गाईन मीच गाणी, गर्दभ नका म्हणू...
जिलब्या इथे कुणाला का आवडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये
लपला टवाळ कोठे? तू शोधशी मला...
हातात आज धोंडा या सापडू नये...
गाईन मीच गाणी, गर्दभ नका म्हणू
आधीच सांगतो मी, कोणी नडू नये
राजाच मी मनाचा, हासू नका कुणी
खरडेन लेख माझे, तेव्हा रडू नये..,
तूही जरा चरावे, मीही चरेन ना,
बेकार भांडणांनी दोघे सडू नये
नाहीस तू तरीही आहे निवांत मी,
माझ्याविना तुझेही काही अडू नये,
वागा हवे तसे रे, जखमा नका करू
वाढेल वाद, वाढो, नाते झडू नये ...
नव-हझलकार इरसाल म्हमईकर