प्रकटन
Dear Camera
Dear Camera,
देवाने आम्हाला दोन डोळे दिले, पण त्यात एकच लेन्स बसवली. तू आलास, आणि मला तिसरी, चौथी, पाचवी.... कितवी तरी लेन्स मिळाली. जग तुला तिसरा डोळा म्हणते. मी म्हणत नाही. कारण तिसरा डोळा उघडला कि हाहाकार माजतो. मी तुला अंतर्चक्षु म्हणते. आतले डोळे.
.... बाकी तुमचं चालू द्या।
काल एक मेसेज आला.... गुढीपाडवा साजरा करू नका... कलश म्हणजे राजाचं शिर... वगैरे वगैरे. काल मुद्दाम डेक्कनवर गेलो... आमच्या राजाला नमस्कार केला. आज गुढी उभारली... कडुनिंबाची पानं खाल्ली... श्रीखंड केलं.... बाकी तुमचं चालूद्या!
काही लोकांनी दीपिका पदुकोणचं नाक - शिर उडवण्याची मागणी केली म्हणे. तिने भारतीय संस्कृतीचा अपमान... वगैरे वगैरे... चित्रपट बघितला नाही पण ती पोरगी दृष्ट लागण्याइतकी सुंदर दिसते. तिचे काही चित्रपट आवर्जून पुन्हा पुन्हा बघतो... छान वाटतं....बाकी तुमचं चालूद्या!
माझे अपहरण
माझे अपहरण ...
मी पोते, सुतळी, दाभण घेऊन तयार आहे..
मी वाट पहात, दबा धरून बसलेय.
मला माझेच अपहरण करायचे आहे..
कुत्रा माग काढणार नाही,
भिकारी चुकून माझी एखादी खुण लक्षात ठेवणार नाही,
गाड्यावरचा भाजीवाला ओळख दाखवणार नाही,
शाळेत जाणारे पोर मला बघून हसणार नाही,
नाक्यावरचा फुटकळ तरुण मला बघून, न बघितल्यासारखा करणार नाही,
कुणी रिक्षावाला माझ्या अगदी जवळून रिक्षा नेणार नाही,
....... असे सगळे जुळून आले कि ,
मी माझेच अपहरण करेन ....
मी (शतशब्दकथा )
"चहा झालाय का ग ? " आल्या आल्या श्रीरंग मधूरावर ओरडला
"अोरडायला काय झाल ? 'मी' तुमचच कपाट लावत होते. काय तो पसारा ..'मी' आहे म्हणून काय ते घर टिकलयं..नाहीतर उकीरडा करुन ठेवला असता सगळा ."
"जास्त बोलू नको आता.. आधीच ऑफिसच टेंशन.. तिथे सगळेजण टिपूनच बसलेत 'मी' केलेल्या कामाचं क्रेडिट घ्यायला. .."
"पप्पा तुम्हाला ना घरी कसं वागायच काहीच कळत नाही. ऑफिसचा राग घरी का आणता? " राघव श्रीरंगला म्हणाला
" वा..'मी' तुला या जगात आणलो आणि मला अक्कल शिकवतो ? अभ्यास कर जा.."
३५ रियाल
वेंकटने तीन हजार रियाल खात्यात जमा झाल्याचे स्क्रीनवर पाहिले. सिगरेट क्रश केली. उठला. पुढच्या महिन्यात किमान शंभर रियाल तरी वाढवा, नाहीतर हा मी निघालो सौदीला, असं उद्या बॉसला दमात घेऊन सांगायचं, असा विचार करून तो पार्किंगकडे वळला.
मला भेटलेले रुग्ण - १४
"चव नै न ढंव नै सोंगाडी"
"चव नै न ढंव नै सोंगाडी" - २०१६च्या युनिक फिचर्सच्या 'अनुभव' च्या 'कॉमेडी कट्टा' या दिवाळी अंकात आलेली अस्मादिकांची अहिराणी कथा
********
सरसगडची सुरस सहल
सरसगडाच्या ९६ पायरी जिन्याच्या पायथ्याशी आम्ही अडलो होतो. छे! हा तर अवघड रॉक पॅच होता. हा काही आपल्याला जमणार नाही. चला परत. कारण पालीत राहणार्या एका अनुभवी माणसाने आम्हाला सांगितलेलेच होते की साठीच्या वरील लोकांसाठी सरसगड काही सोपा नाही. त्यांनी तर जाऊच नये तिथे.
मराठी दिन २०१८: धुयानी होयी नी धुयवड (अहिराणी)
धुयानी होयी नि धुयवड
लोकेसहो!
धुयवड खेयनात ना! आम्हन्या धुयामां बी होयीना येगळाच रंग चढस.
मन्हा बाबा सांगे..त्यासन्हा टाईमले धुयवडनी मोठी धमाल व्हये.