कॉर्पोरेट तमाशा १३- नशा आणि हँगओव्हर

रन्गराव's picture
रन्गराव in जनातलं, मनातलं
18 Oct 2010 - 8:58 pm

सकाळी ऑफिसमध्ये पोहचलो तर काय आश्चर्य - पूर्ण टीम आज गायब होती. मनात विचार आला " लढाई सुरु होनेस अजून काही क्षण आहेत तेंव्हा थोडा कॉफी घ्यायला काही हरकत नाही!" कॅफेमध्ये गेलो तर तिथ पूर्ण संसद भरली होती. मला तिथं पहताक्षणीच बळीचा बकरा दिसावा तसा हूरूप सगळ्यांच्या चेहर्यावर होता! गीता- " कॉफी राहू द्या. या इथं आधी. आज चांगली हजेरी घ्यायची आहे!" मी मला काहीच कल्पना नाही अशा अविर्भावात "वा, आज चांगल्याच खूष दिसताय! आदीनं काही गिफ्ट दिलं की पगार अजून वाढ्वून मिळाला?" खरं तर तिचे डोळे चांगलेच सुजले होते, काल चांगलीच रड्ली असणार आहे! तिला पाहिजे तर शिव्यांची लोखोली वाहू दे पण आज परत रडारड नको! अशी मनोमन प्रार्थना केली. ती - " लाज आहे का बघा? काल एकतर आगावपणा करून काय वाटेल ते बोलून गेलास आणि आज असले थिल्लर विनोद सुचतायत! जखमेवर मीठ चोळायला मात्र चांगल येत तुला. आणि तो तुझा मित्र आदी- त्यानं तर खूपच मोठ गिफ्ट दिलय मला!" महत्वाचा मुद्दा टाळायचा अटीतटीचा प्रयत्न करत मी म्हणालो- " काय दिल आहे सांगा बघू!" ती -" काल मी तू केलेला पराक्रम सांगितला! तो म्हणाला रडू नको त्याला तस म्हणायचा काही एक अधिकार नाही. मला खरोखर खूप बर वाटल. पण नंतर म्हणतो कसा - तसं रंगराव काही चुकीचा बोलला नाही. नशीब माझं. देव जाणे कुठल्या मुहूर्तावर तुम्हा दोघांची ओळख करून दिली. " मी हसू आवरायचा आटोकाट प्रयत्न करत होतो. गीताचा राग बर्यापैकी शांत झाला होता. पण बाकिचे लोक भलतेच पेटले होते!
टेक लीड -" ईंडस्ट्री जॉईन करून आज आठ महिने झाले नाहीत बेट्या तुला, सगळ्यांना शहानपणा शिकवायला लागला का?" मी-" तसं पाह्ता माझ कालचा बोलण थोड चुकीचच होत. तुम्हाला पाहिजे तसं वागण हा तुमचा अधिकार आहे. त्याचा न्यायनिवडा करायचा मक्ता मला कुणीही दिलेला नाही! आणि खरतर मी तुमच्यावर चिडलो नव्हतो. स्वत:चाच राग आला होता आणि वड्याच तेल वांग्यावर निघालं! "
टेक लीड- "का रे, काय झाल?" मी -" काल सर गेल्यावर, मी गेल्या एक महिन्यात काय काय केल ह्याचा विचार करत होतो. असं लक्षात आल की टेक्निकल काही कामच केलं नाहीये. सरांनी राजीनामा दिल्यापासून मॅनेजरची प्रत्येक गोष्ट हाणून पाडणे हाच एक उद्योग केला आहे. विरोध कशाला करायचा हेच विसरून गेलो. विरोध मॅनेजरच्या नसत्या बळजबरीला करायचा होता. बंड अन्यायाविरूद्ध करयाच होत! आणि सुरूवातीला तेच केल. पण एकदा यशस्वी झाल्यावर बंडखोरीची नशा चढली! आणि नशा चढली की मग काय बंड कशाविरूद्ध करायचा हेच विसरलो. आणि बहूदा लोक असच करून अतिरेकी बनत असावेत. कारण नसताना फक्त मजा वाटते म्हणून विरोध करायचा. आणि ह्या नादात गेल्या एक महिन्यात काहीच महत्वाच काम नाही केल. हा मूर्खपणा होता. आणि काल तुम्ही लोक आलात तेंव्हा हॅंग-ओव्हर चालू होता! "
टेक लीड " म्हणजे ईथून पूढ तू मॅनेजर जे म्हणेल ते करणार? " मी -" तस नाही म्हंटल! फक्त मॅनेजर सांगतोय म्हनून त्याला विरोध करायचा नाही. आणि कामचुकारपणा करायला ते कारण होवू द्यायच नाही. पण तो जर चुकीचा सांगत असेल तर त्याला विरोध होणार! " तो म्हणाला -"बर झाल! तू गांधीवादी झाला नाहीस. आम्ही एक प्लॅन केला आहे. तुझा पाठींबा गरजेचा आहे त्याला!"
