काम चालु होवून एक महिना होत आला होता. शुक्रवारी सन्ध्याकाळी मेल आली "You guys are doing a great job! Now we need to have better co-ordination. Monday onwards we will have daily stand up meeting at 11.00 am. Make sure that all of you are around. This is important for all of us to be on the same page!"
सोमवार पासून चक्र चालु झाला. २० लोक ११ वाजता एकत्र यायचे. काल काय केले, कोणत्या अडचणी आल्या, आणि उद्या काय करणार हे सांगायचे. त्या नंतर टिम लिड्स समरी द्यायचे! हे सगळा व्हायला जवळपास ४० मिनिटा लागायचे. पण पुढे अडचणींचे तोड्गे ही तीथच शोधले जावू लागेले. आणि वेळ वाढून दिड तासावर पोहोचला. सकळी १०-१०:३० ला लोक ऑफिसला यायचे. मिटींगची तयारी करून मीटिन्गला जायचे. ते सरळ १२:३० ला बाहेर. मग काय मेल वाचा आणि १ वाजता जेवायला जायचे. जेवल्यानंतर गप्पाटप्पा मारत २ वाजता पेंगत कामाला लागायचे. शुक्रवारि तर अजून भारी काम होता. सकाळी स्टॅन्ड अप, दुपारी " weekly status update ". सन्ध्याकाळी अमेरिकन टिम बरोबर मीटिंग. "Thank God. Its Friday!" हे कुठल्या गदढ्याने लिहिल आहे माहित नाहि!
अशान काम माग पडू लागला! मी लिडला म्हणालो. " यार स्टॅन्ड अप २० मिनीटात संपवायची असते! आपण दीड तास वाया घालवतो" तो - " पण याला पर्ञाय काय?". मी- " खर तर QA and DEV can have separate stand ups. there is hardly anything we share at this point of time. And Friday afternoon's meeting is good enough to converge. त्याला हे कळत कस नाहि की वेळ वाया जातो ते " . तो हसला " त्याचा वेळ जात नसणार!" मी- "कुणी तरि त्याला ह्याचि जाणिव करून दिलि पाहिजे!" गीता म्हणालि " मांजराच्या गळ्यात घंटा कोन बांधनार?" मी -" मि प्रयत्न करतो!"
दुसर्या दिवशीपासून माझा अपडेट ३० सेकंदात सम्पू लागला " yesterday I finished another 10% of the work and hope to do the same today! " चार दिवस मॅनेजरने ऐकून घेतला. एक दिवस तो म्हनाला " I want more details! " मी -" work in progress, its tough to describe here in details". तो - " ते काही नाहि. Tomorrow I need the finest level of details!"
बाहेर आल्याबर गीता म्हणाली " आत येशील सुतासारखा सरळ!". मी मनात विचार केला. " आयला लग्न न होता हि फुकटचा सासुरवास चालु आहे! " दुसर्या दिवशी मिटींग मध्ये दिड तास होवून गेले होते. माझा अप्डेट सगळ्यात शेवटी झाला. मी सुरु झालो " these are the finest levels of details. its gona take bit extra time. shall I go ahead? " तो -"without any doubts!" मी खिशातून प्रिन्टाअवूट्स चा गठ्ठा काढत -" I have written a static class my_job. it has five private variables. one public function do_job(). and 4 private functions do_job1() , do_job2() , do_job3() and do_job4() . all the private functions are called through do_job. do_job3() and do_job4()'s code is not yet ready. do_job1() , do_job2() put together has 250 lines of code. वाचून दाखवू? " आता सगळे लोक मान खाली घालून हसू लागले होते. तो म्हणाला "राहू दे! " मिटींग समप्त झालि. एकच हशा पिकला.
