सोना, सोSSना, सोनुSSटली, काहीच उत्तर नाही. शेवटी आबा जोरात ओरडले गधडी बहरी आहेस का, ऐकू येते कि नाही. जोर-जोरात पाय आपटत ११ वर्षाशी सोनुटली दोन्ही हात कमरे वर ठेऊन आबासमोर उभी ठाकली. मोठे-मोठे डोळे वटारून बेंबीच्या देठाने ओरडली आSSबाSS, ओ द्यायला थोडा उशीर का झाला, मी बहरी, मी गधडी. आता कुकल बाळ नाही मी. मोठी झाली आहे. ६वीत शिकते. गधडी म्हंटलेले मला मुळीच खपणार नाही. एवढी वर्ष सहन केले, आता मुळीच सहन करणार नाही. येउ ध्या ममाला ऑफिसातून, कशी वाट लावते तुमची, बघाच.
आबाही तेवढ्याच त्वेषाने म्हणाले, "एवढ्या आवाज देतो, तू ऐकूनहि न ऐकल्यासारखे करते, आणि वर मला धमकी देते. माझी बिल्ली आणि मलाच म्याऊ". येउ दे तुझ्या पपाला, आईची धमकी देते, बघून घेईल तुझा बा, तुम्हा माय लेकीना. हा!, हा!,हा! 'व्हाट अ जोक,व्हाट अ जोक' आबा तुमचा जावई, सॅारी माझे पपा, आईने थोडे डोळे वटारले कि शेळी होते त्याची. एक विचारू आबा, तू पण आजीला घाबरत होता का? म्हणत सोनुटलीने तेथून धूम ठोकली.
आबाचे लक्ष समोर हार घातलेल्या त्यांच्या बायकोच्या फोटो कडे गेले. च्यायला फोटोत हि मोठे-मोठे डोळे करून टक लावून पहात आहे. आबा दचकले, सॅारी, नाही बोलणार पुन्हा सोनाला म्हणत आबानी कानाला हात लावले आणि मनातच पुटपुटले, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा....
प्रतिक्रिया
2 Jul 2018 - 9:50 am | विवेकपटाईत
१०-१२ दिवस आधीची गोष्ट आमची २ वर्षाची नात, का माहित का नाराज झाली आणि दिवसभर थोड्या थोड्या वेळाने आपल्या बोबड्या भाषेत -मंडीयाली, हिंदी, मराठी व आंग्ल भाषेतील no-no - फाईरिंग करत राहिली. अर्थात तिची भाषा समजणे अवघडच. तिचा अवतार पाहून, तिची माय आणि आमची सौ. सर्वांनी या प्रकरणात मलाच दोषी ठरविले. त्या वरून सुचलेली कहाणी.
2 Jul 2018 - 11:15 am | एस
कथा आवडली. छान लिहिलंय.
2 Jul 2018 - 1:18 pm | टवाळ कार्टा
खि खि खि
2 Jul 2018 - 7:21 pm | टर्मीनेटर
शॉर्ट & स्वीट.
2 Jul 2018 - 10:00 pm | जयन्त बा शिम्पि
मला वाटते शीर्षक चुकले की काय ? पराधीन आहे " पुत्र " मानवाचा , ह्या ऐवजी ' पराधीन आहे जगती, पती बायकोचा " असे असावे. कारण शेवटच्या परिच्छेदात कथेचे तात्पर्य याच निष्कर्षाप्रत आले आहे.
4 Jul 2018 - 1:00 pm | विवेकपटाईत
पुत्र हा नवरा पण होणार. बायको आल्यावर त्याला हि हे भोग भोगावे लागतील.