आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी
अॅक्सिडेंटल प्रॉयमिनिस्टर*****
जनता दल राजवटीमध्ये जसे कुणाच्या ध्यानीमनीही नसलेले नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आले आणि देवेगौडा यांच्या भाळी पंतप्रधान पदाचा मानटिळा लागला.
अॅक्सिडेंटल प्रॉयमिनिस्टर*****
जनता दल राजवटीमध्ये जसे कुणाच्या ध्यानीमनीही नसलेले नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आले आणि देवेगौडा यांच्या भाळी पंतप्रधान पदाचा मानटिळा लागला.
काल 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' पाहिला, एक चित्रपट म्हणून चांगला आहे. भारतीय सैन्यावरचा आदर यामुळे वाढत असला, तरी 'उरी' मध्ये झालेला हल्ला आपल्या इंटेलिजन्स चं अपयश होतं हे खुबीने लपवलं आहे. सर्जिकल स्ट्राईक बद्दल आज मिडियाच्या कृपेने भरपूर माहिती आहे, त्यामुळे यातल्या फॅक्टस कोणी नाकारू शकणार नाही. अभिनयाच्या बाबतीत नेहमीप्रमाणे 'विकी कौशल' ने भारी कौशल्य दाखवलं आहे. चित्रपटातपण नरेंद्र मोदी 'मित्रो' असं कधीपण म्हणतील की काय असं सारखं वाटतं राहते. उरी मधली आवडलेली गोष्ट म्हणजे यात यामी गौतम आणि विकी कौशल याचं कुठेही अफेयर वगैरे दाखवलं नाही.
नान्याला छळण्यात आम्हाला आता काहीही स्वारस्य उरलं नव्हतं.अपेक्षित दहशत त्याच्या मनात बसलेली असल्याने तो आता आमचं सर्व ऐकायला बांधील होता.
नाना नानीची वरात पुन्हा प्रेसजवळ पोहचल्यावर नाना थंडीने आणी भितीने थरथर कापत जीन्यावरुन घरात गेला.आता त्याला आरामाची गरज होती.एकंदर सर्व घटनाक्रमाचा त्याच्या मनावर ताण निर्माण झाला होता .आता पुन्हा जर काही घडते तर तो देखील नानीला विधवा करुन आमच्याबरोबर वावरायला मोकळा झाला असता.आणी आम्हाला ते नको होते.
त्याला तात्पुर्त सोडुन आम्ही त्याच्या अॉफीसमधे आता पुढे काय करायचं याचा विचार करीत त्याच्याच खुर्चीत रेलुन बसलो.
खुप कंटाळुन आम्ही टेबलवरुन उडी मारली .आणी खुर्ची शेजारी उभं राहुन एक हात नान्याच्या खांद्यावर ठेवत दुसऱ्या सहाताने टेबलवरचं रजिस्टर उचललं.
"नान्या हरामखोर ! मुडद्याच्या टाळुवरचं पण चाटतोस ? साल्या लाज वाटली पाहिजे तुला ." त्याचं मानगुट पकडत आम्ही ओरडलो.
दचकलेला नाना एकदम भयभीत नजरेने बघु लागला. डायरी ,कॕलेंडर सगळं बंद करुन त्याने ड्रॉवर उघडुन 100/- च्या नोटांच बंडलच काढुन टेबलवर ठेवलं.
"हे घे बाबा ! आणी सोड मला .तुझा तीन महिन्याचा पगार घे आणी जा एकदाचा इथुन " नान्या गयावाया करु लागला.
त्याचा आज वाढदिवस. सकाळी अंथरुणात उठून बसला. काल रात्री बारा पर्यंत जागाच होता. पण शुभेच्छा द्यायला तो सोडून कोणीच जागे नव्हते. whats app वरचे काही फुटकळ मेसेज तपासून हा पण शहाण्या सारखा गपचूप झोपी गेला. तर सकाळी उठून बसला. कोणाची काही चर्चा नाही, भेटवस्तू काय हवी विचारणा नाही, बाहेर कोठे जायचे काही तयारी नाही. आपला वाढदिवस विसरले कि काय हे लोक, असंच त्याला वाटून गेलं.
