पुण्यवंतांची स्मारके आणि वाद घालणारे आपण करंटे

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
18 Nov 2015 - 4:12 am

डिक्स्लेमरः सदर लेख कोणत्याही जात, धर्म, पंथ, राजकिय पक्ष, विचारसरणी विषयी किंवा त्या विरूद्ध भाष्य करीत नाही. लेखातील विचार केवळ लेखकाचे वैयक्तीक आहेत. लेखकाची सामाजिक वागणूक आणि विचार या लेखात आलेल्या विचारसरणीस अनुसरून असतीलच असे नाही.

साहित्याचं नोबेल मिळवणारे प्रसिद्ध इंग्रजी लेखक रुडयार्ड किपलिंग यांच्या मुंबईतील जन्मस्थळावरुन वाद सुरु झाला आहे. (संदर्भः "किपलिंगच्या शोधात.." ओंकार करंबेळकर, मंथन पुरवणी, दै. लोकमत)
बाबासाहेबांचे लंडनमधील निवासस्थान घेण्याचा मार्ग मोकळा - दै. सकाळ
महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं स्मारक - दै. महाराष्ट्र टाईम्स
बाळासाहेबांच्या महापौर बंगल्यातील स्मारकाला राजचा विरोध - दै. महाराष्ट्र टाईम्स
डॉ. आंबेडकरांच्या घर खरेदीवरून घोळ कायम -दै. सकाळ
अरबी समुद्रातील शिवस्मारकाला केंद्राची मान्यता -मुख्यमंत्री - दै. माझा पेपर
बुरज खलिफा उभारणारेशिवकास्मारकापासून दुरच - दै. महाराष्ट्र टाईम्स
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळ उभारणीतही लाखोंचा घोटाळा! - दै. लोकसत्ता
Rs 200 crore for Sardar Vallabhbhai Patel statue, but only Rs 100 crore for women across India - DNAIndia.com
How economically viable is the Statue of Unity of Sardar Vallabhbhai Patel? - quora.com
इंदु मिल पर ही बनेगा अंबेडकर स्‍मारक - आजतक.कॉम

सदर लेख लिहीण्याचे मनात बर्‍याच दिवसांपासून घाटत होते. वेळेअभावी म्हणा किंवा विषय तसा वादाचा असल्याने म्हणा, पण लेख लिहीण्याचे टाळत होतो. बर्‍याच म्हणजे खुप काही वर्षंपुर्वी, साधारणतः सात वर्षंपुर्वी मी धुळ्याला जाणे झाले होते.पावसाळ्याचे दिवस होते. नाशिकपासूनच पावसाला सुरूवात झालेली होती. धुळ्याच्या अलीकडे दहा एक किलोमिटरवर लळींग घाट लागतो. त्या घाटात धुवांधार पाऊस चालू होता. तेथेच एका ठिकाणी "लांडोर बंगला - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथे वास्तव्य केले" अशा अर्थाची एक पाटी वाचनात आली होती.

वरील संदर्भासहीत बातम्यांचे मथळे पाहीले की पुण्यस्मरणीय व्यक्तीमत्वांची स्मारके व त्यातून उद्भवणारे वाद ही एक साखळी मालीका आहे असे वाटते. वरील बातम्या ह्या बहुतकरून महाराष्ट्रासंबंधीत व्यक्ती किंवा थोर समाजपुरूषांबाबतीत आहेत. परंतु ही केवळ महाराष्ट्राची प्रादेशीक वस्तूस्थिती नाही. असलेच वाद संपुर्ण देशात असलेल्या थोर विचारवंत, नेते, स्वातंत्र सैनीक यांच्या असलेल्या किंवा होवू घातलेल्या स्मारकांबाबत असू शकतात याबद्दल खात्री आहे.