गांधींना पार्श्वभागावर लाथ घालून आगगाडीतून हाकलल्यावर देशभक्तीचा पाझर फुटला होता तस काहीस आमच्या टीम मेट्सच झाल होत. मॅनेजरना खोट बोलून वेळे आधी काम करून घेतल आणि वर ह्यांना सगळ्याना कमी हाईक देवून स्वतः सिनियर मॅनेजर झाला होता. म्हणून त्याना आता दर्जा, प्रामणिकपणा, स्वाभिमान अशा सर्व प्रकारच्या भावनांचे पाझर फुटले होते. वरती रीलीज नंतर प्रोडक्ट ब्रेक झाल तर मॅनेजर त्याच खापर ह्यांच्या डोक्यात फोडणार अशी भीती वाटत होती. त्यांचा प्लॅन असा होता की - डीझाईन जरी बदलावं लागल तरी ते करून पूर्ण खात्री झाल्याशिवाय बग क्लोज करायचे नाहीत. आणि सगळ्यांनी ह्यात एकमेकाची साथ द्यायची अस ठरल होत.
मी - " तुम्ही काहीही झाल तरी एकत्र रहाणार?" सर्वजण एका सुरात "हो". मी -" मग एक काम करा आजच्या आज राजीनामा द्या सगळे. कारण पुढ्च्या आठवड्यात वीस पैकी सहा लोकांना प्रेम पत्र मिळणार आहे! आपण सगळ्यांनी एकत्र रहायचं म्हंटल्यावर फक्त सहा लोकांना आपण अस मध्येच कस सोडणार?"
बनिया " तुम्हे कैसे पता चला ये सब? मजाक कर रहे हो तुम". मी -" सर कल जाने से पहले मुझे बताके गये है! तुम्हे याद होगा तो मै तुम लोगोंके साथ मीटींगमे नही आया था, सर के साथ था! " आता मात्र सगळ्यांचे चेहरे पडले होते. मी म्हणालो -" अरेरे तुमचा उठाव तुम्ही लोक हत्यार उचलायच्या आधीच मोडीत निघाला तर! मी थाप मारली होती. सरांनी अस काही सांगितल नाही मला. पण तुमचा प्लॅन काम करणार नाही अस दिसतय!"
क्यु. ए. लीड - " आम्हाला वाटत होत तु त्याला घाबरत नाहीस. पण तु पण कागदी वाघ निघालास! ऐन वेळी शेपूट घालून फरार!" मी -" मी काय चुक केली हे लक्षात आलेल दिसत नाही अजून तुमच्या. प्रश्न त्याला घाबरण्याचा नाहीए. चुक केली ती त्याला कमी लेखन्याचा. आखाड्यात कुस्त्या खेळून त्याला लोळवत बसलो आणि मुख्य खेळ बुद्धीबळाच्या पटावर मांडला होता, त्याचे डावपेच शिकायच आणि वापरायचच राहून गेलं आणि त्याने मात्र चुटपूट चकमकी हरून मोठं युद्ध मात्र जिंकल होत, आणि त्याला जे हव ते मिळवल! तोच मूर्खपणा परत एकदा करन्यात काही एक अर्थ नाही."
टेक लीड- " ह्याचा अर्थ ह्यातून काहीच मार्ग नाही तर! " मी -" सध्या तरी नाही. पण मी एक शहाणपणा केला आहे. दोन पान अजून उघड्लेली नाहीत. वेळ आल्यावर वापरता येतील. पण तिथ जायच्या आधी क्यु ए ना थोड डिझाईन समजवून घ्यायला लागेल. हे काम तुम्हालाच कराव लागेल. कारण तुमच्या आधी मी बग सबमीट केले तर परत तुम्हालाच शिव्या खायला लागतील. काही काळ किल्ला लढवता येईल पण जास्ती अपेक्षा ठेवू नका. " सगळ्यांनी माना डोलावल्या.
त्या दिवसापासून क्यु. ए. च ट्रेनिंग चालू झाल. संध्याकाळी आदी आला होता. फोन करून खाली बोलवून घेतलं. आतामात्र खरच छातीत धडधड वाढ्ली होती. काय म्हणून त्याला तोंड दाखवनार माहीत नव्हत. आदी -" काय रंगराव माझ्या अश्या कणखर बायकोला रडवलत होय काल?" मी मान खाली घालून उभा. गीताच गालातल्या गालात खिदळन अजूनच बोचत होत. दोन मिनीट शांतता. आदी-" अरे खर सांगायच तर काल लगनानंतर बर्याच दिवसानी घरी फार कमी टोमणे खायला लागले. तुझ्याकडून टीप्स घ्यायला हव्यात आता!" गीता त्याला म्हणाली - " चल आदी तू घरी आज. काल राहिलेल्या टोमण्यांची पण भरपायी करून द्यायची आहे!"

