आमची टिम प्रॉड्क्ट विंडोजसाठी बनवत होती. ते मॅक्साठीही बनवायच होत. लोक जमा करून टीम बनवायला वेळ नसल्यामुळे ते outsource करायच ठरला. बर्याच ठिकाणी वाटाघाटी करून शेवटी एका बेंगलोरच्या सेवा कंपनीला काम द्यायच ठरल. ही बातमी टीम लिडने आम्हाला दिली. तो म्हणाला -"ते लोक सगळं काम पूढच्या तीन महिन्यात पूर्ण करनार आहेत." ऐकून धक्का बसला. आमचा विंडोजसाठी एकंदर १० महिन्याचा प्लॅन होता (मॅनेजर तसा सहा महिने म्हणत होता) आणि तोही डिझाईन पूर्ण झाल्यानंतर. मी त्याला म्हणालो " यार त्या लोकांचे अजून डीझाईन ही तयार नाहि. आणि तरीही ते लोक जर तीन महिन्यात पूर्ण करनार असतील तर आपण काय सहा महिने गोट्या खेळन्यासाठी ठेवले आहेत काय? " तो म्हणाला "वेळ आल्यावर सम़जेल तुला."
पुढे दोन महिन्यानी मॅनेजरन बातमी दिली. बेंगलोरचे लोक पूढच्या आठवड्यात code complete करणार आहेत. त्यानंतर एक आठवड्यात आपल्याला code build करता येइल इथे. मला आत खरच inferiority complex यायला लागला होता. आणि एक दिवस सकाळी मेल येवून धड्कली "we are glad to inform you that we have completed the code one week ahead of schedule, you people can now put your hands on the builds. " आमच्याकडे उत्सुकता शिगेला पोहोचली होती. बिल्ड चालू करून सगळी मंडळी वाट पहात बसली होती. तितक्यात बिल्ड ईंजिनीयर आला. सगळ्यानी त्याला घेरला आणि विचारला "क्या हुआ? प्रॉड्क्ट कैसे बना है! " आणि उत्तर आला "पोपट!!!!!!, तुम प्रॉड्क्ट की बात कर रहे हो. यहा तो बिल्ड्ही फेल हो गया. "
मॅनेजरने बंगलोरला फोन लावला. त्यानंतर त्याची अशी खातरी पटली की टीम मधल्या एकालाही मॅक वापरायची अक्कल नाही. बंगलोरकरानी सांगितले की उद्या त्यांचा ईंजिनीयर बिल्ड करायला गाईड करेल. दुसर्या दिवशी आमच्या बिल्ड ईंजिनीयरची त्याच्याबरोबर चर्चा झाली. मी त्याला विचारला "कूछ पता चला?". तो म्हणाला " सौ सवाल पूछ के परेशान किया. मैने जिस पहले सवाल का जवाब हां दिया, उसी को रीझन बता दिया है. वोह बोल रहा है की पूरा नया बिल्ड मशीन सेटअप करो. मैने मना कर दिया है." तेवढ्यात आमचा मॅनेजर " तुम्हे क्या पता है मॅक के बारे मै! वो जैसे बोलता है वैसे करो." नाईलाजाना त्याने फॉर्मॅट करून नवीन सेट अप केला. त्याचाही काहि उपयोग झाला नाही. एक आठवडा असच किडा करण्यात गेले. मग शुक्रवारी आमचा मॅनेजर म्हणाला "Looks like MAC is too good for you people. I have decided to call their build engineer here. He will demonstrate you how to get things moving!". त्याची बंगलोर टीमशी चर्चा झाली. त्यांचा बिल्ड ईंजिनीयरची आमच्या ओफिसात रवाना झाला- "I will take you through each and every step of build process!" आणि पून्हा एकदा पोपट! त्याचा कारण आमचा मशीनचा हार्डवेअर बेंगलोर पेक्षा वेगळा आहे म्हणून चालत नाहि अस सांगून तो निघून गेला.
मॅनेजरने टीम लीड ला विचारला "What next?" टीम लिड म्हणाला -" lets not worry about builds anymore. let the Bangalore team do a preliminary round of testing and give us a installer! And then we can decide!" त्यानी दोन आठवड्यानी installer पाठवला. पण install काहि केल्या जमला नाहि. त्याना तस कळवल्यावर हे compatible नाही ते compatible नाही असा सूर लावला. शेवटी वैतागून आमचा टीम लीड म्हणाला मीच बँगलोरला जावून बघून येतो. तो बेंगलोरहून परत आला तो प्रचंड वैतागून. तो म्हणाला " एक तर त्यानी प्रोड्क्ट धड बनवला नाहि. वरती त्याचा installer old version साठी बनवला आहे. आणि कारण काय असेल तर ambiguity in problem definition!" मी म्हणालो " म्हंजे नक्की काय?" तो म्हणाला " back-word compatibility is one of the clauses in agreement so they designed it on older version and assumed that it will work on the current version. Actually they have not completed the development, they are exploiting the version issue to gain more time and hence more money" . आणि आमचा मॅनेजर उंदीर सापळ्यात सापडावा तसा ह्यावेळीही फसला. contract दोन महिन्यासाठी वाढवण्यातआला. दोन महिन्यानी त्यानी एक installer पाठवला. त्यातही बरेच काही तुटला होता. त्यानी ambiguous specifications अशी excuse पून्हा वापरली whatever new things are required, we can include in a patch which can be released in two months . मॅनेजरला काहीही करून दोन महिन्यात product release करायचा होता आणि त्यामुळे दुसर्या ठिकाणी पून्हा वाटाघाटी करून त्याना काम देन शक्य नव्हता . त्यान नाईलाजान contract extend केला आणि additional support and maintenance for next six months त्यात समाविष्ट करवा लागला.