जे जे स्कूल ऑफ आर्ट येथील एका बंगल्यात लेखक रुडयार्ड किपलिंग यांचा जन्म झाल्याबद्दल किवंदता आहे. याला ठोस पुरावा नाही. येथे असलेल्या बंगल्याला किपलिंग यांचे जन्मस्थान घोषीत करावे व तेथे त्यांचे स्मारक उभारावे यासाठी तेथील व्यवस्थापनाने प्रयत्न चालू केले आहे. त्यानंतर तेथेच व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचेही स्मारक येथे करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या दोन्ही स्मारकांना जेष्ठ चित्रकार मंडळींनी विरोध केला आहे.

कालच माननिय बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक महापौर बंगल्यात करण्याची घोषणा माननिय मुख्यमंत्र्यांनी केली. त्या प्रस्तावास राज ठाकरेंनी विरोध केलाच पण शिवसेनेला तो बंगला बळकवायचा आहे अशा अर्थाचे भाष्य केले.

माननिय बाळासाहेब ठाकरेंचा अंत्यविधी ज्या शिवाजी पार्कवर झाला तेथील जागा त्यांच्या अंत्यविधीनंतर अशीच वादाची ठरली आहे.

इंदू मील मध्ये माननिय बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व्हावे यासाठी बरेच वाद झालेत. असलेच वाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लंडनमध्ये असतांना ज्या ठिकाणी राहीले ते ठिकाण महाराष्ट्र सरकारने खरेदी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबतीत झाले होते.

शिवछत्रपती शिवाजीमहाराज यांचे अरबी समुद्रातील स्मारक असलेच वादाचे ठरले आहे. हीच गत सरदार सरोवरातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याबाबत आहे.

थोडक्यात स्मारके म्हटले की वाद हातात हात घालून येतातच.

खर्‍या अर्थाने विचार केला की असे वाटते खरोखर या स्मारकांची गरज आहे काय? पुर्वी जे काही महापुरूषांच्या पुतळ्यांसर्दर्भात व्हायचे तेच आता या स्मारकाबाबत होवू पाहते आहे. पुर्वी प्रत्येक सण हा एक संस्कार असलेली घटना होती. आजकाल प्रत्येक सणाचा समारंभ होतो आहे. याच समांतर संदर्भाने पुर्वी पुतळे होते आता त्या पुतळ्यांचे स्मारके होत आहे असे म्हणावे लागेल.

एखादा महापुरूष हा सर्व अर्थाने समाजाचा असतो. समाजकार्य म्हटले की आपण सामान्यजन दररोज कंपनीत किंवा ऑफीसमध्ये जातो तसे; १० ते ६ या वेळात त्याला एका ठिकाणी बसून समाजकार्य करणे शक्य नाही. तो महापुरूष त्याच्या जीवनकालात अनेक ठिकाणी जातो, अनेक गावांमध्ये जावून बैठका घेतो, भाषणे देतो, उद्बोधन करतो. काही वेळेस त्या त्या विवीक्षीत ठिकाणी तो प्रार्थना करतो. काही कालावधी व्यथित करतो. काही वेळेस तो एखाद्या ठिकाणी अभ्यासासाठी राहतो, दिक्षा घेतो किंवा काही वेळेस तेथे त्याचा जन्म होतो किंवा अंत होतो किंवा अंतीम संस्कार तेथे केले जातात.

ह्या सार्‍या घटना थोर महापुरूष तसेच सर्वसामान्य व्यक्ती आदींबाबत घडतच असतात. सर्वसामान्य आयुष्य जगतांना असल्या घटनाचक्रातून जातांना काही ठिकाणे त्या त्या व्यक्तींच्या आयुष्यात येत असतात.एखादा सेल्समन, एखाद्या कंपनीचा एमडी किंवा एखादा सरकारी कर्मचारी उदाहरणार्थ कलेक्टर, तहसीलदार आदी. आपाआपल्या कार्यबाहूल्यासाठी निरनिरार्‍या गावांत जात असतात. थोर महापुरूषांनी वास्तव्य केलेल्या किंवा त्यांचा स्पर्श झालेल्या प्रत्येक जागा ह्या त्यांच्या स्मारकात रूपांतरीत करता येत नाहीत. त्याचप्रमाणे इतर ठिकाणीही त्यांच्या स्मारक उभारणीबाबत आग्रही राहणेही योग्य होत नाही. उदाहरणार्थ सरदार पटेल यांचे स्मारक सरदार सरोवरात करणे हे सर्वाथाने अयोग्य आहे. हीच स्थिती शिवछत्रपती महाराजांच्या अरबीसमुद्रातील स्मारकाबाबत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मीलमधील स्मारकाबाबत, बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क किंवा आताच्या महापौर बंगल्यातील स्मारकाबाबत आहे.

