वार्तालाप: संपन्न बनण्याचा मार्ग
जाणपण निरूपण समासात समर्थांनी आध्यात्मिक प्रगती सोबत संसारात संपन्न आणि वैभवशाली बनण्याचा मार्ग ही सांगितलेला आहे. समर्थ म्हणतात, समाजात आर्थिक आणि सामाजिक विषमता नेहमीच असते. अजाणते पणे लोक राजकीय व्यवस्थेला दोष देतात, काही प्रारब्धला दोष देतात. भारतात अनेक राजनेता सामाजिक विषमतेचा उपयोग जातीय, भाषिक आणि प्रांतीय आधारवर प्रजेत भेद टाकून निवडणूक जिंकण्यासाठी करतात. समर्थांच्या शब्दांत नेणता अर्थात अज्ञानी माणूस यातच गुरूफटून जातो. जसे आजकाल महाराष्ट्रात भाषा विवादात प्रजा गुंतली आहे.