मी टीम लीडला म्हणालो " Won't this screw up their reputation? And how can they survive in the market?" आमचा टीम लिड म्हणाला सेवा कंपनी जळू सारखी असते. ती एकदा चिकट्लीकी रक्त पीत रहाणार, ठेवली तरी त्रास आणि काढायला गेला तरी त्रास. " मला काहि झेपलं नाहि. तो म्हणाला " मी सांगतो तुला समजावून. तू म्हणालास की कमीत कमी सहा महिन्याचा काम आहे. ह्या इंड्स्ट्रीमध्ये असा करनं गरजेचा असता. बहुतेक वेळा गिर्हाईकाला हे माहित नसता की एखाद काम करयला किती वेळ आणि मानसं लागतील. आणि त्याला स्वस्तात मस्त हव असत. जसा आपला मॅनेजर! ह्या बेंगलोरच्या कंपनीला प्रोजेक्ट मिळ्न्याचा एकमेव कारण त्यानी सर्वात स्वस्तात आणि कमी वेळेत काम करून देवू असा सांगितला असणार. .एकदा बकरं फसला कि पाहिजे तसा कापा. आणि त्यानी ही तेच केला. तीन महिने म्हणत म्हणत सात महिन्यावर आनला आणि सुरुवातीला जे ठरला होत त्याच्या चौपट पैसे कमावले! म्हणजे खरया किमतीच्य जवळपास दुप्प्ट! " मी- " but thats cheating and very cheap!" तो म्हणाला " पण तू एक गोष्ट लक्षात घेत नाहिस. जळू मज्जा म्हणून रक्त पित नाहि. जगन्यासाठी गरजेचा असता ते. सेवा कंपन्याचही तसच आहे. जो सर्वात कमी किम्मत सांगतो त्यालाच काम मिळत मग ती खोटी का असेना कारण काम देनारे लोक आपल्या मॅनेजर सारखे लोभी असतात. आणि एकदा की काम दिला कि सहजासहजी काढून घेता येत नाहि कारण त्यासाठी वर स्पष्टीकरन द्याव लागत. वर काय सांगनार मी येडेपणा केला म्हनून? त्यामुळे तेरीभी चूप मेरीभी चुप. आणि मग प्रामाणिकपणे किंमत आणि वेळ क्वोट करनार्या कंपनीवर दुकान बंद करयाची वेळ येते ." मी म्हणालो " धंदा है पर गंदा है!"
प्रतिक्रिया
10 Oct 2010 - 12:46 am | रन्गराव
http://www.misalpav.com/node/14540
http://www.misalpav.com/node/14560
http://www.misalpav.com/node/14575
http://www.misalpav.com/node/14584
http://www.misalpav.com/node/14592
http://www.misalpav.com/node/14623
http://www.misalpav.com/node/14625
http://www.misalpav.com/node/14706
10 Oct 2010 - 2:05 am | इंटरनेटस्नेही
वेरी गुड!
10 Oct 2010 - 5:14 am | शिल्पा ब
हा भाग आवडला...पण सेवा कंपनी म्हणजे नक्की काय? outsource केलेल्या कंपनीला सेवा कंपनी म्हणतात का? तसे असेल तर मग तुमची पण सेवा कंपनीच झाली ना?
10 Oct 2010 - 8:33 am | रन्गराव
>>हा भाग आवडला...
धन्यवाद
>>पण सेवा कंपनी म्हणजे नक्की काय?
Should have written service company! भाषांतर गंडला बहुतेक!
>>outsource केलेल्या कंपनीला सेवा कंपनी म्हणतात का? तसे असेल तर मग तुमची पण सेवा कंपनीच झाली ना?
very smart question! Actually ours was US based product company which has office in India. पण म्हनून काय कमी काळा बाजार केला नाहि आम्हि. service कंपनीलाही कदचित जमणार नाही इतका चिपपना दाखवला होता. पुढिल काहि भागात कळेल ते.
10 Oct 2010 - 4:56 pm | स्वाती२
आवडले.
10 Oct 2010 - 4:58 pm | सूर्य
चांगला झालाय लेख. पुढचा भाग लवकर टाका राव.
यावेळेस तुमचा बॉस मॅनेजर होता की आर्किटेक्ट ?
- सूर्य.
10 Oct 2010 - 9:08 pm | रन्गराव
मागील भाग वाचले असतील तर अस लक्षात येइल की आता मी मॅनेजरला रिपोर्ट करने बन्द केले होते. त्यामुळं आर्किटेक्ट माझे बॉस होते.
11 Oct 2010 - 10:51 am | llपुण्याचे पेशवेll
रंगराव हे खरं आहे. मी अनेक कंपन्याना असे करताना पाहीले आहे. तसेच एक खूप अनुभवी मनुष्य काम करतो आहे असे दाखवून त्याचे मजबूत बिलिंग वसूल करायचे मात्र काम करायला दुसरे खूप स्वस्तातले कमी अनुभव असलेले २ रिसोर्स वापरायचे ज्यांचे बिलिंग त्या अनुभवी माणसाच्या बिलिंगच्या १/८ सुधा नसते. आणि प्रोजेक्ट प्रॉफिटॅबिलिटी वाढवायची.
11 Oct 2010 - 3:35 pm | रन्गराव
बरोबर आहे आपला. चांगला मुद्दा मांड्लात आपण. धन्यवाद!
15 Oct 2010 - 5:48 am | फारएन्ड
"सेवाभावी जळू" आवडला शब्द :). लेखही वाचतोच आहे, कॅच अप चालू आहे :)
15 Oct 2010 - 12:11 pm | रन्गराव
आपल्या सारख्या मित्रांचा पाठींबा आहे म्हनून अजून लेखन सोडलेल नाही :)