इतक्यात आलीच ...लगबगीने हसत हसतच बायको आली. येऊन सरळ मांडीवरच बसली.
आयला हे काय... ! म्हणजे एकीकडे बरे वाटले. पण अजून झोपेतून पूर्ण शुद्धीवर येतोय तेवढ्यातच मांडीवर ..हा ..हा ..
(भारतीय समाजात जातीभेदाचे विष पसरविण्यासाठी मूळ निवासी युरेशिअन इत्यादी थोतांड इतिहासाच्या नावावर पसरविले जातात. हे पसरविणारे स्वत:ला इतिहासकार इत्यादी म्हणवितात. खर म्हणाल तर आजच्या लोकांचे अध्ययन केले तरी खरा इतिहास कळू शकतो).
लेखक : कोणी का असेना.
स्थळ : इशान्य भारतातील एक राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे कार्यालय
पात्र : सरकारी बाबू ( श्री. ना.पा. सघोडे)
पिता ( श्री. फा.र. चतापलेले)
पुत्र ( संदर्भास)
इतर सोयीनुसार
पार्श्वभुमी : अभियांत्रिकी शिक्षणासाठीच्या जागांचे सुयोग्य आणि यथार्थ वाटप व्हावे, म्हणून केंद्र सरकारने CSAB - NEUT ( Central Seat Allotment Board - North East & Union Territories) ची निर्मिती केली आहे. सदर प्रक्रियेनुसार जागांचे वाटप व भरती होऊन आता जवळपास दोन महीने लोटले आहेत.
काही दिवसांपूर्वी 'सर्चिंग' हा इंग्रजी सिनेमा पाहिला. बर्याच दिवसांनी एक चांगला, उत्कंठावर्धक रहस्यपट पाहिल्याचं समाधान मिळालं. अतिशय संयत हाताळणीमुळे 'सर्चिंग' एकाच मुख्य कथासूत्राभोवती प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. मला या चित्रपटाबद्दल आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे कुठलाच इतर फापटपसारा या चित्रपटात नव्हता. समांतर असणारी उपकथानके नाहीत; विनाकारण वाढवून ठेवलेली गुंतागुंत नाही; प्रेक्षकांना भुलवण्यासाठी रचलेले फसवे भूलभुलैय्या नाहीत. एकच प्रश्न आणि त्याभोवती फिरणारे, खरे वाटणारे नाट्य! एका माणसाची एक टीनेज्ड मुलगी एक दिवशी अचानक गायब होते.
काल दुपारी 'तुंबाड' पाहिला. नीलायमला दुपारी साडे बाराचा खेळ होता. पावणे बारा वाजता चिरंजीव गाढ झोपी गेले. म्हणजे १-२ तास निवांत होतो. बायकोला सांगीतले आणि ताबडतोब नीलायमला पोहोचलो. दिवाळीमुळे आणि या चित्रपटाच्या कथेमुळे फारशी गर्दी नव्हती. बरोबर साडे-बारा वाजता चित्रपट सुरु झाला. १९१८ चा काळ. कोकणातले तुंबाड गाव. तुफान पाऊस कोसळतोय; संध्याकाळ की रात्र अशा कात्रीत दिवस सापडला आहे. आभाळ गच्च भरलेलं आहे. एका जुन्या वाड्याच्या चौकात एक गरीब, तरुण विधवा भर पावसात कुडकुडत उभी आहे. समोर वाड्याच्या पडवीत एका खुर्चीत वाड्याचा जख्ख म्हातारा मालक त्या तरुण विधवेकडे एकटक बघतो आहे.
विसरलेल्या आठवणी वा नकळत निसटून गेल्या क्षणांचा मोह कधी परतून एकांतात एखादा विराग सूर छेडून मनाला वाऱ्याबरोबर हलके करेल वा एखाद्या ओल्या कापसाच्या ओझ्याप्रमाणे भारी करेल हे सहसा सामान्य बुद्धीच्या पालिकडे! कदाचित काळाला खुणगाठ बांधता आली असती वा एखादा क्षण मोरपिसाप्रमाणे वा त्या पिंपळाच्या पानाप्रमाणे जीवनाच्या पुस्तकात राखता आला असता तर नक्कीच सुखकर झाले असते.