नोकरीअनुभव

प्रतिक्रिया

अडगळ's picture

18 Oct 2010 - 9:10 pm | अडगळ

>>गांधींना पार्श्वभागावर लाथ घालून आगगाडीतून हाकलल्यावर देशभक्तीचा पाझर फुटला >>>>
हे जरा खटकलं .
बाकी चालू द्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Oct 2010 - 9:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कोणाच्यामुळे का होईना, जवळजवळ संपूर्ण लेख मराठीत आला हे पाहून आनंद झाला.

रन्गराव's picture

18 Oct 2010 - 9:56 pm | रन्गराव

असो. तरी तुम्हाला फक्त एक वाक्यच खटकलं! लोकांना पूर्ण धागाच खटकतोय! :) असतात आपपली मत. मग मतभेद होणारच. तुम्हाला जे आवडल नाही ते प्रामाणिकपणे सांगितला त्याबद्द्ल धन्यवाद्.

इंटरनेटस्नेही's picture

18 Oct 2010 - 9:39 pm | इंटरनेटस्नेही

अरे पण यात नशा पाणी आहे कुठे?

(नशाबाज) इंट्या.

इंटरनेटस्नेही's picture

18 Oct 2010 - 9:39 pm | इंटरनेटस्नेही

अरे पण यात नशा पाणी आहे कुठे?

(नशाबाज) इंट्या.

रन्गराव's picture

18 Oct 2010 - 9:49 pm | रन्गराव

रेबेल कंपनीची देशी दारू मिळत्या. पिवून बघा एक दिस! ;)

चांगला चालू आहे कार्पोरेट तमाशा. येऊद्यात अजून.

शुचि's picture

19 Oct 2010 - 1:25 am | शुचि

ठीकठाक वाटला

असेच काही प्रसंग मी पाहीले/अनुभवले आहेत...

रन्गराव आटोपता घ्या हा पसारा. संपवा हे एकदाचे.
तुमची कार्पोरेट कादंबरी कधी पब्लीश करताय?

अनिल २७'s picture

19 Oct 2010 - 11:09 am | अनिल २७

अजूनही क्रमशःच आहे का?