उंच उधळला इकडून तिकडे, बापाचे (काय) चुकले
भंजाळून पडला तोंडावर खाली, भावानेही धुतले
दुरूनच पाहुनी पटकन आला, वर्दीने(ही) ठासले
पारावरती विसावलो अन तिथेच चुकले
खबर होता कर्णोकर्णी, बघ्यांचेही फावले
तडफडलो पण थांबले नाही, सगळ्यांनीच धुतले
सुजून गेली अंगे सगळी, प्लास्टरही घातले
पाटलीणीस चुकून आपले म्हटले, (अख्ख्या) गावाने धुतले...
प्रतिक्रिया
2 Dec 2017 - 8:43 pm | नाखु
पेर्णा कुठाय?
2 Dec 2017 - 9:48 pm | टवाळ कार्टा
कोणी पेर्णा क्वितेच्या आधी अॅडवेल का? बर्याच दिव्सांनी कैतरी ल्हिले आहे त्यामुळे घैघैमध्ये पेर्णा टाकायची राहून गेली
5 Dec 2017 - 10:35 am | पगला गजोधर
धुतले रे अंगन माssझे, धुतले रे ...||धृ||
मधूनच पाऊस, मधुनीच थंड वारे...
ओखी आले दारी टुन्न म्हणूनच कारे ?
रुजवले चक्रमाने का त्या, मनी प्रीतीचे धुमारे ....?
गुलाब समजून निवडुंगाचा कवटाळ आता निस्तररे...
लॉज नाही नशिबी, आता हॉस्पिटलचे बिस्तर रे....
6 Dec 2017 - 2:33 pm | टवाळ कार्टा
=))
6 Dec 2017 - 4:20 pm | पगला गजोधर
टका, केवळ तुझी मिपावरची कविता आहे, म्हणूनच "अंगन",
असा शब्दप्रयोग मी प्रतिक्रियेत केलाय बरें !
2 Dec 2017 - 9:05 pm | पगला गजोधर
ऑ आमच्या टक्कुमक्कुशोनुला कुनी धुतले म्हणायचे ??
4 Dec 2017 - 2:29 pm | प्रचेतस
गुर्जीस्टाईल विडंबन असेल असे वाटून अधीरतेने वाचावयास उघडले पण निराशा झाली.
4 Dec 2017 - 7:18 pm | टवाळ कार्टा
=))
तसे काही लिहिले की लोक नावे ठेवतात
4 Dec 2017 - 4:36 pm | पैसा
आता लौकरात लौकर एक पाटलीन शोधाच!
4 Dec 2017 - 8:37 pm | प्राची अश्विनी
विडंबन नही जम्या.
5 Dec 2017 - 11:47 am | सतिश गावडे
ऑ अच्च जाल तर
6 Dec 2017 - 3:00 pm | सूड
अन्भवी टक्कोजी!!