क्रिमिनल जस्टीस
सध्या कोणत्याही सिरीज मध्ये ड्रग्स, सेक्स पंकज त्रिपाठी यांची फोडणी मारली कि ती हमखास यशस्वी होते असा सिरीज बनवणाऱ्यांचा समज आहे. मग कथा कितीही कच्ची असो पंकज त्रिपाठी आहे ना तो हमखास अभिनयाच्या जोरावर सिरीज तारून नेतो. The Night Of चं भारतीय रूपांतर असलेल्या 'क्रिमिनल जस्टीस' या 'क्राईम-कोर्टरूम ड्रामा' मध्ये सशक्त कथा सोडून वरच्या तिन्ही गोष्टी आहेत. पण शेवटी जो धक्का दिलाय फक्त त्यासाठी हि सिरीज पहावी.