जानराव : येका संडासाची कथा
अमदा आमच्या सल्लू भाईची ट्यूबलाइट काही पेटली नाही, पार फ्युज उडाला. लइ बेक्कार वाटल जी. सालभर भाइच्या पिक्चरची वाट पायलीआन असा पचका झाला. सल्लू भाइनच असा पचका केल्यावर आम्ही कोणाचे पिक्चर पाहाचे? आता टायगर येउन रायला हाय. तसा खिला़डी भारी हाय, मस्त फाइटा मारते पण तो बी फायटा गियटा माराच्या सोडून संडासवाला पिक्चर घेउन आलता. ज्यान हवेत उडी मारुन कोणाले हवेतच उचालाच तो संडासात बसाच्या गोष्टी सांगत होता. हे का टाकीजमंधी जाउन पाहाची गोष्ट हाय? आपण तर तवाच ठरवल हे अस पिक्चर पाहाचच नाही. नाही पायल म्या, तिकड भटकलो बी नाही. पण म्हणते ना नशीबात जे असन ते चुकत नाही.