दौलतजादा

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जे न देखे रवी...
18 Nov 2015 - 9:26 pm

सरपटत येणाऱ्या हुंदक्यांचे
नाक चोंदुन पायबंध घालताना
फोडणीच्या भातावर
लिंबु पिळुन खाताना
तुळशीपत्राचे वृंदावन
लाथेने उडवताना
डबल बॅरल काढुन
रानडुक्कर टिपताना
मरतुकड्या बामणाला
दगड फेकुन घालताना
विसरु नकोस
हा दौलतजादा तुझ्या बापजाद्यानं कमावलाय
अंधारवाड्यातील भयकिंकाळ्या ऐकुन
रुळलेली वाट वाकडी करताना

°°°°°°°°°°°

थरारनाट्याचा दुसरा अंक लिहीला जातो
निसरड्या बाहुपाशात श्वास गुदमरुन जातो
समुद्राची भिती काळजात घुसत जाते
बेफिकीर वटवाघुळ केविलवाणे तडफडतं
जेव्हा कुठुणशी एक कुणकुण कानावर येते
आणि आता ही तलवार सरकन मागे फिरवताना
विसरु नकोस
हा दौलतजादा तुझ्या बापजाद्यानं कमावलाय
अंधारवाड्यातील भयकिंकाळ्या ऐकुन
रुळलेली वाट वाकडी करताना

मुक्त कवितासमाज

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

19 Nov 2015 - 11:19 am | चांदणे संदीप

दौलतजादा = ?
जायजाद(तेच ते - जायदाद/मालमत्ता/संपत्ती/इस्टेट/Property ) वगैरे का? नसाव बहुतेक! कोणीतरी हिरो आहे हा...अंधाराचा सुपरहिरो किंवा निंजा किंवा सामुराई किंवा मार्सिनरी??

डोक्याला मुंग्या आल्या राव!
लिहिलंय परिणामकारक पण....

बाबा योगिराज's picture

19 Nov 2015 - 5:30 pm | बाबा योगिराज

_____/\____

जव्हेरगंज's picture

19 Nov 2015 - 6:14 pm | जव्हेरगंज

धन्यवाद संदिप, बाबाजी!

थोडं स्पष्टीकरण देतोच,
कविता 'बडे बाप की बिगडी हुई औलाद' ला समोर ठेऊन लिहीलीय.
दौलतजादा=संप्पत्ती हे गृहित धरलयं.
:)