कॉर्पोरेट तमाशा १४ : count down

रन्गराव's picture
रन्गराव in जनातलं, मनातलं
19 Oct 2010 - 11:06 pm

क्यु. ए. लोकांच डीझाईन ट्रेनिंग आठवडा भरात पूर्ण झालं. त्यानंतर एक p1 बग फाईल झाला. मॅनेजरन टेक लीडला तो फिक्स करयाला सांगितला. त्यान मॅनेजरला सांगितला एक dirty fix आहे पण त्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स सुटनार नाही आहेत. डीझाईन बदलाव लागनार आहे थोड. मॅनेजर त्याला म्हणाला तेव्हढा वेळ नाही आहे. दोन आठवड्यानी रीलीज आहे. पट्कन जे होईल ते संपवून टाक. टेक लीडन त्यान सांगितल्या प्रमाण फिक्स मारला. त्यात तीन चार दिवस निघून गेले. टेस्टींगला अजून दोन दिवस. प्रोडक्ट परत एकदा ब्रेक झालं.
मॅनेजरन टेक लीडला परत धारेवर धरल. टेक लीडन सांगितल " Design problem can not be solved by coding patches. Rangraav has the solution almost ready. Integration and testing can be done in two to three weeks. It will attack the bugs at the root-cause!" मॅनेजर -" मला आश्चर्य वाटतय की तुम्ही लोक हा बग क्लोज नाही करू शकत. This is not the time to tinker with the design. मी बघतो काय करयाच ते. एक आठवडा उरला आहे फक्त." हे सगळ ठरल्याप्रमाण चालल होत. मॅनेजरने इंटरनेट्वरून कुठून तरी एक तोडगा शोधून काढला. त्याने टेक लीडला मेल केली -" हे वाचून एकदा तुम्ही सगळे लोक चर्चा करा आणि उद्या मला काय ते सांगा! " आता फक्त चार दिवस उरले होते. टेक लीड आम्हाला म्हणाला -" बघा मॅनेजरन काय तोडगा काढला आहे. He has sent a link which discusses the problem in earlier versions of windows. Its not going to work here!" त्यान मॅनेजरला तस कळवल. मॅनेजर त्याला म्हणाला -"there must be way to extend this to current version. Think about it." टेक लीड -" security is not my domain! But I will try to think about it today". तो दिवसही गेला.
आता फक्त तीन दिवस उरले होते. सकाळी मॅनेजरनं टेक लीड बरोबर चर्चा केली. टेक लीडने त्या पद्ध्तीत काय काय चुका आहेत ते त्याला समजावायचा प्रयत्न केला. त्यान ते ऐकल नाही.

