पुनश्च टेबल माऊंटन
मागच्या वर्षी केप टाऊनला कामानिमित्त जाऊन आले, त्यानंतर परत लगेच जाता येईल असं वाटलं नव्हतं (झैरात-http://www.misalpav.com/node/38109). पण पुन्हा एकदा मला नेण्यापुरता प्रोजेक्टकडे फंड आहे, हे सांगत दीडेक महिन्याभरानंतरची तारीख नक्की करणारा तिथल्या प्रोफेसरचा मेल आला, आणि तयारीची गडबड सुरू झाली. मागच्या वेळेस भेटलेल्या लोकांना कळवणे, वर्षभरातल्या कामाचा आढावा घेणे या सगळ्या धामधुमीत दसरा-दिवाळी पार पडली. माझ्या नशिबाने व्हिसा वेळेत आला, पण जाण्याच्या दिवशी पर्यंत करन्सी मिळालेली नव्हती.