प्रवास

मनाचा एकांत - स्मरणाचा काटा

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
14 Oct 2016 - 10:49 am

आत्ता इथे इतके वाजलेत,
म्हणजे आपल्या घरी आता तितके वाजले असतील.....
तिथे आता
हे हे असे असे घडत असेल
आणि इथे हे हे असे असे ..............!
स्मरणाचा एक तास काटा तिथे
तर एक इथे!
बाकी मन,
सेकंद काटा होऊन
सांधणाऱ्या प्रिय समुद्रासारखे
टिकटिकत राहते
दोन किनाऱ्यांमध्ये अष्टौप्रहर..............
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!

-शिवकन्या

अनर्थशास्त्रअविश्वसनीयकविता माझीकालगंगामुक्त कवितासांत्वनामांडणीवावरसंस्कृतीकवितासाहित्यिकसमाजजीवनमानप्रवासभूगोलदेशांतरराहती जागा

डीसेंडींग ट्रेक - लोणावळा (कुरवंडे) ते खोपोली (चावणी) - उंबरखिंड - सह्याद्री ग्रुप - २ ऑक्टोबर २०१६ - (भाग २)

कविता१९७८'s picture
कविता१९७८ in जनातलं, मनातलं
6 Oct 2016 - 8:40 pm

मिपाकर किसन शिंदे यांची लोणावळा रेल्वे स्टेशनवरच भेट झाली. कुरवंडे गावात उतरलो तेथे गाईड गौरु भाउ आमची वाट पाहातच होते. किती जण आले आहेत हे पाहण्यासाठी काउंटींग घेउन चालायला सुरुवात केली तो पाउस सुरु झाला.

१० मिनीटे चढ चढल्यावर चावणी गावापर्यंत उतरणीचा रस्ता असल्याने सर्व अगदी मजेत , फोटो काढत चालले होते. चढ संपल्यावर छोटा पठारसदृश भागात उभे राहील्यानंतर आधी सर्वांची ओळख परेड झाली. आम्ही जिथे उभे होतो तिथेच कुठेतरी शिवाजीमहाराजांनी छावणी बांधली होती असे बरोबर असलेल्या श्री. नागेश धोंगे यांनी सांगितले आणि ऐतिहासिक उंबरखिंडीची खुप छान माहीती सांगितली ती अशी.....

प्रवासआस्वाद

डीसेंडींग ट्रेक - लोणावळा (कुरवंडे) ते खोपोली (चावणी) - सह्याद्री ग्रुप - २ ऑक्टोबर २०१६ - (भाग १)

कविता१९७८'s picture
कविता१९७८ in जनातलं, मनातलं
4 Oct 2016 - 8:32 am

डोंगर नद्या हे लहानपणापासुन पाहत आल्याने आणि माझ्या पदयात्रेचा रस्ताही अशाच भागातुन जात असल्याने ट्रेक हा प्रकार तसा मला नवखा नाही. पण अनोळखी ग्रुप बरोबर पहिल्यांदा खर्‍या अर्थाने ट्रेक केला तो २०१५ च्या महीला दिनाच्या दिवशी. माझ्या एका मैत्रीणीने मला सांगितले की सह्याद्री म्हणुन एक ट्रेकींग गृप आहे जो श्री शैलेंद्र सोनटक्के लीड करतात आणि श्री महेंद्र भोर, कविता नवरे, विश्वेश नवरे, नागेश धोंगे आणि अजुन २-३ मंडळी त्यांच्याबरोबर बाकीच्या जबाबदार्‍या संभाळतात. हा ग्रुप नो प्रोफीट नो लॉस बेसीस वर चालतो. या ग्रुप ने महीला दिना निमित्त महीला विशेष ट्रेक आयोजित केला आहे.

प्रवासआस्वाद

नाकासमोर म्हणजेच वळत वळत? हा काय चावटपणा?

स्वीट टॉकर's picture
स्वीट टॉकर in जनातलं, मनातलं
21 Sep 2016 - 8:02 pm

आपण नकाशावर जेव्हां भारताहून अमेरिकेकडे जाणार्या विमानांचे मार्ग बघतो तेव्हां आपल्याला एक गोष्ट खटकते. सारे मार्ग वक्राकार दिसतात. यूरोप (ऍटलांटिक) वरून जाणारा मार्ग सारखा डावीकडे वळत वळत गेल्यासारखा दिसतो आणि जपान (पॅसिफिक) वरून गेलेला उजवीकडे. तीच गत बोटींच्या मार्गांची. आकाशात आणि पाण्यात ट्रॅफिक नसतो, तर हे शहाणे सरळसोट का जात नाहीत? हा मुद्दा वेगवेगळ्या वेळेस मिपावर उपस्थित झाला आहे. शिवाय माझ्या व्यनिमध्ये देखील ही विचारणा झाली आहे.

विचारलंत ना? घ्या आता!