दुपारी मॅनेजरन मला बोलावल- " तुझ्याकड आलेल्या प्रोब्लेमवर काही तरी उपाय आहे म्हणे. सांग काय आहे तो. " मी त्याला समजावून सांगितल. तो -"किती वेळ लागेल?" मी- " Code for the problem is ready. But integration will take time. Roughly two weeks. Then one week for testing and buffer of a week in case of eventualities as we might touch the code which will affect other modules. All put together not less than a month!" तो -"इतका वेळ नाही आहे. तुला मी मेल केलेला उपाय वापरूनच काम कराव लागेल. You understand security pretty well, you must be able to use that solution in current framework." मी -" ते शक्य नाही!" तो -" मी तुला करणार का अस विचारल नाही. तुला करायला सांगतो आहे. आणि हे बघ पंधरा मिनीटानी डायरेक्टर इथ येनार आहे स्टेट्स चेक साठी. आणि तू त्यांना सांगणार आहेस सगळ दोन दिवसात कस संपणार ते!"
मी त्याच्या रूममधून बाहेर आलो. एक मस्त कॉफी मारून आलो. एक मिनीट विचार केला - " आता काय!" मग मेल कॉम्पोज केली. दोन ओळी टाईप केल्या. मेल पाठवून दिली. आणि टेरेसवर जायाला निघालो. वाटेत डारेक्टरबरोबर मॅनेजर भेटला- " कुठ निघाला आहेस? मिटींगला यायच नाहीए का?" मी-" I'm not interested" अस म्हणून निघून गेलो. टेरेसवर गेलो. पश्चिमेला सूर्य मावळ्तीला आला होता. एक मोकळा श्वास घेतला. गेल्या आठ महिन्यात ह्या शहराची प्रदूषित हवा इतकी फ्रेश कधी वाट्ली नव्हती. दहा एक मिनिट होवून गेली. पूर्ण टीम वर आली होती.
गीता " वा रंगराव. इतका चालू असशील अस वाटलं नव्हत. अभिनंदन! तरी आदी एक महिन्या पूर्वी मला म्हणाला होता- हा जास्ती दिवस इथ रहाणार नाही. बर कुठ्ली कंपनी जॉईन करतो आहे सांग बघू?" मी काही बोलायच्या आत टेक लीड-" आम्हाला फसवून व्यवस्थित कलटी मारलीस. डारेक्टर समोर मॅनेजरन आमची वाट लावली. मला म्हणाला -" You have failed to motivate people" आणि क्यु ए. लीड्ला - You could not create a comprehensive test plan. These bugs should have been discovered early. " तोपर्यंत आदीचा फोन आला होता. गीतान त्याला वर बोलावून घेतल.
गीता- " बास झाल तुमच रडगाण. तो कुठ जाणार आहे सांगू दे त्याला!" मी -" माहित नाही". गीता -" माहित नाही म्हणजे काय? आदी तू सांग. तुमच्या दोघांच नक्कीच काही तरी बोलण झाला आहे. त्याशिवाय तु इतक्या आधी अंदाज बांधू शकनार नाहीस" मी- " माझ्याकड दुसरी कुठलीही ऑफर नाही! "
टेक लीड -" मग काय करायचा ठरवल आहेस पुढ!" मी -" अजून काहीही ठरवल नाही." बनिया -"पागल हो गया है क्या? बिना सोचे समझे रीझाईन कर दिया! कमसे कम सोच तो लेता एक दीन ढंग से. बाकी लोगोकी सलाह लेता फिर कुछ करता. " मी -" हा निर्णय मी जर एका झटक्यात घेतला नसता तर कधीच घेवू शकलो नसतो. आणि राहिली गोष्ट दुसर्यांचा सल्ला घ्यायची. मला माझ्या निर्णयासाठी फक्त मी जबाबदार रहायच आहे."
गीता -" अरे पण तुला काय करायच हे माहित नाही तर कशाच्या आधारावर हा निर्णय घेतलास. मी -" मला काय करायच हे माहीत नाही. पण काय नाही करायचं हे नक्की माहित आहे"
टेक लीड -" जास्ती शिकल की हे अस होतं. ईन्स्टीट्यूट्च्या डीग्रीचा माज आहे हा बाकी काही नाही. म्हणून असली हिरोगिरी सुचते. किती दिवस करशील बघू." मी -" हाच मुद्दा दुसर्या पद्धतीनही मांडता येईल. चांगल्या ईन्स्टीट्यूट्ची डिग्री असूनही प्रत्येक वेळी लाचार होवून मान खाली घालायला लागत असेल तर, तो ईन्स्टीट्यूट्च्या डीग्रीचा अपमान आहे. आणि राहिली गोष्ट तडजोड्ची. कधी ना कधी करावी लागतेच. पण आज गरज नव्हती तर का करायची! आज हिरोगिरी करायला परवड्ते तर का नाही करयायची? उद्या अशी संधी मिळेल ह्याची काय खात्री आहे!"
बनिया - " वो सब ठिक है. जॉब का क्या?" मी -" अभी एक महिने का नोटीस पिरीयड है. सोच लूंगा कुछ तो."
गीता -" पण मिळनार ह्याची खात्री हा का तुला?"
इतका वेळ शांत राहीलेला आदी -" रंगराव, आता थोडी स्ट्रगल करायला लागेल. तयारी आहे ना?" मी -" कल्पाना आहे त्याची." तो बाकिच्याना म्हणाला- " Leave him alone. He is looking pretty relaxed today. Let him have his moment! उद्या ठरवूयात काय करायच ते". सगळे लोक निघून गेले. सूर्य पूर्ण मावळला होता- पण उद्या पून्हा उगवनार ह्याची ग्वाही देवून!