ह्या शुक्रवारि बहुधा सगळ्यान्चा काम मागा पडला होता! मॅनेजरने सगळ्याना फैलावर घेतला " we can't afford to miss deadlines like this! you people need to stay in the office longer! " मी म्हणालो. " you are treating symptoms not the root cause. fact is that the stand ups are proving out to be counter productive. we should have separate stand ups for dev and Qa ." तो आता चिडला होता म्हणाला " फक्त तुला एक्ट्याला प्रोब्लेम आहे. बाकि कुनाला वाटतय का असा? " कुणी काहि बोलला नाहि. मी म्हणालो " असा दम भरल्यावर कोण सांगनार. lets have an anonymous survey" चिट्ठ्या टाकून पाच मिनिटात सर्व्हे केला. मी २० विरूद्ध १ ने जिन्कलो होतो. तो पडलेला चेहरा घेवून म्हणाला " ठिक आहे जशी सर्वान्चि ईच्छा. रंगराव आता डेव मीटिंग ला तरि येणार ना?" मी -" No! I will up-date the team -lead and he can inform you. there is no need for stand-ups anymore. " रूम मध्ये शांतता पसरली होती. तो काहि बोलणार इतक्यात टीम लिड म्हणाला " I think he is right! lets try this approach for some time and see if it works!" . तो निघून गेल्यावर गीता म्हणाली " अहो बाजीराव पेशवे. आपले चरणकमल दाखवा. साष्टांग दंड्वत घालायचा आहे". बनिया म्हणाला " थँक्स यार. पर लगता है तेरि वाट लगने वालि हैन" . रात्री आदिचा मेल आला - "good job dude! but be careful! he can be vindictive"
प्रतिक्रिया
26 Sep 2010 - 11:27 am | अवलिया
क्या बात है रंगराव,, तुफान लेखन चालु आहे,
मिपावर फक्त सोन्याचा मुलामा असलेले किंवा अल्युमिनियमचे किंवा मातीचे किंवा मोडलेले गंजलेले एकाच गरीब गटात असलेल्या लेखक प्रतिसादकांचा भरणा आहे असे मत असलेल्या विचारवंतांना मान खाली घालायला लावेल असा आपला लेखन आवाका !! जबरदस्त !!
असेच लिहित रहा आणि नव नवीन विषयांची मेजवानी देत जा !!
जियो ! रंगराव जियो !!
26 Sep 2010 - 12:58 pm | अनिल २७
कुणी कुणी माना खाली घातल्या त्यांनी हात वर करा बरं ;-)
26 Sep 2010 - 1:11 pm | रन्गराव
धन्यवाद! ईतकी स्तुति नका करूत. पाठिला पन्ख वगैरे फुटल्यासारखा वाटायला लागला आहे ;)
26 Sep 2010 - 1:20 pm | कुंदन
जियो ! रंगराव जियो !!
26 Sep 2010 - 1:30 pm | रन्गराव
त्यातर पहिल्या लेखनात ही घातल्या न्व्ह्त्या! वाचनार्यांचे तसे समज झाले आणि मला थोड्क्यात स्पष्टिकरन देता आले नाहि. climax पहिल्याच लेखनात फोड्ला तर मज्जा निघून जाइल. पण तरिहि आपण वाचत राहिलात ह्याबद्दल धन्यवाद!
29 Sep 2010 - 2:47 am | विश्वनाथ मेहेंदळे
अहो, ती त्यांची सही आहे. तुम्ही ते वाक्य मनावर घेऊ नका. तुम्हाला उद्देशून नाही आहे ते.
30 Sep 2010 - 10:50 am | रन्गराव
अरेच्चा खरच की. लक्षातच आलं नाही.
26 Sep 2010 - 11:46 am | नितिन थत्ते
मस्त लेखन
26 Sep 2010 - 12:12 pm | स्वानन्द
आईल्ला राव, आपण तर यार तुझा पंखा झालो!!
येत राहू दे पुढचे भाग.... कधी संपायलाच नको.
26 Sep 2010 - 12:15 pm | कवितानागेश
चांगले लिहिलेय...
वाचतेय..........
26 Sep 2010 - 12:28 pm | प्रीत-मोहर
मस्त लिहीताय........:)
26 Sep 2010 - 12:43 pm | मस्त कलंदर
हा भाग इतर भागांपेक्षा जास्त आवडला.. कदाचित पॅरलल प्रोसेसरची कमी वेळा गरज लागल्यानेही तसे झाले असेल...पुभाशु.
26 Sep 2010 - 3:00 pm | रन्गराव
धन्यवाद!
