एक दिवस तरी लहान "बाबू" बनून बघावे
का म्हणून दिवसेंदिवस प्रौढच बनत जावे ?
का म्हणून आपणच सारं खांद्यावर वाहावे ?
थोडं मागं वळून बघा , कोरी पाटी नि पेन्सिलचा तुकडा दिसेल
ती हातात घेऊन बसलेला एक छोटा बाबू दिसेल
एक दिवस तरी लहान बाबू बनून बघावे
दुद्धु दुद्धु म्हणून ओरडावे
वाटेल तिथे फतकल मारून बसावे
दिसेल त्याचे केस उपटावे
आडवंतिडवं पडून त्रागा करावे
बाबू जे जे करतो ते ते मनापासून करावे
हमसून हमसून रडावे
घरातल्यानी पण तोंडात बोट घालावे
इतके साऱ्या घरभर लोळावे
रांगत रांगत चड्डीवर फिरावे