अवांतर:
१. एक पर्व इथ संपल आहे. अजून एक शिल्लक आहे. वेळ आणि मूड असेल तेंव्हा पून्हा लिहीन.
२. काही लोकांना इथ लिहिलेल अतिरंजक वाटल. आजच्या भागावर तशा प्रतिक्रिया येन्याची शक्यता जास्त आहे. पण तुम्ही एखादी गोष्ट अजून अनुभवली नाही ह्याचा अर्थ ते काल्पनीक आहे अस ठरवन तर्क संगत नाही. आणि विरोध करताना तो वैयक्तिक पातळीवर होणार नाही ह्याची काळ्जी घ्या. इथं तर नोकरीपण पनाला लागली नाही. तितकच परखड उत्तर मिळेल.पण असा तमाशा करून मिपाचं नाव बदनाम करन्यात काही अर्थ नाही.
३. आणि सर्वात महत्वाच म्हणजे बर्याच लोकांनी फक्त चांगला प्रतिसादच दिला नाही तर चांगले मुद्देही मांडले. काही विरोधी तर्क आणि टोमणे कौतुकास्पद होते. :)

नोकरीअनुभव

प्रतिक्रिया

मॅनेजरच्या जाचापायी नोकरी सोडली असं म्हणायचय का तुम्हाला? असे ५६ मॅनेजर येणार किती नोकर्‍या सोडणार आपण?
दुसरं समोरच्याने कसं वागावं हे आपण ठरवू शकतच नाही पण समोरच्याने आपलं वागणं देखील ठरवता कामा नये अगदी इनडायरे़क्टली देखील.
तुम्ही नोकरी नको होती सोडायला रन्गराव. त्या मॅनेजरचा काय सुंठीवाचून खोकला गेला मेल्याचा.

रन्गराव's picture

19 Oct 2010 - 11:35 pm | रन्गराव

नक्की कस उत्तर द्यायचा ते माहित नाही. तरी प्रयत्न करतो. पूर्ण मॅनेजमेंट सामील होती त्यात. त्यामुळे राजीनामा दिला नसता तर तो ज्या पदधतीन सांगेल तस वागावा लागल असत. ती कल्पना सहन झाली नाही. आयटी मध्ये तेंव्हा नवीन होतो राजकारणाचे डावपेच माहित नव्हते. मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे सुरूवात चुकीची झाली होती.

आणि राहीली गोष्ट औषधावाचून खोकला जाण्याचा. त्याच कर्म त्याच्या बरोबर.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Oct 2010 - 11:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्या मॅनेजरचा काय सुंठीवाचून खोकला गेला मेल्याचा.
ज्ञानेश्वरीतील ओवीवर आधारीत सुविचार - या जगात काही दुर्लभ असेल तर ती आहे सद्वासना.

तुमच्या दोन वाक्यांचा एकत्र अर्थ लावा शुचिताई!

शुचि's picture

19 Oct 2010 - 11:45 pm | शुचि

मॅनेजरचा दुर्लभ खोकला सद्वासनेने सुंठीवाचूनच गेला मेल्याचा.

रन्गराव's picture

19 Oct 2010 - 11:54 pm | रन्गराव

तुमच्या सद्भावनेच्या ह्या दुर्लभ खेळापायी मी एवढा टंकल ते वाया जाईल. कारण तुमचा खेळच आता जास्ती ईंटेरेस्टींग होईल अशी भिती वाटायला लागली आहे. ;)

शुचि's picture

19 Oct 2010 - 11:56 pm | शुचि

एकदम ईश्टॉप!!!! नो मोअर कमेंट्स :)

यशवंतकुलकर्णी's picture

19 Oct 2010 - 11:45 pm | यशवंतकुलकर्णी

एका शीख जनरल मॅनेजरसोबत माझ्याबाबतीत अशीच खटखट झाली होती..
डोके तापून मी राजीनामा देऊन टाकला; पण घरचे लोक पुढे काय करशील म्हणून काळजी करत होते..
आता घरचेच लोक जास्त आधी राजीनामा दिला असता तर बरं झालं असतं असं म्हणतात... ;-)

सेक्युरिटी गमावून बसायला पण मजा येते काही काळ... :)

रन्गराव's picture

19 Oct 2010 - 11:50 pm | रन्गराव

>>सेक्युरिटी गमावून बसायला पण मजा येते काही काळ..