26 Sep 2010 - 12:43 pm | कानडाऊ योगेशु
मी ही तुमच्या लेखनाचा फॅन झालो आहे.
तुमचा मॅनेजर फार स्टिरिओटिपिकल वाटतोय.इतका एक्स्ट्रीम अॅटिट्युड असणारा मॅनेजर आढळणे मला तरी मुश्किल वाटते.
त्यामुळे तुमच्या अनुभवाला कथेची झालर येतेय.
पण जे लिहित आहात ते वाचनीय आहे हे नक्की.
गीताचा नवरा आदित्य आवडला.
26 Sep 2010 - 12:59 pm | नगरीनिरंजन
असेच म्हणतो. मॅनेजर थोडा अतिरंजित वाटतोय खरा पण त्यामुळे जास्त मजा येते आहे.
लिहा पुढे.
26 Sep 2010 - 1:45 pm | रन्गराव
तुम्हि म्हण्ताय ते बहुदा खरा असावा. त्याची चिडचिड माझ्याच बाबतीत जास्ती व्हायची. त्याचा इगो न दुखवता त्याला सांगना मला त्यावेळी जमत नव्हते. एक घाव दोन तुकडे करण्याच्या सवयीमुळे झाला असल कदाचित तसा!
26 Sep 2010 - 12:55 pm | डावखुरा
येउद्यात....भारीये
26 Sep 2010 - 1:10 pm | अनिल २७
द हिरो ! (?????) पार्ट -५
26 Sep 2010 - 1:46 pm | चिगो
छान लिहीताय... पु. भा. प्र.त..
26 Sep 2010 - 7:23 pm | नावातकायआहे
छान लिहीताय... पु. भा. प्र.
26 Sep 2010 - 8:39 pm | विजुभाऊ
रन्गराव मस्त लिहिताय.
मला " इन द वन्डरलॅन्ड ऑफ इन्डियन मॅनेजर्स" आठवले.
26 Sep 2010 - 10:47 pm | रन्गराव
अशा नावचा पुस्तक असेल ह्याची कल्प्ना नव्हती. नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद! Good to know that somebody is already talking about these problems!
26 Sep 2010 - 10:47 pm | रन्गराव
अशा नावचा पुस्तक असेल ह्याची कल्प्ना नव्हती. नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद! Good to know that somebody is already talking about these problems!
27 Sep 2010 - 6:09 am | फारएन्ड
हे पुढचेही भाग आवडले!
त्या मॅनेजरशी १:१ मिटींग ठरवून त्याला सांगा की मी ज्या सजेशन्स देतो त्या तुला विरोध करायचा किंवा तुझ्यापुढे अडथळे उभे करायचे म्हणून नाही, मला खरेच तसे वाटते म्हणून देतो. पाहिजे तर अशा कल्पना आपण आधी डिस्कस करत जाउ. तो मॅनेजर स्वतः जाणकार असेल पण फक्त स्वतःला असुरक्षित समजणारा असेल (इन्सिक्युअर. येथे भाषांतर जरा गडबड करते) तर मान्य करेल. पण मुळातच खत्रुट असेल तर एक दोन अशा मीटींग्स मधे तुमच्या लक्षात येइल (बर्याचश्या कल्पना तो हाणून पाडेल किंवा तुम्हाला श्रेय न देता स्वतःच्या म्हणून वापरेल) आणि मग वेगळा मार्ग पत्करावा लागेल. पण निदान प्रयत्न केला असे सांगता येइल, पुढे काही प्रॉब्लेम झाला तर.
यातील ह्यूमन फॅक्टर लक्षात घेतलात तर फायदा होईल. तारीफ सर्वांसमोर करावी व टीका गुप्तपणे हा ही सर्वसाधारण नियम चालतो अशा कंपन्यांमधे.
27 Sep 2010 - 6:41 am | रन्गराव
तुम्ही इतक्या आपुलकिन सल्ला दिलात त्याबद्द्ल मनापासून धन्यवाद. पण ह्या सगळ्याला खूप उशिर होवून गेला आहे. पुढील काहि भागांमध्ये चित्र स्पष्ट होइल.