जर्नी इस द रिवॉर्ड
जगातले काही शोध असे आहेत, ज्यामध्ये पूर्ण समाजाला बदलूंन टाकायची शक्ती असते. कम्प्युटरचा शोध या महत्वाच्या शोधांपैकीच एक. कम्प्युटर जेव्हा प्राथमिक अवस्थेत होते तेव्हा कोणी विचारही केला नसेल, कि येत्या काही दशकांत तुम्ही घरबसल्या दुसऱ्या खंडातल्या लोकांशी संवाद साधू शकाल, खिशात १००० गाणी ठेवून फिरू शकाल. खरं तर तेव्हा अशी कोणी कल्पना असती तर त्याला अगदी वेड्यात काढलं असतं, पण म्हणतात ना वेडी माणसंच इतिहास घडवू शकतात.