खर आहे. आणि अशावेळी आपण दबावाखाली असल्यामुळे पटापट पावलं उचलतो. आणि हा अनुभव एकदा पाठीशी असला की रेसेशन, मॅनेजर असल्या भुतांची भिती रहात नाही. :)

बाप रे सेक्युरीटी गमावण्यात मजा :O

मला तर नोकरी नसताना स्वप्न पडायची की मी रस्त्यावर लोखंदाचे खीळे, पत्रे गोळा करत फिरते आहे आणि भंगाराच्या भावात विकून कुटुंब चालवते आहे =)) आणि हे केव्हा नवरा जहाजावर डॉलर्स कमावत असताना. आता कमकुवत मनाची म्हणा की काहीही पण असुरक्षितता हा विषयच भीतीदायक आहे बुवा.

रन्गराव's picture

19 Oct 2010 - 11:59 pm | रन्गराव

त्याच कस असत. त्यासाठी नर्मदेतला गोट्यासारख असावा लागत. जग कितीही शंख मारो, आम्ही आमचच खर करनार! ह्यात भीती ह्या भावने पेक्षा लाज ही भावना जास्ती आड येतीये तुमच्या. ;)
पळतो आता, नाही तर रात्री मला स्वप्न पडेल - रस्त्यावर गोळा करून आणलेले खिळे तुम्ही माझ्या डोक्यात ठोकताय वगैरे ;)

मधुशाला's picture

20 Oct 2010 - 1:58 am | मधुशाला

तुम्ही राजीनामा दिला?? मी तुमचा मॅनेजर असतो तर केव्हाच हाकलून दिलं असतं. :) ग्रूपमध्ये रहायचं तर ग्रूपच्या नियमानुसार. उठसूठ कुठलाही रंगराव नियम/कायदे/पद्धती बदलायला लागला तर कसं चालेल? तुम्हाला एवढंच पटत नव्हतं तर अगोदरच सरळ बाजूला व्हायचं होतं.

रन्गराव's picture

20 Oct 2010 - 7:27 am | रन्गराव

>>तुम्हाला एवढंच पटत नव्हतं तर अगोदरच सरळ बाजूला व्हायचं होतं.

"I will change the things around me!" असा एक किडा असतो त्याच्यामुळे सगळा तमाशा घडला.

>>ग्रूपमध्ये रहायचं तर ग्रूपच्या नियमानुसार. उठसूठ कुठलाही रंगराव नियम/कायदे/पद्धती बदलायला लागला तर कसं चालेल?
आपण एक मज्जा करूयात. तुम्ही जिथं कुठ मॅनेजर व्हाल तिथ मला काम करायला बोलवा. मग परत आपण हा खेळ करूयात ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Oct 2010 - 9:40 am | llपुण्याचे पेशवेll

हा हा हा.. म्हणजे तुम्ही चांगले मॅनेजर नाही म्हणायचे. चांगले मॅनेजर असा विरोधी विचार करणार्‍याना आयुष्यातून उठवून ठेवतात. :)

बाहुली's picture

20 Oct 2010 - 11:37 am | बाहुली

>>>>ग्रूपमध्ये रहायचं तर ग्रूपच्या नियमानुसार....

इथे नियम ग्रूपने बनवले नव्हते .. त्यामुळे खरेतर मॅनेजरने जायला हवे होते...जो टिमच्या कल्पना समजावुन घेतो तो चान्गला मॅनेजर..

त्या घडीला जे केलंत ते बरोबर केलंत रंगराव .

नेत्रेश's picture

20 Oct 2010 - 4:51 am | नेत्रेश

तुमचा गॉडफादर (आर्किटेक्ट) गेला तेव्हाच समजले की आता अजुन कुणीतरी (मॅनेजर किंवा तुम्ही) जाणार.

तुम्हीच जाणार असेच जास्त वाटत होते कारण तुम्ही कंपुत सामील झाला नाहीत (ती चुक मि.पा. वर करु नका :) - ह्.घ्या.)

पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

- नेत्रेश.

रन्गराव's picture

20 Oct 2010 - 7:22 am | रन्गराव

वाचून मज्जा आली! आपण आता नवीनच कंपु तयार करूयात मिपावर ;)

सूर्य's picture

20 Oct 2010 - 8:43 am | सूर्य

पहिलाच जॉब असल्याने (बाकी काही जबाबदारी नाही असे गृहीत धरतो) तुम्ही बरोबर केलेत. अशा अनुभवांमधुन आपण शिकत जातो. तरी परिस्थीती बदलण्यासाठी काहीतरी वेगळे केले पाहीजे होते असे वाटते. पुन्हा, पहिल्याच नोकरीमधे कसे वागावे हा अनुभव आपल्याला नसतो व तो अशा पद्धतीनेच मिळतो, असे मला वाटते.
खात्री आहे, की असा मॅनेजर तुम्हाला परत भेटला असेल. तेंव्हा तुम्ही परिस्थीती बदलु शकलात का? कशी? हे वाचण्यास उत्सुक आहे.

लिखाणाबद्दल : माझ्या दृष्टीने चांगले लिहीले आहे. काही पॉझिटीव्ह प्रतिसाद येतात तर काही निगेटीव्ह. काही व्यक्तीगत पातळीवर उतरु शकतात. आपण त्या पातळीवर उतरायचे की नाही ते आपण ठरवायचे.

- सूर्य

रन्गराव's picture

20 Oct 2010 - 11:40 am | रन्गराव

पहिलाच जॉब असल्याने (बाकी काही जबाबदारी नाही असे गृहीत धरतो) तुम्ही बरोबर केलेत. अशा अनुभवांमधुन आपण शिकत जातो. तरी परिस्थीती बदलण्यासाठी काहीतरी वेगळे केले पाहीजे होते असे वाटते. पुन्हा, पहिल्याच नोकरीमधे कसे वागावे हा अनुभव आपल्याला नसतो व तो अशा पद्धतीनेच मिळतो, असे मला वाटते.

बरोबर आहे :)

खात्री आहे, की असा मॅनेजर तुम्हाला परत भेटला असेल. तेंव्हा तुम्ही परिस्थीती बदलु शकलात का? कशी? हे वाचण्यास उत्सुक आहे.

दुसर पर्व ह्याच बाबतीत आहे.

>>लिखाणाबद्दल : माझ्या दृष्टीने चांगले लिहीले आहे. काही पॉझिटीव्ह प्रतिसाद येतात तर काही निगेटीव्ह. काही व्यक्तीगत पातळीवर उतरु शकतात. आपण त्या पातळीवर उतरायचे की नाही ते आपण ठरवायचे.

मान्य आहे. म्हणूनच संयम ठेवला इतके दिवस. पण शिवशिवनार्या हातांना किती दिवस थांबवनार? :)

अनिल २७'s picture

20 Oct 2010 - 11:49 am | अनिल २७

>>>> दुसर पर्व ह्याच बाबतीत आहे.

काय ?? दुसरे पर्व पण आहे ????

बाहुली's picture

20 Oct 2010 - 9:06 am | बाहुली

मला पण असाच अनुभव आला आहे ..मनाविरुद्ध काम करुन आपण आपलाच अपमान करतो... मी पण असाच तडकाफडकी राजीनामा दिला होता... खुप छान वाटलेले.... ;)

छान लिखाण...

All the best :)

रन्गराव's picture

20 Oct 2010 - 11:26 am | रन्गराव

खूप छान वाटते हे मात्र खर. स्वातंत्र्य इतक महत्वाच का असत ते पटतं अशा वेळी ;)

कानडाऊ योगेशु's picture

20 Oct 2010 - 9:20 am | कानडाऊ योगेशु

संपूर्ण प्रकरणात सगळ्यात दुबळे पात्र म्हणजे आर्किटेक्ट,रंगरावांचा गॉडफादर.त्याला अनुभव असुनसुध्दा मॅनेजरचे प्रकरण कसे हाताळायचे हे समजले नाही.त्याला राजकारणाचा असलेला तिटकारा समजु शकतो पण बेसिक सर्व्हायल पुरता तरी राजकारणाचा सामना करता आला पाहीजे.तो करता येत नसेल तर तुमची टेक्निकल विद्वत्ता काय कामाची?
आणि मॅनेजर जे काही करत होता त्याचे एक कारण म्हणजे वरुन येणारा दबाव पण असु शकतो.कंपनीमध्ये अगदी श्रूड पण कंपनीबाहेर नॉर्मल व्यक्तिमत्व असणारे एक-दोन मॅनेजर मीही पाहीले आहेत.

