"काका आहात का आत?" अस म्हणत मी काकांच्या घरात शिरलो. तर काका नेहमीप्रमाणे मिक्सर दुरुस्त करत बसले होते आणि काकू कधी मिक्सरकडे तर कधी काकांकडे करूण कटाक्ष टाकात होत्या.
"काका तुम्हाला आधीपण म्हणालो होतो माझ्या अोळखीचा एकजण आहे , त्याकडे द्या दुरुस्तीसाठी "
"राजे तुम्ही जन्मला ही नव्हता तेव्हा डिप्लोमा केला आहे मी. बघ कसा चालू होतो.." इति काका
त्याच दिवशी संध्याकाळी काका , काकू आमच्याकडे चावी देऊन बाहेरगावी गेले. मी संधीचे सोने करत गुपचूप मिक्सर दुरुस्त करून ठेऊन दिला.
दुस-या दिवशी बघतो तर काका मिक्सरला घेऊन बसलेले.. मग शेवटी अभिमानने काकांनी मिक्सर चालू केलाच
काकूनी माझ्याकडे पाहून मिचकावलेले डोळे काकांनी पाहिलेच नाही..
प्रतिक्रिया
3 Dec 2017 - 10:38 pm | एस
अरे वा! खूपच छान, साधी-सरळ शतशब्दकथा! आवडली.
3 Dec 2017 - 11:28 pm | पद्मावति
खुप गोड. आवडली.
4 Dec 2017 - 6:01 am | खेडूत
:))
4 Dec 2017 - 8:52 am | ज्योति अळवणी
मस्त. एकदम आवडली कथा आणि काकांचं मन जपण्याची पद्धत
4 Dec 2017 - 9:33 am | अभिजीत अवलिया
सहमत.
4 Dec 2017 - 11:26 am | पुंबा
मस्त..
4 Dec 2017 - 11:41 am | कंजूस
व्वा!
4 Dec 2017 - 11:59 am | सिरुसेरि
मस्तच ! +१
4 Dec 2017 - 1:15 pm | नाखु
साधेपणा जास्त मोहक असतो हे अधोरेखित करणारी आहे
4 Dec 2017 - 1:59 pm | जागु
छान मजेशीर.
4 Dec 2017 - 4:40 pm | मनिमौ
छोटीशी कथा
4 Dec 2017 - 4:51 pm | चौथा कोनाडा
मस्त !
4 Dec 2017 - 10:06 pm | शब्दानुज
सर्वांचे आभार
5 Dec 2017 - 11:49 am | सस्नेह
मजेदार छोटुकली कथा !
6 Dec 2017 - 2:10 am | रुपी
छान कथा :)
6 Dec 2017 - 9:39 am | ss_sameer
वाह
7 Dec 2017 - 1:44 pm | रंगीला रतन
छान.