लेख

आरण्यक :

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
21 Feb 2021 - 7:00 pm

आरण्यक

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

मित्र आणि मैत्रिणींनो,

आज एक नवीन पुस्तक घेऊन येत आहे. या पुस्तकाचा मी अनुवाद करणार आहे हे मी पूर्वीच सांगितले होते. त्याप्रमाणे हे पुस्तक आपल्यापुढे सादर करण्यास मला आनंद होतोय. माझ्या आवडत्या पुस्तकापैकी हे एक पुस्तक.
ज्यांना हे घेण्यात रस असेल त्यांनी कृपया मला मेसेज करावा.

साहित्यिकलेख

शिक्षणाचे मानसशास्र: गोष्ट सांगा आणि बीजगणित शिकवा

राजा वळसंगकर's picture
राजा वळसंगकर in जनातलं, मनातलं
21 Feb 2021 - 6:01 pm

पाणी घेऊ का विचारायला म्हणून सायली बंगल्याचे गेट उघडून आत गेली. दरवाज्यावर बेल होती, पण ती वाजली नाही, म्हणून सायलीने दरवाज्यावर थाप मारली. थाप हलकीच होती पण दरवाजा थोडा उघडला, बहुतेक तो लॉक केला नव्हता. कुणी आहे का घरी म्हणत तिने दरवाजा अजून थोडा उघडून विचारलं, पण काही उत्तर आले नाही. सायलीने आता दरवाजा पूर्ण उघडला आणि आत डोकावलं...
****************************************

शिक्षणलेख

▁ ▂ ▄ ▅ ▆ ▇ █ बरबादीचा आलम █ ▇ ▆ ▅ ▄ ▂ ▁

लेखनवाला's picture
लेखनवाला in जनातलं, मनातलं
21 Feb 2021 - 10:21 am

जगण्यातल्या रोजनिशीतल्या घडामोडी

1.व्यवस्था

मांडणीवावरसंस्कृतीसमाजजीवनमानप्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रियाआस्वादलेखबातमीमाहितीसंदर्भ

मराठेशाहीचे अखेरचे सेनापती - बापू गोखले

kvponkshe's picture
kvponkshe in जनातलं, मनातलं
19 Feb 2021 - 11:32 pm

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नजीक तळेखाजण येथे पिरंदवणे (तळेखाजण वाडी) येथे गोखले घराणे वसले होते. लष्करी पेश्याची कोणतीही परंपरा असण्याची शक्यता नसलेल्या या घराण्यात १७७१ मधे नरहर उर्फ बापू गोखले याचा जन्म झाला. बापुंचे वडील गणेशपंत, चुलते मोरोपंत व लक्ष्मणपंत हे शेतकरीच असावेत. बापूंच्या आई विषयी माहिती मिळत नाही.पितृसहवास बापुना किती लाभला हे ही समजत नाही. मात्र चुलते धोंडोपंत आणि काकू लक्ष्मीबाई यानीच बापुना सांभाळले असावे. बापूंना महादेव (आप्पा) नावाचा एक मोठा भाऊही होता. धोंडोपंत हे विजयदुर्ग सुभ्यास गंगाधर पंत भानू याच्या कडे कामास होते. त्यावेळी विजयदुर्ग परिसरात रामोशी टोळ्या लुटा

इतिहासलेख

शुन्य टिंब एक

नीळा's picture
नीळा in जनातलं, मनातलं
15 Feb 2021 - 7:25 pm

सगळ्यात महत्वाचे म्हणजे माफी मागणे. पहिल्यांदा ज्या आयडी चा अकाऊंट माम्ही हॅक केलाय म्हणजे नीळायांचा..सर माफ करा पण माम्हचा पण नाईलाज आहे…माम्हची कहाणी ऐकली की तुला कळेलच…समजुन पण घ्यालच. दुसरी गोष्ट म्हणजे ईतर सगळ्या वाचकांना…. माम्हची भाषा तोडकी मोडकी वाटते ना?…म्राठी हि काही माम्हची योनभाषा नाही…आणि माम्हच्या दुनिया मधल्या काही संकल्पना.. शब्द तुच्या भाषेत नाहीतच. तर थोड समजुन घ्या… हळूहळू सवय होईल, माम्हालाहि आणी तूलाही.
ईथेच कहाणी षांगायच मुख्य कारण म्हणजे यक्क.

कथालेख

कण

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
14 Feb 2021 - 5:51 pm

नदीच्या प्रवाहात दोन अनोळखी आणि दूरचे दगड एकमेकांना भेटावेत तशी माणसांच्या समुद्रातील आपली भेट. जिथे भेटलो तिथेच नदीचा सागर झाला. निदान आपल्यापुरते तरी नवीन दगडांवर आदळणे थांबले. पूर्वी आधार शोधणारे हात आता एकमेकांच्या आधाराला सज्ज होते. माणसांची स्वयंभू नदी तशीच वाहत होती. मनाला वाटलं तेव्हा आपणही प्रवाहात पुन्हा मिसळायचो, पण आता आवडत्या वळणावर क्षणभर विश्रांती घेताना प्रवाहाच्या मागे पडायची फिकीर नसायची. मातीत रुजलेल्या बी सारखा मी तुझ्यातून अंकुरत होतो. ना मला वाढायचं होतं ना फळाफुलांनी बहरण्याची आस होती. धरतीतून उगवलेला अंकुर आकाशाच्या ओढीनेच वाढत असतो.

धोरणविचारलेख

गुमोसोस आणि अफ़सोस

कुमार जावडेकर's picture
कुमार जावडेकर in जनातलं, मनातलं
14 Feb 2021 - 2:09 pm

आमच्या गुलमोहर सोसायटीची अनेक 'व्हॉटस ॲप' मंडळं आहेत. त्यांची नावं काय असावीत या विषयापासूनच त्यांच्यामध्ये कधी मनोरंजक तर कधी अतिरंजित चर्चा होत आल्या आहेत. वास्तविक बरेच दिवस आम्ही प्रत्येक जण आपापल्या घरातल्या, नात्यातल्या, मित्रांतल्या इत्यादी ‘व्हॉटस ॲप’ मंडळांमध्ये मान्यता आणि धन्यता पावत होतो; पण सोसायटीचं असं मंडळ व्हायला हवं हे कुणाच्या लक्षात आलं नव्हतं. याचं मुख्य कारण म्हणजे सोसायटीच्या प्रत्येक कार्यक्रमाचा शुभारंभ करायला आम्हांला परुळेकर मामा लागतात. ते स्वतः गेली वीस वर्ष, निवृत्त झाल्यापासून, सोसायटीचे सेक्रेटरी (आणि सर्वांचे एल. आय. सी. एजंट) आहेत.

विनोदलेखप्रतिभाविरंगुळा