नारायण मूर्तींनी म्हटल्याप्रमाणे " लव्ह युवर वर्क, नॉट युवर कंपनी" ह्याची प्रचिति काही वर्षांच्या अनुभवानंतर येतेच येते.

जियो रंगराव जियो.

योगेश तुमचे प्रतिसाद विरोधी असूनही मला आवडतात. बहुदा ते मांडताना त्याला भक्कम विचाराची जोडणा असते म्हणून. ;)

>>संपूर्ण प्रकरणात सगळ्यात दुबळे पात्र म्हणजे आर्किटेक्ट,रंगरावांचा गॉडफादर.त्याला अनुभव असुनसुध्दा मॅनेजरचे प्रकरण कसे हाताळायचे हे समजले नाही.त्याला राजकारणाचा असलेला तिटकारा समजु शकतो पण बेसिक सर्व्हायल पुरता तरी राजकारणाचा सामना करता आला पाहीजे.तो करता येत नसेल तर तुमची टेक्निकल विद्वत्ता काय कामाची?

इथ कदाचित माझीच चुक झाली असेल. त्यांची भुमिका नीट रंगवता आली नाही बहुदा. मला नेहमी वाटायच की आपण ही त्यांच्या सारख व्हावं आणि नेहमी तसा प्रयत्नही करायचो. पण पुढं एक गोष्ट लक्षात आली की अस करणे ही विसंगती आहे. Trying to be like him is a paradox b'coz he never tries to be like anybody else. गीतेतला कर्मयोग म्हणजे काय ह्याच खर उदाहरन होत ते. राजकारण शिकन्याच्या मोह माझ्यासारखे लोक आवरू शकत नाहीत. पण त्या मार्गाला जायचीही गरज पडली नाही असा माणूस आपल्यापेक्षा किती तरी पटीन जास्ती कणखर मनाचा असावा लागतो.
आणि त्यांच्या सर्व्हायलच म्हणालात तर ते पुढे ज्या कंपनीत गेले तिथ लवकरच CTO झाले. आणि खूप चांगला काम करतात.

नगरीनिरंजन's picture

20 Oct 2010 - 9:20 am | नगरीनिरंजन

राजीनामा देणे हा पलायनवाद झाला. राजीनामा दिल्यामुळे ज्या गोष्टी तुम्हाला योग्य वाटत होत्या आणि ज्या गोष्टींसाठी तुम्ही भांडलात त्याला काहीच अर्थ राहिला नाही. राजीनामाच द्यायचा होता तर आधीच भांडण करण्यापेक्षा शांतपणे निघून जाता आले असते. पण तुम्ही तिथे राहून झगडणे तर राहिलेच पण इतर सहकार्‍यांच्या मनातही किल्मिष निर्माण करून निघून जायचा निर्णय घेतला. शिवाय राजीनामा देऊन दुसरीकडे असे लोक नसतील याची काहीच खात्री नाही. त्यामानाने तुमचे आर्किटेक्ट बरोबर वागले. मनासारखे काम करता येत नाही म्हणून शांतपणे निघून गेले. इतराना प्रभावित करण्याचा खटाटोप न करता.
असो. ही माझी वैयक्तिक मते आहेत. वाद घालण्याचा किंवा चूक बरोबर ठरवण्याचा हेतू नाही.

रन्गराव's picture

20 Oct 2010 - 11:22 am | रन्गराव

>>राजीनामा देणे हा पलायनवाद झाला.

हे खरच मनाला बोचलं. पण ते चुकीच आहे अस म्हणून नव्हे तर कदतचित सत्य पचवायला कठीण असत म्हणून. पण पूर्ण उत्तर खाली लिहितो आहे.

