क्रीडायुद्धस्य कथा वाहा(ब) जी वाहा(ब)
आपल्याला ड्रामा आवडतो. क्रिकेट असो वा सिनेमा वा लाइफ.... आपल्याला ड्रामा आवडतो. आपला हीरो कसा... हातात बंदुक असली तरी त्याच्या दस्त्यानी हानत हानत १० लोकांना लो़ळवील... पण गोळी नाही घालणार. सरळ समोरच्याला गोळी घालुन मामला खतम केला तर पिक्चरमध्ये मजा काय राहिली? जरा काचा तुटल्या, डोकी फुटली, मानसं हिकडून तिकडं उडून पडली, हाडं मोडली की कसं जरा पैशे वसूल झाल्यासारखं वाटतं. एका टीमनी अमुक अमुक रन केल्या आणि दुसर्या टीमनी तमुक तमुक ओव्हर्समध्ये त्या चेस केल्या अशी साधी सरळ सोपी स्टोरी असलेलं क्रिकेट आम्हाला कसं आवडणार? मग तो पाठलाग कितीही शिस्तीचा का असेना.