कथाप्रवासभूगोलदेशांतरलेखमतमाहितीप्रश्नोत्तरे

डुलकी

भटकीभिंगरी's picture
भटकीभिंगरी in जनातलं, मनातलं
21 Sep 2016 - 6:48 pm

तो २००८ सालातील ११ मी हा दिवस होता. मी केसरी टुर्स सोबत ओस्ट्रेलिया टूरवर गेले होते. त्या दिवशी आम्ही सिडनीहून सकाळी ८ वाजत कॅनबेरा या कॅपिटल सिटीमध्ये गेलो. जाताना बसमधून बाहेर निसर्गाने उधळलेल्या सौदर्याचा आस्वादघेत गेलो. पूर्वीची राजधानी सिडने होती. पण सिडने समुद्र किनार्यावर आहे. आणी राजधानी समुद्रकिनार्यावर असणे सुरक्षेच्या दृष्टीने ठीक नाही म्हणून नंतर ती कॅनबेराला आणली.

प्रवासअनुभव

पुस्तकपरिचय: 'भय इथले...' - आतिवास सविता.

एस's picture
एस in जनातलं, मनातलं
18 Sep 2016 - 3:13 pm

‘भय इथले... तालिबानी सावट : प्रत्यक्ष अनुभव’
लेखिका – आतिवास सविता.

संस्कृतीसमाजप्रवासआस्वादसमीक्षा

तीन दिवस दोन रात्री : भाग १

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in जनातलं, मनातलं
16 Sep 2016 - 1:47 am

(अनुभव खरा, नावे खोटी)

त्या नोटांच्या बंडलातून सराईतपणे एक एका नोटेवर अंगठ्याचे बोट फिरत होते. ती दहाची नवी कोरी करकरित नोट हळुवार निसटली. अंमळ झटका घेऊन तीच्या डोक्यावरुन खाली घरंगळली. मऊसूत खांद्यावरुन येऊन उभारलेल्या वक्षावर क्षणभर स्थिरावली, पुढच्या क्षणी फिरून खाली ओघळली. घागर्‍याच्या निर्‍यांमधून लपत-छपत कार्पेटवर पडली. त्या निर्जीव नोटेवरल्या हसर्‍या गांधीजीच्या चष्म्यावर तिच्या टोकदार हायहिलची टाच पडली. गांधींचा चष्मा फुटला नाही पण माझ्या आतमधे खोल कुठेतरी, काहीतरी खळ्ळंकन फुटलं.

................................................

संस्कृतीवाङ्मयकथासमाजजीवनमानप्रवासमौजमजाअनुभवविरंगुळा

एक स्पॅनिश टोपी

सुहास बांदल's picture
सुहास बांदल in जनातलं, मनातलं
8 Sep 2016 - 2:54 pm

ऑनलाईन बँकिंग आता आपल्या जीवनातील रोजचा भाग आहे. गेल्या एका दशकात आपण बरेच त्यात निपुण झालो आहोत. तरी आपल्याला वाटते कि आपल्याला सगळे माहित आहे आणि आपण एवढी काळजी घेतो कि आपल्याला कोण टोपी घालणार आहे. आमच्या आयुष्यात हा टोपी घालण्याचा प्रसंग ८ महिन्यांनपुर्वी घडुन आला आणि प्रस्थापित मुलतत्वाला सॉलिड धक्का लागला.

प्रवासअनुभव

माहिती हवी आहे.

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
4 Sep 2016 - 6:55 pm

खालील माहिती हवी आहे.बरीचशी शोधाशोध करुनही न मिळाल्याने मिपाकरांकडे आलो आहे.अाता सर्वजण गणेश आगमनाच्या तयारीत असतील.त्यामुळे नमनाला घडाभर तेल न घालता थेट प्रश्न विचारतो.

1)पूर्वी CNBC या वाहिनीवर GE (General Electric)corporation ची एक जाहिरात लागत असे.बरीच मोठी अशी ही जाहिरात होती.या जाहिरातीत tion वरुन शेवट होणार्या बर्याचश्या शब्दांचा,विशेषणांचा वापर केलेलं हे गाणं होतं याचा व्हिडिओ किंवा Mp3 आंजावर कुठे मिळेल?

संस्कृतीसंगीतइतिहासकवितासाहित्यिकसमाजप्रवासभूगोलज्योतिषफलज्योतिषकृष्णमुर्तीमौजमजा

माझा सायकल प्रवास….

नपा's picture
नपा in जनातलं, मनातलं
18 Aug 2016 - 11:44 am

सेमिस्टर नंतर आपल्या गावी आपण सायकल वर जाऊया..!!
का?...उगाच
अभियांत्रिकीच्या तिसऱ्या सेमिस्टर ला हा किडा आम्हा मित्रांना चावला. अति उत्साहात बरेच जण तयार झाले.
पण दर वेळी परीक्षा देऊन थकलेलो आम्ही, या ना त्या कारणाने आपापल्या गावी (अर्थातच केलेल्या संकल्पाला फाट्यावर मारून) विनासायास आणि विनासायकल पोहचायचो. अधून मधून तो किडा पुन्हा पुन्हा डोकं वर काढायचा, चावायचा आणि पुन्हा गायब व्हायचा. नंतर अचानक लक्षात आला कि आता हे तर शेवटचे वर्ष, मग मात्र मी पुन्हा एकदा सगळ्यांना विचारले कि कोण कोण तयार आहे सायकल सवारीला ला?

प्रवासमौजमजाअनुभवविरंगुळा