उन्हाळी दुपार आणि पित्ज्झा बॉय
दुपारचे १ वाजले होते, पित्ज्झा बॉयला अर्ध्या तासात ३ पित्ज्झे डिलिवर करायचे होते. उशीर झाला तर ग्राहक पैसे देणार नाही आणि मालिक पगार हि नाही. पित्ज्झा बॉयच्या नौकरीत वेळेचेच महत्व. बाईक स्टार्ट करून तो निघाला. तापलेल्या गरमागरम सीटचे चटके त्याला बसू लागले. आजीने सांगितलेली गोष्ट आठवली, "कोल्होबा-कोल्होबा बोरोली पिकली, नाही नाही आजीबाई ढुंगोली शेकली". मनात विचार आला गाव सोडून आपण या शहरात पैसे कमवायला आलो कि ढुंगोली शेकायला. चौरस्त्यावर पोहचतात समोर रेड लाईट दिसली. दिल्लीची रेड लाईट, च्यायला आता चक्क ५ मिनिटे थांबावे लागेल.