाओ....मर्दानी है!
14 Oct 2010 - 8:48 pm | पाषाणभेद
आवं ताय आमाला वाटलं की 'मी अशीच आहे!' ह्ये बी गाडीच्या मागंच लिवेल का काय?
तुमी तुमच्या सहीच्या एक ओळ वर --------------------- लायन टाका म्हंजे गोंधूळ व्हनार नाय आमच्यावाला.
------------------------------------
'मी अशीच आहे!'
आसं दिसंल त्ये.
14 Oct 2010 - 8:53 pm | धमाल मुलगा
एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर लिहिलं होतं :
'A ३० का ऊ७ '
15 Oct 2010 - 12:36 am | स्वछंदी-पाखरु
एका टाटा च्या ACE छोटा हत्तीच्या मागे लिहिल होत.
"बडा हो के ट्रक बनुंगा...."
ट्र्कच्या मागे
"चलती है गाडी उडती है धूल...... आगे क्या हुआ ये मत पुछ सब गया भूल...."
"एक फुल दो माली...."
"जलो मगर दीपक जैसे...."
"थांब लक्ष्मी कुंकु लावते"
15 Oct 2010 - 10:11 am | अप्पा जोगळेकर
आमचा एक दोस्त श्री. सौरभ आगटे याने एका रिक्षावर पुढील मजकूर वाचला आणि स्वतःच्या वहीत उतरवून आम्हला मेल केला. तो मेल जसाच्या तसा.
दिवस : २१ सेप्टेम्बर २०१०
वेळ : संध्याकाळी ६.२० मिनिट
स्थळ : अंधेरी
ऑटोरिक्षा ने घाटकोपर ला जात असताना ट्राफिक मध्ये समोरच एक रिक्षा जात होती
रिक्षा : MH-03
R7689
त्या रिक्षाच्या मागे खालील प्रमाणे मजकूर लिहिला होता तो जसाच्या तसा तुम्च्यास्ठी
" देवाच्या कृपेने आपली अवस्था लय भारी
आणि देशाची अवस्था देवाच्याच दरी "
३% विदेशी ब्राम्हण देवता फार महान
९७% बहुजनांची खाऊन पिऊन भागत नाही त्यांची तहान
न देखते डोळा ऐसा हा आकांत |
परपीडे चित्त दुखी होते ||
भीती नाही आता अपुल्या मरणा|
दुळी होता जन न देखावे ||
कुळवाडी भूषण , शिवरायांचे खरे गुरु , सर्व श्रेष्ट तुकाराम महाराज
जय जिजाऊ जय शिवराय
त्या ऑटो वर अजून पण बरेच काही लिहिले होते पण वेळे अभावी ते शक्य अझाले नाही , तरी त्या बद्दल दिलगीर आहोत .
अशा त्या अजान शिष्यास (तुकाराम महारजांच्या ) आमचे कोटी कोटी प्रणाम
15 Oct 2010 - 10:42 am | मितभाषी
मी पळतो
तु का जळतो.