तुन्हा मन्हा जुगुमले...
- डॉ. सुधीर रा. देवरे
तुले मनावाले जास
मी काकोळीतखाल
तुन्हा भ्या मा खंगाईसन
तुन्ही गोटना उगरा टोकले
मी तुन्हामाच रवळी जास...
मन्हाच रंगतवरी
माले थापन देवानी
मी कितली काकोळीत कई
आनि मोर्हला उच्छाव
येवानं आदुगरच
मी व्हई गऊ घुमर्या
तुनी पसरेल- आखडायेल
कपारनी गौळ नादमा...
मी घांगळी वाजी पाही
पावरी वाजी पाही
टापरा वाजी पाह्या
चिमटा हालाई पाह्या
तुन्ही थाळीना नाद
आझुनबी आयकू येत नही
मी रातभर घुमी र्हास...