जनोबा रेग्याचे वंशज!
जर तुम्ही पू लं चे चाहते असाल तर जनोबा रेगे हा इसम/व्यक्तिरेखा तुम्हाला माहिती नाही असे होणे शक्य नाही. बटाट्याच्या चाळीतला एक अफलातून विनोद बुद्धी असणारी ही व्यक्ती. चाळीत खर म्हणजे एकापेक्षा एक नमुने आहेत, पण ह्याची बात काही औरच. ह्या व्यक्तिरेखेची 2 ठळक वैशिष्ट्ये, अत्यंत मोजक्या शब्दात विनोद निर्मिती आणि अफलातून म्हणावी अशी टायमिंग. एखादा अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे त्यात सगळे गंभीरतेने चर्चा करत आहेत आणि अशा वेळी अचानकच असं काहीतरी ही व्यक्ती बोलून जाते की त्या प्रसंगाच गांभीर्य समूळ नष्ट होऊन जातं आणि चालू असणारी गोष्ट खरोखरच गांभीर्याने घ्यायची गरज आहे का असा प्रश्न निर्माण होतो.