शिवरायांचे खरे स्मारक तर त्यांचे किल्ले आहेत. डॉ. बाबासाहेबांचे स्मारक हे नागपुरची चैत्यभुमी किंवा दादर येथील महापरीनिर्वाण स्थळ आहे. सरदार पटेल यांचे गुजरातमधील जन्मस्थान हे स्मारक म्हणून उभारले गेलेही असेल. रूपयार्ड किपलींग हे जे जे स्कूल येथील घरात जन्मले किंवा नाही हा तर वादच आहे. परंतु तेथे आर के लक्ष्मण यांचे स्मारक ते केवळ व्यंग्यचित्रकार आहेत आणि व्यंगचित्रकला ही चित्रकलेची एक शाखा आहे म्हणून उभारणे हे अनुचित नाही. हाच न्याय लावायचा असेल तर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकदेखील जे जे स्कूल मध्ये व्हावे ही(न केली गेलेली) मागणी उचित आहे काय?

दुसरा मुद्दा निघतो तो असा की, यापुढील समाजाजात जे जे महापुरूष, थोर पुढारी, नेते उदयाला येणार आहेत त्यांची स्मारके कोठे उभारणार याचा. आजकाल गल्लोगल्ली समाजपुरूष उदयाला येत आहेत. निरनिराळी समाजरत्ने उद्धार करण्यासाठी गल्लोगल्ली जन्माला येत आहेत. त्यांचे पुढे जावून निधन होणार आहे. त्यांची स्मारके जागोजागी उभी राहणार आहेत. असे असेल तर प्रत्येक शहरात, गावांत आणि गल्यांत कितीतरी समाजउद्धारकांची स्मारके उदयाला येतील. कदाचित त्याही पुढील समाजधुरीणांच्या स्मारकासाठी जागाच उरणार नाही.

केवळ बोधीवृक्षाखाली बसले म्हणून कोणी सर्वसामान्य व्यक्ती गौतमबुद्ध यांच्या योग्यतेचा बनत नाही. गौतमबुद्ध यांची योग्यता बुद्धीमत्ता सर्वार्थाने अगणीत होती त्यामुळेच ते गौतमबुद्ध बनले. बोधीवृक्ष नसता तरी ते दुसर्‍या कोणत्याही झाडाखाली बसले असते तरी त्यांना तेथे ज्ञान अवश्य प्राप्त झाले असते. शिवाजी महाराज यांची योग्यता केवळ त्यांच्या गडकिल्यांनी होत नाही. त्यांचे आचरण अनुसरणे हेच एक स्मारक आहे. आज ज्या ठिकाणी रायगड किल्ला आहे, त्या ठिकाणी भौगोलीक अनुकूलता असल्यानेच त्यांनी त्या ठिकाणी तो बांधला. त्यांना किल्ला कोठे बांधावा, कसा बांधावा याचे योग्य ज्ञान होते. त्या योग्यतेचे त्यांचे सल्लागारही होते. त्यामुळे आज ज्या ठिकाणी त्यांचे किल्ले आहेत ते ठिकाण कदाचित योग्य नसते तर त्यांनी सुयोग्य स्थळी बांधले असते. हे किल्ले बांधतांना किंवा इतर महापुरूषांच्या बाबतीतले अभ्यासाचे ठिकाण, जिवनकाल घालविलेले ठिकाण हे स्मारक व्हावे असे त्यांना कदापिही वाटले नसेल. केवळ त्यांच्या अनुयायांचा रेटा मोठा आहे म्हणून ती स्मारके त्या त्या ठिकाणी बांधली जातात. पुढे जावून ती स्मारके त्या पुण्यात्मांची स्मरणाची ठिकाणे न बनता पर्यटनस्थळे होतात.