>>राजीनामा दिल्यामुळे ज्या गोष्टी तुम्हाला योग्य वाटत होत्या आणि ज्या गोष्टींसाठी तुम्ही भांडलात त्याला काहीच अर्थ राहिला नाही.

हा मुद्दा मान्य आहे. त्यावेळी तिथ राहून जे बरोबर आहे ते करयला लावायला सगळ्यांना भाग कस पाडायच हे नवशिख्याला माहीत नव्हत. त्यामुळे तिथून निघून जाण हाच एक पर्याय दिसत होता त्यावेळी. आपल्याला पाहिजे ते करता आलं नाही कमीत कमी जे करायचा नाही ते कराव लागू नये म्हणून राजीनामा दिला होता.

>>राजीनामाच द्यायचा होता तर आधीच भांडण करण्यापेक्षा शांतपणे निघून जाता आले असते. पण तुम्ही तिथे राहून झगडणे तर राहिलेच पण इतर सहकार्‍यांच्या मनातही किल्मिष निर्माण करून निघून जायचा निर्णय घेतला.
>>त्यामानाने तुमचे आर्किटेक्ट बरोबर वागले. मनासारखे काम करता येत नाही म्हणून शांतपणे निघून गेले. इतराना प्रभावित करण्याचा खटाटोप न करता.

हो त्यानी जे केल तेच बरोबर केल. खर तर ज्या वेळी राजीनामा दिला होता तेव्हाच मी ही सोडून जायचा विचार केला होता. त्यावेळी सर म्हणाले होते -" Don't give up until you are assured that its not going to work. Whatever has happened as a architect I'm responsible for that. Just b'coz I could not succeed is not good enough excuse to assume that you will also fail!" आणि शेवटच्या दिवशीही त्यांनी मला हेच सांगितल होत. आता माझ जजमेंट " काहीही करण्यासारखा राहील नाही" हे कदाचित चुकीच असेल!

>>शिवाय राजीनामा देऊन दुसरीकडे असे लोक नसतील याची काहीच खात्री नाही.
हे सत्य कुणिही नाकारू शकत नाही. पण नवीन जागी नवीन सुधारणा करता येतात मागचे अनुभव वापरून. पुढचा भाग ह्याबद्दलच आहे!

>>ही माझी वैयक्तिक मते आहेत. वाद घालण्याचा किंवा चूक बरोबर ठरवण्याचा हेतू नाही.

मतभेद हा आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. तुम्ही जसा योग्य पद्धती मांडलात तस सर्वानी केल तर काहीच अडचण नाही. परखड मत प्रामाणीकपणे मांड्ल्याबद्द्ल धन्यवाद :)

रन्गराव.. तुम्ही ग्रेट आहात.. मला तुमचे लेखन फार्फार आवडते.. तुम्ही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला अन माझे डोळे पाणावले.. आता हा कार्पोरेट तमाशा आमच्या भेटीस येणार नाही या जाणीवेने जीवघेणा त्रास होत आहे.. कृपा करुन परत तिथे जॉईन व्हा अन तमाशाचे खूप खूप भाग आम्हाला वाचायला द्या..

प्लीज.. :(

विजुभाऊ's picture

20 Oct 2010 - 11:54 am | विजुभाऊ

दोनास एक या प्रमाणात दर दोन प्रतिसादांमागे रन्गरावांचा एक प्रतिसाद.
लेखाचा ट्यारपी वाढवून देतोय.

रन्गराव's picture

20 Oct 2010 - 1:39 pm | रन्गराव

काय करनार विजूभाऊ? दुर्लक्षित मिपा कर असल्यामुळं अस करावा लागता. त्या निमित्तान आपल्या सारख्या थोरामोठ्यानी इथ पायधूळ झाडली. धागा धन्य झाला ;) वर आता टी आर पी अजून वाढनार तुमच्या ह्या प्रतिसादामूळे. देवबाप्पा कसे फेडणार हे उपकारांच ओझं. आतून दिसतोय का तुला ओझ्याखाली दबलेला मी. का वीजूभाऊंना घाबरून तु तिथून ही पळ काढलास? ;)