कित्येकवेळा स्मारक बनणे तर दुरच पण त्या स्मारकापित्यर्थ आपण करंटे वाद घालतो. स्मारक बनवतांनादेखील आपण आपल्या कोत्या बुद्धीची चुणूक दाखवतो. तेथे कॅफेटेरीया हवा, बोट जाण्यासाठी स्वतंत्र जेटी उभारणे, पर्यटकांनी राहण्याची जागा उभारणे, त्यांच्या स्मृतीभेटी खरेदी करण्यासाठी दुकाने उभारणे आदी व्यापारी वूत्तीच्या खुणा आपण तेथे सोडतो. तेथे भेट देणारा पर्यटक हा केवळ उपचार म्हणून भेट देतो अन बाहेर पडतांना सामान्य माणूस म्हणून बाहेर पडून रस्त्यात पान खावून थुंकतो, लायसन्स नसतांना, विना हेल्मेटचा नो एंट्रीत गाडी हाकतो. किंवा प्रत्यक्ष त्या स्मारकाला भेट देतेवेळी आपल्या अधिकाराचा वापर करून स्मारकाच्या तिकीटामध्ये कन्सेशन मागतो किंवा लाईन तोडून पुढे जातो.

पुन्हा एकदा डिक्स्लेमरः सदर लेख कोणत्याही जात, धर्म, पंथ, राजकिय पक्ष, विचारसरणी विषयी किंवा त्या विरूद्ध भाष्य करीत नाही. लेखातील विचार केवळ लेखकाचे वैयक्तीक आहेत. लेखकाची सामाजिक वागणूक आणि विचार या लेखात आलेल्या विचारसरणीस अनुसरून असतीलच असे नाही.

समाजप्रकटनविचार

प्रतिक्रिया

रमेश आठवले's picture

18 Nov 2015 - 6:25 am | रमेश आठवले

महापौर बंगल्याची जुनी वास्तु शिव सेने पासून सुरक्षित ठेवली पाहिजे. राज ठाकरे यांच्याशी सहमत.

रमेश आठवले's picture

18 Nov 2015 - 6:25 am | रमेश आठवले

महापौर बंगल्याची जुनी वास्तु शिव सेने पासून सुरक्षित ठेवली पाहिजे. राज ठाकरे यांच्याशी सहमत.

एकाच ताटात जेवले आणि आता ---घालतात एकमेकास शिव्या.काही खरं नाही.
आपण बसू भांडत अन ते पुन्हा एक होतील.

मोगा's picture

18 Nov 2015 - 9:00 am | मोगा

जनतेच्या घामातून उभारलेल्या वास्त्तू हडपणे हा राजघराण्यातील राजपुत्रांचा जुना उद्योग आहे.
चांगल्या वास्तू राजपुत्रानी हडपून मोडकळीला आलेले गड किल्ले लोकशाहीच्या गळ्यात मारले जातात.

किल्ल्यांकडे सरकारचे दुर्लक्ष आहे असेही हॅच राजकारणी बोंबलत असतात.

असला कोतेपणा दाखवण्याऐवजी ठाकरेनी एखादा मोडकळलेला किल्ला उदा रायगड घेऊन स्वतःची धनराशी + सेनेचा पैसा + जनतेचा पैसा+ सरकारी सोयीसुविधा यांच्या मदतीने त्यावर स्मारक उभारावे.

मोगा's picture

18 Nov 2015 - 11:14 am | मोगा

साहेबांचे स्मारक रायगडावर उभारावे.. महाराज एकटे आहेत. सोबतीस साहेबाम्ची साथ होइल